मी पण एक कविता करणार आहे ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
13 Jan 2011 - 9:06 am

थांबा मित्रानो ..!!
थोडेसे क्षणभर थांबा
दम घेउद्या मला
सूर जराशे लावूद्या
अन बघा मी काय करतोय ते
मित्रानो..! मीपण एक कविता करणार आहे

कविता म्हणजे असते काय
खाली डोके वरती पाय
अहो मी पण तसेच करणार आहे
हातावर मी देखील चालून
शब्दाची रांगोळी काढणार आहे
थांबा मित्रानो
क्षणभर ..!
मी पण एक कविता करणार आहे

तीच तशीच सिनेमाची गाणी
तशीच चाल मीपण लावणार आहे
नि तुमच्याकडून वाहवाची दाद मी पण घेणार आहे
थांबा मित्रानो
क्षणभर
मी पण एक कविता करणार आहे

खेड्यातून आलोय
सालं शब्दाना वळणच नाही ना ..?
त्याना जरा एस नि फेस
पाठीत रट्टा [माझ्याच]घालून शिकवणार आहे
ऐकत नाही म्हणजे काय ..?
थांबा मित्रानो ..
क्षणभर ..!
मी पण एक कविता करणार आहे

खूप कविता वाचून मी तसेच थोडेफार गिरवून
अगदी मस्त कविता लिहिणार आहे
थांबा मित्रानो
क्षणभर ..!
मी पण एक कविता करणार आहे ..

कशा केल्या तुम्ही कविता ..?
जरा तुमचीच कॉपी करणार आहे ..!
चालेलना मित्रानो ..?
थोडसे थांबतायना
क्षणभर ...
मी पण एक कविता करणार आहे ..!!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

13 Jan 2011 - 10:14 am | पाषाणभेद

चला मग ती केलेली कविता ऐकवा आता.

प्रकाश१११'s picture

13 Jan 2011 - 10:32 am | प्रकाश१११

पाषाणभेद - जे वाचली तीच कविता मित्रा .

पाषाणभेद's picture

13 Jan 2011 - 12:16 pm | पाषाणभेद

त्ये समजले हो पकाकाका, आमी पन विनोदाने जोक केला.

नरेशकुमार's picture

13 Jan 2011 - 10:48 am | नरेशकुमार

मि पन एक परतिसाद देनार आहे.