परग्रहावरील जीवसृष्टींचा शोध.

प्यारे१'s picture
प्यारे१ in काथ्याकूट
3 Feb 2011 - 12:25 pm
गाभा: 

मराठेंची विज्ञानकथा वाचून पूर्वी मनात आलेला एक थोडा वेगळा विचार मांडावासा वाटला.

माहितगार व्यक्ति (मुख्यत: भौतिकशास्त्राचे अभ्यासक) शक्याशक्यतांचा विचार करुन अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देतील ही अपेक्षा.

पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. (मॅटर????)
त्यातून आलेल्या /मिळालेल्या/ प्रक्रिया केल्या गेलेल्या धातू, वगैरेंपासूनच (जी पृथ्वीतत्वाची आहेत) आपली उपकरणे बनलेली आहेत. तसेच येथील जीवसृष्टी ही पृथ्वी तत्वापासून बनलेली. आपण इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेताना या उपकरणांचाच वापर करतो आहोत.

जर एखाद्या ग्रहाचा अथवा तार्‍याचा मूळ स्त्रोत अग्नितत्व असेल, जलतत्व असेल तर त्या ग्रह, तार्‍यावरील असलेली सृष्टी ही तशीच असेल.

मग आपली ही उपकरणे अशा वेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीची माहिती देऊ शकतील का? मुळात ती तशा वातावरणात कशा प्रकारे टिकू शकतील ?

जसे द्रव पदार्थ लिटरमधे आणि घन पदार्थ किलोग्रॅममधे मोजण्याची पद्धत आहे. (जनरली) म्हणजे 'मोड ऑफ मेजरमेंट' भिन्न आहे.

तसेच इथे लागू असेल असे वाटते. तसे आहे का? असू शकेल का?

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

3 Feb 2011 - 12:29 pm | कच्ची कैरी

काही कल्पना नाही बुवा ! तुमच्यामुळे आता माझ्यासारख्या लोकांनाही माहिती पडेल.

स्पा's picture

3 Feb 2011 - 12:31 pm | स्पा

छान विषय
आणि कल्पक धागा
जाणकारांच्या प्रतीक्षेत

शेखर काळे's picture

3 Feb 2011 - 12:59 pm | शेखर काळे

म्हणजे काय ?

पॄथ्वीवरीलजीवसॄष्टी ही कार्बन व हायड्रोजन वर आधारीत आहे.़
कदाचित इतर तारकामालांमधील जीवसॄष्टी काही इतर अणूंवर आधारलेली असेल.

पण तसे जरी असले, तरी पदार्थ विज्ञानाचे मुलभूत नियम सगळी कडे सारखेच लागू व्हावेत.

शिवाय, तुम्ही जर पॄथ्वीतत्व म्हणजे मॅटर असे म्हणत असाल
तर आपल्या विश्वात मॅटरच्या विरुद्ध अ‍ॅन्टी मॅटर असते.

जयदीप's picture

3 Feb 2011 - 1:11 pm | जयदीप

आपण पारा वापरुन उष्णतामान मोजतो. द्रव पदार्थ मोजण्यासाठी विविध मापे वापरतो.

तो द्रव पदार्थ कोणता आहे हे शोधुन काढ्ण्यासाठी रसायन शास्त्राने "Spectroscopy" सारख्या अनेक पद्धती विकसीत केल्या आहेत. येथे प्रकाशाचा वापर करुन त्या पदर्थाची तिन आयामि अणु संरचना बनवली जाते व त्याचा वापर करुन तो पदार्थ कोणता आहे हे शोधुन काढले जाते.

प्रकाशाच्या वेगवेगळ्या "wave lengths" वापरुन अनेक गोष्टींचा मागोवा घेण्याचे तंत्र माणसाने विकसीत केले आहे.

ह्याच तंत्रांचा वापर करुन अशा वेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीची माहिती आपण मिळवू शकतो.

विलासराव's picture

3 Feb 2011 - 1:12 pm | विलासराव

>>>>>>>>>पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. (मॅटर????)
त्यातून आलेल्या /मिळालेल्या/ प्रक्रिया केल्या गेलेल्या धातू, वगैरेंपासूनच (जी पृथ्वीतत्वाची आहेत) आपली उपकरणे बनलेली आहेत. तसेच येथील जीवसृष्टी ही पृथ्वी तत्वापासून बनलेली. आपण इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा शोध घेताना या उपकरणांचाच वापर करतो आहोत.

'पृथ्वीतत्व- मला वाटते यामधे जल, वायु,अग्नी आणी आणखी दोन अशी पंचतत्वे आहेत. आपला देहही याच पंचतत्वाचा बनलेला आहे.

>>>>>>>>जर एखाद्या ग्रहाचा अथवा तार्‍याचा मूळ स्त्रोत अग्नितत्व असेल, जलतत्व असेल तर त्या ग्रह, तार्‍यावरील असलेली सृष्टी ही तशीच असेल.

पंचतत्वात अग्नितत्व जलतत्व असेल तर मग आपली ही उपकरणे अशा वेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीची माहिती देऊ शकतील. कारण हे पुर्ण ब्रह्मांड याच पाच तत्वांनी बनलेले आहे.

पंचतत्वात अग्नितत्व जलतत्व असेल तर मग आपली ही उपकरणे अशा वेगळ्या प्रकारच्या जीवसृष्टीची माहिती देऊ शकतील. कारण हे पुर्ण ब्रह्मांड याच पाच तत्वांनी बनलेले आहे.

नाय वो, नाय बनलेलं. आता?

विलासराव's picture

3 Feb 2011 - 8:20 pm | विलासराव

>>>>>>>नाय वो, नाय बनलेलं. आता?

आता तुम्ही सांगा काही माहिती असेल तर.
बाकी आमचं ज्ञान संपलं साहेब.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2011 - 4:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

रोचक धागा. शेखर काळे यांचा प्रतिसाद त्रोटक असला तरी पटणेबल आहे.

माझं या विषयावर फारसं वाचन नाही. पण वेळ मिळेल तसं आहे तेवढी माहिती लिहीण्याचा प्रयत्न करते. आत्ताच फेसबुकावर मित्राकडून साधारण या विषयावर एक व्हीडीओ मिळाला.

