पिकलं पान

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
9 Sep 2010 - 8:02 pm

पिकलं पान

पिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काय काम? ||१||

पिकलं पान
हिरवटपना जात नाही
केव्हा गळेल केव्हा गळेल?
झाडालाच चिकटून राही ||२||

पिकलं पान
झाडावरून गळून जाई
झाडाखाली पडून पडून
सडून जाई ||३||

पिकलं पान
झाडावरून पडून जाई
जमीनीवर पडल्या पडल्या
जुन्या दिवसांची आठवण येई ||४||

पिकलं पान
विचारी दुसर्‍याला
माझा खांदा तुला?
की तुझा खांदा मला? ||५||

पिकलं पान
फळाला म्हणालं
तुझं माझं
नशीबच निराळं ||६||

पिकलं पान
पिकलं फळ
यांची होते
वेगळी वेळ ||७||

पिकलं पान
पिकली केळी
यांचे महत्व वेगळेवेगळे
वेगवेगळ्या वेळी ||८||

पिकलं पान
खाली पडलं
तिला देण्यासाठी
वहीत ठेवलं ||९||

पिकलं पान
खाली पडलं
जाळी होण्यासाठी
पुस्तकात ठेवलं ||१०||

पिकल्या पान
उपयोग किती!
झाडाखालीच कुजते
त्याच झाडाला खत होण्यासाठी ||११||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०९/०९/२०१०

शांतरसकविता

प्रतिक्रिया

अथांग's picture

10 Sep 2010 - 2:03 am | अथांग

पिकल्या पानाचं काय काय घडू शकतं ते समजलं, छान कल्पनाविस्तार!

पिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काय काम? ||१||

इथे 'माझं आता काम काय' असं म्हंटलं तर ? यमक पण जुळेल...असं आपलं मला वाटतं.

चतुरंग's picture

10 Sep 2010 - 2:44 am | चतुरंग

दिवसेंदिवस तुमच्या कवितेत कल्पनांचे वेगळेपण दिसत आहे.
वरती अथांगने म्हटल्याप्रमाणे थोडी यमकांची सफाई साधता आली तर कविता आणखीन खुलेल.
पुकशु.

(आस्वादक)चतुरंग

पाषाणभेद's picture

10 Sep 2010 - 4:49 am | पाषाणभेद

धन्यवाद अथांग, चतुरंग साहेब अन वाचकहो.

काय आहे की गाडीच्या कारखान्यात कामगाराने निट ठाकठोकीचे काम न केल्यामुळे असले कोचे गाडीच्या पत्र्यावर राहून जातात अन गाडी शोरूम ला आणायची घाई नडते मग. मग एखादं गिर्‍हाईक ते कोचे निट पाहते अन कोचा असलेला पत्रा/ भाग बदलावा लागतो शोरुममध्ये किंवा मग गाडी परत कारखान्यात जाते.

कोन भरून देईल मंग नुसकानी मालकाची? :-)

अथांग, चतुरंग यांनी सांगितलेला बदल गृहीत धरूनच आगामी वाचकांनी कविता वाचावी.
अन त्या बरोबरच खालचे अ‍ॅडवलेले कडवे पण वाचावे.

पिकलं पान
पडलं खाली
पुस्तकात ठेवलं
जाळी झाली ||

पानची जाळी झाली, जाळी होण्यासाठी पुस्तकात ठेवले, वहीत ठेवले यात कल्पनेची पुनरावृत्ती झालेली आढलेल. त्यासाठी कवितेतील प्रत्येक कडवे चारोळीच्या चालीवर बघीतल्यास योग्य ठरेल.

अथांग's picture

10 Sep 2010 - 6:17 am | अथांग

पाहिलं आहे...

पिकलं पान
डुलत, झुलत अलगद खाली..
पण बघता-बघता,
भरधाव गाडीच्या- चाकाखाली :(

पाषाणभेद's picture

10 Sep 2010 - 6:27 am | पाषाणभेद

लगे रहो अथांग भाय!

पिकलं पान
मनात भरलं
कवितेला मग
कारण सुचलं

इतरही लोकं सामिल होवू शकतात बरं का!

चिंतामणराव's picture

10 Sep 2010 - 11:32 am | चिंतामणराव

पिकलं पान
कडक उन्हात फांदीवरी
खालच्या नवीन कोंबावर
सांवली धरी

विदेश's picture

10 Sep 2010 - 11:31 pm | विदेश

पिकल्या पानाचं
वर्णन की हो चांगलं .

अथांग's picture

15 Sep 2010 - 3:37 am | अथांग

पिकल्या पानची
आगळीच तर्‍हा...
पाषाणभेद
आणि काव्यझरा(?) !!!

बाय द वे - अथांग'भाय' नाय - अथांग 'ताय' हाय - मिपाकरांच्या भाषेत 'तै' हो !