जस्ट अ जोक .एन.ओ.एम !!
बिडी अर्थातच बिनधास्त डिसक्लेमर : खालील सर्व व्यक्तींविषयी मला आदर आहे आणी त्यांचाविषयी बोलण्याचा आदरयुक्त मनमोकळेपणाही ..कोणालाही अनादर झाल्यासारखे वाटल्यास मला सेंटर-फ्रेश खाण्यास काही ही हरकत नाही
प्रत्येक लेखाआधी थोडेशी प्रस्तावना असावी असे माझे ,शिरीष कणेकरांचे आणी छोटा डॉनचे खाजगी मत आहे..तशी माझी बरीचशी खाजगी मते आहेत आणी त्या मतांशी मी ईमान राखुन आहे ,पण जेव्हा बाटलीतली दारु माझ्या मेंदुशी ईमान राखते तेव्हा माझी खाजगी मते सार्वजनीक होतात. ही व्यथा माझ्या एकट्याची नाही तर जवळपास सर्वांची आहे ...आता काही दिवसांपुर्वीचीच गोष्ट ..
परिकथेतील राजकुमार.. राजे....पुनेरी....श्रावण मोडक...बिपीन कार्यकर्ते व मी ...आम्ही सर्व काही दिवसांपुर्वी दोन घडी बसावे, विचार-विनिमय करावा,दोन पेग टाकावेत आणी मोद प्राप्त करावा अशा वैचारिक,पवित्र, स्वच्छ ,निष्पाप आणी निर्मळ उद्देशाने पुनममध्ये बसलो होतो..धम्याला एसीत, छान छान ,गुबगुबीत खुर्चीवर बसुन रात्री उशीरापर्यंत भजी तळावयाची असल्या कारणाने त्यानी आमच्या ह्या पुरोगामी,विकासपुरक प्रस्तावास समर्थन दिले नाही.अर्थातच दोन टाके पर्यंत आम्ही सर्व एकत्र होतो ,त्यानतंर बौध्दीक पातळीवर आम्ही फुटीरवादी झालो ...पण बौध्दीक पातळीवर आम्ही साम्यवादी - फुटीरवादी होण्याच्या दरम्यान एक सदगृहस्थ मोडकांना भेटावयास म्हणुन आमच्या आसनापर्यंत आले...त्यांची सर्वांग-समृध्द असणारी बौध्दीक पातळी आमच्या लक्षात आली..."ओळख-पाळख" हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडल्यानंतर " विचार आदान-प्रदान" हा क्रार्यक्रम सुरु झाला..अर्थात तो थोडा वेळ जरी चालला असला तरी त्यांचे एक वाक्य आम्हा सर्वांना विशेष आवडुन गेले...
"MY FATHER TOLD ME,TELL ME YOUR COMPANY AND I WILL TELL YOU WHAT YOU ARE "
अर्थात (माझ्या काही अमराठी बांधवासाठी त्याचे भाषांतर देत आहे.)
"माझे वडील मला म्हणाले की तु मला तुझे मित्र दाखव आणी मी तुला सांगतो की तु कसा आहेस."
त्यावर बिपीनदांनी ही काहीतरी वाक्य टाकले...पण ते मला अजिबात आठवत नाही....का कोण जाणे....सुज्ञ वाचकांना लक्षात आलेच असेल..
..तर सांगायचा मुद्दा हा की जसे तुझे मित्र तसा तु ..
