यूपीएससी साठी 'मराठी साहित्य' विषयाचे मार्गदर्शन हवे आहे (तत्काळ).

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in काथ्याकूट
15 Oct 2010 - 1:16 pm
गाभा: 

नमस्कार मित्र / मैत्रीणींनो..

आमची एक बेस्ट फ्रेंड केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परिक्षा या वर्षी देऊ इच्छिते. तीने सदर परिक्षेसाठी मराठी साहित्य या विषय मुख्य परिक्षेकरता वैकल्पिक म्हणुन घेण्याचे ठरवले आहे. तिचे माध्यमिक शिक्षण गोरेगाव, मुंबई इथल्या
अ. भि. गोरेगावकर शाळेत झाले आहे. तिचे मराठी साहित्याचे सुरवातीपासुन म्हणाजे अगदी शालेय जीवनापासुन वाचन अफाट आहे.

तिने मला अशी विचारणा केली आहे की, उपरोल्लिखित परिक्षेकरता मराठी साहित्य या विषया करता कोणी अनुभवी आणि एक्सपर्ट मार्गदर्शक आहे का? मुंबई अथवा पुणे येथे असल्यास सोयीचे होईल.

(अवांतर: ती कोणी एक प्रविण चव्हाण म्हणुन देखील नाव सांगत होती पण आम्हाला त्यांच्या बाबतीत अधिक महिती मिळु शकली नाही, तेव्हा सदर मार्गदर्शकांबद्द्ल देखील अधिक महिती मिळाली तरी चालेल. हे मुंबई ला असतात की पुण्याला की अन्य कहिच महित नाही.)

आपल्या मिपावर अनेक अनुभवी आणि महितीगार सभासद आहेत.. कोणासही या बाबतीत काहिही (योग्य मार्गदर्शक गुरुंचे नाव, पत्ता, ईमेल, संर्पक क्रमांक इ.)महित असल्यास कृपया इथे धाग्यावरच अथवा व्यनि / खरडी तुन कळवावे, ही नम्र विनंती. मी आपला शतःश आभारी राहीन.

आपला नम्र,
इंट्या.

प्रतिक्रिया

रामदास's picture

15 Oct 2010 - 1:21 pm | रामदास

नावाचे एक सदस्य आहेत त्यांना विचारून बघा. विषयाचे मार्गदर्शन पण चांगले करतात अशी त्यांची ख्याती आहे.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2010 - 1:26 pm | विसोबा खेचर

आमचे आरवलीचे मित्र श्री नंदन होडावडेकर यांना कृपया लिहा किंवा भेटा.. :)

ते जयवंत दळवी व पु ल देशपांड्यांचे शिष्यही आहेत..! :)

(नंदनचा गुरुबंधु) तात्या.

आमचे संभाजीनगरचे मित्र आहेत दिलीप बिरुटे. ते प्राध्यापक आहेत. डॉक्टर आहेत. एवढे शिकलेले असुनही त्यांचा मराठीचा गाढा व्यासंग आहे. आपण त्यांच्याशी संपर्क साधावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Oct 2010 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गाढा व्यासंग वगैरे काही नाही. पण, मराठी विषयाच्या निमित्ताने थोडी फार माहिती असल्याने काही मदत नक्कीच करता येईल. काय मदत हवी आहे, कृपया व्य.नि. टाकावा. मी खालील विषयावर मी काही मदत करु शकतो.

१) मराठी वाड;मयाचा इतिहास [कुठून कुठपर्यंत पाहिजे ते कळवावे]
२) आधुनिक भाषाविज्ञान आणि मराठी भाषा
३) साहित्य समीक्षेची मूलतत्त्वे.
४) दलित साहित्य
५) ग्रामीण साहित्य
६) लोकसाहित्य
७) महानुभाव संप्रदाय
८) आधुनिक मराठी वाड;मयाची सांस्कृतिक पार्श्वभूमी.

