मिपा कि मिपाकर..
सरळ मुद्या म्हणजे नक्की मिपा काय आहे?
नव्या-नवोदित व जुन्या-प्रस्थापित जनांनी एका वादकाप्रमाणे केलेली लेखनाची जुगलबंदी. किंवा प्रस्थापित वा नवोदितांनी केलेली- लिहिलेली एकेरी सरगम. मिपावरच्या लेखनापेक्षा त्यावरील खोचक - बोचक गमतीशीर वा विवादास्पद वा हास्यास्पद प्रतिक्रिया वाचण्यात लोकांना रस वाटतो. हि देखील चांगली बाब आहे.
कधी कधी होते असे जो नवोदित, नवोदित म्हणण्यापेक्षा नवीन मिपाकर काही नवे साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करतो त्यावर अशा टिप्पण्या होतात कि त्याला निराशा वाटते. व पुढील लेख लिहिण्यास थोडे असंबद्ध वाटते. असुरक्षितता वाटते. लिहिताना जो हुरूप असतो त्याची गळचेपी होते. यावर उपाय म्हणजे स्वतः संपादक किंवा प्रस्थापितांनी वा दोघांनी मिळून नवोदितांना मार्गदर्शन केले पाहिजे. टोमणे- कोपरखळ्या हे प्रस्थापिता पर्यंत मर्यादित ठेवावेत. नवोदितांना त्यांची चूक प्रेमाने समजून समजावून दिली पाहिजे. मग असे हे मिपाचे साहित्याला समर्पित पोषक वातावरण आणखी पोषक बनवता येऊ शकेल अशी आशा वाटते.
मिपा व मिपाकर दोघे महत्वाचे आहेत हे समजून घेणे.
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 8:44 pm | मेघवेडा
काउंटर लावला आहे.
CTR = CTR + 1;
;)
6 Aug 2010 - 8:45 pm | प्रभो
i++;
6 Aug 2010 - 9:24 pm | मंडित
कुणी समजावण्याचे कष्ट घेईल का कि या लेखात काय चुकीच लिहिले आहे ??
बोलण्या पेक्षा मार्गदर्शन करावे हीच प्रार्थना
6 Aug 2010 - 9:31 pm | प्रभो
माझ्या प्रतिसादादाला उपप्रतिसाद दिलात त्याबद्दल हा प्रतिसादप्रपंच,
रोज रोज त्याच विषयावर चर्चा झाली की तो विषय रटाळ होतो. नवे-जुने मिपावर ह्या विषयावर गेल्या आठवडाभरात अर्धा डझन धागे आलेत आणी त्या अर्ध्या डझन धाग्यांवर खंडीभर प्रतिसाद. धागा चूक-बरोबर ह्याबद्दल मी अथवा मेवे काहीच बोललो नाहीये. जुन्या विषयावरचा अजून एक नवा धागा या अर्थाचा प्रतिसाद आहे तो.
अधीक माहितीसाठी खाली बिकांचा प्रतिसाद नजरेखालून घाला.... :)
धन्यवाद.
6 Aug 2010 - 8:52 pm | असुर
साखरेचे मिश्रण बदलून जुनाच काढा परत प्यायला दिलाय असं वाटतंय!
सतत स्वत:ला नवीन म्हणवून घेण्यात अभिमान किंवा न्यूनगंड, दोन्हीची गरज नाहीये. जाणून बुजून किंवा अजाणतेपणी तुम्हीच या गोष्टीचा प्रपोगंडा करत राहिलात तर तुम्ही कायम रस्त्यापलीकडेच रहाल.
यापुढे या विषयावर मी तरी प्रतिसाद देणार नाहीये. हा शेवटचा!
-असुर
6 Aug 2010 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते
खरं तर आता नुसतं न बोलता काही अॅक्शन करा बरं मृण्मयी ताई. म्हणजे असं की, आता हे मिपा / इथलं वातावरण, संपादकांचा हलकटपणा, काही सदस्यांची उदात्तता आणि लोकप्रियता, जुने वि. नवोदित इत्यादी विषयांचा कंटाळा आलाय. मिसळपावचे जुने सुरूवातीपासूनचे धागे चाळत इथे पर्यंत या आणि बघा की इथे किती उत्तमोत्तम लेखन झाले आहे / होत आहे. त्यात भर घाला. असले चर्चा विषय पुरे आता खरंच. बाकी मार्गदर्शनाचा मुद्दा ठीक आहे. पण .... असो.
- (हौशी मार्गदर्शक)
6 Aug 2010 - 9:26 pm | क्रेमर
पण कृपया प्रतिसाद देऊन वर आणू नका.
7 Aug 2010 - 1:24 am | सुनील
पण कृपया प्रतिसाद देऊन वर आणू नका
नाहीतर तुमचे विडंबन केले जाईल!!!!
6 Aug 2010 - 9:27 pm | शानबा५१२
तुम्हाला काही कटु अनुभव आला का?
