शेवग्याच्या झाडाच्या फांद्या खुप ठिसुळ असतात. पावसाळ्यात बर्याचदा मोठ्या शेवग्याच्या फांद्या वार्याने पडतात. कधी कधी तर शेंगा काढतानाही फांदी तुटते. मग ह्याची फुले भाजीसाठी उपयोगात आणतात. परवा मी माहेरी गेले होते. तिथे शेंगा काढताना शेंवगेची फांदी खाली आली. मग आईने लगेच ह्या फुलांची भाजी करायचा मार्ग दाखवला.
माझ्या अपेक्षेप्रमाणे खुपच छान चव लागते फुलांच्या भाजीची. बुरजी आनी कालवांसारखीच सारखीच भाजी दिसते.
ही फुले कालवांमध्ये, सुकटीमध्येही घालतात.
लागणारे साहित्य:
शेवग्याची फुले
एक किंवा दोन कांदे चिरुन
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
३-४ हिरव्या मिरच्या
१ टोमॅटो
हिंग, हळद
मिठ
अगदी थोडा गुळ
तेल
पाककृती:
शेवग्याची फुले धुवुन घ्यावीत. तेलावर लसुण पाकळ्या, मिरचीची फोडणी देउन त्यावर कांदा परता. कांदा जास्त शिजवण्याची गरज नसते. मग त्यात हिंग, हळद घालुन शेवग्याची फुले घाला. परतुन एक वाफ घ्या. मग त्यात चिरलेला टोमॅटो, मिठ, गुळ घाला. एक वाफ काढा आणि चांगले परतुन घ्या. झाली भाजी तय्यार.
प्रतिक्रिया
1 Feb 2011 - 4:07 pm | नन्दादीप
खाल्लीय भाजी...मस्त लागते.....
अवांतर : टाकळा/टायकुळा याच्या भाजीची पाक्रु टाका जमल तर...
1 Feb 2011 - 4:07 pm | गणपा
शेवगाच्या पाल्याची (कवळ्या पानांची) भजी खाल्ली आहे.. फुलांचा प्रकार अभिनव दिसतोय.
2 Feb 2011 - 8:45 am | सहज
शेवगाच्या पाल्याची (कवळ्या पानांची) भाजी (भजी नाही)खाल्ली आहे. तसेच कणकेत हा पाला घालून पराठे (पालक पराठेप्रमाणे). पण शेवग्याची फुले कधी खाल्ली नाहीत.
जागूतै ग्रेट आहे.
1 Feb 2011 - 4:12 pm | कच्चा पापड पक्क...
हादग्याच्या फुलान्ची भाजी खाल्ली आहे. हि भाजी कधी खाल्ली नाही.
1 Feb 2011 - 7:14 pm | निवेदिता-ताई
.............हि भाजी कधी खाल्ली नाही
1 Feb 2011 - 4:12 pm | कच्चा पापड पक्क...
हादग्याच्या फुलान्ची भाजी खाल्ली आहे. हि भाजी कधी खाल्ली नाही.
1 Feb 2011 - 4:13 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__
तुझे कुटुंबीय आणि आप्तेष्ट खरेच नशिबवान आहेत.
1 Feb 2011 - 10:14 pm | प्राजु
अगदी अगदी!!
मी शेवग्याची पाने.. आल्यापाल्याच्या भाजी (बहुतेक गौरी बसतात तेव्हा)मध्ये घातलेली पाहिलेली आहेत. पण फुलांची भाजी.. नवाच आहे हा प्रकार. :)
आवांतर : जागुच्या घरचे नशिबवान आहेतच.. शिवाय त्यांना एकिकडे भितीही वाटत असावी की, "आज नेमकं ही काय खायला घालेल सांगता येत नाही.. अशी काही बेमालूमपणे मसाले वगैरे घालून करते की, काय आहे हे विचार करायला वेळ मिळतच नाही..) ;)
1 Feb 2011 - 4:20 pm | जागु
नंदादिप टाकळ्याची टाकली आहे आधी भाजी.
गणपा, कच्चा पापड खरच एकदा करुन बघा. खुप छान लागते ही भाजी.
राजकुमार एका अर्थाने मी पण नशिबवान आहे. काही केले तरी बिचारे खातात सगळे आवडीने.
1 Feb 2011 - 4:36 pm | प्राजक्ता पवार
मस्तंच गं जागु . आणखी एक नविन पाकृ कळली तुझ्यामुळे :)
1 Feb 2011 - 5:11 pm | आशिष सुर्वे
जागु तै..
पुस्तक लिवा आता तुमी..
खरंच झ्याक पाकृ हायेत ह्या सगल्या..
मन भरून पावलं..
1 Feb 2011 - 5:44 pm | आमोद
असेच म्हणतो
1 Feb 2011 - 5:46 pm | स्वाती२
शेवग्याच्या फुलांची सुकट घालून भाजी आणि तांदळाची गरम गरम भाकरी! आठवणी उरल्यात आता फक्त!
1 Feb 2011 - 6:59 pm | कच्ची कैरी
गावी गेल्यावर हा प्रकार नक्की करुन बघणार ,मागच्या दारीच शेवग्याचे झाड आहे .पाकृ.बद्दल धन्यवाद!
1 Feb 2011 - 9:19 pm | योगप्रभू
शेवग्याच्या फुलांची परतून कोरडी चटणी पण छान होते.
फुले नाजूक असल्याने चटणी जास्त परतायची नसते. दोडक्याच्या शिरांची चटणी जशी आपण काळी न होऊ देता हलक्या हाताने खमंग परततो तशीच शेवगा फुलांची चटणीही करायची असते. अनुभवी गृहिणींना या चटणीचे इन्ग्रेडियंट्स ठाऊक असतीलच.
स्वाती२ यांची प्रतिक्रिया वाचताना एक कल्पना सुचली. शेवगा फुले आणि सुकटाची मिक्स कोरडी चटणी केली तर काय बहारदार लागेल नै?