बाप रे !!! ...भल्या पहाटे चार वाजता कंजारभाटात नवसागराची हातभट्टी लावणारा पप्या माझा मित्र आहे...मी वडारवाडीत कॅरम आणी पत्त्याच्या अड्डा चालविणार्या महंमदभाईचा मित्र आहे ...तसा मुसद्दी,राजकारणी,बेरकी आणी बारामतीचे पाणी पिलेला धम्या माझा मित्र आहे...सुज्ञ आणी सारासारविवेकबुध्दी जागृत असणारे बिपीनदा, धम्याचे मित्र आहेत ..धम्या, हा आंतरजालीय-आय.डीं.चे आद्य-सुधारक मोडंकाचा पण मित्र आहे...मोडक, हे संवाद आणी संधी हे दोन्ही,साधु पहाणार्या घानोरीकरांचे मित्र आहेत...मोडक ,राडेबाज प्रसनदांचे पण मित्र आहेत....प्रसनदा ,हे खवचट,किमान शब्दात कमाल ईज्जत काढणार्या सदाशिवपेठी पर्याचे मित्र आहेत ...पर्या ,व्यवहारी मार्केटकिंग राजेंचा मित्र आहे.....राजे ,समस्त मिपाकर भगिनींचा मित्र आहे......तसा ,तो ,मराठीभिमानी निखील देशपांडेचापण मित्र आहे..निखील देशपांडे, ही & ही टार्याचा मित्र आहे ..टार्या ,हुशार विजुभाउंचा मित्र आहे...विजुभाउ ,क्रिप्टीक मास्टर विनायक प्रभुंचे मित्र आहेत...विनायक प्रभु, सिध्दहस्त रामदासांचे मित्र आहेत ..रामदास ,पोटासाठी ,जे पैशासाठी स्वताचे कपडे उतरवात त्यांचे विमे उतरवणार्या व माड्या चढणार्या तात्यांचे मित्र आहेत....तात्या ,माळीकामात आनंद घेणारे पिवळा डांबिसचे मित्र आहेत ...पिवळा डांबिस, कविराज पुणेरी पेशवेंचे मित्र आहेत...पुणेरी पेशवे ,हलकट ब्रिटीश टिंग्याचा ((हा ईतकाच शब्द ह्याच्यासाठी भरपुर आहे,खरतर आजकाल एखाद्याला हलकट म्हणावयाच्या एवजी टिंग्या म्हणावेसे वाटते. )) मित्र आहे....टिंग्या ,हा माझा मित्र आहे...बाप रे !!
सगळा गोंधळच आहे ....मग मी नेमका कसा....आणी ह्यात आपला मित्र कुठला ? ह्याचा काही मागमुस लागेना..डोक पिकायला लागल ....आपल्या मित्रांचा आपण शोध घेतलाच पाहिजे.असे असेल तरच मी कोण आहे ? कसा आहे ? ह्याचा शोध घेता येईल .आणी ...तसही आम्ही निवासी भारतीय लोक्स तात्विक आणी जावई-शोध घेण्यात पटाईत असतात असे निवासी आणी अनिवासी अमेरिकन भारतीयांचे मत आहे
पण विदेशी लोकही शोध घेण्यात पटाईत आहेत ...असाच एक शोध लावला जॉन डनलॉप ह्या ईसमाने ..सन १८८७ साली आपल्या मुलाच्या सायकली साठी त्याने हा शोध लावला ..त्याच्या ह्या पुत्रप्रेमापोटी जन्म घेतलेल्या शोधाला आपण हव तेव्हा हव तसे रगडतो....पण त्याच्या शिवाय प्रवास शक्य नाही ...तो शोध म्हणजे न्युमॅटीक टायर.....आधी वॅटसन नी ईंजिन बनविले . नंतर ह्या महाराजांनी टायर...माणसाला पंख फुटले...वेग वाढायला लागला...शहरांमध्ये टायर चालतील असे रस्ते तयार होउ लागले...मग नियमाप्रमाणे विदेशी वस्तुंचे loan भारतापर्यत पोचले...शिवाय त्यावेळी देश ही पारतंत्रात होता....हळु-हळु तंत्रज्ञानामुळे समाजात आणी सामजिक जीवनमानात बदल होऊ लागले...कार आली,सायकल आली ,दुचाकी आली.....गावांपेक्षा शहरात प्रवासासाठी सर्रास वाहने वापरली जाउ लागली..त्यातलेच एक जगप्रसिध्द शहर म्हणजे पुणे(हा माझा गैरसमज नाही !!) ...पुण्यातील मंडळी हुशार(हा ही माझा गैरसमज नाही !!)....रस्ते छोटे ..गल्ली - बोळ , मग सर्वसामान्यांना परवडेल असा पर्याय पुणेकरांनी स्विकारला,सायकलला जवळ केले..कधी एके-काळी पुणे हे सायकलींचे शहर म्हणुन ओळखले जात होते .....तत्रज्ञान विकसित होत होते..फार काही तसे स्वयंचलित दुचाकीचा शोध कोणी लावला ह्याबाबत नीटशी माहीती नाही ..पण एडवर्ड बटलर ह्या खोपडीबाज हुश्शार ईग्रंजाने एक तिचाकी बनविली ...त्याची सुधारणा होत गेली ...दुसर्या महायुध्दापर्यंत स्कुटरची मोपेड झाली होत...मोपेड हा प्रकार जगभर प्रसिध्द पावला आणी आता दुचाकींची एक वेगळी ईंडंस्ट्री आहे.....आणी पुणे दुचाकींच शहर.....