अवांतर : कंटाळलो राव या अवलियाला......! :)

-दिलीप बिरुटे

श्रावण मोडक's picture

15 Oct 2010 - 1:56 pm | श्रावण मोडक

इंद्रराज पवार! मुक्तसुनीत!! नंदन!!!
मिपावरचे हे सदस्य आहेतच. आणि यांच्यासारखे इतर काही असतीलही. रामदास काका चर्चा करतील मस्तपैकी. ती मदत खूप मोलाची असेल. बाकी प्राध्यापक (प्राध्यापक किंवा व्याख्याते) हुडकावे लागतील.
मराठी साहित्य हे शब्द पुरेसे नाहीत. नेमके तपशील लिहा.

".....मराठी साहित्य हे शब्द पुरेसे नाहीत. नेमके तपशील लिहा. ..."

श्री.मोडक सरांच्या वरील विधानाशी १०० सहमत आहे. श्री.इंटरनेटस्नेही यांना मी सांगू इच्छितो की, फार मोठा आवाका आहे या विषयातील पेपर्सचा (मराठीच असे नव्हे तर घटनेत मान्य असलेल्या सर्वच भाषा विषयांची लोकसेवा आयोगाने विस्ताराने मांडणी केली आहे); त्यामुळे केवळ एका शिक्षकाच्या मार्गदर्शनाने तुमच्या फ्रेंडला अपेक्षित असलेले यश मिळणार नाही. मुख्य म्हणजे मला तिच्या/त्याच्या जनरल वाचनाविषयी काहीतरी कल्पना इथे द्या; म्हणजे त्या अनुषंगाने मी इथूनदेखील (बर्‍यापैकी...) मार्गदर्शन स्वतः करू शकेन. एमपीएससी असो वा यूपीएससी....दोन्ही परीक्षेला बसणार्‍याला स्वतःच्या क्षमतेवर फार अवलंबून राहावे लागते. (ते जुने एक कोटेशन आहेच...."घोड्याला तळ्याजवळ नेता येते, पाणी त्यानेच प्यायचे असते...")

तुम्हाला लोकसेवा आयोगाच्या सिलॅबसची माहिती असेल वा नसेल पण या निमित्ताने त्याचा थोडक्यात इथे आढावा घेतला तर तुम्ही धाग्यात म्हटलेले 'मराठी साहित्य' कोणत्या प्रकारे अभ्यासावे लागेल याची झलक दिसेल : (इथे अन्य कुणी आयोगाच्या परीक्षेसाठी इच्छुक असेल तर त्याला/तिलाही या विषयाचा आवाका लक्षात येईल.)

मराठी विषय
मुख्य पेपर : १. भाषा आणि लोकजीवन ~ स्वरूप आणि भाषा कार्य (उपप्रकार > मूलतत्वे, काव्यात्म भाषा, उपयोगातील/व्यवहारातील भाषा, बोली/लिपी, समाजजीवनाशी समरस होताना भाषेचे बदलत जाणारे रूप, जडणघडण. १३ व्या शतकात सुरू झालेले भाषेचे संक्रमण आणि १७ व्या शतकापर्यंतची तिची वाटचाल.

२. मराठी बोलीभाषा > अहिराणी, वर्‍हाडी, डांगी....यांचा सप्रमाण इतिहास.
३. मराठी व्याकरण > बोलीतील विविध उपप्रकार, स्वर-व्यंजनांची रचना, प्रयोग विचार.
४. लोककथा, लोकगीत, लोकनाट्य > त्यांची जडणघडण, सप्रमाण.

