सरणावर माझ्या नको ते लोक रडूनी गेले
ओले लाकुड त्यामुळेच का पेटूनी गेले
जीवंतपणी पाहीलेले स्वार्थी परके आप्तगण
मी गेल्यावर माझ्याशी ते नाते सांगूनी गेले
आयुष्यभर सिताफ़ीने ज्यांनी पै पै माझी लुटलेली
सरणावर ही माझ्या ते अश्रू गहान ठेवूनी गेले
जगताना एकटाच लढलो मी स्वता:शी
ज्यांनी मारले तेच आज मज खांदा देवूनी गेले
चंद्रासही माझ्या कधी ना डाग होता काही
नजरेच्या निखार्यांनी आगीस ते भडकवूनी गेले
संसाराच्या झोळीत होता स्वाभिमान जपलेला
कोरड्या आसवांची आज ते भीक घालूनी गेले
मिळेल त्या गोष्टीत कायम स्वर्गसुख घेत गेलो
स्मशानात आज ते नरकयात्रा दाखवूनी गेले
श्वासांसही न दिली अंतरे कधी जीवनात मी
हुंदक्यात दुस्वासाचे उसासे ते झाकूनी गेले
अन्यायाविरुद्ध कायम पेटुन उठलेलो मी
आगीतच आज अस्तित्व माझे विरूनी गेले
------ शब्दमेघ
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 5:18 pm | प्रकाश१११
सरणावर माझ्या नको ते लोक रडूनी गेले
ओले लाकुड त्यामुळेच का पेटूनी गेले
अरे हेतर खूपच छान लिहिले आहे
नवीन असेल तर खूप खूप शुभेच्छा !!
मनापासून !!
8 Dec 2010 - 6:07 pm | स्पंदना
एक शेवटच कडव सोडल तर बाकिची गझल __/\__ अप्रतिम गणेशा !
8 Dec 2010 - 8:01 pm | मदनबाण
अ प्र ति म !!! :)
9 Dec 2010 - 10:22 am | पियुशा
सुरेख !
9 Dec 2010 - 11:50 am | अवलिया
__/\__
21 Aug 2011 - 5:27 am | चित्रा
गझल आवडली.
कधीकधी जुन्या गोष्टी शोधताना बरेच चांगले काही सापडून जाते तसे झाले.