खरंच खारुताई महान आहेत ! एवढी विधायक कामे करणार्या खारुताई मात्र नेहमीच उपेक्षित राहिल्या त्याचं मला बालपणापासुनंच वाईट आलं आहे. खारुताईंनी जर रामाला मदत केली नसती, तर रामाचं जिंकणं केवळ नामुनकीनंच नाही तर अशक्य पण होतं . खारुताईच्या पाठीवर उठलेले वळ रामाने हात फिरवल्यामुळे आले आहेत असे कविचे म्हणने आहे. वैज्ञानिक दृष्टिकोणातुन पाहिले असता , त्या खारुताई ला रामाच्या बोटांची भयंकर अॅलर्जी असावी. आणि ती अॅलर्जी एवढी भयंकर असावी की खारुताईच्या डिएनए मधे अमुलाग्र बदल करुन गेली. आणि त्यानंतर आलेल्या कित्येक खारुताईच्या पिढ्या ह्या विकाराने ग्रस्त आहेत / राहतील. झेब्रा , वाघ किंवा अजुन चट्टेपट्टे असलेल्या प्राण्यांच्याही पाठीवरुन रामाने हात फिरवल्या असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तेंव्हाच बहुतेक व्यासाच्या दौतेतली शाई संपली असावी. तेंव्हा ब्लॉगस्पॉट / वर्डप्रेस हवे होते.
" एखाद्या गोष्टीत खारीचा वाटा उचलणे " ह्यातली खारी नक्की चहाबरोबर खायचा एक बेकरीपदार्थ आहे की खारुताईचं टोपण णाव आहे ? असा प्रश्न मला बालपणी चहाखारी खाताना वाटे. ह्या विचारात कित्येकदा माझी खारी चहात भिजुन अगदी राळ झाल्याचेही स्मरते. खारुताई ह्या थोड्याश्या मुंगसासारख्या दिसतात असे माझे प्रामाणिक आणि वैयक्तिक मत आहे. मुंगुस दिसणे जसे शुभलक्षण समजतात तसे खारुताई दिसण्यास समजत नाहीत , इथे खाऊताई वर अन्याय होतो असे मनोमन वाटुन जाते. लहाणपणी सहामाही किंवा वार्षिक परिक्षांणा जाण्या आधी मी नेहमी ओढ्याकडे बळेच टमरेल घेऊन जायचो ( मुंगुस दिसेल ह्या अपेक्षेणे ) पण मला खारुताई दिसायची बर्याचदा. आणि मला पेपर नेहमीच छाण जायचे पण त्याचं श्रेय मी ह्या खारुताई ला कधीच दिले नाही ह्याचा मला आता घोर पश्चाताप होतो .
खारुताईंच्या फॅमिलीत पुरुष पार्टी नेहमीच दुर्लक्षित राहिली आहे असे मला वाटते . कारण कोण्या कवीने किंवा लेखकाणे कधी खारुदादा चा उल्लेख केल्याचे कधी वाचनात आले नाही , आता ताजं उदाहरण वरतीच बघा ना ? हातच्या कंगणा ला राणावत कशाला ? खारुताई ही बहुतेक झाडावर रहात असावी . सगळ्या खारुताया मला लिटरली एक सारख्या वाटतात त्यामुळे त्या एकमेकांना कशा ओळखत असाव्यात असा प्रश्न मी बाबांना एके रात्री विचारला होता. आणि उत्तर मिळे पर्यंत त्यांच्या पासुन हाललो नव्हतो तेंव्हा त्यांनी मला असंच उडवाउडवीचं उत्तर देऊन पळ काढला होता , बरं झालं ते कौन बनेगा करोडपती ह्या बद्दन अँकरीकृत कार्यक्रमात गेले नाहीत. नाही तर हाच प्रश्न त्यांना तिथे आला असता आणि त्यांची पंचाईत झाली असती.
खारूताई म्हणजे खारुताई असते
तुमच्या आमच्या वर्गातली गोंडस मुलगी असते
पोरांची तिच्या मागे लांबच लांब लाईन असते
पण तिला त्याची खबरंच नसते .
खारुताई म्हणजे खारुताई असते
खारुताई आमचे बॉबकट करते
वर्गात नेहमी टॉप नंबरात येते
चालताना नेहमी रुबाबात असते
खारुताई म्हणजे खारुताई असते
आजकाल म्हणे गायनॅक असते
लेबर वॉर्डात सदा पडिक असते
ऑर्कुटच्या स्क्रॅपला तिचे रिप्लायच नसते
खारुताई म्हणजे खारुताई असते
कधी कधी ती चोरुन हलवा खाणारी मनिमाऊ अस्ते
खारुताई म्हणजे खारुताई असते
(कविता "बोळे क्लब " ला समर्पित )
-(कधीकाळी खारुताई च्या बस ची वाट बघणारा) टारझन पिएम्टीकर
प्रतिक्रिया
24 Feb 2011 - 1:17 pm | आत्मशून्य
बालपण आठवले.
24 Feb 2011 - 1:42 pm | टारझन

24 Feb 2011 - 1:53 pm | नगरीनिरंजन
=)) =))
खारुताईनं हलवा खाणे टारुदादाच्या अगदी जिव्हारी लागलेलं दिसतंय. म्हणतात ना "कोणाला कशाचं तर टारुला खारुचं"
24 Feb 2011 - 10:37 pm | आत्मशून्य
"वो कॉलेज के दीन" आठवले.
24 Feb 2011 - 1:59 pm | कच्ची कैरी
बालकविता म्हणुन छान आहे .खारुताई माझीही आवडती .
24 Feb 2011 - 3:49 pm | प्रकाश१११
विदेश
झुपकेदार शेपटीची-
ऐट भारी हो तुमची !
बघुन टकमक इकडेतिकडे
तुरु तुरु पळता कुणीकडे ?
मस्त वाटले. !!