विभाग-ब [मराठी साहित्याचा इतिहास आणि साहित्य समीक्षा] ~~ हा खरा घाम काढणारा विषय असतो.
१. महानुभव लेखन संप्रदाय, वारकरी संप्रदाय, पंडिती काव्य, शाहिरी परंपरा, बखरलिखीत मराठी साहित्याचा समग्र इतिहास ~ १८१८ पासून अर्वाचीन काळ.
२. १८५० ते १९९० दरम्यान मराठी साहित्यात घडत गेलेले बदल...संदर्भासहीत [यात अर्थातच कविता, कादंबरी, लघुकथा, नाटक, टीकात्मक लेखन, वाङ्मयीन इतिहासावर] टाकला गेलेला प्रकाश, कल्पनारम्य साहित्य, सत्यजीवन, आधुनिक विचारसरणी, दलित, ग्रामीण, महिलाप्रधान साहित्य. इ.
३. समीक्षा > साहित्य समिक्षेची रूपे आणि तिची कार्यप्रणाली, साहित्याचे परिक्षण, समीक्षेचे साध्य आणि पध्द्ती, परंपरा आणि समाजाशी तिची असलेली बांधिलकी.....(हा विषयही फार मोठा आहे.)

मराठी पेपर-२
इथे प्रत्यक्ष विहीत केलेल्या साहित्य प्रकारावरील लेखन अपेक्षित असते. उदा. गद्यात ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, सखुबाई आणि तत्सम संत परंपरेच्या वाङ्मयावर आधारित साहित्य....जोतिबा फुले, केतकर आदींचे समाजजीवन लेखन....एखादे नाटक (अत्रे, पु.ल., दळवी, शं.ना., वरेरकर यांच्यापैकी कुणीतरी हमखास असतोच), कादंबरी (पाच लेखक असतात...पैकी एक स्त्री...एक दलित), कविता : अभंगवाणी पासून आधुनिक काळापर्यंत सर्व स्तरावरील कविंच्या साहित्याचा समावेश असतो.... (यातही केशवसुत, बालकवी, बी, ज्युलियन, कुसुमाग्रज, विंदा, अनिल आणि स्त्रीयांपैकी इंदिरा संत, तर दलितापैकी सुर्वे, ढसाळ इ. असतातच)

ही फार वरवरची चर्चा समजा....कारण वरील प्रकार आणि मंडळी समजावून घेणे म्हणजे एका मुंगीसाठी सारे वारूळ खणण्यासारखे आहे.... बट इट इज वर्थ, नो डाऊट !

पण असे जरी असले तरी अंतीमतः लोकसेवा आयोगाचे श्रीखंड हे सातत्याने गोडच लागेल.

तुमच्या मित्राला (किंवा मैत्रिणीला...) मनःपूर्वक शुभेच्छा !

इन्द्रा

श्रावण मोडक's picture

15 Oct 2010 - 3:07 pm | श्रावण मोडक

बास्स. माझे कष्ट वाचले. इंद्राचे नाव घेतल्याचे समाधान झाले. :)
इंद्राने दिलेल्या माहितीतील पहिला पेपरही पार झोपवू शकतो. दुसऱ्यात एक वेळ बाजी मारता येईल. पण पहिला... मुश्कील काम. अनेक जण तिथंही मनाचे श्लोक लिहिण्याचा प्रयत्न करतात आणि गंडतात. प्राध्यापकांना विचारा. ते सांगतील. :)
इंटरनेटस्नेही, तुमच्या या मैत्रिणीला इथं मिपावर या म्हणावं. तिची शिकवणी सुरू झाली आहे.

विसोबा खेचर's picture

15 Oct 2010 - 3:17 pm | विसोबा खेचर

इन्द्ररावांची प्रत्येक वेळेस पान-पानभर प्रतिसद लिहिण्याची चिकाटी वाखाणण्याजोगी आहे..! :)

तात्या.