हे सगळे शक्य झाले ते त्या डनलॉपच्या न्यमॅटिक टायर-ट्युबमुळे..जस मी ,शंकर पाटील आणी नान्या ,चेंगट, अवलिया,विसरत नाही की असाच अवांतर पणा करीत-करीत लेख दुसर्या विषयाकडे वळवावा..तसाच तो ही हे विसरला नाही की ..
रस्त्यावर ही चाके रगडताना रस्त्यावर असलेल्या काही टोकदार आणी धारदार वस्तुंमुळे आतील ट्युब पंचर होउ शकते.म्हणुनच पंचर टेक्नॉलॉजी जन्माला आली..
शाळेत असताना, माझा व माझ्या कंपुतील सर्व जणांचा अभिमानाचा मुद्दा होता तो म्हणजे माझी रेंजर सायकल....तिथेही माझ्या कंपुतील माझ्या मित्रांनी माझ्या सत्कार्यांसाठी बर्याचदा माझी पाठ थोपठली आहे ....आणी मिपाकर कंपुनी ही माझी पाठ बर्याचवेळा थोपटली.....पण माझा मीपाकर कंपु सहसा खालच्या पातळीवर घसरतो असे आमचे काही मीपाकर हितशत्रु म्हणतात,त्यांचे म्हणणे खरे करुन दाखवावे म्हणुन की काय ,माझ्या कपुंतील काही मंडळी नेमकी माझी पाठ थोपटताना खालच्या पातळीवर गेली आणी माझी दोन दिवस बसायची सोय राहिली नाही..असो.पण एकदा शाळेतल्या हितशत्रुंनी,जळकुकड्या वृत्तीने,पंचर करायच्या हेतुने रेंजरच्या चाकांना खिळे ठोकले...म्हणुन मी त्यांना ठोकले ....त्यानंतर प्राचार्यांने त्याच्या खोलीत मला ठोकले आणी नंतर लक्ष्मण नावाच्या आडमुठ्या,रागीट ईसमाने,माझे म्हणणे अजिबात न एकता भर शाळेत मला यथेच्छ तुडवुन काढले .(हो हो तोच तो ,सुहास लक्ष्मण साळे मधला लक्ष्मण) ...त्या घटनेने माझ दहावीच एक वर्ष खराब झाल...लहाणपणीच मला पंचर देवतेचा असा प्रतिसाद...आपल हे ..प्रसाद मिळाला आहे..तेव्हापासुनच पंचरला मी खुप घाबरतो....टार्या आपल्या एका जुन्या सहीत लिहीतो की " आमच्या ईथे पंचर काढुन मिळेल ".....पण टार्याशेजारी ,मी ,पर्या वा धम्या उभे असलो की आम्ही तिघेही पंचर असल्यासारखे दिसतो...बहुतेक लिहीताना चुकला असेल...."काढुनच्या" एवजी "करुन" असे पाहिजे होते..आणी तर असा हा पंचर झालेला पंचरचा महिमा...
