कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला
बादल्या भरून भरून यायच्या
गप्पा मारीत धूत बसायच्या
तो काळच तसा होता
सासुरवाशिणीचा अड्डा जमायला
तेवढाच निव्वळ क्षण होता ...!
घरच्या सुख दुखाचे रडगाणे गायला
नदीकाठ किती मस्त होता
तो नदीकाठ सुंदर सुरेख होता
अगदी बहरून जायचा
ह्या सुंदर फुलांनी
कशी बांधीव नदी होती
छान पायर्या पायार्या होत्या
पायर्यावर कपडे आपटत बसायच्या
ह्या सासुरवाशिणी ...!!
डबल बी साबणाचा मस्त फेस वाहत राहायचा
बघायला बरे नि बरे वाटायचे
त्याचा गंध आसमंतात फिरायचा
एखादे लवथवते तारुण्य डोळे खेचून घ्यायचे
नागासारखा साबणाचा फेस नदीवर तरंगताना
किती छान वाटायचे ...!!
डोळे त्या पाण्यात हरवून जायचे
त्या थंड थंड हवेत मन विरघळून जायचे
कधी दिवाळीच्या दरम्यान गणिताचा पेपर देऊन
नदीवरच्या सांडव्यावरून जायचो
तेह्वा बायका मस्त धुणे धूत बसायच्या
माझ्या गणिताच्या पेपरमध्ये सगळा फेस नि फेस असायचा
प्रमेय नि रायडर मला नागासारखा वाटायचा
माझे दुख एवढे मोठे नि ह्या आपल्या कपडे आपटीत बसायच्या
गणितापेक्षा ह्यांचे दुख मोठे असेल काहो ?
ह्या मला नेहमी सुखादुखाच्या पार दिसायच्या
कितीतरी बायका नदीवर धुणे धुवायला
.
बादल्या भरून भरून
नि कपडे धूत बसायच्या
माझा गणिताचा पेपर ...!!
नि ह्याचे चुबुक चुबुक धुणे
कसे सोपे असते जगणे ......
नि कसे अवघड होऊन जाते जगणे ..
कुणास ठाऊक काय खरे नि काय खोटे .....????
प्रतिक्रिया
8 Dec 2010 - 11:14 am | अवलिया
मस्त !
मला आधी वाटले ती मागे एक बहुचर्चित जाहिरात आली होती दूरचित्रवाणीवर त्यासंबंधी काही आहे की काय !
8 Dec 2010 - 11:30 am | टारझन
अमुल माचो .. आय मीन अमुल वाह्यात इन्सान ;)
8 Dec 2010 - 11:30 am | अवलिया
करेक्ट !
8 Dec 2010 - 11:52 am | नरेशकुमार
'वाह्यात इन्सान' चुक आहे
'वाहीय्यात इन्सान' असे पाहिजे.
--------------------------------------------------------
वाह्यात कसं ते लाह्यात बोल्ल्या वानि वाटत.
8 Dec 2010 - 11:24 am | वेताळ
त्या जाहिरातीबद्दल लिहा जरा.
8 Dec 2010 - 11:39 am | प्रकाश१११
माझा मित्र नाशिकला होता त्याच्या लहानपणीच्या काही घटना तो खूप रंगवून सांगतो नाशिकचा गोदावरी घाटावर अशा बायका खूप म्हणजे दररोज धुणे धुवाव्यास यायच्या.
मित्र एकदा असाच गणिताचा पेपर देऊन आला .मोठा कठीण पेपर होता . नि ह्या बायका काही सोयर न सुतक .आपल्या मस्त धुणे धुतात .त्यचे त्याला वाईट वाटले. त्यावरून ही कल्पना .
आवडली खूप आभार .माझ्या मित्राचेपण !!
8 Dec 2010 - 11:46 am | पियुशा
छान, लिहिताय!
पु.ले.शु.
