चंद्रावर मी बांधलाय एक बंगला
फार जुनी झालीय हकीगत
जाहिरात आली होती
[आठवतंय का ..?]
चंद्रावर जमीन मिळतेय
तेव्हाच घेऊन ठेवलीय
दहा रुपये एकरने
चक्क वीस एकर घेऊन ठेवलीय
माझ्याकडे कागद पत्र आहे
कालच चंद्राचा सेल आला
बंगला बांधून तयार आहे
कधी येताय राहायला ..?
हुरळून गेलो कसा असेल बंगला
चंद्राने "ई"मेल केलाय .
मस्त बंगला..! छान बांधलाय ...!!
फळांची झाडे लावलीत
आंबा, पेरू ,सफरचंद द्राक्षे
काय म्हणाल ते
बंगला एस्पैस नि खोल्या छान
सूर्य टांगून ठेवलाय आवारात
मस्त गाभूळ्लेला
तुम्हाला हवां तसा ...!!
खरेच कंटाळा आलाय येथला
रहायला धड जागा नाही
झोपायला धड खोली नाही
राहायला येथे ..
नि कामाला तेथे ......
नुसती धडधड नि नुसती वणवण
शरीर गेलेय थकून
नि हाडे लागलीत बोलू
चला चंद्रावरच जाउया ..
चंद्र म्हणतो येथे छान आहे
हात उभारले कि त्याचे पंख होतात
"हू !!"म्हणाले की
तुम्ही मस्त उडू लागता
येथे गाडीचा खर्च नाही
उडालाकी बुडण्याचे भय नाही
चांदण्याची नाणी येथे खूप आहेत
आणि मुठभर उचला
येथे सगळे फुकट आहे
येथे खायला लागते काय
प्यायला अमृत दुसरे काय ..?
यायचे तर लवकर या
येथे आल्यावर एक होईल
तुमाचा मात्र अडाम होईल
येताना मात्र ईव आणा
मग चंद्राची पृथ्वी होईल
त्याला वेळ लागणार नाही
येथे तारुण्य भरपूर आहे
हे चंद्राचे अंगण आहे ...!!
प्रतिक्रिया
26 Jan 2011 - 7:22 pm | नरेशकुमार
मस्त !
26 Jan 2011 - 7:39 pm | ashvinibapat
26 Jan 2011 - 8:14 pm | कच्ची कैरी
चंद्र तर आपला मामा ! मग त्याच्याकडुन कशाला काय विकत घ्यायचे ?आपल्या मामाचीच जमीन समजुन हक्काने रहायचे .
बाकी कविता एकदम फंडु हं!
27 Jan 2011 - 1:07 pm | गणेशा
कविता आवडली
28 Jan 2011 - 12:23 pm | पियुशा
मस्त जमलिये कविता
पन एक सुचवु का ?
यमक जुळ्लि तर अजुन छान जमेल
(अर्थात हा तुम्च्या मर्जिचा प्रश्न आहे)