कॉलेजच्या परीक्षा नुकत्याच संपलेल्या असतात ..आपली प्रेयसी गावाला जाणार असते.... जाताना भेटशील ना असा एक आर्जव करणारा निरोप परीक्षेच्या हॉलवर आलेला असतो.....मग सात दिवसानी ,भेटीचे अगत्य करण्यासाठी, लाडिकपणे निरोप येतो ..येणार आहेस ना आज ..गाडी चार वाजता आहे....पण मी दोन वाजताच निघणार ....आपण एम्प्रेसला बसुयात थोडा वेळ...एम्प्रेसला जायचय म्हटल्या-म्हटल्या आपल्या अंगाला अंगभर शहारे येतात....आपण कधी नव्हे ते चार मित्रांचे खिशे पंचर करुन आपल्या खिशात हवा भरतो.....थोडीशी हवा, व्हाव्याच्या गल्ल्यात भरतो......थोडीशी आर्चिस वाल्यांना देतो आणी थोडीशी फुलवाल्या मामाला.....टाईट-बॅली-फेडेड ब्लॅक जिन्स...लाईट-क्रश पॅटर्नचा,मिल्क व्हाईट, टु-थर्ड व्ही नेक ....गाडीला समोरच्या फ्लॅपमध्ये अडकविलेले झरबेराचे फुल .....टी-शर्टच्या आत आपण हॅपी जर्नी आणी लव्ह यु ही दोन कार्डस टाकलेली असतात..सगळ काही तिला पसंत असणारं.....तिने आज काय वेषभुषा केली असेल.....तिला काय-काय सांगायचे....एम्प्रेसला काय-काय करायचे....आपल्याला एम्प्रेसचे आधीचे क्षण आठवतात...तिचा लाजुन चुर झालेला गोरामोरा चेहरा...आपल्याच छातीवर ती लपवुन घेते.....आपण तिचे गालाभोवती रुळणारे केस हलकेच बोंटानी कानामागे नेतो.....तसाच थोडेसे मनगट फिरवुन आपण तो चेहरा पुन्हा ओंजळीत घेतो.....ती किंचीतशी मान वर करुन डोळे घट्ट मिटुन घेते....आणी...आणी...... लिहु का पुढे.....नाही म्हणजे संपादकीय अडचण जरी नसली तरी आपण आपल्या सार्वजनीक लेखनाच्या सीमा ओळखतो....असो...तर ..अश्या आठवणीतुन आपण गाडीला किक(मराठी शब्द ?) मारतो...वार्याची झुळुक आपल्या शरीराला मोहरुन काढते....तिच रुसण, बोलण...शब्दातीत ईशारे ..तिच खळखळुन हसणं....आणी आपण ही हसतो..अचानक एखादा हत्ती आपल्या गाडीवर सीटवर बसुन गडगडत हसतोय की काय असे वाटायला लागते ..पुर्ण गाडी हसायला लागते..... टायर्स तर हरमन बावेजाच्या() डान्स-स्टेप्स दाखवायला लागतात .... आपण गाडी थांबवतो...
आयला बोलता-बोलता लेख लईच मोठा झाला की ..असो तुर्तास ईथेच थांबतो...
करमश.....
काही खुलाशे
१) वरील सर्व प्रसंग काल्पनिक आहेत
२) एम्प्रेस =एम्प्रेस गार्डन ...पुण्यात जोडप्यांना खुला वातावरणात रोमान्स करायचे कधी एकेकाळचे हक्काचे स्थान....
३) टिंबाचा वापर करण्यास " संपादकीय " परवानगी लागत नाही अशी आशा आहे .
प्रतिक्रिया
8 Aug 2010 - 2:19 am | असुर
क ड क!!!
क मा ल!!!
खल्लास्स....
सगळे मुद्दे जाहीर पटले आहेत!!!
--असुर
8 Aug 2010 - 2:28 am | प्रभो
क ड आणी क!!!!
