माझ्या शौर्याच्या (??) सुरस कथा!!!!

सविता's picture
सविता in जनातलं, मनातलं
17 Sep 2010 - 8:53 am

तशी काही मी शूर या सदरात मोडत नाही किंबहुना घाबरटच म्हणायला हवे. इतकी फ़िरले गेल्या तीन-चार वर्षात...माझ्या या सगळ्या प्रवासात अंधाराची भिती वाटते(आणि एकटेपणाची सुद्धा!!)...म्हणून माझ्या रुम मधले दिवे मी कधी बंद करत नाही....झोपतानासुद्धा...जास्त भिती वाटली तर टि.व्ही., रेडिओ हे पण रात्री झोपताना चालू ठेवते. आणि असे कधीतरी एकटे असताना नेमके नको ते प्रसंग आठवतात म्हणुन मी कधीही भुताखेताचे पिक्चर बघत नाही किंवा पुस्तके पण वाचत नाही...

मला प्रवास करणं ( तो पण विमानाने...आणि कंपनीच्या खर्चाने!!!) आवडायला लागलं आहे वाटतं. बरेच महीने झाले आता मी मागच्या वेळी सिंगापूर ला गेले होते त्याला....आणि मी परत ते सगळं मिस् करायला लागले आहे...ते विमानतळावरचे तास....ना इकडच्या जगात...ना तिकडच्या जगात...मध्येच कुठेतरी अधांतरी लोंबकळत असल्यासारखं...मला ते आवडायला लागलंय!!

मागच्या वेळी US हून परत येताना...सांता बार्बरा मधल्या अपार्टमेंट मधून निघून पुण्यात घरी पोचण्यासाठीच्या ४६ तास प्रवासात मी एकटीच होते. पण मी अगदी निवांत होते...फ़्लाइट मध्ये समोर आलेले सगळे खाणे पिणे व्यवस्थित केलं....काही तास झोपले...उरलेल्या वेळात फ़्लाइटमध्ये चालू असलेले सगळे हिन्दी, इंग्लिश पिक्चर बघून टाकले....हॉंगकॉंग एअरपोर्टवर ८ तासाच्या हाल्ट्मध्ये बराचसा एअरपोर्ट बघितला....मस्त विन्डो शॉपिंग केले.....एकूण काय....एकटी असताना पण प्रवास मस्त एंन्जॉय केला.

हेच पहिल्यांदा सिंगापूर ला जाताना मी प्रथमच एकटी प्रवास करत होते..म्हणजे प्रवास केला होता एक्-दोनदा तरी त्या सगळ्या प्रवासात माझ्यापेक्षा माहितगार कोणीतरी माझ्याबरोबर नेहमी होतं...सिंगापूर ला जाताना मात्र पुण्याहून पहाटे मुंबई एअरपोर्टवर जाण्यासाठी मी जी निघणार होते...ते दुस-या दिवशी सकाळी सिंगापूर मध्ये हॉटेल लॉबीत ऑफिसमधले बाकीचे लोक भेटेपर्यंत मी एकटीच असणार होते.

आधी तर कामाच्या घाईत या गोष्टीवर विचार करायला वेळच मिळाला नव्हता. मुंबई एअरपोर्टवर माझा एक मित्र भेटायला येणार होता...त्याला मधूनच मी कुठपर्यंत पोचलेय हे कळवायला फोन करत होते त्यामुळे पुणे ते मुंबई प्रवासात पण फारसं काही वाटलं नाही.एअरपोर्टवर मित्र भेटला..१०-१५ मिनिटे गप्पा झाल्यावर तो जेव्हा म्हटला..."चल गं..आता मी निघतो"......अन साक्षात्कार झाला....अरेच्चा....आता इथून पुढे आपण अगदी पूर्ण एकटेच की!!!

