[निर्माण ग्रुपमधील .माझा मित्र त्रिशूल त्यातला
छान कार्यकर्ता आहे .सर्वांनी धान्यापासून दारू ह्या विरोधात मोठे आंदोलन छेडले होते .त्यावरून हे रामायण ..!!]
शेता मध्ये पिक येऊ दे
पाउस पडून सारे कुजू दे
मग बनवू त्याची दारू
जरा खिसा भरू दे ....!
बाजरीची दारू
ज्वारीची दारू
भाताची बी दारू बनवू दे
जरा खिसा भरू दे ...!
शेता शेता मध्ये
लागुदेरे भट्टी देवा
तुझी करतो मी सेवा
जरा खिसा भरू दे...!
बायको आणेल भाकर
त्याच्या संगे दारू
जरा पिऊन मजा करू दे
जरा खिसा भरू दे ...!
सरकारची करणी
जरा लागुदेकी वर्णी
धान्याची बनवूनी दारू
जरा खिसा भरू दे ...!
येउदेकी पाहुणे
त्याना देऊ भरून ग्लास
पहिल्या धारेची पिउदे
जरा खिसा भरू दे .....!!
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 5:31 pm | गणेशा
छान आणि नेहमी पेक्षा वेगळी शैली ..
आवडली कविता
8 Dec 2010 - 6:18 pm | स्पंदना
भर लेका भर
खिसे भर ।
खिसे भरुन कोपर्यावरच्या गटारात लोळ ।
भर लेका भर
खिसे भर ।
बायका पोरांना पांजर पोळात सोड ।
भर लेका भर
खिसे भर ।
दावणीची खिल्लार कत्तल खान्यात तोड ।
भर लेका भर
खिसे भर ।
शिवारावर उठुदे माळाच कोड ।