आजच्या अ‍ॅस्ट्रॉनॉमी पिक्चर ऑफ द डेवरही हाच विषय आहे.

जर एखाद्या ग्रहाचा अथवा तार्‍याचा मूळ स्त्रोत अग्नितत्व असेल, जलतत्व असेल तर त्या ग्रह, तार्‍यावरील असलेली सृष्टी ही तशीच असेल.

असं काय नसतं रे भो! (म्हणजे असलं तर मला तरी माहित नाही ब्वॉ, प्यारेंना कुठुन कळाले असल्यास सांगावे.)

मॅटर्=पृथ्वीतत्व असेल तर तर संपुर्ण युनीव्हर्स त्याचंच बनलेलं* आहे, त्याशिवाय अ‍ॅन्टीमॅटर असलच पाहिजे अशी थेअरी आहे.
(पदार्थाचे मुलभुत घटक=> अणु, क्वार्क (स्ट्रींग्ज?))

आख्खं जग हे समान भौतिक नियमांनुसारच चालत असले पाहिजे असे शास्त्रज्ञांना वाटते. (उदा. न्युटनचे नियम जसे पृथ्वीला लागू होतात तसेच इतर ग्रहांनाही होतात, (त्यात थोडा बदल आईनस्टाईनने केला वगैरे)).

बा़की योगायोगाने याच विषयावर सद्ध्या आमच्या येथे एक सुंदर व्याख्यानमाला ( http://cos.arizona.edu/cosmic/ ) (इच्छुकांनी (आपल्या पैशाने) जरुर येणे करावे) सुरु झाली आहे. पहिल्या व्याख्यानाला व्हॅटीकन प्रयोगशाळेचा शास्त्रज्ञ आला होता. (जसजशी विज्ञानात प्रगती होत आहे तसतसे "रीलिजस बॅगेज" ओळखुन आपण ते त्यागले पाहिजे असे त्याचे मत ऐकुन मला आश्चर्य वाटले. असो.)

बाकी मला जर बरोबर आठवत असेल तर अ‍ॅन्शिअंट कॉस्मॉलॉजी मध्ये जलतत्त्व वगैरे भानगडी होत्या आणि त्या चुक होत्या असे केव्हाच मानले गेले आहे.

नितिन थत्ते's picture

3 Feb 2011 - 3:00 pm | नितिन थत्ते

>>मॅटर्=पृथ्वीतत्व असेल तर तर संपुर्ण युनीव्हर्स त्याचंच बनलेलं* आहे, त्याशिवाय अ‍ॅन्टीमॅटर असलच पाहिजे अशी थेअरी आहे.
(पदार्थाचे मुलभुत घटक=> अणु, क्वार्क (स्ट्रींग्ज?))

हॅ हॅ हॅ. कृस्ती आणि इस्लामी प्रदेशात लोक सगळा इतिहास विसरून गेले आहेत त्यामुळे त्यांना या असल्या काल्पनिक थिअरीज मांडाव्या लागतात. वेदांमध्ये सगळा इतिहास आहे. त्यानुसार सुरुवातीस पूर्ण अंधार होता. मग ॐ असा ध्वनी उमटला....... वगैरे वगैरे.
----- संदर्भ- भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका- ले. पु ना ओक.

स्वानन्द's picture

3 Feb 2011 - 3:19 pm | स्वानन्द

>>वेदांमध्ये सगळा इतिहास आहे. त्यानुसार सुरुवातीस पूर्ण अंधार होता. मग ॐ असा ध्वनी उमटला....... वगैरे वगैरे.

सहमत आहे. शिवाय, ॐ चा आवाज ऐकूनच 'जादू' प्रूथ्वीवर आला होता, लुतीक लोशन ला मदत करायला.

वडाची साल पिंपळाला. चालू द्या !!

अर्धवटराव's picture

3 Feb 2011 - 11:37 pm | अर्धवटराव

ओंकार कंपन हे सृष्टी निर्मीतीचं मूळ कारण होय, अशी एक थेअरी आहे खरी. आणि ती स्ट्रींग थेअरीच्या फार जवळ्ची आहे. स्ट्रींग थेअरीनुसार (बहुतेक) ११ मीतींबध्ये कंपन पावणार्‍या तंतूंनी हे विश्व बनलय. हे तंतू कुठल्या मितीत आणि कुठल्या फ्रीक्वेंसीने कंप पावतात यावरुन वेगवेगळे फोर्स पार्टीकल्स आणि अती सूक्ष्म अ‍ॅटोमीक पार्टीकल्स बनतात. त्यातून पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटीक, ग्रॅव्हीटी वगैरे फोर्सेस आणि इलेक्ट्रोन, प्रोटोन आदि अणू घटक तयार होतात. त्याचच पूढे मॅटर तयार होते.
-- संदर्भ- कीमयागार- अच्युत गोडबोले

ओंकार थेअरीच्या जनकाला एक्झॅक्ट असच म्हणायचं होतं अशातला भाग नाहि. पण केवळ ते पूरातन वैदीक साहित्यातून आलय म्हणुन त्याची उगाच हेटाळणी करावी इतकी ति थेअरी वाईटही नाहि.
राहिला भाग काल्पनीक थेअरीचा, तर प्रत्येक थेअरी हि काल्पनीकच असते...

अर्धवटराव

अच्युत गोडबोल्यांनी स्ट्रींग थेअरीचा अभ्यास केला आहे काय? अर्धवटरावांनी त्यांचे मत उद्धृत केले आहे, याचा अर्थ अर्धवटरावांना त्यांचे मत मान्य आहे काय? असल्यास मला दोहोंमधील साम्य जास्त जवळुन जाणून घ्यायला आवडेल. प्रगत विज्ञानाचा आणी वैदीक ज्ञानाचा ओढुनताणुन संबंध लावला जातो हा आरोपही लावायची संधी कुणाला इथे मिळणार नाही हा एक अजुन फायदा.

राहिला भाग काल्पनीक थेअरीचा, तर प्रत्येक थेअरी हि काल्पनीकच असते...