मित्राला म्हटलं..."खरं सांगू???....खूप भिती वाटायला लागलीये!!!"..तो खूप हसला...मला म्हटला..एवढी हुषार मुलगी आहेस...देवाने तोंड दिलेय......जिथे काही अडेल...तुला फ़क्त तोंड उघडून प्रश्न विचारायचे आहेत...आणि ते तुला आरामात जमेल...सगळं काही व्यवस्थित होईल...तेव्हा खरेतर त्याचा राग आला.......च्या मारी..मला भिती वाटतेय...आणि हा गधडा हसतो काय???..शेवटी त्याने विचारले "जाऊ का?"...त्याला जा सांगितलं..तसंही तो कितीही वेळ थांबला असता..तरी काय फरक पडणार होता?..मला इतकी भिती का वाटतेय हे त्याला कळंतच नव्हतं... तो गेला..आणि...प्रचंड टेन्शन येऊन माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं..आणि...रडायचं वगैरे नसताना डोळ्यात आपसूक पाणी यायला लागलंय....यामुळे मला माझाच संताप आला.

तडक रेस्टरूम गाठले...पहिले चेह-यावर पाणी मारलं....जरा अवतार ठीक केला....for god's sake....I should not look like a "radaki" girl...for such stupid reasons!!!.....बाहेर आले...पाणी प्यायले...आणि शांत बसले दोन मिनिट...मग डोकं थोडं चाललं....मुंबईत पण माझा फोन रोमिंगवर चालू होता..आणि मला किती आणि का भिती वाटते हे पक्कं माहित असलेल्या एका व्यक्तीशी तर मी नक्कीच बोलू शकणार होते.माझी बहिणाबाई!!!!!....मला खूप चांगलं ओळखते.मी न सांगता पण मला बरं वाटत नाहीये..किंवा भिती वाटतेय, काहीतरी बिनसलंय..हे तिला अचूक कळतं. माझ्या घाबरटपणा चा एक किस्सा तर तिने आख्ख्या खानदानाला सुनवलाय..

ही गोष्ट आहे मी तिसरीत असतानाची....आम्ही नुकतेच कोथरूड ला राहायला आलो होतो. जवळपासच्या दुकानात आम्ही दोघी मिळून थोड्याफार वेळेला गेलो होतो.तेव्हा अजूनपण मी काही काही गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी माझ्या भावाची पाटी वापरायचे. एके दिवशी संध्याकाळी घरातल्या पाटी वरच्या सगळ्या पेन्सिल संपल्या होत्या. दहा पैशाला एक पेन्सिल मिळायची. मी आईकडून वीस पैसे घेतले आणि पाटीवरची पेन्सिल आणण्यासाठी बाहेर पडले.

