मे संपून जून सुरु झाला की
निळ्या निळ्या आभाळात काळे काळे ढग यायचे
शाळा सुरु झाली की मास्तरांच्या छडीसारखे दिवस टोकदार नि कठोर व्हायचे
खरे म्हणजे दिवस कसे छान होते
गाभुळलेल्या चिंचेसारखे
आंबट चिंबट चवदार होते
शाळा सुरु झाली की सारेच बेचव व्हायचे
अभ्यास म्हटला म्हणजे बाबा…. आमचे धरणच फुटायचे …!!
काळे काळे ढग नि मस्त थंड हवा
खिशात चिंचा बोरे नि रंगीत रंगीत गोट्या
मास्तरांनी गणिताचे सूत्र :
{ अ -ब }२ विचारले
की काय सांगू बाबा ..आमचे तर धरणच फुटायचे ..!!
कसे छान छान दिवस यायचे थंड थंड हवेचे
ब्याट होती
बॉल होता
बेल-तेल होते
ब्याटला स्ट्रोक लावण्याचे
भवरा वरच्यावर झेलण्याचे
गणपतीचे
गौरीचे
मग दिवाळीचे दिवस यायचे
सहामयीचा रिझल्ट लागताच
आमचे मन गोते खायचे
काय सांगू बाबा … आमचे तर धरणच फुटायचे !!
रंगीत रंगीत सिनेमाचे काय मस्त मस्त दिवस होते
मस्त मस्त नट्या नि चोकलेट चोकलेट हिरो होते
थेटरमध्ये खाता खाता मस्त वाटायचे
गणिताचा पेपर आठवून तर बाबा…
आमचे धरणच फुटायचे ...!!
कधीतरी सर्कस यायची वर्षातून एकदा
रात्रीचा सर्च-लाईट फिरायचा मिट्ट काळोखात
कधी कधी रस्त्याने हत्ती फिरायचा
मोठ-मोठ्या बाम्बुवर्ती जोकर चालायचा
अशावेळी बाबा मलातर गणित आठवायचे
काय सांगू बाबा… माझे धरणच फुटायचे !
किती वर्षे झाली नि किती काळ गेला
कालच माझ्या स्वप्नामध्ये गणिताचा पेपर आला
गणिताचे सूत्र आठवताना काय सांगू बाबा... मला घाम फुटून गेला ……!!
प्रतिक्रिया
7 Dec 2010 - 1:22 pm | विजुभाऊ
वयोमानानुसार छडी कठोर रहात नाही.
तिच्या आठवणीं इतके मऊ आणि नरम दुसरे काही असत नाही
धरण सुद्धा पुर्वीएवढे भरत नाही.
धरण फुटल्याचे दु:ख नसते....
फुटण्यापूर्वी ते भरलेले नसते
याचे राहून राहून वाईट वाटत असते.
अवांतरः प्रभुमास्तरानी बाकी ज्ञानात यात भर घालावी
7 Dec 2010 - 1:39 pm | टारझन
=)) =)) =)) विजुभाऊ एकदम फ्लॉलेस =))
बाकी छडी लागे छमछम विद्या येई घम घम ची उकल आम्हाला आज एवढ्या वर्षांनी शाळा सोडल्यावर झाली !!
- छडीभाऊ
8 Dec 2010 - 6:29 pm | विंजिनेर
अतीषय हिन आनी हळकट प्रतिसाद.
:D. लगे रहो....
7 Dec 2010 - 4:50 pm | स्पंदना
>>>कधीतरी सर्कस यायची वर्षातून एकदा
रात्रीचा सर्च-लाईट फिरायचा मिट्ट काळोखात
कधी कधी रस्त्याने हत्ती फिरायचा
मोठ-मोठ्या बाम्बुवर्ती जोकर चालायचा>>
हे हे सार विसरल होत हो!! धन्यवाद आठवण करुन दिल्या बद्दल. कित्ती दुर पर्यंत फिरायचा तो लाईट. प्रकाश खरच मनापासुन धन्यवाद ! एक अगदी विस्मरणाच्या खोल कप्प्यात गेलेली गोष्ट आठवुन दिलीत तुम्ही.
कविते बद्दल काय बोलु. छानच!
7 Dec 2010 - 4:53 pm | परिकथेतील राजकुमार
प्रकाशराव कवितेतले आपल्याला काय कळत नाही, पण ते शिर्षक वाचुन मात्र फिस्सकन हसलो एकदम. माफ करा.
8 Dec 2010 - 2:12 pm | गणेशा
छान कविता ..
खुप आवडली
8 Dec 2010 - 5:42 pm | गवि
सहामयीचा रिझल्ट लागताच.
आम्हीही सहामईच म्हणायचो.. तीनमई, सहामई, घटक चाचणी..
जगच परत उभं केलंत भोवती. पावसातल्या कुडकुडत चाललेल्या शाळेतून घरी येण्याच्या वाटेसकट.
उत्तम कवीपॉवर.. :)