आशी कशी येळी वो माये.

उग्रसेन's picture
उग्रसेन in कलादालन
7 Aug 2010 - 9:19 pm

ABCD0002
बहिणाबाय म्हणते- आशी कशी येळी वो माये, आशी कशी येळी.

'' नीज न ये तर गीत म्हणावे
अथवा झोके देत बसावे
कोण करी हे जीवेभावे
ती माझी आई ! "

माय म्हणली की इथुन तिथून एकच नै का ?
फोटू आवडला का ?

छायाचित्रण

प्रतिक्रिया

बहुगुणी's picture

7 Aug 2010 - 9:29 pm | बहुगुणी

आणि बहिणाबाईंच्या ओळीही सुंदर!
या आधी क्रान्ति यांनी दिलेली पूर्ण कविता इथे आहे.

अर्धवट's picture

7 Aug 2010 - 9:47 pm | अर्धवट

+१

भिरभिरा's picture

7 Aug 2010 - 10:17 pm | भिरभिरा

मस्त.
कविता तर...

कवितेच्या वळी माझ्या नै. माहा फक्त फोटू. कवितेच्या वळी इथं सापडल्या.
त्या चार वळी इथे वापरल्या.

बाबुराव :)

माय लेकरु आवडल :)
लेकरु तर कस्ल क्युट दिसतय :)

कवितेच्या ओळीही एकदम चपलख.
दुव्या बद्दल धन्यवाद. लेकीच आवडत अंगाईगीत आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Aug 2010 - 11:05 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो छान आहेच. पण बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळी... क्या केहने!!! अप्रतिमच.

पुष्करिणी's picture

7 Aug 2010 - 11:59 pm | पुष्करिणी

फोटो छानच आणि बोलका आहे, बहिणाबाइंची कविता तर..

सहज's picture

8 Aug 2010 - 5:19 am | सहज

बाबुराव, बहिणाबाइंच्या त्या ओळी व फोटो दोन्ही छान!!

मस्त कलंदर's picture

8 Aug 2010 - 11:03 am | मस्त कलंदर

एलिफंटा केव्हज मधली माकडे...

स्वाती दिनेश's picture

8 Aug 2010 - 11:37 am | स्वाती दिनेश

मस्तच, बहिणाबाईंच्या कवितेतल्या ओळी फोटोसाठी अगदी चपखल !
मकीने दिलेला फोटूही आवडला, त्यातले साइडने दिसते ते तर अगदी मानवी पिल्लूच वाटते आहे,
हा फोटो तुम्ही सुलेशबाबूंनी आयोजित केलेल्या मिम वरच्या फोटो स्पर्धेत का नाही पाठवत तुम्ही बाबूराव?
स्वाती