तेव्हा आमचा रस्ता तसा कच्चा आणि बाजूलाच होता. रस्त्यावर भटके कुत्रे, डुकरे, शेळ्या मोकाट फिरत असायचे. मी आमच्या गेट मधून बाहेर पडले आणि कोप-यावरच्या पहिल्या दुकानाकडे निघाले. ब-यापैकी अंधार झाला होता. मी त्या दुकानापाशी पोचले तेव्हा माझ्या लक्षात आले की मी गेट मधून बाहेर पडल्या पडल्या बाजूला उभी असलेली एक शेळी ( का बोकड होता?? शिंगे होती..त्याबरोबर कदाचित दाढी पण होती बहुतेक!) माझ्या बाजूनेच चालत चालत दुकानापर्यंत आली होती. मी पेन्सिल मागितली...तर नेमके त्याच्याकडच्या पेन्सिल्स संपल्या होत्या. मी दुस-या दुकानात जायचे म्हणून मागे वळले तर समोर ती शेळी!!!! तिने माझ्यावर शिंगे उगारली आहेत असं मला एकदम वाटलं आणि मी घाबरले. तरी पण आपलं लक्षच नाहीये असं दाखवत शेळीच्या डाव्या बाजूने जावे म्हणून मी थोडी डावीकडे वळले..तर शेळी पण तिकडेच वळली..मी उजवीकडे...शेळी पण उजवीकडे!!!.... तरी मी जोरात त्या दिशेने वळले..आणि रस्त्याच्या दुस-या बाजूला असलेल्या एका दुकानाकडे जवळ जवळ पळत निघाले. पळता पळता मागे वळून बघितले तर...परत शेळी पण चालत त्याच दिशेने येताना दिसली. आता मात्र माझी खात्री झाली की ती शेळी माझा पाठलाग करत होती..आणि माझ्याजवळ पोचली की मला शिंगे मारणार होती. मी प्रचंड घाबरले आणि दुस-या दुकानाऎवजी घराच्या दिशेने जोरात जी पळत सुटले ते मागे न बघता...न थांबता थेट घरातच येऊन थांबले. पेन्सिल घेणे तर राहूनच गेले...आणि परत घरी पोचेपर्यंत मला रडू फुटले होते. पण आई..ताई..पप्पा कोणाला पण...शेळी पाठलाग करते ही गोष्ट पटलीच नाही...सगळे उलट मलाच हसले..आणि तेव्हा पासून ताई मला चिडवायचे झाले की माझ्यासमोर हा सगळा किस्सा नवनवीन लोकांना सांगत राहते. तिचा नवरा..आणि तिच्या सासरच्या सगळ्या मंडळींना पण "माझी बहिण शेळीला घाबरते" हे तिने सांगून ठेवले आहे.

तर अशा माझ्या बहिणीला मग मी एअरपोर्टवरून फोन केला....जरी मी स्पष्ट काही सांगितले नाही तरी..घरून निघतानाचे...."काही काळजी करू नका..एकटी असले तरी मी नीट जाईन"...हे अवसान गेले होते...हे तिला समजले.तेव्हा सकाळचे ९ वाजले होते. फ़्लाईट ११:३० ची होती. मग साधारण दर अर्ध्या तासाने...मी विमानात बसेपर्यंत ती मला फोन करत राहिली..आणि चहा घेतला का, कुठे बसली आहेस?...सामानाकडे लक्ष दे....असल्या फ़ुटकळ गप्पा मारत राहिली.मला का भिती वाटतेय हे निदान एका व्यक्तीला तरी समजल्यामुळे....आणि तसे पण....सिंगापूरपर्यंत विमानाने..आणि मग कॅब ने हॉटेलवर पोचेपर्यंत प्रवास नीट झल्याने मी सावरले झाले होते. हॉटेलच्या रूम वर पोचले...खाली जाऊन सिंगापूरच्या प्लग पॉइंट मध्ये लॅपटॉप चा चार्जर लावण्यासाठी कनव्हर्टर घेऊन आले. आणि पहिले घरी..आणि मग ताईला फोन करून मी नीट पोचल्याचे कळवले. ताईला फोनवर मी व्यवस्थित असल्याचे सांगितले..त्यावर ती हसून म्हटली..."शेळीला घाबरणारी मुलगी सिंगापूर ला एकटी गेली!!"

असो...एअरपोर्टवर माझ्या मित्राने दिलेला सल्ला खरेतर काही चुकीचा नव्हता...हे आता पटतंय..पण त्या वेळेला भिती वाटणं साहजिक आहे..हे त्याला समजलं नाही. आता मला परदेशप्रवासाचा भरपूर अनुभव आहे म्हणून ओळखीतले पहिल्यांदा प्रवास करणारे जेव्हा मला सल्ला विचारतात..तेव्हा मी माझ्या मित्राने मला सांगितलेली वाक्येच त्यांना ऐकवते.

पण...एका गोष्टीची मला कायम खात्री होती..आणि आहे...भले शिंगे मारण्यासाठी नसेल...माझ्याकडे तिला खाण्यायोग्य काहीतरी आहे असे वाटून असेल कदाचित...पण त्या शेळीने माझा पाठलाग केला होता हे नक्की!!!!!!

