डच बालकथा ३ - कोंबडी आणि पिल्लू

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
19 Aug 2010 - 5:51 pm

एका शेतावर एक कोंबडी रहायची. छोटंसंच पण एकदम शानदार घर होतं हं तिचं. दिवसभर शेतात किडे मुंग्या शोधायची. इकडेतिकडे सापडलेले दाणे मस्त चवीचवीनं खायची. आणि रात्री आपल्या घरात येऊन आवडीचं काहीतरी करत बसायची. खूप छंद होते कोंबडीला. तिला गायला आवडायचं, तिला विणायला आवडायचं, नवे नवे पदार्थ बनवायला आवडायचं आणि बागकामही आवडायचं. आपल्या घरासमोरच्या अंगणात तिने छान बाग फुलवली होती.

हे एवढे उद्योग असतानाही तिला कधीतरी खूप कंटाळा यायचा. कोणाशी तरी खेळावं, गप्पा माराव्या असं वाटायचं. पण आजूबाजूला कोणी नसायचं. अशा वेळी मग ती आपल्या छोट्याशा गाडीतून फिरायला जायची. लांबच्या दुसर्‍या शेतात असणार्‍या मित्रमैत्रिणींना भेटायची आणि परत यायची.

एकदा ती अशीच सर्वांना भेटून परत येत असताना तिला एक छोटीशी भेट मिळाली. एका सुंदर पिशवीत काहीतरी गोल वस्तू होती. कोंबडीला वाटलं की लग्गेच ती पिशवी उघडून बघावी. पण आईने शिकवलेलं आठवलं. सगळ्यांसमोर भेटवस्तू लगेच नाही उघडायची. कधी एकदा घरी जाते आणि ती वस्तू बघते असं झालं तिला. भराभरा ती घरी आली. दार उघडून घरात आली. दाराजवळच्या टेबलावर तिने ती पिशवी अलगद ठेवली नि हळूच उघडली. बघते तर काय... एक पांढरेशुभ्र अंडे होते त्यात !!! " कित्ती मज्जा ! म्हणजे आता या अंड्यातून पिल्लू बाहेर येणार ! आणि आपल्यासोबत राहाणार "!! कोंबडीला खूप खूप आनंद झाला. घरभर नाचली ती अंडे हातात घेऊन !

पण अंड्यातून पिल्लू कसे बाहेर येते, कधी येते हे तिला काही माहीत नव्हतं. विचारणार तरी कोणाला ? सोबत कोणीच नव्हतं. कोंबडीने एक दिवस वाट बघायची ठरवली. सोफ्याजवळच्या एका छोट्याशा खुर्चीत तिने एक मऊ मऊ बिछाना तयार केला. आणि त्यावर ते अंडे ठेवले. दिवसभर ती त्या अंड्याकडे बघत राहिली. पिल्लू काही बाहेर येईना ! मग तिने रात्रभर वाट बघितली. अंड्याजवळच्या सोफ्यावरच येऊन झोपली. सकाळी उठून बघते तर काय अंडे तसेच. मग तिने अजून दोन दिवस वाट बघितली. अंहं... ! पिल्लू बाहेर येईना.

मग कोंबडीने विचार केला आपण पिल्लुला बोलले पाहिजे. ती अंड्याकडे तोंड करून म्हणाली, " पिल्ला, पिल्ला, बाहेर ये. मी तुला छान छान गोष्ट सांगेन. " तिने एक सुंदर गोष्ट सांगितली. पण पिल्लू बाहेर येईना !

आता काय करावं बरं? ह्म्म.. पिल्लाला खाऊ देऊया. असे म्हणत कोंबडी स्वयंपाकघरात गेली. तिने पिल्लूसाठी मस्त नूडल्स बनविल्या. आणि केक सुद्धा बनवला. ते घेऊन ती बाहेर आली. अंड्याकडे बघून म्हणाली, " पिल्ला पिल्ला, बघ मी तुझ्यासाठी काय काय खाऊ आणलाय.. बघ तरी बाहेर येऊन ! " अंहं ! पिल्लू बाहेर येईना ! कोंबडी बिचारी हिरमुसून गेली. " खूपच हट्टी दिसतंय पिल्लू " असं म्हणून बसून राहिली.