यावरही थोडा प्रकाश टाकल्यास उत्तम, काय म्हणायचे आहे हे सुस्पष्ट कळण्याकरता काल्पनीक या शब्दाच्या वापराचे अधीक अचुक प्रयोजन स्पष्ट केल्यास अधिक उत्तम.

अर्धवटराव's picture

5 Feb 2011 - 2:34 am | अर्धवटराव

चला, थोडा आणखी टाईमपास करुया !!

>>अच्युत गोडबोल्यांनी स्ट्रींग थेअरीचा अभ्यास केला आहे काय?
-- अगदी पी.एच.डी नाहि, तरी गोडबोल्यांनी सिरीयसली या थेअरीचा अभ्यास केला असावा. मी स्वतः त्यांना पुस्तके नेउन दिली नाहित आणि त्यांची परिक्षा सुद्धा घेतली नाहि. पण त्यांच्या लेखनावरुन, त्यांच्या पुस्तकाला मान्यवरांनी जे अभिप्राय दिलेत त्यावरुन तरी गोडबोल्यांनी न्हाव्याच्या दुकानातल्या वायफळ गप्पा लिहीलेल्या नाहित असं वाटतं. सदर पुस्तक (इच्छा असल्यास)स्वतः वाचावे

>>अर्धवटरावांनी त्यांचे मत उद्धृत केले आहे, याचा अर्थ अर्धवटरावांना त्यांचे मत मान्य आहे काय?
मत उद्घृत करायला हा कुठला वाद-विवाद नाहिए. गोडबोल्यांनी वै़ज्ञानीक थेअरीची एक जंत्री दिली आहे आणि त्यावर आमच्या सारख्या सामान्य वाचकांना समजेल अश्या शब्दात थोडंफार स्पष्टीकरण दिलय. अधीक माहितीसाठी (ईच्छा असल्यास) गोडबोल्यांशी स्वतः संपर्क करावा.

>>असल्यास मला दोहोंमधील साम्य जास्त जवळुन जाणून घ्यायला आवडेल
आपली ज्ञानलालसा आमच्या कडुन तृप्त होणे शक्य नाहि. आम्हाला जे कळलं ते अगोदरच सांगीतले आहे. (ईच्छा असल्यास) स्वतः व्यासंग करावा आणि आमच्याही ज्ञानात भर टाकावी.

>>प्रगत विज्ञानाचा आणी वैदीक ज्ञानाचा ओढुनताणुन संबंध लावला जातो हा आरोपही लावायची संधी कुणाला इथे मिळणार नाही हा एक अजुन फायदा.

प्रगत विज्ञान, वैदीक ज्ञान... या फार लांबच्या आणि मोठ्या वकुबाच्या गोष्टी आहेत. ज्या अर्थी तुम्हाला हा ओढुन ताणुन लावलेला संबंध वाटतोय, त्यावरुन या दोन्ही क्षेत्रांचा आपला दांडगा अभ्यास असावा असं दिसतय. तसं असल्यास (आणि ईच्छा असल्यास) या संबंधावर, त्यातल्या फरकांवर आम्हाला समजेल अश्या शब्दात चार ओळी टंकाव्या.

प्रगत विज्ञान आणि वैदीक ज्ञानाचा संबंध लावला जातो आणि त्यावर फुशारकी मारली जाते हे मान्यच. पण उठसूट वैदीक ज्ञानाला, स्वतः त्याचा काहिही अभ्यास नसताना, उगाच हिणवले जाते असही बरेचदा दिसतं...

>>यावरही थोडा प्रकाश टाकल्यास उत्तम, काय म्हणायचे आहे हे सुस्पष्ट कळण्याकरता काल्पनीक या शब्दाच्या वापराचे अधीक अचुक प्रयोजन स्पष्ट केल्यास अधिक उत्तम

वेगवेगळ्या "थेअरी" आणि त्यांच्यामागे शोधकर्त्याने वापरलेली कल्पकता याचा (ईच्छा असल्यास) थोडा विचार करा. स्पष्टीकरण लगेच कळेल.

अर्धवटराव

Nile's picture

5 Feb 2011 - 3:50 am | Nile

माझ्या प्रतिसादात ओंकार आणि स्ट्रींग थेअरीमधील साम्य जाणुन घेण्याचे कुतुहलच दिसेल असा प्रामाणिक प्रयत्न करुनही इतके डिफेन्सिव होउन उत्तर देण्यास कारणीभुत असा आक्रमकपणा प्रतिसादात अर्धवटरावांना का बरे जाणवला असावा? असो.

स्ट्रींग थेअरीबद्दल सामान्य ज्ञान आहे, ओंकार थेअरीबद्दल मागे वाचायचा प्रयत्न केला होता, किरकोळ वाचनाअंती भंपक आहे असे वाटले होते म्हणुन अधिक वाचण्यात वेळ वाया घालु शकलो नाही. (तरी सुद्धा स्वच्छ मनाने ओंकार थेअरी बद्दल कुतुहल आहे हे वरती प्रतिसादात म्हणलेच आहे).

आम्हाला जे कळलं ते अगोदरच सांगीतले आहे.

तुम्ही काय कळलं हे सांगितलेलं मला तरी कुठे दिसलं नाही. तुम्ही किमयागार पुस्तकात विवक्षित संबंध असावा असे गोडबोल्यांचे मत व्यक्त आहे असे दिले आहे. हा संबंध तुम्हाला कळला असेल तर तो कृपया सांगावा. (अर्थात तुम्हाला फार त्रास होणार असल्यास आग्रह नाही) अधिक कुतुहल निर्माण झाल्यास नक्कीच किमयागार वाचु.

प्रगत विज्ञान, वैदीक ज्ञान... या फार लांबच्या आणि मोठ्या वकुबाच्या गोष्टी आहेत.

वैदिकाचं माहित नाही, पण प्रगत विज्ञान फार लांबचे आणि वकुबाचे असावे असे वाटत नाही. सामान्य बुद्धिमत्तेच्या कुणालाही प्रयत्नाने जमण्यासारखं आहे इतकं तरे इक विज्ञानाचा विद्यार्थी या नात्याने सांगु शकतो. (इच्छुकांनी प्रयन्त करुन पहावा)

प्रगत विज्ञान आणि वैदीक ज्ञानाचा संबंध लावला जातो आणि त्यावर फुशारकी मारली जाते हे मान्यच. पण उठसूट वैदीक ज्ञानाला, स्वतः त्याचा काहिही अभ्यास नसताना, उगाच हिणवले जाते असही बरेचदा दिसतं...

