वाफेवर चालणार्या आगगाडीने फिरून झाल्यावर आम्ही चारचाकी काढून Shenipsit State Forest ला भेट द्यायला निघालो.... रस्त्यात डाव्या हाताची झाडे हिरवी तर उजव्या हाताची रंगीबेरंगी पाहून मजा येत होती...
निघाल्यापासून साधारण एक सव्वा तासात इच्छित स्थळी पोहोचलो...
जंगलात थोडं आत गेल्यावर हा नजारा दिसला.
जायच्या एक दिवस आधीच हा सर्व कार्यक्रम ठरल्याने २ दिवस आधीचे हवामान पाहिले नव्हतेच आम्ही..इथेही दोन दिवस आधी पाउस पडून गेल्याने बरीच पानगळती झाली होती व ढगाळ वातावरण असल्याने फार दुरवरचे रंग नीट नाही पाहता आले..
मॅक्रो मोड मधे टीपी
या खालच्या फोटू वरून आईस एजची आठवण झाली..
समाप्त.
प्रतिक्रिया
27 Oct 2010 - 8:13 pm | पैसा
पहिल्या काही फोटोतली रंगांची उधळण आणि माळावरचं एकच घर छान!
नटक्रॅकरचा नट छान छान!
27 Oct 2010 - 8:20 pm | Dhananjay Borgaonkar
१ आणि ६ वा फोटु क्लास्!!!!जबरदस्त..
27 Oct 2010 - 8:26 pm | मितान
सह्ह्ह्ह्ही फोटो आलेत प्रभ्या :)
27 Oct 2010 - 8:42 pm | सूड
+१
27 Oct 2010 - 8:29 pm | मदनबाण
झकास्स्स्स्स... :)
आईस एज... ;)
27 Oct 2010 - 8:39 pm | मेघवेडा
क ड क! आईसएजची आठवण झालीच! मस्त फोटु. बाकी फोटू नि वाक्यांच्या संख्येत झालेली घट बरी नाही हो द्येवा!
27 Oct 2010 - 11:23 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
27 Oct 2010 - 8:49 pm | धमाल मुलगा
प्रभ्या, लेका, तुझा क्यामेर्यावर हात एकदम मस्त बसलाय हां!
पण जरा 'एका वाक्यात उत्तरे द्या' सोडुन थोडं 'सविस्तर उत्तरे लिहा' मध्ये उतर की भौ! :)
27 Oct 2010 - 8:54 pm | मेघवेडा
"गाळलेल्या जागा भरा" वरून साहेब "एका वाक्यात उत्तरे द्या" वर आले आहेत. प्रगतीच आहे की! ;)
28 Oct 2010 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>लेका, तुझा क्यामेर्यावर हात एकदम मस्त बसलाय हां!
अगदी स्सही बोल्लास भाऊ.....!
>>>>पण जरा 'एका वाक्यात उत्तरे द्या' सोडुन थोडं 'सविस्तर उत्तरे लिहा' मध्ये उतर की भौ!
हेच म्हणतो ना राव....!
-दिलीप बिरुटे
27 Oct 2010 - 8:53 pm | प्रीत-मोहर
आईसेज..............
27 Oct 2010 - 8:58 pm | ईन्टरफेल
चांगले फोटु हाये दोन कॉफि बि केलेय
परवानगि न घेता?
27 Oct 2010 - 9:20 pm | सुनील
अजून फोटो पाहिजे होते बॉ.
27 Oct 2010 - 9:50 pm | रेवती
फोटू मस्त!
या दिवसात आपल्या आसपास अशीच सुंदर रंगीबेरंगी झाडं असतात पण रोजच्या गडबडीत त्याकडे लक्ष जात नाही.
काल नेहमीच्या रस्त्यावरून जाताना परवापर्यंत हिरवं असलेलं झाड आग लागल्यासारखं पिवळं झालं होतं. ते बघण्याच्या नादात अपघात होताहोता वाचले असेच म्हणीन. ड्राईव्ह करताना एकाही झाडाकडं बघणार नाही असं ठरवून टाकलय.
