मी माझ्यात बंद ....!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
14 Feb 2011 - 8:12 am

[सर्दीने अचानक बेजार झालो होतो. खूप दिवसांनी अशी जीवघेणी सर्दी.
डोके सुन्न .कान बधीर मन कासावीस . आणि अचानक जाणवले की हे सुन्नपण मस्त वाटतेय.
ऐकू येत नाही .छान वाटतेय. हा कोलाहल हा गोंधळ दुरून बघतोय.
मी माझे तात्पुरते सुन्नपण एन्जोय करीत होतो.तेच शब्दात मांडण्याचा प्रयत्न ]

डोके सुन्न ....!
बधीर ….!!
सर्दीने हैरान ....!!!
काहीच ऐकू येत नाही
झाडाची पाने हलत असतात
कावळे कावकाव करीत झाडावर बसलेली
मला त्यांच्यां चोची फाकलेल्या दिसतात
पण आवाज येत नाही ऐकायला
मी सुन्न बधीर...!
केविलवाणा ...!!
माझे मन, कान,
आजूबाजूचे सगळे आवाज
म्यूट करून ठेवलेत
कोणीतरी ...!

बायको काहीतरी बोलतेय
डोंगराच्या पल्याडचा आवाज वाटतोय तिचा
अगदी निवांत मस्त
आणि एकदम छान वाटायला लागते
ध्यान लावून बसलेय कान
मन ,हे शरीर
हे ब्रम्हांड ..!!
निवांत शांतपन
काहीसे बधीर सुन्न सुंदर
आपलेपण
हवेहवेसे .....!!
शप्पत..!!
मस्त वाटतेय हे निवांतपण
सेंट्रलाईज ए सी. च्यां काच खिडकीतून
खालचा वाहणारा रस्ता
गाड्यांचा बंद गोंगाट
पाखरांची पंख हलवीत निशब्द सरसर
खालच्या लोकांची मूक हालचाल
हे सगळे छान वाटतेय
सुन्न बधीर आपलेपण ...!!

ऐकायला यायचे नाही आईला
म्हणून वैतागून जायची ढीगभर
तिला ऐकायची असते आमच्या नवरा बायकोची कुजबुज
आमचे बहाणे
एकेक डाव
रुसवे फुगवे
मग ती करावयाची ध चा मा

नि आता मी सुन्न बधीर
मस्त ध्यानस्त
आवाजाच्या तोंडावर कोणीतरी हात ठेवून
दाबून ठेवलाय
आवाज बंद आतमध्ये
नाही ऐकू येत काहीपण
मी माझ्यात बंद
काचेच्या पेटीत निवांत
मस्त बहिरा
आपल्यातच गर्क ....!!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

कमाल आहे तुमचि
खरच कविता छान :)

झंम्प्या's picture

14 Feb 2011 - 4:49 pm | झंम्प्या

खूप दिवसांपासून अशी समाधी लागावी अस वाटतंय,

शांत फक्त आपल्याबरोबर आपणच. निश्चल असलेल शरीर समोर बसून पाहत रहाव,

मनात असंख्य विचारांची येजा चालू असते, जशी एखाद्या रेल्वे फलाटावर शांत बसल्यावर असंख्य प्रवासी ये जा करतात त्यांच्याशी आपल्याला घेण देन नसत,

गाडी, चालू झाली कि विजेचे खांब मागे पळतात तशी ह्या विचारांची गत होते.

पण शेवटी जेव्हा परत जायचा विचार येतो त्या वेळी, भीतीच काहूर माजत, कि मागे तर कुठे राहिलो नाही न आपण, गमाउन तर नाही न बसलो आपण. :)

प्रत्तेकाच्या अनुभूतीचा प्रश्न तो शेवटी...

असो... छान वाटली तुमची मुक्त मुशाफिरी...

गणेशा's picture

15 Feb 2011 - 3:41 pm | गणेशा

मस्त कविता