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

17 Sep 2010 - 9:00 am | पैसा

हा हा हा!!! लोक झुरळाला पण घाबरतात!

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Sep 2010 - 10:32 am | ब्रिटिश टिंग्या

आपण अजुन किती देश बघितले आहेत?

अहो कित्ती कित्ती देश बघितले ते सांगण्यासाठीच तर हा सगळा लेखनप्रपंच.....

अय्या पण तुम्हाला कसं कळलं?

मागच्या वेळी सिंगापूर ला गेले होते त्याला....

मागच्या वेळी US हून परत येताना...

हॉंगकॉंग एअरपोर्टवर ८ तासाच्या हाल्ट्मध्ये बराचसा एअरपोर्ट बघितला....

अग्गो बाई..तुम्ही किनई फार म्हणजे फार्फार हुश्शारच आहात........

चिंतामणी's picture

17 Sep 2010 - 6:53 pm | चिंतामणी

कसचे कसचे.

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 1:04 pm | धमाल मुलगा

गंमतच आहे. :)

गणेशा's picture

17 Sep 2010 - 4:58 pm | गणेशा

आवडले लिहिलेले

श्रावण मोडक's picture

17 Sep 2010 - 6:01 pm | श्रावण मोडक

तो धागा याच मालिकेतला वाटत नाही ना आता?

रेवती's picture

17 Sep 2010 - 6:18 pm | रेवती

सगळ्यात आधी तुझे अभिनंदन!
माझ्या कंपूत तुझे स्वागत (किंवा तुझ्या कंपूत माझा प्रवेश!) ;)
लेख अगदी मनापासून आवडला. मीच लिहिलाय असे आधी वाटले, पण आपल्याला इतके चांगले लिहिता येत नाही हे आठवले. पैसाताई म्हणतात त्याप्रमाणे झुरळाला घाबरणार्‍यातली आहे मी!
आता मुख्य विषय (अवांतर नाही हो!) म्हणजे तू पुण्याची असल्याने तुझा निषेध! पुणं हे काय रहायचं शहर आहे? अर्थात हे तुलाही पटल्यामुळेच देशोदेशी फिरत असतेस म्हणा!;) जिथे कुठे फिरून झालय त्या देशांची यादी इथे प्रसिद्ध करावी ही विनंती! ;)

(पक्की पुणेरी, सदाशिवपेठी, हिरव्या देशातली) रेवती

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Sep 2010 - 6:22 pm | ब्रिटिश टिंग्या

>>जिथे कुठे फिरून झालय त्या देशांची यादी इथे प्रसिद्ध करावी ही विनंती!

+१

छॅ बॉ काय वेळ आलीये......रेवतीकाकुंशी सहमत व्हावं लागत आहे! :(

अर्रर्र!! काय वेळ आलिये ही टिंग्यावर!
शब्दांचा ष्टॉक संपल्यामुळे सहमत असल्याच्या प्रतिसादांवर भागवावं लागतय बिचार्‍याला. ;)

प्रभो's picture

17 Sep 2010 - 7:26 pm | प्रभो

शब्दांचा ष्टॉक नाहीतर हलकटपणाचा ष्टॉक ;)

रेवती =))
आजपासून मी तुझ्याशी नेहमीच सहमत आहे! तू पुण्याची आहेस ना! अ़जून काय हवे?
आपण, PPTA (प्टा) क्लब काढायचा का? :D

काढुयात गं!
आपला स्वत:चा कंपू / गँग असावी हे स्वप्न कित्ती दिवस पहात होते. ;)
आता पुढच्या माझ्या धाग्याला शेपाचशे प्रतिसाद नक्कीच येणार. ;)

कंपूच्या सदस्यत्वाचे नियम काय आहेत?

