माझ्या देशात राहणाऱ्या बाबास ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
5 Dec 2010 - 11:52 am

किती वर्षे झाली
मी इथे परदेशात येऊन बसलो आहे बाबा
देश सोडून येण इतकं सोपं असतं का बाबा ?--
आपल्या मातीचा वास
आपल्या घराचा सहवास गणपतीची आरास
हनुमानजयंतीला भल्या पाहटे उठून केलेली आरती
नि ते गुळखोबरे ….. !
मनात सेव्ह केलेले कसे डिलीट करता येईल आता ..??
आता माझा देश मी माझ्यातच शोधू लागलोय
नि माझा चेहरा तुमच्यात बघू लागलो आहे
माझं मन क्लिक केलं की प्रथम
तुमचाच चेहरा समोर येतो नं बाबा..!!
नि आईची आठवण तर अख्खा स्क्रीन खाऊन टाकतो
मी तुम्हाला, आपल्या घराला
विसरेल असं वाटतं का तुम्हाला...?

मी अगदी लहान होतो
नि तुम्ही तर टारझन होता
माझं बोट धरून तुम्ही मला कोठे फिरवले
याची चव आहेना माझ्या आठवणीला...?
माझ्या आठवणीत तर तुम्ही असता
नि आईचा तर प्रश्नच नाही
तिची आठवण तर असते माझ्या मनात
सतत कधीही ..केव्हाही ..!!
ह्या बर्फाळ हवेत मला, शप्पत उब देते..!!
तुमचा दरारा माझी लक्ष्मन रेषा वाटते
एकटेपणाची भावना देश सोडल्याशिवाय
नाही कळत बाबा ......!!
एकटेपणाची भावना घालवण्यासाठी तुमच्या वयाची
माणसे दिसली की त्यांच्या डोळ्यात
शोधत बसतो माझे आई बाबा ….!

डोळे मिटले कि आपलं गाव दिसतं
घर दिसतं
गुलमोहराचं झाड दिसतं
त्याची लाल फुले दिसतात
त्यावर बसलेला कावळा
कोंबड्याची बांग
खरच सांगतो बाबा :
तिन्ही सांजेला आईनं देवाजवळ लावलेला
दिवा नि म्हटलेली रामरक्षा
माझ्या मनात काहूर उठवतात …ssss

आता या परदेशात : माझ्या घरात
देवाचा देव्हारा मांडून ठेवलाय बाबा
शेंदूर लावलेला मारुती माझा प्राण झाला आता
माझी पहाट रामदासाच्या दासबोधाने सुरु होते बाबा...
नि थिरकत्या उदबत्तीची रेघ नेते
सातासमुद्रापलीकडच्या आपल्या देशात
नि चर्चच्या घंटेचा नाद
मला घेऊन जातो थेट आपल्या देवघरात...

येथे येऊन तर मी दिवस मोजतो आहे नं बाबा …..?
एक गम्मत सांगतो :
दिवस मोजायला लागलो कि तो लांब-लांब पळतो
किती वर्ष झाले मी तुमच्या जवळ होतो नं??....
नं कधी तुम्ही मोजले
न कधी मी
मग कधी काळ कसा हरवून गेला
कधी कळले तरी का ?
नि बाबा तुम्ही आता दिवस मोजायला लागलात...??

करुणकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

6 Dec 2010 - 5:37 am | शुचि

मस्त!!

पियुशा's picture

6 Dec 2010 - 12:47 pm | पियुशा

व्वा मस्त लिहिलय

हे जे काहि लिहिलंय ते लिहीलंय भारी .. एकदम णॉस्टॅल्जिक का काय ते .. :) डोळे पाणावले.

*पण वाचताना मधेच जोराचा हृदयविकाराचा झटका येता येता राहिला !!! आणि थोडा वेळ अफ्रिका रिकॅप डोळ्यासमोर तरळुन गेला !!
*

अतिशय सुंदर कविता ...

वाचतच राहवेशे वाटते आहे ...

स्वानन्द's picture

8 Dec 2010 - 8:10 pm | स्वानन्द

प्रकाटाआ

फारएन्ड's picture

9 Dec 2010 - 3:55 am | फारएन्ड

आवडले!