कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
टाकळा - http://www.misalpav.com/node/8565
लागणारे जिन्नस:
२-३ भारंगीच्या जुड्या (पाने खुडून, धुवून, चिरून)
२ मोठे कांदे
चणा डाळ पाव वाटी भिजवून
५-६ लसुण पाकळ्या
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा हळद
२-३ मिरच्या
चवी पुरते मिठ
अर्धा चमचा साखर
पाव वाटी खवलेला ओला नारळ
२ मोठे चमचे तेल
क्रमवार पाककृती:
भारंगीचा चिरलेला पाला पाणी घालून उकडत ठेवावा उकळी आली की पाच मिनीटांनी गॅस बंद करुन त्यातील पाणी काढून हा पाला पिळून घ्यायचा. मग तेलावर लसुण, मिरची, हिंग, ची फोडणी देउन कांदा घालावा व हळद घालून चणाडाळ व भारंगीचा पाला घालावा. झाकण देउन थोडावेळ शिजवावे. चणाडाळ शिजत आली की त्यात मिठ व साखर घालून थोडावेळ शिजू द्यावे. डाळ शिजली की त्यात खोबर घालून गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
ह्या भाजीत एक दिवस भिजत घातलेले वाल साल न काढता घालूनही भाजी करता येते तसेच चणा डाळ ऐवजी मुगडाळ, तुरडाळ, उडीदडाळ घालता येते. नॉनव्हेजमध्ये सुकट व ओल्या करंदीतही (छोटी कोलंबी) घालता येते.
प्रतिक्रिया
17 Jul 2009 - 12:22 pm | दिपाली पाटिल
छान दिसतेय भाजी पण बनवल्यानंतर चा फोटो नाही चढवलास कां? आणि उकडुन घ्यायचं काही कारण आहे कां?
दिपाली :)
17 Jul 2009 - 12:25 pm | सहज
चवीला ह्या सगळ्या टाकळा, करडू, भारंगी कश्या असतात तुरट, कडवड? डाळी ऐवजी/सकट भिजवलेले शेंगादाणे घालून देखील बरी लागेल का?
खर सांगायचे तर ह्या भाज्यापाहून आळूच्या भाजीची जास्त आठवण होते आहे. :-)
एक उत्तम पाकृलेखमाला यात काही वाद नाही.
17 Jul 2009 - 12:30 pm | सुनील
फस्सक्लास!! गेल्याच आठवड्यात बिरडं घातलेली भारंगी खाल्ली होती, त्याची आठवण झाली.
मस्त पाकृ.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Jul 2009 - 12:35 pm | आशिष सुर्वे
फक्त दोनच प्रतिक्रिया...
(१) ' वा! '
आणि
(२) 'येउदेत अजून'...
-
कोकणी फणस
17 Jul 2009 - 1:08 pm | जागु
दिपाली, सहज - ही भाजी कडवट असते. म्हणून ही शिजवून त्यातील पाणी काढले की त्याचा कडूपणा जातो. शेंगदाणेही घालतात ह्यात. कुरडू माठासारखी लागते.
सुनिल, मराठा - धन्यवाद.
17 Jul 2009 - 7:16 pm | चकली
ही भाजी मला आवडते. अजून अशाच छान छान भाज्या येउ द्या.
चकली
http://chakali.blogspot.com
17 Jul 2009 - 9:27 pm | प्राजु
आणखी एक रान मेवा!
जागु, तुला एक प्रश्न..
सध्या तू काय कोकणात वगैरे रहायला गेली आहेस का? तुला इतक्या रान भाज्या फोटो काढण्यासाठी मिळतात कुठे?
पाकृ नेहमी प्रमाणेच सरस!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Jul 2009 - 2:09 am | अश्विनीका
जागुताई , छान आहे लेखमाला. ह्या सर्व भाज्या पुणे मुंबई सारख्या मोठ्या शहरात मिळतात का?
चिवळी बद्दल पण ऐकले आहे. तुम्हाला रेसिपी माहित असेल तर ती पण टाका.
- अश्विनी
18 Jul 2009 - 11:37 pm | अश्विनीका
>>अश्विनी चिवळी म्हणजे बारिक-बारिक पानांची , लाल दांड्यांची भाजी असते ना? - दिपाली
दिपाली , बरोबर. पाने बारिक असतात आणी दांडे गुलाबी लालसर रंगाचे असतात. भाजी स्पर्शाला खूप थंड असते. विदर्भात, जळगाव कडे कडाक्याच्या उन्हाळ्यात छोट्या बाळांना ह्या भाजीवर झोपवतात...थंडाव्यासाठी. भाजीची पाने पसरवून त्यावर पातळ धोतराचे कापड घालून मग बाळांना त्यावर झोपवतात. हल्ली पंखे , कूलर असले तरी लाई ट गेल्यावर मात्र हा उपाय हमखास करतात. मी मागे (खूप वर्षापूर्वी , शाळेत असताना) एका नातेवाईकांच्या मुलीच्या बारशाला गेले असताना त्या मुलीला ह्या भाजीच्या टोपलीत ठेवलेले पाहिले आहे.
दिपाली, हा प्रतिसाद इथे अवांतर वाटला तरी मला अजून व्यनीची आणि खरडीला प्रतिसाद देण्याची सुविधा मिळाली नाहिये.त्यामुळे तुझ्या खरडीला इथेच उत्तर देत आहे.
- अश्विनी
18 Jul 2009 - 11:00 am | जागु
चकली, प्राजू, अश्विनीका मी नवी मुंबईमध्ये राहते. इथला अजुनही इथे डोंगर आहेत, रान आहे, शेती आहे. त्यामुळे ह्या भाज्या आम्हाला उपलब्ध होतात. मी लग्न झाल्यापासुन दर पावसाळ्यात हया वेगवेगळ्या भाज्या रोज करते. घरातलेही अगदी आवडीने खातात, कौतुक करतात त्यामुळे माझा उत्साहही वाढतो.
7 Jul 2015 - 7:06 pm | चारु राऊत
वाल भाजुन भिजत घालुन भाजिबरोबर शिजवावे