(सुहाश्याचा मित्र) प्रभो
8 Aug 2010 - 3:44 am | llपुण्याचे पेशवेll
झरबेराचे
वाहवा हा शब्द काळजाला भिडला. :) एकदम पाक पंतप्रधानांची आठवण झाली. असो शनिवार रात्रीचा परिणाम(?).
कडक लेख. शनिवार रात्र साजिरी साजरी झालेली दिसते आहे. चालूद्या.
8 Aug 2010 - 5:12 am | सहज
मस्तच लिहले आहेस! :-)
8 Aug 2010 - 10:40 am | प्रकाश घाटपांडे
वा वा! काय बात बोल्या सुहास.
यातुन पुढे आपल्या मताशी जो सहमत आहे तो आपला मित्र व जो सहमत नाही अथवा तटस्थ आहे तो आपला शत्रू अशी देखील विचारसरणी तयार होते. ते विंग्रजीत म्हंत्यात ना ईफ यु आर नॉट वुईथ मी यु आर वुईथ देम.
कधी कधी अशा गप्पा न्याहळत / ऐकत शांतपणे बसण्यात देखील मजा असते. प्रत्येकाचे अभिनिवेश पहाण्यासारखे असतात. आपल मत मांडणे व ते दुसर्याला पटवुन देणे हा स्वाभाविक प्रयत्न असतो. पण जेव्हा ते दुसर्याला पटत नाही त्या वेळी दुसर्याची आकलन क्षमतेत दोष आहे असे समजले जाते. दुसर्या भाषेत बोलायचे झाले तर अक्कल काढली जाते.
काही लोकांना फक्त आपण बोलाव व इतरांनी ऐकाव अस वाटत असते. त्या पुढे जाउन दादही द्यावी असही वाटत असते. यांना सतत श्रोतेच हवे असतात. आपणही कधी कधी श्रोत्याच्या भुमिकेत जाव अस वाटत नाही.
साप्ताहिक साधनेच्या ७ ऑगस्ट च्या ताज्या अंकात सचिन कुंडलकर चा तेच तेच बोलणारे ऑयडॉल्स हा लेख वाचनीय आहे http://www.weeklysadhana.com/ इथे अपलोड झाल्यावर वाचायला मिळेल.
8 Aug 2010 - 10:50 am | वेताळ
एकदम मस्त लेख लिहलाय.करमश आता पुढे काय?
8 Aug 2010 - 11:01 am | अर्धवट
उत्तम,
च्यायला पिले की बाकिच्यांना सुचायचं बंद होतं अन ह्याला सुचायला लागतं.
अवांतर - अनुल्लेख!! अर्ध्या भा* तुझा बाब्या कधी होणार, असुदे फिरुन यत्न कर. होशील होशील
8 Aug 2010 - 11:08 am | अवलिया
तु रोज का पित नाहीस?
8 Aug 2010 - 11:09 am | अवलिया
चुकुन वि चा पि झाला... क्षमस्व
8 Aug 2010 - 11:16 am | आनंदयात्री
मस्त आणि बेष्ट लेख !!
हलकट या शब्दाऐवजी टिंग्या हा शब्द वापरावा याला अनुमोदन देतो.
धम्या आणि इन्या साले दोघेही टिंग्या आहेत !!
8 Aug 2010 - 11:19 am | तिमा
बंद वर्तुळातल्या व्यक्तिने वर्तुळातल्या खास लोकांसाठी लिहिलेले. याहून आमच्यासारख्या तिर्हाइतांना काय बोध होणार ?
8 Aug 2010 - 11:46 am | फुस्स
नाईस. आपले विचार लेखाद्वारे नेमके आणि स्पष्ट लिहीता येणे ही एक फार मोठी कला आहे. ओळखीच्या लोकांना एका माळेत गुंफुन सुंदर माला तयार झाली आहे.
हे तितकेच विनोदी आहे जितके ," तु मला तुझी रास सांग आणि मी तुला सांगतो की तु कसा आहेस."
8 Aug 2010 - 12:52 pm | वारा