प्रभोची व माझी नेहमी शाब्दीक मारामारी चाललेली असते त्यामुळे एकॉर्न बघितल्यावर आईसएजमध्ये मी आणि प्रभोची मारामारी चाललिये असे क्षणभर वाटून गेले.;)
28 Oct 2010 - 5:16 am | गांधीवादी
जीवाची काळजी घ्या. 'जान है तो जहाँ है'
28 Oct 2010 - 10:24 am | रेवती
अगदी बरोबर!
27 Oct 2010 - 10:01 pm | असुर
लै झ्याक फटू प्रभ्याजीराव!
मेल्या, अजूण लाव की फटू! इथेपण कंजूसपणा करणार का?
बाकी श्री. धमाल मुलगा आणि श्री. मेघवेडा यांच्याशी अगदीच सहमत!! आपली अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो! :D
--असुर
27 Oct 2010 - 10:09 pm | प्राजु
एकॉर्न चा फोटो आवडला..
27 Oct 2010 - 10:32 pm | प्रभो
हे ठिकाण तुमच्या मँचेस्टर पासून १५ मैलावर आहे.. :) स्टॅफॉर्ड स्प्रिंग्स ला..
27 Oct 2010 - 10:33 pm | ब्रिटिश टिंग्या
सही रे प्रभो :)
27 Oct 2010 - 11:17 pm | पिवळा डांबिस
हॅपी फॉल टू यू!!!
28 Oct 2010 - 2:22 am | चित्रा
फारच आवडला. थोड्या वेळाने माझ्या मोबाईलने काढलेले फोटो टाकीन.
28 Oct 2010 - 7:05 am | सहज
मिपासदस्य श्री आनंद घारे यांनी उपक्रमावर लिहलेला वृक्षांची रंगसंगती हा छोटेखानी माहीतीपूर्ण लेख अवश्य वाचा.
28 Oct 2010 - 8:52 am | स्पंदना
मागील भागा सारखच सुन्दर पण आण्खी ठोडे फोटो चालले असते ना.
एकोर्न ही अगदी टप्पोरा छान दिसतोय.
28 Oct 2010 - 9:26 am | निखिल देशपांडे
मस्त रे प्रभ्या...
पण बाकी लोक म्हणतात तसे सविस्तर लिही ना
28 Oct 2010 - 10:26 am | रेवती
अरे तो सविस्तर लिहिल तेंव्हा लिहिल!
आधी आभार मान म्हणावं!;)
धाग्यावर येउन दोन तीन वेळा बघून गेले अजून आभाराचा शब्द नाही!
28 Oct 2010 - 10:27 am | sneharani
मस्त फोटो!
28 Oct 2010 - 2:27 pm | यशोधरा
शेवटचे तीन फोटो एकदम भारी आले आहेत प्रभो! :) सुरेख!
28 Oct 2010 - 3:09 pm | परिकथेतील राजकुमार
नयनरम्य !
प्रभ्या 'लिहिता' हो रे भाड्या. आणि ते देखील जमणार नसेल, तर इथे फुटकल कौल फोडत बसतात त्यांच्याकडून फोटोवर २/४ ओळी लिहुन घेत जा आणी खाली त्यांचे नाव देत जा. म्हणजे तुझीपण सोय होईल आणि त्यांचा पण लेखनकंडु शमेल.
28 Oct 2010 - 6:30 pm | प्रभो
सर्व वाचक प्रतिसादक मित्र ,मैत्रीण, काका, काकू व एका आजीचे(परत एकदा) आभार... :)
28 Oct 2010 - 7:18 pm | रेवती
हां. आत्ता कस्सं!;)
28 Oct 2010 - 8:15 pm | स्वाती२
मस्त! दोन्ही भाग आवडले.