थोड्या वेळाने तिला वाटले," किती बाई ही थंडी ! पिल्लूसाठी स्वेटर विणले पाहिजे. " मग काय, चपला घालून गेली बाहेर. मेंढीकडून लोकर घेऊन आली. आणि कपाटातल्या विणकामाच्या सुया घेऊन लागली कामाला. मस्त स्वेटर तयार झाले ! ते घेऊन अंड्याजवळ जाऊन म्हणाली, ' पिल्लू..बघ किति छान स्वेटर आहे हे. चल ये आता बाहेर, घालून बघ पाहू.. " पण अंडे थोडेसुद्धा हलले नाही.

अचानक कोंबडीला वाटले, अरेच्चा, आपल्या लक्षातच आली नाही एक गोष्ट. पाणी कुठं घातलंय आपण अंड्याला ??? लगोलग ती घरातून एक कुदळ फावडे घेऊन आली. बागेत एक छोटासा खड्डा खणला. त्यात अंडे ठेवले नि वरून झारीने पाणी घातले. एक दिवस गेला, दोन गेले, तिसर्‍या दिवशी पण अंडे तस्सेच !

कोंबडीला त्या अंड्याचा खूप राग आला. आणि पिल्लू बाहेर येत नाही म्हणून खूप वाईटही वाटले. तिला खूप रडू येत होते. अंड्याच्या समोर बसून ती खूप खूप रडली. इतकी रडली की आता तिचे डोके दुखू लागले. तिने अंडे उचलले. आणि आपल्या बिछान्यावर ठेवले. जेवली नाही, कपडे बदलले नाहीत. तशीच पांघरूण घेऊन झोपून गेली. खूप खूप थकली होती ती. अंडे पण तिच्या पांघरुणातच होते.

सकाळी कोणाच्या तरी गोड आवाजाने तिला जाग आली. कोंबडीने डोक्यावरचे पांघरूण काढून पाहिले. समोर चक्क अंड्यातून नुकतेच बाहेर आलेले पिल्लू तिला हाका मारत होते. " सुप्रभात आई, तू कशी आहेस ? मला भूक लागली गं. कधी उठणार तू ? " कोंबडीला आभाळाएवढा आनंद झाला. अखेर तिला पिल्लू भेटले होते. :)

बालकथाभाषांतर

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 6:07 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

:-)
क्यूट!

मस्त कलंदर's picture

19 Aug 2010 - 6:10 pm | मस्त कलंदर

आवडली गं ही पण कथा..
बिचारी कोंबडी.. नशीब तंगडी धरून लंगडी नाही घालत बसली. :)

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 6:17 pm | परिकथेतील राजकुमार

सहीच :)

मदनबाण's picture

19 Aug 2010 - 6:20 pm | मदनबाण

कोंबडी इस्टोरी आवडली !!! :)

दोन्ही गोष्टी मुलाला वाचून दाखवल्या.
मस्त आहेत.

निखिल देशपांडे's picture

19 Aug 2010 - 7:39 pm | निखिल देशपांडे

टु गुड....
हे भाषांतर जबरी जमतय गं तुला

शशिधर केळकर's picture

19 Aug 2010 - 8:07 pm | शशिधर केळकर

नशीब! त्या बयेने अंडे फोडून नाही पाहिले! नाहीतर अगदीच दु:खांतक कथा झाली असती.
माझ्या या प्रतिक्रियेबद्दल क्षमस्व - पण कथा वाचताना - संपेपर्यंत - हाच एक विचार मनात होता.
बाकी कथा अप्रतिम!
आणखी येऊद्यात.
शशिधर

आत्मशून्य's picture

20 Aug 2010 - 9:56 pm | आत्मशून्य

मला सुध्धा हीच भिती वाटत होती आधीच इतक्या रडक्या (sorry वास्तववादी)ART FILMS पाहिल्यात कि शेवट sad ending आहे असेच वाटले. (मूळात ते लिहलेच इतके छान आहे कि कथा लहान मूलानची आहे याचे भानच विसरलो)

चतुरंग's picture

19 Aug 2010 - 8:15 pm | चतुरंग

(हॉलिश)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Aug 2010 - 8:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून येऊ द्या....!