श्रावण मोडक's picture

15 Oct 2010 - 3:45 pm | श्रावण मोडक

कोल्हापुरचे, तालीम आणि कुस्तीच्या गावातले. मोठा दमसास असलेला गडी आहे तो. :) त्यामुळं तुमच्याशी सहमत. :)

इन्द्र्राज पवार's picture

15 Oct 2010 - 4:35 pm | इन्द्र्राज पवार

थॅन्क्स तात्या....तुमच्यासारख्या ज्येष्ठाची अशी पसंतीची पावती येत असेल तर मेगाच काय पण टेट्रा बायटी प्रतिक्रियादेखील टंकताना मला आनंदच होईल, शेवटी आपल्या आवडीच्या विषयावर मनसोक्त लिहायला 'मिसळपाव' ने इतके चांगले व्यासपीठ दिले आहे तीबद्दल उलट आम्ही सदस्यच तुमच्याशी/संचालकांशी/संपादकांशी कृतज्ञ आहोत.

वरील "लोकसेवा आयोगा" च्या प्रतिसादाबद्दल बोलायचे म्हटले तर मी अगदी दहा पाने भरतील इतपत मजकूर लिहू शकतो, त्या मुलीला इथून मिपावरूनसुद्धा मार्गदर्शन करू शकतो. फार छान असते अशा स्पर्धात्मक परीक्षेच्या अभ्यासक्रमातील बाबी पाहताना/तपासताना. तुम्हाला हिंदी/उर्दु काव्यात खूप आवड आहे हे तुम्ही नित्यनेमाने देत असलेल्या गाण्याच्या निरुपणावरून समजून येतेच. पण तुम्हालाही सांगितले तर आश्चर्य वाटेल की, श्री.इंटरनेटस्नेही यांनी धाग्यात उल्लेख केलेल्या त्यांच्या मैत्रीणीसम एक लखनौची २२-२३ वर्षाची मुलगी आमच्या जेएनयूच्या भाषाशास्त्राच्या अभ्यासक्रमाला होती. "त्रिवेदी' तिचे आडनाव, इंग्लिश विषय घेऊन युपीएससीचा अभ्यास करणारी आणि ती माझ्यासमवेत English Poetry (Especially reference to "The Waste Land" by T.S.Eliot) चर्चा करीत असे. असे असूनही एकदा आम्हा १५-२० मित्रमैत्रिणीत तिने 'साहिर लुधियानवी और अमृता प्रीतम' यांच्या कवितांवर/साहित्यावर सलग दोन तास (होय...सलग दोन तास) असे काय व्याख्यान दिले की, ज्याचे नाव ते. हिंदी भाषिक ती मुलगी पण तिच्या तोंडीचे अस्खलीत उर्दु ऐकताना भान हरपल्यासारखे झाले होते....शिवाय साहिरची कविता तर काळजाला हातच घालणारी. मला तर 'साहिर' म्हणजे प्यासा, कागज के फूल आणि चोप्रा कॅम्प इतपतच माहित. पण इवलीशी दिसणार्‍या त्या बाहुलीसम मुलीने त्यादिवशी उर्दु साहित्याचा एक भव्य पडदाच आमच्यासमोर उभा केला. सांगायचा मुद्दा असा की, नंतर त्या मुलीला मी आणि माझ्या मित्राने विचारले की, ऊर्दु भाषेवर तुझा इतका पगडा, प्रभुत्व आहे तर मग इंग्रजी सोडून ऊर्दुच का घेत नाहीस 'मेन' ला? त्यावर तिने सांगितले की, ऊर्दु साहित्यातील टर्म्स इतक्या किचकट आहेत आणि त्यातच इंग्लिशच्या तुलनेत संदर्भ ग्रंथाची असणारी वाणवा. पण असे असले तरी तिने त्या भाषेचा अभ्यास सोडला नव्हता. आणि तिची आवड ही केवळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेपुरताच नसणार....शिवाय लेक्चर देताना तिच्यासमोर नोटस् चा एक तुकडाही नव्हता. इतक्या तयारीची असूनदेखील अन्य कुणाकडून भाषेचे ज्ञान शिकून घेताना तिची विनम्रता प्राथमिक शाळेतील मुलीसम असायची. मी त्या काळात मिपाचा सदस्य नव्हतो, अन्यथा तिला जरूर इथल्या वैविध्यपूर्ण विषयाची ओळख करून दिली असती.

