कलम, आज उनकी जय बोल - रामधारी सिंह दिनकर

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
18 Jan 2011 - 4:40 am

जालावर भटकत असताना अतिशय गेय अशी एक कविता माझ्या वाचनात आली. वीररसाने ओथम्बलेली ही रचना हिंदीतील नामवंत कवी "रामधारी सिंह दिनकर" यांची असून खाली उधृत केलेली आहे.

अनाम ,नामवंत, अमर, लहान, थोर अशा स्वातंत्र्यवीरांना ही कविता अर्पण केलेली आहे.

पहीले कडवे चटका लावणारे आहे आणि ते वाचत असताना भगतसिंग, राजगुरु, चाफेकर बंधूंची आठवण झाल्याखेरीज रहात नाही.
"जो चढ़ गये पुण्यवेदी पर
लिए बिना गर्दन का मोल।" हे वाचतानाच काळजात चर्र होते.

दुसर्‍या कडव्यातील रुपक अप्रतिमच आहे. स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक हे जणू प्रचंड वादळातदेखील आत्मबळावर जळत राहीलेले, प्रकाश देत राहीलेले असंख्य लहान लहान दीपच आहेत असे रूपक कवीने वापरले आहे. एका शब्दाचीही परतफेडीची अपेक्षा न ठेवता कर्तव्यपूर्ती करता करता, वादळाचा सामना करत जे विझून गेले आज त्यांचा जयजयकार करू यात अशा आशयाची ही कविता आपल्याला आवडेल याची मला खात्री आहे.

कलम, आज उनकी जय बोल - रामधारी सिंह दिनकर

जला अस्थियां बारी-बारी
चिटकाई जिनमें चिंगारी,
जो चढ़ गये पुण्यवेदी पर
लिए बिना गर्दन का मोल।
कलम, आज उनकी जय बोल

जो अगणित लघु दीप हमारे
तूफानों में एक किनारे,
जल-जलाकर बुझ गए किसी दिन
मांगा नहीं स्नेह मुंह खोल।
कलम, आज उनकी जय बोल

पीकर जिनकी लाल शिखाएं
उगल रही सौ लपट दिशाएं,
जिनके सिंहनाद से सहमी
धरती रही अभी तक डोल।
कलम, आज उनकी जय बोल

अंधा चकाचौंध का मारा
क्या जाने इतिहास बेचारा,
साखी हैं उनकी महिमा के
सूर्य चन्द्र भूगोल खगोल।
कलम, आज उनकी जय बोल

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

सन्जोप राव's picture

18 Jan 2011 - 5:43 am | सन्जोप राव

'जेथे चिरा न पणती' च्या धर्तीवरची कविता आहे. छान!
(याचा मराठी भावानुवाद करता येईल का? प्रयत्न करायला हवा...)

भाकरी's picture

18 Jan 2011 - 8:26 am | भाकरी

शुचि, धन्यवाद. तिसरया / चवथ्या कडव्याचा पण अर्थ लिहिशील का? 'उगल रही है', 'चकाचौंध' वगैरे शब्दांचे अर्थ माहित नाहित त्यामुळे कळत नाहिये.

वेताळ's picture

18 Jan 2011 - 9:37 am | वेताळ

लखलखाट.....

llपुण्याचे पेशवेll's picture

18 Jan 2011 - 9:44 am | llपुण्याचे पेशवेll

सदर कविता जर शांततामय मार्गाने निदर्शने करण्यार्‍यांबद्दल लिहीली असेल तरच आवडली आहे.
अन्य क्रांतीकारक वगैरे सगळे अतिरेकी असल्याने जर त्यांच्यावर लिहीली असेल तर आवडली नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jan 2011 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

आज पुन्हा एकदा पुप्याशी सहमत आहे. सदर कविता जर शांततामय मार्गाने निदर्शने करण्यार्‍यांबद्दल लिहीली असेल तरच आवडली आहे.

आज क्रांतिकारकांवरच्या कवितेचे कौतुक चालु आहे, उद्या कसाब - अबझल वगैरे.वर कविता लिहुन त्याचे गोडवे गायले जातील.

ह्या धाग्याचा निषेध म्हणुन मी ५ मिनिट खरडमौन बाळगत आहे. ५ मिनिटांनी शेळीच्या दुधातील शेवया खाऊन मी ते सोडेन.

धन्यवाद.
परात्मा गांधी

यशोधरा's picture

18 Jan 2011 - 9:46 am | यशोधरा

सुरेख कविता शुचि, इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

गुंडोपंत's picture

18 Jan 2011 - 11:11 am | गुंडोपंत

सुरेख कविता शुचि, इथे दिल्याबद्दल धन्यवाद. हेच म्हणतो.

आवडले. अजून रसग्रहण केले असते तरी आवडले असते. कुणी चाल लावून म्हंटली असल्यास ते ही द्या...

प्रकाश१११'s picture

20 Jan 2011 - 8:43 pm | प्रकाश१११

शुची - हे खूप मस्त शोधून काढलेस .आवडले . तुझ्या मेहनितीला शुभेच्छां
लिए बिना गर्दन का मोल।" हे वाचतानाच काळजात चर्र होते