कात्रज ते सिंहगड.

sandeepn's picture
sandeepn in जनातलं, मनातलं
4 Aug 2010 - 3:45 pm

जुलै महिन्याच्या सुरवातीला कात्रज ते सिंहगड असा ट्रेक करण्याचा योग आला होता. शनिवारचा दिवस होता. सकाळी ७ लाच जुन्या कात्रज बोगद्याच्या वरुन चढायला सुरवात केली. सकाळी सकाळी स्वारगेटवरून टमटम पकडुन आम्ही ८ लोक इथे पोहचलो होतो. आधिच ट्रेक खुप अवघड आहे असे सांगण्यात आले होते , पण उस्ताहाच्या भरात त्याचा सिरिअसनेस आम्हाला कळला नव्हता. पण पहिलाच डोंगर चढतानाच पुढच्या ट्रेक ची कल्पना आली. वरुतुन कात्रज घाट असा दिसत होता.


वरुन दिसणारा कात्रज घाट.

चालता चालता सुंदर निसर्ग निहाळत होतो. तेव्हा ते क्षण कॅमेरयात टिपले.


हिरवे हिरवे गार गालीचे हरीत 

तृणांच्या मखमालीचे.


धुक्यात हरवलेली वाट.

पुढे चालत राहिलो. मग एक एक असे ४-५ दोंगर चढलो आणि उतरलो.मग एका ठिकानी थोडी विश्रांती घेतली आणि एकाने आणलेल्या गुळ पोळ्या खाल्ल्या.जरा बरे वाटले. मग थोडे फ़ार ऑर्कुट पोस देत फोटो काढले व परत चालायला लागलो. एकामागुन एक असे डोंगर चढत होतो आणि उतरत होतो. पण सिंहगड काही दिसत नव्हता.तो तिकडे लांब ढगांच्या आड लपला होता. मधे आजुबाजुला दिसनारा निसर्ग मात्र टिपत होतो,डोळ्यांत आणु कॅमेरयातही.


एक कॅमेरयात टिपलेले द्रुश्य.


असेच अजुन एक कॅमेरयात टिपलेले द्रुश्य.

सुरवातीला थोडास रिमझिम पाउस झाला तो तेव्हडाच. नंतर काही पाउस झाला नाही. काही चढ काठीण तर काही सोप्पे होते. आम्ही पुरते थकलो होतो पन आता मधेच अडकलो होतो. परत जायचा कोणी विचार केला असता तरी तो काहि शक्य नव्हता.
मधे काही गावकरी महिला डोक्यावर लाकडांचे ओझे घेवुन चालताना दिसल्या. त्यांची कमाल वाटली.


ऒझे वाहणारया कष्टकरी महिला.

तेव्हड्यात ढगांनी क्रुपा केली व सिंहगडाने दर्शन दिले. जरासे बरे वाटले. मग परत जोमाने पुढचा डोगर चढुन गेलो. पण ज्यावेळेस आम्ही त्या डोंगरावर आलो तेव्हा पुढचा मोठा डोंगर बघुन धस्स झाले. पन काही पर्याय नव्हता परत चालायला लागलो.


आम्ही ह्या रस्त्याने आलो !


पुढील दिसनारा रस्ता.

रस्त्यामधे काही रानफ़ुलांनी लक्ष वेधुन घेतले. मग परत कॅमेरा काढला आणि फ़ोटोसेशन चालु केले.

असे जवळ जवळ ११ डोगर चढलो आणि उतरलो तेव्हा सिंहगडावर जाण्यारया रस्त्याला लागलो.
तो रस्ता असा दिसत होता.

