अबोला

शितल's picture
शितल in जे न देखे रवी...
14 May 2008 - 6:09 pm

अबोला

का ग सखे तु अशी अबोल झाली
नजर तुझी ही का रूसुन गेली !!

अबोला तुझा हा मज वेड लावी
शब्दच माझे मी आठवुन पाही !!

कळेना ना मला तु काय अर्थ लावी
शब्द हे माझे हळवे किती !!

रोखुनीया डोळे पाही जरी तु मज कडे
कळेना मला अबोला तुझा हा फसवा किती !!

अबोल्यात ही तुझे प्रेम असे
अबोल बोल ते मज आज कळे !!

कविता

प्रतिक्रिया

ऋचा's picture

14 May 2008 - 6:15 pm | ऋचा

छान लिहील आहेस.
पण अपिल होत नाहीये.
काहीतरी राहून गेलय असं वाट्टय.

प्रयत्न खुप छान केलास.

विजुभाऊ's picture

15 May 2008 - 10:10 am | विजुभाऊ

पण अपिल होत नाहीये.
काहीतरी राहून गेलय असं वाटतेय्.........बरोबर आहे

का ग सखे तु अशी अबोल झाली
नजर तुझी ही का रूसुन गेली
व्याकरणात थोडी चुक आहे. "तु अबोल झाली" असे आपण म्हणत नाही. ती अबोल झाली / तु अबोल झालीस असे म्हणतो . कदाचित यमक साधण्याच्या नादात ही चुक लक्षात आली नसावी.
पण प्रयत्न करत रहा.

आनंदयात्री's picture

15 May 2008 - 10:20 am | आनंदयात्री

"तु अबोल झाली" बरोबर आहे :) , त्यांची कविता काही प्रमाणमराठीत (पुण्याच्या) नाही/नसावी.

स्वाती राजेश's picture

14 May 2008 - 6:16 pm | स्वाती राजेश

शितल तुझ्या जादूच्या पोतडीतून छान छान कविता बाहेर पडत आहेत.:)
मस्त कविता सोपी, सुटसुटीत....
अबोल्यात ही तुझे प्रेम असे
अबोल बोल ते मज आज कळे !!
व्वा मस्त ओळी...

मन's picture

14 May 2008 - 6:23 pm | मन

कविता आवडली...
पु ले शु.

आपलाच,
मनोबा
(जाडजूड असलेल्या अमेरिकन सोमालियाच्या नागरिकाला म्हणतो. "तुझ्याकडे बघितलं की जगातलं दारिद्य्र समजतं. सीमालियाच्या नागरिक म्हणतो- "आणि तुझ्याकडं बघितलं की त्या दरिद्य्राचं कारण समजतं....!'
)

प्राजु's picture

15 May 2008 - 4:05 pm | प्राजु

कविता आवडली.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

राजे's picture

14 May 2008 - 6:35 pm | राजे (not verified)

छान कविता , आवडली.

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

वरदा's picture

14 May 2008 - 7:09 pm | वरदा

तु तर मस्तच करतेस कविता....
अबोल्यात ही तुझे प्रेम असे
अबोल बोल ते मज आज कळे !!


हे मलाही आवडलं...
पुढच्या कवितांच्या प्रतिक्षेत......

इनोबा म्हणे's picture

14 May 2008 - 7:15 pm | इनोबा म्हणे

कविता आवडली. अजून येऊ दे!

का ग सखे तु अशी अबोल झाली
नजर तुझी ही का रूसुन गेली !!

अबोला तुझा हा मज वेड लावी
शब्दच माझे मी आठवुन पाही !!
या ओळी विशेष आवडल्या

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

आनंदयात्री's picture

15 May 2008 - 10:02 am | आनंदयात्री

अबोल्यात ही तुझे प्रेम असे
अबोल बोल ते मज आज कळे !!

ह्या ओळी सर्वाधिक आवडल्या. प्रेमिकांच्या खोट्या अबोल्यातल्या भावना छान मांडल्यात :)
पुलेशु.

शितल's picture

15 May 2008 - 5:14 pm | शितल

सर्व वाचका॑चे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद !
काही चुका असतील पण मी तो सुधारण्याचा प्रयत्न करीन.
धन्यवाद !