उत्तरार्धा जे झाले ते होउ नये म्हणुनच पुढाकार घेउन अधिक जाणुन घेण्याचा प्रामाणिक मनसुबा बोलुन दाखवला, त्यात तुम्हाला वांझोटा वकिली थाट दिसावा हे तर दुर्दैव!

बाकी कल्पकता असणे आणि काल्पनिक असणे यात (बोली भाषेत तरी)फरक आहे असे वाटते.

अर्धवटराव's picture

5 Feb 2011 - 6:07 am | अर्धवटराव

>>माझ्या प्रतिसादात ओंकार आणि स्ट्रींग थेअरीमधील साम्य जाणुन घेण्याचे कुतुहलच दिसेल असा प्रामाणिक प्रयत्न करुनही ...
::स्पष्टच सांगायचं तर मला तसं नाहि वाटलं. मतांतर असु शकेल.

>>तुम्ही काय कळलं हे सांगितलेलं मला तरी कुठे दिसलं नाहि.
::ज्या काहि ४ ओळी खरडल्या त्यात मला काय म्हणायचं हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तुम्हाला काहिच दिसलं नाहि हा माझ्या लेखनाचा दोष असण्याची शक्यता आहे.

>> तुम्ही किमयागार पुस्तकात विवक्षित संबंध असावा असे गोडबोल्यांचे मत व्यक्त आहे असे दिले आहे.
:: गोडबोल्यांनी ओंकार थेअरीचे नावही काढले नाहि. त्यांनी फक्त स्ट्रींग थेअरीबद्दल लिहीलय. त्याची ओंकार थेअरीशी जवळीक मला जाणवली आणि तिच मी मांडण्याचा प्रयत्न केला. ओंकार थेअरीचा 'कंपनातुन विश्व निर्मीती' हा कंसेप्ट आणि स्ट्रींग थेअरीचा 'तंतूंच्या कंपनातुन विश्व घटकांची निर्मीती' हा कंसेप्ट मला जवळाचा वाटला.

>>वैदिकाचं माहित नाही, पण प्रगत विज्ञान फार लांबचे आणि वकुबाचे असावे असे वाटत नाही
::सामान्य बुद्धीमत्ता वापरुन जे काहि थोडंफार कळलं ते प्रतीसादात लिहीलं होतं. त्यापलीकडचे जाणण्याची आपली ईच्छा बघुन मी माझ्या वकुबाची लिमीट सांगितली. उदा. ११ मीतींचे स्ट्रींग थेअरीचे गणीत आणि योग्यांना जाणवणारी ओंकाररुपी घरघर, या सध्या तरी माझ्या वकुबाबाहेरच्या गोष्टी आहेत.

>>सामान्य बुद्धिमत्तेच्या कुणालाही प्रयत्नाने जमण्यासारखं आहे इतकं तरे इक विज्ञानाचा विद्यार्थी या नात्याने सांगु शकतो. (इच्छुकांनी प्रयन्त करुन पहावा)
::म्हणुनच जे माझ्या वकुबापलीकडे आहे ते तुम्ही समजावुन सांगावं अशी विनंती केली होती. ओंकार थेअरीत तुम्हाला काय भंपकपणा दिसला हे जर स्पष्ट केले असते तर त्याबद्दलच्या माझ्या धारणा तपासुन पहाता आल्या असत्या.

>>उत्तरार्धा जे झाले ते होउ नये म्हणुनच पुढाकार घेउन अधिक जाणुन घेण्याचा प्रामाणिक मनसुबा बोलुन दाखवला, त्यात तुम्हाला वांझोटा वकिली थाट दिसावा हे तर दुर्दैव!
::तसं असेल तर खरच दुर्दैव आहे.

अर्धवटराव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Feb 2011 - 11:02 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्ट्रींग थेअरीनुसार (बहुतेक) ११ मीतींबध्ये कंपन पावणार्‍या तंतूंनी हे विश्व बनलय. हे तंतू कुठल्या मितीत आणि कुठल्या फ्रीक्वेंसीने कंप पावतात यावरुन वेगवेगळे फोर्स पार्टीकल्स आणि अती सूक्ष्म अ‍ॅटोमीक पार्टीकल्स बनतात. त्यातून पुढे इलेक्ट्रोमॅग्नेटीक, ग्रॅव्हीटी वगैरे फोर्सेस आणि इलेक्ट्रोन, प्रोटोन आदि अणू घटक तयार होतात. त्याचच पूढे मॅटर तयार होते.

हे वाक्य वाचून मला मराठी (आणि इंग्लिशही) समजतं पण वरचं काही कळलं नाही एवढंच समजलं. खरंच कोणीतरी समजेल, झेपेल असं सांगेल का हे मला?

त्यातून आपल्याला समजत नाही ते सगळं उगाच असं मानून स्ट्रींग थिअरीला मराठीत दोर्‍या लावायची थिअरी म्हणावं का?

विकास's picture

5 Feb 2011 - 1:00 am | विकास

मला देखील समजले नव्हते. पण समजेल अशी अपेक्षा नव्हती. ;) जेंव्हा साक्षात ३.१४ यांना हे इरॅशनल वाटले तेंव्हा मात्र उत्सुकता चाळवली आणि जरा शोधलेम तर एम-थिअरी मिळाली:

(संदर्भ)

In theoretical physics, M-theory is an extension of string theory in which 11 dimensions are identified. Because the dimensionality exceeds the dimensionality of superstring theories in 10 dimensions, it is believed that the 11-dimensional theory unites all five string theories (and supersedes them). Though a full description of the theory is not known, the low-entropy dynamics are known to be supergravity interacting with 2- and 5-dimensional membranes.

आता या संदर्भात अधिक वाचून आम्हालाही समजून सांगावेत ही विनंती. :-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Feb 2011 - 8:03 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पास.
न झेपणार्‍या गोळ्या नकोतच!

