ते गाणे तिन्हीसांजेला
मन माझे फुलवून गेले
दूर मला माझ्या गावी
मज अलगद घेऊन गेले
त्या नदी किनारी
झाडांची हिरवी गर्दी
वळणारी पाउलवाट
किती वाटत होती आपुली
ती हवा मस्त होती
होती गाभुळलेली
मज आठवूनी गेले
ती तिन्हीसांजेची गाणी
तिन्हीसांजेच्या डोंगर रांगा
तो नाद अनामिक येई
घंटीचा किणकिणनारा....!!
मन माझे मोहून जाई
मन भरून जाई माझे
ती बघून गुलबक्षीची फुले
त्या मत्त गंधाने
मन माझे झुलून गेले
त्या कळ्या शेंदरी बघोनी
मन माझे हरखुनी जाई
ते रंग फुलांचे बघुनी
मी खुळा होऊनी जाई
ते पक्षी गोजिरवाने
ते स्वर फुलवीत गेले
आभाळातील भिरी
नक्षी कोरून गेले
मज क्षणभर दिसून गेले
मन माझे हरवून गेले ......!!
ते गाणे तिन्हीसांजेला
मन माझे फुलवून गेले
प्रतिक्रिया
21 Jan 2011 - 9:25 am | निवेदिता-ताई
छान !!!!!!!!!!!!
21 Jan 2011 - 12:13 pm | काव्यवेडी
तिन्हीसान्जेची वेळ , कातरवेळ !!!
हुरहुर लावणारी , त्यावेळी आवडते गाणे !!
सुन्दर जमली आहे कविता !!
21 Jan 2011 - 12:18 pm | पियुशा
मस्त मस्त मस्त!
:)
21 Jan 2011 - 5:23 pm | गणेशा
कविता नेहमीप्रमाणे खुपच छान निसर्गवर्णन अतीशय हुबेहुब.. आणि कवितेचा फॉरमॅट ही आवडला
21 Jan 2011 - 10:50 pm | शुचि
सुंदर.
>> ते पक्षी गोजिरवाने
ते स्वर फुलवीत गेले
आभाळातील भिरी
नक्षी कोरून गेले >>
मस्तच
22 Jan 2011 - 9:08 am | आत्मशून्य
.