हो आहेत, पण ते आपल्याला ख. व. मध्ये कळवते.
नाहीतर संपादकांनीच नियमाचा भंग केला असा ओरडा व्हायचा!:)

अवलिया's picture

17 Sep 2010 - 6:47 pm | अवलिया

नक्की कळवा.

कोण हो कोण तो संपादकांविरुद्ध ओरडा करतो? हात रे !!

पैसा's picture

17 Sep 2010 - 6:47 pm | पैसा

पुणेरी असणे ही अट असेल तर आमचा पास! फ्रीलान्सर चालत असतील तर विचार करू. पाकिस्तानी क्रिकेटर्स हा आदर्श ठेवला तर आणखी छान!

अगं अटी दाखवायला असतात, काही तत्वं वगैरे असावी लागतात, पण व्यक्तीनुसार बदलायची.
तुला मागच्या दाराने घेऊ. फिकर नॉट.

पैसा's picture

17 Sep 2010 - 6:52 pm | पैसा

मग ठीक हय!

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 6:51 pm | धमाल मुलगा

१.नविन साडी पाहिल्याबरोब्बर 'ऐय्य्य्य्य्या' असं किंचाळता आलं पाहिजे.
२.दागिने ह्या विषयावर कमीतकमी ३ तास बोलता आलं पाहिजे.
३.पाककला निदान चर्चेपुरती का होईना यायला हवी.
४.दोन सदस्य एकत्र आले असतील तर तिसरीबद्दल बोलताना सुरुवात, 'ती गंऽ..ती मेली शिष्ठ....' अशी करता यायला हवी.....
५.....
६............
७.............
८.....................
९...............................

नानुस, तुला बोटांवर कुणाला नाचवता येतं का? नसेल तर सदस्यत्वाच्या भानगडीत पडु नये हा प्रेमळ सल्ला.

स्वगतः पळाऽऽऽ तिच्यायला.... लई मारतील ह्या काकूलोक्स!

विनायक प्रभू's picture

17 Sep 2010 - 6:53 pm | विनायक प्रभू

शेळी आणि बोकड नानाला भितात त्याचे काय?

पैसा's picture

17 Sep 2010 - 6:56 pm | पैसा

धमु, या अटी "पाशवी कंपू" च्या झाल्या! "पुणेरी" हा वेगळा मामला हय.

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 7:01 pm | धमाल मुलगा

हॅत्तिच्या! त्यात काय एव्हढं?
एक कलम वाढवायचं.... पुणेकर असायला हवे.
फिनिश!

पैसा's picture

17 Sep 2010 - 7:06 pm | पैसा

ह्या:
काही लोक नुसतेच पुणेकर आहेत
काही नुसतेच पाशवी आहेत
काही पुणेकर आणि पाशवी दोन्ही आहेत
काही पुणेकरही नाहीत आणि पाशवीही नाहीत!
सगळा गोंधळ आहे!!

अवलिया's picture

17 Sep 2010 - 6:57 pm | अवलिया

आयचा घो..... यूयुत्सु... बचाव !

सविता's picture

17 Sep 2010 - 7:00 pm | सविता

"यूयुत्सु... बचाव" काय......

अशा कंपूपासून युयुत्सू ला वाचवायची वेळ येईल.......

सवित्सु

म्हंजे पुणेरी पाशवी कंपूवर एक धागा काढायला तेही मोकळे! =))

येस्सस्स... नंतर नागपुरचे पाश आवळायला... आपलं नागपुरचा कंपू काढायला मोकळे !

कोण म्हणतं पुणेरी कंपू पाशवी नाही ?

इश्श्य मेलं! त्यात प्रश्न काय ते विचारायचे? आम्हीच की! पुणे हे बाब्या आहे व आम्ही पुण्यातले, तेह्वा आम्ही ठरवू ती पूर्व हे ओघानेच आले.

आम्ही म्हंजे सगळे PPTA वाले हां.