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

19 Aug 2010 - 9:02 pm | धनंजय

छानच गोष्ट, शैलीसुद्धा आवडली.

पुष्करिणी's picture

19 Aug 2010 - 9:30 pm | पुष्करिणी

गोड गोष्ट आहे अगदी

अनामिक's picture

19 Aug 2010 - 9:31 pm | अनामिक

छान आहे डच कथा... अजून येऊ द्या!

अवांतर - कोंबडी नक्कीच आयटीतली दिसत नाहीये.

शिल्पा ब's picture

19 Aug 2010 - 10:44 pm | शिल्पा ब

छान...आणि तुमची अनुवाद करण्याची पद्धतहि खूप आवडली...आणि मुख्य म्हणजे यातून हे घ्या ते घ्या असली भानगड नसल्याने मोकळेपणाने गोष्टीचा आनंद घेता आला.
अजून येऊ द्या.

मॅन्ड्रेक's picture

19 Aug 2010 - 10:46 pm | मॅन्ड्रेक

नमस्कार ,
ह्या गोष्टी वरुन मंगेश पाडगावकरांची एक कविता आठवली.

कोंबडीच्या अंड्यामधुन आले एक पिल्लु,
दिसायला छोटे अन उंचिलाहि टील्लु !
कोंबडी म्हणाली बाळा , तुला काय हवे ?
चणे हवे तर चणे , दाणे हवे तर दाणे, आणुन देईन तुला हवे असेल ते खाणे.
पिल्लु म्हणाले आई , असल नको काही,
छोट्याशा कपा मधुन चहा भरुन दे ,
आणि एका अंड्याचे ऑम्लेट करुन दे.

शिल्पा ब's picture

19 Aug 2010 - 10:48 pm | शिल्पा ब

हे गाणं तर मस्तच आहे..

धन्यवाद भावा... कित्तीतरी वेळ हीच कविता आठवत होतो मी.. शेवटच्याच चार ओळी आठवत होत्या..

यशवंत देवांची चाल पण खुप सुंदर आहे याला, ऐकलिये कधी?

परिकथेतील राजकुमार's picture

20 Aug 2010 - 1:32 pm | परिकथेतील राजकुमार

हा हा हा पिल्लु टिल्लु कविता एकदम आवडेश.

मी ऋचा's picture

20 Aug 2010 - 1:27 pm | मी ऋचा

गोग्गोड गोष्ट!! आवडली...

अर्धवट's picture

20 Aug 2010 - 1:29 pm | अर्धवट

दुशली शांग..

शाहरुख's picture

21 Aug 2010 - 2:59 pm | शाहरुख

शांग लवकल !

दिपक's picture

20 Aug 2010 - 1:43 pm | दिपक

आवडली.

कुक's picture

20 Aug 2010 - 2:26 pm | कुक

कोबडा नवता काय? दुसर्या नी भेट द्यायला लागते का अन्ड?
आणि कोम्बडी च्या अन्ड्यातुन पिल्लु बाहेर यायला २१ दिवस लागतात. १ रात्रित कसे पिल्लु बाहेर आले.
खुप अतिशोयुक्ती वाटते.

मितान's picture

20 Aug 2010 - 5:45 pm | मितान

सर्वांना गोष्ट आवडली हे बघून नवीन अनुवाद करण्याचा उत्साह आला :)

कुक, तुम्हाला वास्तववादी कथा सांगायच्यात का मुलांना ??
>>खुप अतिशोयुक्ती वाटते.
आम्हाला नाही वाटत अतिशयोक्ती. आमच्या गोष्टीत काऊ चिऊ बोलतात. माकड दुकान चालवते. ससा शाळेत जातो. मगरीला बायको असते आंबे खाणारी, उंदीर सिंहाचे प्राण वाचवतो...... हे काहीही आम्हाला अतिशयोक्ती वाटत नाही.

एक उपाय आहे. तुम्हाला करता येईल.
मी तीन दिवस कोंबडीने काय केले ते सांगितले. तुम्ही २१ दिवसांसाठी काय काय करता येईल त्याची भर घाला. काय म्हणता ?