अर्धवटराव's picture

5 Feb 2011 - 2:31 am | अर्धवटराव

अदिती,
मला स्वतःला सुद्धा स्ट्रींग थेअरी कळलीय अश्यातला भाग नाहि. 'कीमयागार' मध्ये अच्युत गोडबोल्यांनी जे काहि थोडंफार या थेअरीबद्द्ल लिहीलय, आणि चार लोकांशी याविषयी जी चर्चा केलीय तेच माझं भांडवल. इंटरेस्ट असेल तर हे पुस्तक जरुर वाचावे अशी शिफारस करेन.
थोडक्यात असं आहे:
फार पूर्वी मनुषयाला हे विश्व जमीन, पाणि, हवा आदि घटकांपासुन बनलय असं वाटायच. मग प्रत्येक पदार्थाचा अणु हा अविभाज्य घटक आहे असं कळायला लागलं. त्या नंतर अणु देखील अविभाज्य नाहि, तर इलेक्ट्रोन, प्रोटोन आदि घटकांचा बनलाय हे कळलं. दरम्यानच्या काळात या सर्व घटकांना बांधुन ठेवणारे, दूर ढकलणारे फोर्सेस कळायला लागले. विश्वाचा आरंभ कसा झाला यावर विचार मंथन करताना बीग बँग थेअरी पुढे आली. गणीत आत्यंतीक प्रगत व्हायला लागलं. आइनस्टाईनने 'काळ' या घटकाला पदार्थाच्या चौथ्या डायमेन्शनच्या रुपात मांडले. हे सगळे फोर्स पार्टीकल्स, मॅटर काँपोनंट्स एकाच तत्वात बसवता येईल काय यावर वैज्ञानिकांनी प्रचंड मेहनत घेतली, अजुनही घेताहेत. याच प्रयत्नाची एक कडी म्हणजे स्ट्रींग थेअरी. या थेअरीनुसार विश्वाच्या मुळाशी कंपन पावणारे तंतू आहेत आणि ते कुठल्या डायमेन्शनमधे (अश्या ११ डायमेन्शन्स थेअरीकर्त्याने माडल्यात) कुठल्या फ्रिक्वेंसीने 'कंपतात' यावरुन वेगवेगळे फोर्स पार्टीकल्स, मॅटर पार्टीकल्स बनतात. या पार्टीकल्सवरुन मग वेवेगळे फोर्सेस आणि अणु-रेणुंचे घटक तयार होतात.
आता या ११ मिती म्हणजे कुठल्या वगैरे तांत्रीक बाबी आणि त्यांचे गणीत कसं करायचं हा वेगळा विषय.

अर्थात या थेअरीच्या बाजुने आणि विरोधात, अशे वैज्ञानिकांचे दोन तट आहेत. विश्वाच्या मुळाशी हे तंतू नसुन मेंब्रेन (पडदा) आहे अशीही एक नवीन थेअरी याच अनुशंगाने पुढे आली आहे...

अर्धवटराव

विकास's picture

3 Feb 2011 - 11:55 pm | विकास

माहितगार व्यक्ति (मुख्यत: भौतिकशास्त्राचे अभ्यासक) शक्याशक्यतांचा विचार करुन अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया देतील ही अपेक्षा.

>>> हॅ हॅ हॅ. कृस्ती आणि इस्लामी प्रदेशात लोक सगळा इतिहास विसरून गेले आहेत त्यामुळे त्यांना या असल्या काल्पनिक थिअरीज मांडाव्या लागतात. वेदांमध्ये सगळा इतिहास आहे. त्यानुसार सुरुवातीस पूर्ण अंधार होता. मग ॐ असा ध्वनी उमटला....... वगैरे वगैरे.
----- संदर्भ- भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका- ले. पु ना ओक. <<<

प्यारेजी तुमचा भला मोठा गोंधळ झाला आहे. जरा घाईत आहे, सवडीने उत्तर देतो किंवा खरडवहीत टंकतो.

लगिनघाई काय हो?
चालु दे, चालु दे! ;-)

उत्तराची वाट बघतोय. कधी तेही सांगा.

'पॅरीस बरोबरच्या मधुचंद्रानंतर' असे मोघम नको.

कवितानागेश's picture

3 Feb 2011 - 2:29 pm | कवितानागेश

जसे द्रव पदार्थ लिटरमधे आणि घन पदार्थ किलोग्रॅममधे मोजण्याची पद्धत आहे. (जनरली) म्हणजे 'मोड ऑफ मेजरमेंट' भिन्न आहे.>>
मी नेहमी तिळाचे तेल किलोमध्ये आणते हो! ;)
तरीच मला काही लोक परग्रहावरुन आणल्यासारखी वागवतात! :(
असो.
फिजिक्समध्ये, मोजमापांच्या पद्धतीत नेहमीच अनेक 'युनिवर्सल कॉन्स्टन्ट्स' वापरतात.
त्यामूळे इतर सूर्यमालांमधली मोजमापे काढताना कुठलाही घोटाळा होणार नाही.

मालोजीराव's picture

3 Feb 2011 - 3:05 pm | मालोजीराव

एरीक व्हॉन डॅनिकेन (मु पो स्विस)यांच्याशी संपर्क साधा,त्यांच्या मते देव हेच अंतराळवीर आहेत.आणि परग्रहावर जीव सृष्टी असल्याचा शोध पण त्यांनी आधीच लावलाय ;)
त्यांना मिपा वर आमंत्रित करा

च्यायला! तुम्ही ह्या डेन्याचे अनुयायी काय! आता कळलं तुमचा प्राब्लेम काय आहे ते.... चालु दे...

मालोजीराव's picture

3 Feb 2011 - 3:18 pm | मालोजीराव

नाई ओ, पुस्तक वाचून हसून हसून पुरेवाट झालेली....पण मनोरंजन साठी चांगलं आहे,डार्विन असता तर आत्महत्या केली असती

परग्रहावरील जीवसृष्टीबद्दल स्वग्रहावरच्या जीवजंतूंच्या भाषेतील चर्चा रोचक आहे!

मूकवाचक's picture

3 Feb 2011 - 4:54 pm | मूकवाचक

ते ही कमी असेल तर मग अ‍ॅनाइम आहेच एंटरटेन करायला...