यशोधरा's picture

17 Sep 2010 - 6:57 pm | यशोधरा

धम्या, हे चोराच्या वाटा चोराला ठाऊक टाईप झालं की रे! :D

अवलिया's picture

17 Sep 2010 - 6:58 pm | अवलिया

तुम्हाला काय म्हणायचं ते स्पष्ट बोला...

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 7:04 pm | धमाल मुलगा

मी शिर्षकात काय लिहिलंय?
माझा प्रतिसाद नीट वाचा.

-वाचून फत्ते.

>>आता पुढच्या माझ्या धाग्याला शेपाचशे प्रतिसाद नक्कीच येणार.>>

हो हो, इतके आयडी आहेत ते कधी कामी येणार मग? ;)

आता तुम्ही मागत्तच आहात एवढी तर देतेच की

हिरव्या माजाचा देश...
आपल्यावर राज्य केलेल्या महान लोकांचा देश.......
मिचमिच्या डोळ्यांच्या लोकांचा देश........

झालंच तर........
उरूग्वे
रवांडा
बुरूंडी
होनुलूलू
सोमालिया.......

ज्या देशाचे नाव तुम्हाला आठवेल ते....... मी जाऊन आले आहे हो.......

मग नंतर मी प्रत्येक देशात कशी गेले... तिथे दररोज सकाळ दुपार संध्याकाळ काय खात होते...... कुठल्या प्राण्यांना घाबरत होते.... एक एक धागा टाकणार आहे मी त्याचा......

विनायक प्रभू's picture

17 Sep 2010 - 6:39 pm | विनायक प्रभू

जवळ जवळ वर्ल्ड ट्रिप झाली म्हणायची की.
मस्त.

सविता's picture

17 Sep 2010 - 6:40 pm | सविता

अगदी अगदी.......

अहाहा!
काय ती यादी!;)
बुरुंडी चे नाव वाचून तर डोळ्यात पाणीच आले.
धन्य तो पुणेरी कंपू!;)

विनायक प्रभू's picture

17 Sep 2010 - 6:45 pm | विनायक प्रभू

यादी मधे सोमालिया आणि खांडा देशाचे नाव ऐकुन थरकाप झाला.

सविता's picture

17 Sep 2010 - 6:46 pm | सविता

नको नको....पुसा पाहू ते डोळ्यातले पाणी.....

श्रावण मोडक's picture

17 Sep 2010 - 7:14 pm | श्रावण मोडक

बुरूंडीत जालिंदरबाबा जलालाबादी भेटले होते का हो? त्यांना तिथं काही मिपाकर भेटले होते. त्यात तुमचा समावेश असावा असं वाटलं... :)

धमाल मुलगा's picture

17 Sep 2010 - 7:58 pm | धमाल मुलगा

आणी र्वांडातही.

सविता's picture

17 Sep 2010 - 8:56 pm | सविता

हो तर........... मी एकदम परमभक्तच झाले त्यांची!!!

जालिंदरबाबा जलालाबादी की जय!!!!!

मी-सौरभ's picture

18 Sep 2010 - 11:46 pm | मी-सौरभ

की हवाई सुंदरी...
कुंपणी तुमाला एवढ्या ठिकाणी फिरवते हे वाचून आणंद जाहला...

शिल्पा ब's picture

19 Sep 2010 - 12:59 am | शिल्पा ब

हो ना...
तुमच्या कंपनीत एखादी जागा आहे का हो म्याडम? मी पण जॉईन होईन म्हणते....तुम्हीच शिफारस करा.

विनायक प्रभू's picture

17 Sep 2010 - 6:30 pm | विनायक प्रभू

किती छान लिहीता हो सवितातै तुम्ही.

खुपच छान लिहला आहे.

ब्रिटिश टिंग्या's picture

17 Sep 2010 - 9:40 pm | ब्रिटिश टिंग्या

जिंकलत जिंकलत सवितावहिनी!
इतकं चान चान कसं लिहीता येतं बॉ तुम्हाला?