8 Dec 2010 - 1:23 pm | योगप्रभू
माफ करा मित्रांनो,
नदीवर धुणे धुणार्या बायका, हे चित्र माझ्याही मनात रुतून बसलेले असले तरी आज विचार करताना जाणवते, की पुढील काळात अशी चित्रे न दिसलेलीच बरी. नदीवर कपडे, जनावरे, वाहने धुणे, नदीच्या पाण्यात सांडपाणी व रासायनिक प्रदूषक घटक सोडणे, कुंभमेळे, मूर्ती विसर्जन हे जितक्या लवकर बंद होईल तेवढा भविष्यकाळ पुढच्या पिढ्यांसाठी सुरक्षित होईल. कारण यापुढच्या काळात आपले गोड्या पाण्याचे साठे कसोशीने जतन करणे हा अस्तित्वाचा प्रश्न बनणार आहे.
आम्ही बनारसला गेलो होतो. तेव्हा होडीतून जाताना शहारे येणारे दृश्य बघितले. मनकर्णिका घाटावर चितेत अर्धवट जळालेले मुडदे ओढून काढून सरळ गंगेच्या पाण्यात टाकून द्यायचे. हे वाहात आलेले मुडदे आमच्या होडीला धडकत असत. भाजलेल्या वांग्यासारखे दिसणारे ते देह बघून उमासे यायला लागायचे. नावाडी सांगे, की मोक्ष मिळावा म्हणून हे मुडदे गंगेत सोडले जातात, पण बारकाईने चौकशी केल्यावर धक्कादायक सत्य समजले. काशीतील डोंब आणि पंडे दोघेही लोभी आहेत. श्रीमंत आणि भरपूर पैसे देतील त्यांच्याच नातलगांच्या मुडद्यांचे चितेत पूर्ण दहन करतात. गरीबांचे मुडदे अर्धवट जाळतात आणि सरळ गंगेत फेकून देतात. गंगा नदी केवळ ह्रषिकेशजवळच स्वच्छ आहे. हरीद्वारपासून ती प्रदूषित व्हायला सुरवात होते ती अगदी गंगासागरपर्यंत. कानपूरला तर चामड्याच्या कारखान्यांतील कातडी कमावून झाल्यावर वापरलेले प्रदूषित पाणी थेट गंगेत सोडले आहे. ज्या महानदीवर उत्तर भारतातील ४० कोटी लोक अवलंबून आहेत तिची ही दशा.
महाराष्ट्रातील नद्यांबाबत तर काय बोलणार? स्थिती समोरच दिसते आहे.
8 Dec 2010 - 1:40 pm | प्रकाश१११
योग प्रभुजी -
आपले विचार अगदी खूप बरोबर आहेत. अगदी मननीय आहेत एकदम मान्य .
मित्रा हे जे लिहिले आहे तो काळ तसा खूप जुना आहे . आत्ता कोणी नदीवर धुणे धुण्यास जातपण नाहीत.
आत्ता आपण म्हणता तसे मी ज्या किंवा माझ्या मनात जी नदी होती ती आत्ता बघवत नाही
अशी घाण घाण झालेली आहे .पूर्वीचे माझ्या मित्राने हे वर्णन केले ती नदी खूप सुंदर सुंदर होती .
नाशिकची गोदावरी नदी .ते चित्र डोळ्यासमोर होते .त्याचे हे वर्णन .आपल्याला जुने आठवले .बरे वाटले असे कसे म्हणू ?तरीही आभार.मनापासून !!
8 Dec 2010 - 1:53 pm | दिपक
शिर्षक वाचुन रारंगढांग मधला हा पॅरा आठवला..
:-)
8 Dec 2010 - 2:07 pm | गणेशा
छान वर्णन ..
आणि आपला गणिताच्या पेपर्चे दु:ख मोठे की या सासुरवासीन बायकांचे जे गप्पाटपा टाकत मस्त धुणे धुत आहेत .. हा पडलेला प्रश्न ही खुप आवडला ..
असे अनेक प्रश्न मला ही बर्याचदा पडायचे ..