अवलिया's picture

3 Feb 2011 - 6:14 pm | अवलिया

सदर प्रतिसाद कूणाला केवळ शब्दच्छल वाटू शकतो त्याबद्दल क्षमस्व.

तत्वज्ञानात विशेषतः भारतीय तत्वज्ञानात संपूर्ण सृष्टी ही पंचमहाभुतांपासून बनलेली आहे अशा प्रकारचे प्रतिपादन आढळते. ही पंचमहाभुते म्हणजे आकाश, अग्नी, जल, वायु आणि पृथ्वी. इथे सर्वात पहिले हे लक्षात घेतले पाहीजे की आपण वसुंधरेला जे पृथ्वी या नावाने संबोधतो ते संबोधन आणि पंचमहाभुतांमधले पृथ्वी तत्व हे संपूर्ण भिन्न आहेत. हे समजुनच पुढे चला अन्यथा गोंधळ उडेल.

ज्या पंचमहाभुतांपासून सृष्टी उत्पन्न झाली आहे असे सांगितले जाते ती पाच तत्वे सुक्ष्म अवस्थेत आपल्याआपल्या स्वस्वरुपात असतात. हे सुक्ष्मरुप मनाला आणि बुद्धिला अगम्य असुन त्यांच्या स्वरुपाचा बोध होणे अशक्य मानले जाते. मात्र सृष्टी उत्पन्न झाल्यावर ही पंचमहाभुते एकत्रित येत स्थुल स्वरुपात दृगोचर होतात. हे होतांना त्यांचे एकमेकांशी संमिलन होते आणि केवळ शुद्ध स्वरुपात ही भुते न रहाता एकमेकांवर प्रक्रिया करत त्यांचे दृश्य स्वरुप तयार होते. याप्रक्रियेत वर्गीकरण करतांना ज्या पंचमहाभुतापैकी ज्याचे प्रमाण जास्त असेल ते नाव त्या पदार्थाला दिले जाउन त्याचे त्या विभागात वर्गीकरण होते. उदा. जमीन. जमीनी मधे पृथ्वी, जल, वायु अंश असतो. अधिक मात्रा पृथ्वी तत्वाची असते त्यामुळे जमीनीला पृथ्बीतत्व मानले जाते. असेच रक्ताला जल मानले जाते जरी त्यात पृथ्वी तत्बाचे कण समाविष्ट असले तरी. आणि ह्याच पद्धतीने आपल्या सर्वत्र असलेल्या अवकाश पोकळीला आकाश तत्व मानले जाते जरी त्यात ग्रह, तारे, वगैरे पृथ्वी, वायु इ. तत्व असले तरी.

त्यामुळे तुम्ही जे म्हणालात

पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. (मॅटर????)

हे तितकेसे बरोबर नाही कारण वसुंधरेवरती (पृथ्वीवरती) सर्वच तत्वांचे पदार्थ दिसतात. फक्त दृश्य स्वरुपावर न जाता वसुंधरेच्या पोटात पाहिले तर आगच दिसेल. असो. त्यामुळे तत्वज्ञानातील पंचमहाभुतांच्या वर्गीकरण प्रक्रियेने आपण एखादा ग्रह किंवा तारा अमुक तत्वाचा असे ठरवु शकत नाही. फक्त त्यावर असलेले जे काही पदार्थ असतील त्यांचे तत्व ठरवु शकतो.

आता तुम्ही म्हणाल मग या तत्वज्ञानाच्या पद्धतीने वर्गीकरणाची गरजच काय तर त्याचे उत्तर असे आहे की मी कोण आहे, कुठुन आलो, का आलो, माझ्या जीवनाचे प्रयोजन काय, मी का जगावे अशा प्रकारच्या प्रश्नांना तत्वज्ञान सामोरे जाते तेव्हा हे जग कसे निर्माण झाले, कुणी निर्माण केले, का निर्माण केले अशा प्रश्नांची उत्तरे शोधत जाते. या मार्गात समोर दिसणार्‍या दृश्य सृष्टीचे साधे सोपे वर्गीकरण करुन काही समान धागा सापडतो का हे पहात त्या नुसार त्या तत्वांचा आपल्या आयुष्यावर काय आणि कसा परिणाम होतो हे पहाणे आवश्यक ठरते. तत्वज्ञान प्रामुख्याने मनाच्या विविध घडामोडींशी निगडीत असल्याने बाह्य सृष्टीचे इतकेच स्थुल विवरण पुरेसे असते कारण धांडोळा घ्यायचा आहे तो मनाचाच. बाह्य सृष्टीचा नाही. त्यामुळे भौतिक किंवा रसायन शास्त्रांप्रमाणे अति सुक्ष्म काटेकोर विभागणी करणे अनावश्यक होते. असो

आता तुम्ही जी परजीवी सृष्टी वगैरे कल्पना लढवली आहे त्यातील अग्नी किंवा इतर काही तत्वाने ग्रहतारे असणे ही चूकीची कल्पना आहे. म्हणजेच जे काही ग्रहतारे इत्यादी असतील ते आपल्या सूर्यमाले प्रमाणेच असतील. त्यातील प्रमुख घटकद्रव्ये वेगळी असु शकतात. कदाचित काही आपल्याला अजुन माहिती नसतील असेही असेल. आता वेगळी जीवसृष्टी असण्याची शक्यता जसे की वेगळ्या मुलद्रव्यापासून वगैरे. तर तसे असु शकते आणि तसे इथेच या वसुंधरेवर असण्याची पण शक्यता नाकारता येत नाही. आणि असे काही असेल तर आपल्याला त्याचा शोध लागेल. उदाहरणार्थ आताच काही दिवसांपूर्वी आर्सेनिकवर जगणार्‍या जीवांचा शोध लागला होता. म्हणजेच जे आपल्याला विष ते त्यांना अमृत होते. याविषयावर जास्त लिहीण्याची माझी लायकी नाही म्हणून इथेच थांबतो.

वॉलिबॉल खेळताना एक जण लिफ्टर आणि एक जण स्मॅशरचे काम करत असतो. मी 'लिफ्ट' दिला /ली होता/ती.

पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. या माझ्या वाक्यात मुख्यत्वे हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. तसेच सूर्य हा मुख्यत्वे तेज तत्वापासून म्हणता येईल ना? तो ग्रह, तारा अर्थात त्यावरील पदार्थ जसे आपण वर म्हटले आहे.

ब्रह्म-> मूळमाया->जडमाया-> गुणमाया-> पंचमहाभूते-> (तीन गुण आणि महाभूतांची) अष्टधा प्रकृति हे असे असते ते ठाऊक आहे.

विचारण्याचा उद्देश सगळीकडे सारखीच परिमाणे, उपकरणे आणि प्रमाणेही लावता येत नाहीत हे दाखवणे हाच होता.

आणि>>> तत्वज्ञान प्रामुख्याने मनाच्या विविध घडामोडींशी निगडीत असल्याने बाह्य सृष्टीचे इतकेच स्थुल विवरण पुरेसे असते कारण धांडोळा घ्यायचा आहे तो मनाचाच निव्वळ 'मन' नाही- अंतःकरण.

पृथ्वी हा ग्रह मुख्यत्वे 'पृथ्वीतत्वा'पासून बनला आहे. या माझ्या वाक्यात मुख्यत्वे हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. तसेच सूर्य हा मुख्यत्वे तेज तत्वापासून म्हणता येईल ना? तो ग्रह, तारा अर्थात त्यावरील पदार्थ जसे आपण वर म्हटले आहे.

चर्चाविषय नीट समजलेला नाही. "मुख्यत्वे" शब्दाचे प्रयोजन कळले. धरणीवरील पदार्थ "मुख्यत्वे" पृथ्वीतत्त्वाने बनलेले आहेत, आणि सूर्यावरील पदार्थ "मुख्यत्वे" तेजतत्त्वाने बनलेले आहेत, या तुमच्या विधानाचा संदर्भही कळतो.

परंतु धरणीवर गौणत्वाने आढळणार्‍या तेजतत्त्व, आपतत्त्व, वायुतत्त्वांना जोखण्या-मोजण्यासाठी परिमाणे, उपकरणे आणि प्रमाणे उपलब्ध आहेत की. मागे एके दिवशी ढगाळलेले नव्हते, तेव्हा सूर्यदर्शन चक्षुर्वै झाल्याचे आठवते. मिसळपावावरील काही कुशल प्रकाशचित्रकारांनी "सूर्यास्त", "सूर्योदय" वगैरे शीर्षके देऊन चित्रे दाखवलेली आहेत. म्हणजे अशा प्रकारची उपकरणे या लोकांकडे उपलब्ध असावीत. "वैशाखातल्या मध्यान्ही ऊन्हे फार प्रखर होती", "आज पहाटे ऊन्ह मंद होते" वगैरे विधाने लोक अर्थपूर्ण मानतात. त्या अर्थी उन्हाबाबत (तेजतत्त्वासंबंधित) परिमाणे/प्रमाणे सुद्धा सहज उपलब्ध असावीत. म्हणून तुमचे पुढील विधान कोड्यात पाडणारे आहे :

विचारण्याचा उद्देश सगळीकडे सारखीच परिमाणे, उपकरणे आणि प्रमाणेही लावता येत नाहीत हे दाखवणे हाच होता.

जे काय जोखायचे-मोजायचे आहे, त्या दृष्टीने उपलब्धांपैकी सुयोग्य परिमाणे, उपकरणे आणि प्रमाणेही लावता येतील की. कुठल्या ग्रहावर किंवा तार्‍यावर कुठले तत्त्व मुख्यत्वे आहे, त्याच्याशी काय देणेघेणे?

प्यारे१'s picture

4 Feb 2011 - 10:29 am | प्यारे१

माझं लिखाण तोकडं पडलंय.

आपण परग्रहवासीयांचा शोध घेतोय आणि बर्‍याचदा ऐकतोही की मंगळावर माणूस पाठवणार इ.इ.

माझा प्रश्न हा आहे की आपण आपल्या साधनांनिशी परग्रहावर जाऊ शकू का आणि तिथे तग धरू शकू का???

मागच्या आठवड्यात पीबीएस वर नोवा चा एक प्रोग्राम होता याच विषया वर.. त्यात त्यांनी जर आपल्याला दुसर्‍या (मंगळावर) ग्रहावर जायचे असेल.. तर काय काय तयारी करावी लागेल याचा फार चांगला आढावा घेतला होता... त्यात त्यांनी खालील विषयांवर चांगली माहिती दिली :
१. अवकाश जरी शांत आणि अवाढव्य असलं तरी त्यात कित्येक लहान उल्का किंवा धूमकेतूंचे अवशेष फिरत असतात.. त्यांपासून अवकाशयानांना फार धोका असतो. एक छोटा दगड (नखाएवढा) जर ताशी २०००० किमी (बंदूकीच्या गोळीच्या दसपट वेगाने) फिरताना अंतराळयानावर आपटला तर धातूची ३ ते ४ लेयर भेदू शकतो हे त्यांनी दाखवलं.

२. अंतराळात सूर्यापासून होणारा अणूउत्सर्ग हा अंतराळ वीरांसाठी घातक ठरू शकतो. हे वैश्वीक किरण मानवाच्या डि-एन-ए वर थेट परिणाम करू शकतात.

३. अंतराळवीर जो पोषाख घालतात त्याच्या मागचा उद्धेश त्याच्या शरीरावर हवेचा दाब कायम ठेवणे हा आहे. पृथ्वीवर सतत जवळ जवळ १५ पौंडांचं हवेचं वजन आपण वागवत असतो. हे वजन असल्यामुळेच आपल्याला श्वास घेता येतो. मानव ह्याहून १/३ हवेच्या दाबात (जितका उंच पर्वतांवर असतो) तितक्या दाबात श्वसन करू शकतो. सध्या वापरात असलेले अंतराळ पोषाख घालून वावरणे हे खूप अवघड आहे. म्हणून वेगळ्या प्रकारचे पोषाख बनवण्याचे प्र्योग चालू आहेत.

४. अंतराळ प्रवास हा कित्येक महिन्यांनाचा/वर्षांचा असू शकतो. अशा वेळी त्यांना खाता येईल आणि तीन ते चार वर्ष टिकतील अश्या रेसिपी बनवणे हा देखिल प्रयोग चालू आहे.