साहित्याचा असा अभ्यास जर सुरूवातीच्या काळापासून असेल तर स्पर्धात्मक परीक्षेला कोणत्याही मार्गदर्शकाशिवायदेखील सामोरे जाता येते. अर्थात 'गुरू' ही हवाच...विशेषत: दिशादिग्दर्शनासाठी.

इन्द्रा

श्रावण मोडक's picture

15 Oct 2010 - 5:37 pm | श्रावण मोडक

भल्या माणसा एकदा तुझा नीट परिचय करून दे तर! तुझे हे गुण म्हणजे रामदासांसारखेच आहेत अगदी.

मुक्तसुनीत's picture

15 Oct 2010 - 8:53 pm | मुक्तसुनीत

टेक अ बाउ ! :-)

इन्द्र्राज पवार's picture

15 Oct 2010 - 9:01 pm | इन्द्र्राज पवार

~~ व्हॉट अ प्लीझंट सरप्राईझ, सर जी !! यू नो, यू आर द फेलो व्हू इन्ट्रोड्युस्ड मी टु धिस फॅन्टॅस्टिक वर्ल्ड ऑफ मिसळपाव !

इन्द्रा

चित्रा's picture

15 Oct 2010 - 11:44 pm | चित्रा

धन्यवाद, एम. एस. :-)

बेसनलाडू's picture

16 Oct 2010 - 3:35 am | बेसनलाडू

_/\_
(नतमस्तक)बेसनलाडू

माननिय आदरनिय श्री. चंद्रकांत वालावलकरांना भेटा. गाढा व्यासंग आणि अभ्यासु व्यक्ति आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

15 Oct 2010 - 6:58 pm | अविनाशकुलकर्णी

नक्किच......चौकशी करतो..व सांगतो...

तुमची मैत्रीण मराठीत परीक्षा देते आहे हेच आम्हाला महत्वाचे आहे. तिला शुभेच्छा!

यशवंतकुलकर्णी's picture

15 Oct 2010 - 8:47 pm | यशवंतकुलकर्णी

फारूख नाईकवाडे यांचे स्टीलफ्रेम हे पुस्तक घ्यायला सांगा.
त्यात दिलेले जवळपास सर्व आयपीएस/आयएएस सध्या सर्व्हिसमध्ये आहेत आणि कुणी जवळपास पोस्टींगवर असल्यास निश्चित मार्गदर्शन करतील..

मिसळभोक्ता's picture

15 Oct 2010 - 10:44 pm | मिसळभोक्ता

बहुतांश मराठी साहित्याची प्रेरणा तिकडेच असल्याने, इंग्रजी साहित्य शिका, असा सल्ला देतो.

चिगो's picture

16 Oct 2010 - 12:03 am | चिगो

तिचे मराठी साहित्याचे सुरवातीपासुन म्हणाजे अगदी शालेय जीवनापासुन वाचन अफाट आहे.
इन्द्रराज ह्यांच्या प्रतिसादावरुन कळले असेलच की ह्या विषयाची व्याप्ती भरपूर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आवड असल्याने केलेले वाचन आणि अभ्यासासाठी करावे लागणारे वाचन ह्यात फरक असतो. म्हणून मी थोडा विचार करण्याचा सल्ला देईन. आणि असे वाटतेय की तुमच्या फ्रेंड कडे अभ्यासासाठी पुरेसा वेळ असावा. (तुम्ही तिच्या माध्यमिक शिक्षणाचा उल्लेख केलाय फक्त, आणि ह्या परीक्षेसाठी पदवी हवी.) बाकी माझ्याकडून शुभेच्छा... तसेच "लोकप्रशासन" आणि "अँथ्रोपोलॉजी" ह्या विषयांबद्दल थोडीफार मदत करु शकेन..