परिकथेतील राजकुमार's picture

20 Aug 2010 - 5:49 pm | परिकथेतील राजकुमार

मी तीन दिवस कोंबडीने काय केले ते सांगितले. तुम्ही २१ दिवसांसाठी काय काय करता येईल त्याची भर घाला. काय म्हणता ?

ते 'कोंबडीने ३ दिवस जे केले तेच पुढे अजुन १८ दिवस केले' असे लिहून मोकळे होतील.

चित्रा's picture

20 Aug 2010 - 5:49 pm | चित्रा

गोष्ट छान आहे. आवडली.

कुक's picture

20 Aug 2010 - 8:34 pm | कुक

राग आला का?
अहो मि पण चम्पक पुस्तकाल्या गोष्टी मि हि वाचतो, वाचायचो पण का न जाणे मला अशी
प्रतिक्रीया द्यावी असे वाटले माहित नाही . कालचि अळी ची गोष्ट आवडली.
चुक भुल माफ असावी .

मृगनयनी's picture

21 Aug 2010 - 3:22 pm | मृगनयनी

कोम्बडी, अंड आणि पिल्लु!

सोSSSSSSSSSSS नाईस्स ऑफ यु! मितान!

___________

किती छान असतं कोम्बडीचं पिल्लु! :)

नैतर काही दुष्ट लोक कोम्बडीच्या अंड्यातून पिल्लु बाहेर यायच्या आतच "त्या" अंड्याचं "ऑम्लेट" करतात..! ;)

____________________________________________

ते बिचारं पिल्लु, बाहेर येऊन या जगातली "रोशनी" पण पाहू शकत नाही! ;) ;) ;) ;) ;)

मितान's picture

21 Aug 2010 - 3:58 pm | मितान

प्रिय मृगनयनीताई,

तुम्हा ऑम्लेट करणारांच्या कुरूप जगाला विटून मी या बालकथांच्या निर्मळ विश्वात ठरवून आले आहे. इथे गोष्ट वाचायला येणारांनाही तो निर्मळ जगात असण्याचा आनंद घेता यावा या हेतूने इथे त्या गोष्टी सांगतेय.

बाह्य जगात किंवा इतर धाग्यांवर तुम्हाला ताण आलेला दिसतोय. मोकळ्या मनाने गोष्ट वाचली तर तुमचेही निखळ मनोरंजन होईल.

त्यामुळे माझ्या बालकथांच्या धाग्यावर येताना कृपया आपल्या अनेक कारणांनी मळलेल्या चपला काढून यावे. इथले वातावरण लहान मुलांसाठी असते तसेच निकोप रहावे यासाठी मी प्रयत्न करत आहे. त्याला आपलीही मदत अपेक्षित आहे.

कदाचित या धाग्यावर आपण पुन्हा येणार नाही म्हणून वरील निरोप आपल्या खरडवहीतही डकवत आहे.
यात कोणताही आकस किंवा वैरभाव नाही हे ही नमूद करु इच्छिते. :)

मृगनयनी's picture

21 Aug 2010 - 4:11 pm | मृगनयनी

मितान!.. तू अशीच रहा.. निर्मळ... या मळक्या जगाचा स्पर्शही नसलेली!........

मी पण जेव्हा नवीन होते... तेव्हा तुझ्यासारखीच होते गं!

पण इथे जेव्हा तुमची मतं इतरांना पटत नाही, तेव्हा ते "इतर" तुमच्याविषयी काहीबाही लिहुन, तुमच्यावर,तुमच्या गुरुजनांवर वाट्टेल ती टीका करून सगळं वातावरण दूषित करतात... त्यामुळे नाईलाजाने या लोकांचा सामना करावा लागतो...

मितान, तुझ्यासारखे लोक इथे विरळच आहेत! :)
__________

असो!... तुला या धुळीचा स्पर्श होऊ नये.. ही शुभेच्छा!
:)

अमोल केळकर's picture

21 Aug 2010 - 4:35 pm | अमोल केळकर

मस्त गोष्ट

अमोल केळकर