५. आत्ताची इंधने वापरून मंगळापर्यंत जाण्यासाठी साधारण चार वर्षांचा अवधी लागेल म्हणून वेगळ्या प्रकारची इंधने वापरून हा प्रवास ५ ते ६ महिन्यांमधे करता येईल. अशा प्रकारचे अंतराळ यान येत्या काही महिन्यांत टेस्ट करण्यात येणार आहे.

६. सर्वात शेवटी अजून मानव मंगळापर्यंत जाउ शकत नसला तरी रोबोट्स पाठवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. हे रोबोट्स बनवण्यामधे आणि कंट्रोल करण्यामधे एका भारतीय मुलीचा मोठा सहभाग आहे. हे दोन रोवर्स तीन महिन्यांसाठी काम करतील अशी योजना होती पण त्या रोवर्सनी अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी बजावली आहे.

- फ्युचर इज एक्सायटिंग!

प्रकाश घाटपांडे's picture

3 Feb 2011 - 8:02 pm | प्रकाश घाटपांडे

विकास यांना मंगळावरची बाई दिसली होती. त्याची आठवण आली.

हा फोटो कोणीही पाच मिनिटात तयार करू शकेल....
सो त्यात काहीच तथ्य नाही

नरेशकुमार's picture

4 Feb 2011 - 10:17 am | नरेशकुमार

ए तुला ते करिझ्मा वगेरे येते का रे ? त्यात असेच काही तरी करत्यात.

विकास's picture

4 Feb 2011 - 8:00 pm | विकास

अहो ती चर्चा तेथे "विज्ञानाबरोबरच विनोद/विरंगुळा" म्हणून टाकलेली होती. :-)

बाकी तुमचेव चित्रसंपादनाचे कौशल्य जबरी. बाईला पत्रिकेत एकच मंगळ असू शकतो, येथे मंगळाच्या पत्रिकेत नाही पण जमिनीवर ७ बायका आहेत असे तरी किमान म्हणता येईल. :)

नितिन थत्ते's picture

3 Feb 2011 - 9:39 pm | नितिन थत्ते

परग्रहावरील 'प्रगत' जीवसृष्टी हा अनेक विज्ञानकथांचा विषय असतो. त्याचप्रमाणे प्रत्यक्षपणे देखील परग्रहावर जीवसृष्टी आहे का अशा स्वरूपाचे संशोधन चालू असते.

शक्याशक्यतेचा विचार केला तर एवढ्या मोठ्या विश्वात कुठेतरी जीवसृष्टी असण्याची शक्यता खूपच आहे. तरीही आपला अशा एखाद्या जीवसृष्टीशी संपर्क होण्याची शक्यता किती?

१. समजा एखाद्या ग्रहावर जीवसृष्टीची आपल्यासारखीच प्रगती होत आहे, आपल्याच वेगाने आणि आगेमागे तिचीही प्रगती होत आहे आणि आपण वापरतो तसलीच साधने दूरसंचारासाठी वापरतात. असे असले तर त्या लोकांनी आपल्याकडे पाठवलेले संपर्क संदेश काहीशे वर्षे जुने असायला हवेत. कारण काहीशे प्रकाशवर्षे अंतरापर्यंततरी जीवसृष्टी आढळलेली नाही. आपल्यासारखीच प्रगती होत असेल तर इतक्या वर्षांपूर्वी असे संदेश पाठवण्याच्या स्थितीत ते नसतील.

२. समजा ते आपल्या पेक्षा खूपच आधी प्रगत झाले आहेत. आणि आपण आज ज्या पातळीला आहोत त्या पातळीला ते सुमारे १००० वर्षांपूर्वीच आले होते. आणि त्यांनीही असाच परग्रहावरील सृष्टीचा शोध घेण्यासाठी संपर्क संदेश पाठवले. ते संदेश आपल्याकडे सुमारे ५००-६०० वर्षांपूर्वी पोचले होते. पण आपल्याकडे ते ग्रहण करण्याची आणि त्यावर कारवाई करण्याची क्षमता त्यावेळी नव्हती. २००-३०० वर्षे त्यांनी प्रयत्न केला आणि मग काही जीवसृष्टी नाही असे समजून शोध घ्यायचे प्रयत्न त्यांनी थांबवले.

३. उलट स्थिती असेल तर आपण आज पाठवीत असलेले संदेश स्वीकारायची त्यांची पात्रता नसणार म्हणून त्याला प्रतिसाद मिळणार नाही.

थोडक्यात जीवसृष्टी असायची शक्यता बरीच असली तरी आपला आणि त्यांचा संपर्क होण्याची शक्यता ही इतके सगळे योगायोग जुळले तरच असेल.

अवलिया's picture

4 Feb 2011 - 6:50 pm | अवलिया
विकास's picture

3 Feb 2011 - 11:53 pm | विकास

मला एकदम नारळीकरांची "ट्रॉयचा घोडा" ही विज्ञानकथा आठवली. त्यात परग्रहवरील अतिप्रगतसृष्टीकडून १९७३ साली नासाने विश्वात सोडून दिलेले "पायोनियर" हे यान परत पाठवलेले असते. ते परत येताना पाहून सर्व खूष होतात. पण नंतर एका शास्त्रज्ञाच्या सुपीक डोक्यामुळे त्याचे जेंव्हा इलेक्ट्रॉनिक किरणांचा वापर करून फोटो काढण्याचा प्रयत्न केला जातो, तेंव्हा लक्षात येते की ते आतून अँटीमॅटरचे बनलेले असल्याने, जर ते उघडले तर स्फोट होऊ शकतो वगैरे. थोडक्यात इट वॉज ट्रोजन हॉर्स...

मला मेन इन ब्लॅक मधला टॉमी ली जोन्सचा विल स्मिथ बरोबरचा अशा अर्थाचा संवाद आठवला: "दोन हजार वर्षांपुर्वी ते पृथ्वीभोवती सुर्य फिरतो समजायचे, चारशे वर्षांपुर्वी पृथ्वीला सपाट मानायचे, आणि आत्ता तू समजतोस की इतरत्र सृष्टी नाही... "