इन्द्र्राज पवार's picture

16 Oct 2010 - 11:52 am | इन्द्र्राज पवार

".....दुसरी गोष्ट म्हणजे आवड असल्याने केलेले वाचन आणि अभ्यासासाठी करावे लागणारे वाचन ह्यात फरक असतो...."

~ अगदी खरे आहे हे श्री.चिगो यांनी व्यक्त केलेले मत. मी या ना त्या कारणाने स्पर्धा परीक्षांना प्रविष्ठ होणार्‍या विद्यार्थ्यांसमवेत (मुले/मुली) संपर्कात असतो. त्यांच्याशी होत असलेल्या संभाषणातून ही बाब प्रकर्षाने जाणवते की, बर्‍याच परीक्षार्थींनी अमुक एका भाषेतील 'साहित्याचे वाचन' म्हणजे कथा-कादंबर्‍या अशी समजूत करून घेतलेली असते. आणि त्यांची पारायणे म्हणजेच 'माझे वाचन भरपूर आहे' अशा भ्रमात राहणे.

माझ्या पाहण्यातील (किंवा ज्यांच्या समवेत चर्चा झालेल्या इच्छुक) १२ विद्यार्थ्यांपैकी चक्क १० जणांनी मराठी साहित्यातील 'आत्मचरित्र' हा प्रकार एकदाही वाचलेला नव्हता. ज्या दोघांनी 'वाचला आहे' असे सांगितले त्यातील एक मुलीने सुनिता देशपांडे यांचे "आहे मनोहर तरी...."; तर दुसर्‍याने गो.नि.दांडेकरांचे "स्मरणगाथा" वाचल्याचे सांगितले. अर्थात दोन्ही पुस्तके गाजली ती त्या त्या साहित्यिकाला मराठी मनात असलेल्या स्थानामुळे. एकालाही आचार्य अत्रे यांचे 'कर्‍हेचे पाणी' माहित नव्हते. त्या मुलांना मराठीत जवळपास ७५ ते ८० आत्मचरित्रे आहेत आणि त्यातील कुठल्याही किमान दोनवर प्रश्न येऊ शकतात हे सांगितल्यावर त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे होते. ८० आत्मचरित्रे वाचायची ही बाबच त्याना पचनी पडेना.

अशी एकंदरीत वाचन अवस्था आहे आपल्याकडे.

पण तरीही....आवड आणि अभ्यास यात लांब पल्ला असला तरी मुळात आवडही हवीच. अभ्यासाच्या रस्त्याला लागायचे तर त्या रस्त्याची आवड प्रथम रक्तात भिनणेही गरजेचे आहेच.

इन्द्रा

चिगो's picture

16 Oct 2010 - 1:34 pm | चिगो

..."साहित्य" ह्याबद्दल अभ्यासाच्या दृष्टीने काही गैरसमजुती असतात. मला एका मुलीने "English literature वाचायला आवडते म्हणुन तो विषय घेऊ का?" असा प्रश्न विचारला होता. मी तिला बोललो की " Loving your pet is one thing and studying about it by operating on it is a different thing". मान्य आहे की उत्तर थोडं gross होतं पण मला जरी वाचायला आवडत असलं तरी समास, अलंकार वगैरे व्याकरण अभ्यासायला आवडत नाही. बाकी तुमच्या फ्रेंडनी हा सारासार विचार केला असेल अशी अपेक्षा आहे, पण नसेल तर करावा. योग्य विषयाची निवड हे CSE मधे फार महत्त्वाचं
असतं कारण की किमान १-२ वर्षे तरी तुम्हाला त्या विषयासोबत जगायला लागतं. All the Best..

इंटरनेटस्नेही's picture

18 Oct 2010 - 7:22 pm | इंटरनेटस्नेही

सर्व प्रतिसादकांचे मनापसुन आभार मानतो. धन्यवाद. :)