सातार्याहून सुमारे २५ किमी अंतरावर कासचे पठार आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर हे पठार अनेकरंगी फुलांनी बहरून येते. निसर्गाचा हा सोहळा सुमारे १५ दिवस टिकतो. गेली ३ वर्षे मी त्याचा आस्वाद घेतो आहे. आजच मी निसर्गाचं हे अनमोल देखणं रुप परत एकदा डोळ्यात आणि कॅमेर्यात साठवून आलो.
त्याची ही छोटीशी झलक...
आणि पठार उतरुन थोडं पुढे गेल्यावर लागणारा थंडगार पाण्याने भरलेला कास तलाव..
प्रतिक्रिया
19 Sep 2010 - 11:31 pm | पैसा
पावसाने न येऊन कृपा केली!
20 Sep 2010 - 12:56 am | कवितानागेश
वेड लागलं!!!
अत्ताच निघावंसं वाटतंय............
20 Sep 2010 - 5:28 am | सुनील
अप्रतिम नजारा!!
कासच्या पठाराला आता युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा दिला आहे. अधिक माहिती येथे.
20 Sep 2010 - 7:40 am | मदनबाण
झकास्स्स्स... :)
20 Sep 2010 - 9:33 am | शिल्पा ब
मस्त...काय छान फुलं आहेत...खास करून निळी पांढरी आणि वेल्वेट सारखं एक निळ मरून कलरचं फुल तर खासच.
20 Sep 2010 - 10:41 pm | उपेन्द्र
वेल्वेट वाली फुलं खूप कमी प्रमाणात आहेत.. पण निळ्या जांभळ्या मखमली रंगावरील परागकणांचे पिवळे धम्मक ठिपके लगेच लक्ष वेधून घेतात...
20 Sep 2010 - 11:04 am | मोहन
उपेन्द्र धन्यवाद. ७-८ वर्षापूर्वी गेलो होतो तेंव्हा फारच मजा आली होती.
चार वर्षापूर्वी माझ्या परदेशी पाहुण्यांना घेवून गेलो तेंव्हा सातार्यातला रस्ता फारच खराब होता. फुले उमलायला नुकतीच सूरवात झाली होती त्यामुळे जरा पचका झाला होता.
या विकांता पर्यंत हा नजारा टिकेल असे वाटते का? परत जायची ईछा आहे.
मोहन
20 Sep 2010 - 10:35 pm | उपेन्द्र
फुलं फुलायला लागून ८-१० दिवस झालेत. पण अजुन ८-१० दिवस रहातील. कारण अजून कडक ऊन पडायला नाही लागलं.. अवश्य भेट द्या..
20 Sep 2010 - 10:38 pm | बेसनलाडू
नयनरम्य परिसर आणि तितकीच मोहक प्रकाशचित्रे. येथे दिल्याबद्दल धन्यवाद!
(आभारी)बेसनलाडू
21 Sep 2010 - 10:41 am | समंजस
अप्रतिम!!
21 Sep 2010 - 10:46 am | रामदास
पठारा विषयी आज लोकसत्तात एक लेख आला आहे. जरूर वाचा.