प्रचंड भुक लागली होती , म्हणुन तिथेच झोपडीत चहा, भजी वर ताव मारला. मग परत त्याच रस्त्याने सिंहगडावर चालत गेलो. गडावर पोहचताच नेहमीप्रमाने गर्दी दिसली. इतक्या वेळची शांतता भंग झाल्यासारखी वाटली. मग मस्त विंड पॉइंट ला जावुन हवा खाली. मग नंतर परत पिठलं भाकरी वर ताव मारला. आणि मग घडावरुन खाली आलो व बस पकडुन परत स्वारगेटला. घरी जायला अंधार झाला होता. पण हा ट्रेक आम्ही खुप इंजॉय केला.
    या ट्रेक ला जाताना बॅगमधे पाणी आणि खायला घेणे आवश्यक आहे. कारण मधे कुठेही पाणी नाही आहे. स्टॅमिन्याची कसोटी बघनारा असा हा ट्रेक आहे. तसा लोक रात्री करतात हा ट्रेक, पण जर तुम्हाला आजुबाजुच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर दिवसा पण करण्यासारखा आहे. पण उन्हाळ्यात दिवसा प्रयत्न करु नये कारण अंतर खुप आहे त्यामुळे उन्हाचा त्रास होवु शकतो.

मौजमजाअनुभव

प्रतिक्रिया

जिप्सी's picture

4 Aug 2010 - 3:59 pm | जिप्सी

व्वा संदीप मस्तच आहेत फोटो. हा ट्रेक म्हणजे खरच स्टॅमिन्याची कसोटी बघणारा आहे. कात्रज ते सिंहगड १ शर्यत असते दरवर्षी १५ ऑगस्टला, मी तीनदा भाग घेतला होता त्यात. एकदा ५वा आलेलो होतो. तीन लोकांची टीम असती. पहिली येणारी टीम अडीच तें तीन तासात करते पूर्ण हि रेस. फार दिवसांनी आठवला हा ट्रेक ,करायलाच पाहिजे परत एकदा.

Pain's picture

5 Aug 2010 - 2:00 pm | Pain

फोटो छान आहेत.
२.५ - ३ तास फारच कमी आहे. पटत नाही.
या शर्यतीची एक अट म्हणजे तीनजणांच्या गटात एकतरी मुलगी पाहिजे अशी आहे. बोंबला~
आणि बहुदा रात्र-दिवस चालतो (ओव्हरनाइट)
पण विंझर - सिंहगड केला होता खूप वर्षांपूर्वी.

धनंजय's picture

5 Aug 2010 - 7:47 pm | धनंजय

असेच म्हणतो.

(गूगल नकाशात अंतर आणि डोंगर-दर्‍या बघता मला तरी सहज ४ तास लागतील. शर्यतीतून आम्ही भाग घेण्यापूर्वीच नापास!)

गौरीदिल्ली's picture

4 Aug 2010 - 4:08 pm | गौरीदिल्ली

विंड पॉइंट बद्दल वाचताना थन्ड हवेचा आपसुकच भास झाला... मस्त ट्रिप ... आणि मस्त वर्णन....

आर आर's picture

4 Aug 2010 - 5:32 pm | आर आर

छान आहेत फोतो

प्रभो's picture

4 Aug 2010 - 8:23 pm | प्रभो

मस्त रे!!

रामदास's picture

4 Aug 2010 - 8:28 pm | रामदास

फोटो बघून ताजातवाना झालो.

शुचि's picture

4 Aug 2010 - 9:46 pm | शुचि

अनुपम!
ते धवल पुष्प तर दिलखेचक :)

sandeepn's picture

5 Aug 2010 - 11:37 am | sandeepn

धन्यवाद

मराठमोळा's picture

5 Aug 2010 - 1:27 pm | मराठमोळा

फोटो अतिशय सुंदर आले आहेत.
ट्रेक ला अशा दृश्यांशिवाय मजा नाही हेच खरे, पायी चालुन आलेला थकवा कुठे हरवुन जातो कळत नाही. :)

sandeepn's picture

6 Aug 2010 - 10:17 am | sandeepn

नटलेला निसर्ग हा टॉनिक सारखे काम करतो :)

स्वाती दिनेश's picture

5 Aug 2010 - 7:14 pm | स्वाती दिनेश

फोटो मस्तच.. सिंहगड ट्रेकच्या आठवणी ताज्या झाल्या.
स्वाती

चित्रा's picture

5 Aug 2010 - 9:02 pm | चित्रा

फोटो छान. रानफूलही आवडले.

मला धुक्याचे असे फोटो पाहिले की माळसेज घाटाचीच आठवण येते. सिंहगडाला अशी कधी गेले नाही.