शब्दांचे भरघोस पिक ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
12 Jan 2011 - 1:25 pm

शब्दांचे भरघोस पिक येऊ लागले आहे
कोठेही पेरा मनात
ते मस्त तरारून येतात
शब्द पेरा नि वाहSवा चे नुसते खत घाला
प्रचंड फुलून येतात
मनाची नि नेटची जमीन अंतहीन आहे
कितीही पेरा
भरपूर जागा शिल्लक आहे

शब्दाचे बियाणे कोठेपण पेरा
वाळवंटात पेरा
पाण्यात उधळा
त्याला पटकन कोंब फुटून
कशे तारार्रून येतात बघत रहा
शब्द कसे का असेना
अक्षर कसेका असेना
यडे...!
गबाळे ...!!
कुरूप....!!
टक्क काळे
टायपत गेले की छान होऊन बाहेर पडतात

दात कितीका वाकडे असेना
थोडे पैसे फेका
व्यगोपचार करून घ्या
चांगल्या दाता पेक्षा सुंदर दिसतात हे दात
छान हसू फुलवून घ्या

शब्द पेरा
कोठेही कसेही
फक्त वाह SS वाचे खत घाला
तुमच्या आनंदासाठी
त्याचे मोफत वाटप करा
पैसे घेऊन ते विकता येणार नाही
कारण
शब्द पेरणारे येथे
मोजता येणार नाहीत
ईतके अमाप आहेत
शब्द पेरा
भरभरून दाद देणारे येथे
रसिक आहेत .......
शब्दांचे पिक भरघोस येत आहे
कांद्याचा भाव कधीतरी मिळेल
शब्दाना [?]
सध्या साठे बहाद्दर कमी आहेत ...!!

अद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

पियुशा's picture

12 Jan 2011 - 2:21 pm | पियुशा

पैसे घेऊन ते विकता येणार नाही
कारण
शब्द पेरणारे येथे
मोजता येणार नाहीत
ईतके अमाप आहेत
शब्द पेरा
भरभरून दाद देणारे येथे
रसिक आहेत .......
व्वा वा लाय भारि

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2011 - 2:32 pm | परिकथेतील राजकुमार

खुप छान.
कवितांचे भरघोस पिक.

नरेशकुमार's picture

12 Jan 2011 - 7:34 pm | नरेशकुमार

अवं पिक नाय पुर आलायं

कविता छान