आला असला तरी 'ते' लोक मस्करी करत होते अस समजुन मनातुन काढुन टाका.क्षणीक गोष्टी आहेत्,क्षणातच संपवलेल्या ब-या असतात.
एकदा इथे रुळलात की आपणही मिपाला आपल्या आवडीच ठीकाण बनवाल.
काही अनिभव विसरणं जड असत हे खरं,पण आपण अतंरजालावर आहात्,ह्या लोकांना आपण मनात आल्यास टाळु शकता कींवा नाहीच जमल तर फक्त वाचन करत रहा.
- एक नाबालिक अजाण.
6 Aug 2010 - 9:44 pm | कळस..
मला कळवावे
6 Aug 2010 - 9:59 pm | रेवती
मृण्मयीताई, सगळे सदस्य कधी ना कधी नवीन होतेच.
चार दंगा करणार्यांकडे दुर्लक्ष करून आपले चांगले लिखाण मिपावर येउ द्यावे.
आता याप्रकारचे धागे कितीजण, कितीवेळा काढणार आहात?
हा असा कंटाळवाणा धागा काढण्यापेक्षा आज आपल्याकडून एक चांगला लेख/ कविता/ पाककृती यापैकी काही/किंवा सगळे आले असते तर चांगले वाटले असते.
6 Aug 2010 - 10:14 pm | विसोबा खेचर
छान प्रकटन..
- एक मिपाकर.
6 Aug 2010 - 10:16 pm | मितान
मृण्मयी,
मी पण इथे नवीनच आहे. एकूण गेले दोन चार दिवस जो प्रकार चालला होता त्यात वीट येण्याचे मुद्दे होतेच. त्यात आपण कोणत्याही प्रकारे न गुंतणे उत्तम. माझ्याप्रमाणे तुम्ही पण इथे चार क्षण आनंद मिळवण्यासाठी येत आहात असे गृहीत धरून एक अनाहूत सल्ला देते - आपला रिमोट कंट्रोल आपल्या ताब्यात ठेवावा. कोणाचे लेखन, प्रतिसाद किंवा खरडी यामुळे सहजासहजी तो गमावला जाऊ नये. परत आपल्या हातात यायला खूप कष्ट आणि वेळ लागतो.
मैत्रीण
माया
6 Aug 2010 - 10:25 pm | भारी समर्थ
बालवाडीतला एक मुलगा मधल्या सुट्टीनंतर वर्गात उशीरा आला. त्याच्या ध्यानात आले की चड्डीचं बक्कल लावायचं राहिलय म्हणून. पण तोवर तो प्रकार सार्या वर्गाच्या लक्षात आला होता (शाळेतला पहिलाच दिवस असल्याने असल्या उघडझापीत तो अजून प्रस्थापित झाला नव्हता). त्यावर प्रस्थापित शिक्षिका ही हसल्या आणि नवोदित सवंगडीही.
सगळे हसले ते तो नवोदित होता म्हणून नाही, तर त्याच्या कंटेंटवर...
प्रतिक्रियांचा डोक्याला ताप करून घ्यायचाच म्हटला तर होणारच की हो.
भारी समर्थ
6 Aug 2010 - 11:16 pm | अर्धवट
कसं मनातलं बोललात
6 Aug 2010 - 11:18 pm | मेघवेडा
तुम्हीच की काय ते?
=)) =))
7 Aug 2010 - 6:32 am | भारी समर्थ
अतिअवांतरः न्हाय बा! आमाला ईल्यास्ष्टिकची चड्डी घालून पाठिवलं व्हतं!
(समर्थ ब्ल्याडरवाला) भारी समर्थ
6 Aug 2010 - 10:39 pm | Dhananjay Borgaonkar
असा काय तुम्हाला वाईट अनुभव आला ताई? आहो थोडीबहोत हसी मजाक चालतेच ईथे.
थोडावेळ जाउद्या तुम्हालाही आपलस वाटेल इथे.
नवीन जागेत सेट व्हायला वेळ सगळ्यांनाच लागतो.
7 Aug 2010 - 7:36 am | आमोद शिंदे
>आहो थोडीबहोत हसी मजाक चालतेच ईथे.
थोडी कशाला बहोत चालू दे हसी मजाक! शिणलेल्या मेंदूला ताजेतवाने करायला तर येतो इथे आम्ही.
7 Aug 2010 - 12:16 am | कार्लोस
ज रा मराथि मह्दे कसे लिहय्चे ते सन्गिलत तर खुप बर होइल
7 Aug 2010 - 1:19 am | Dhananjay Borgaonkar
ठ = T + h
थ = t + h
ध = d +h
ण = N
छ = C + h
अॅ = shift + e
औ = a + u
अं = a + shift + m
ज्ञ = d + n + y + a
श = s + h
ळ = L
हे जरा न जमणारे शब्द आहेत. बाकी थोडेफार हातपाय मारा. जमेल हळुहळु.
7 Aug 2010 - 11:31 am | नितिन थत्ते
बिकांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
7 Aug 2010 - 12:46 pm | अप्पा जोगळेकर
नल रेफरन्स एक्सेप्शन.