... मला माझ्या एका छान मित्राचे आभार मानायचे आहेत...
.....कशाबद्दल?.....
....कारण त्याने माझं एकटेपण दूर केलं...
....मला व्यक्त होण्यासाठी...... माझ्यातल्या impulsive जाई ला मुक्तपणे व्यक्त व्हायला एक स्थान दिलं....
... अनेक प्रकारचे....वेगवेगळ्या विचारसरणीचे.....खुप छान मित्र दिले....
....जे काही थोडंसं लिहावंसं वाटतं ते लिहायला संधी..... आणि वाचायला अतिशय जाणकार्,सुज्ञ वाचकवर्ग दिला..
...एक निखळ आनंद ....कधीही न ओसरणारा आनंद त्यानी दिला..
....म्हणजे नक्की काय केलं?....तर त्याने मला मिसळपाव ची गल्ली दाखवली...
.....मिसळपावची ओळख करुन दिली....
....त्याचे नाव आहे 'स्वछंदी पाखरू'
मी जर काही बरे लिहिले,तुम्हा सर्व वाचक वर्गाला काही आनंदाचे क्षण देऊ शकले तर त्याचे सारे श्रेय "स्व्.पा." लाच जाते.
मी जर फार बोअर केले...कोणच्या भावना दुखाव॑ल्या, दंगल जाळपोळ केली ...तुमच्यापैकी कोणाला वाटले कि मला धरुन हाणावे...तर तेही श्रेय 'स्व्.पा." यांचेच असेल्... ते स्वतः माझ्या मिळकतीत भागिदार असतील.
विनोदाचा भाग निराळा...
मि.पा. वर येउन खरच अतिशय आणंद झाला....त्याबद्दल 'स्व.पा.' चे मनापासून धन्यवाद.
त्याबद्दल त्याना हार आणि पुष्पगुच्छ्....शाल आणि श्रीफळ हेही देण्यात येत आहे.
एवढे बोलुन मी माझे चार शब्द संपवते. मान्यवरांनी चार शब्द शांत चित्ताने ऐकुन घेतले त्याबद्द्ल मंडळ आभारी आहे.
हि साठा उत्तरांची कहणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण.
....जशी मला मिसळ्पाव प्रसन्न झाली तशी अजुन अनेकांना होवो.
जय हिंद्...जय महाराष्र्ट..!
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 7:32 pm | मदनबाण
मिपावर आयडी रुपाने आलेल्या अनेक व्यक्तिमत्वांचे स्वागतच आहे... :)
3 Aug 2010 - 12:20 am | मी-सौरभ
मिपा आपलाच असा....
3 Aug 2010 - 8:55 am | पाषाणभेद
आपले स्वागत आहे.
दै. सकाळच्या मुक्तपीठ या विनोदी कॉलममधली एकमेकांना प्रतिक्रीया देणारे 'सुभाष' अन 'स्नेहा' यांची आठवण झाली.
3 Aug 2010 - 8:57 am | नीलकांत
मिसळपाववर स्वागत आहे. :)
- नीलकांत
3 Aug 2010 - 9:22 am | शिल्पा ब
हे असे आभार प्रदर्शनाचे धागे काढायचे असतात हे माहितीच नव्हतं...आता उशिरा का होईना...नीलकांतचे आभार, मिभो, टार्या, शुची, नील,अडाणी, पंगा, परा, अदिती, मस्त कलंदर, डॉनराव, मुसु, केसू, रंगा आणि जे कोण जेष्ठ श्रेष्ठ असतील त्यांचे आणि कनिष्ठ असतील त्यांचेसुद्धा आभार..वेगवेगळ्या कारणासाठी...
3 Aug 2010 - 9:26 am | पंगा
आपले सर्वाधिक स्वागत आहे! (You are most welcome!)
3 Aug 2010 - 10:07 am | शिल्पा ब
आपले सर्वाधिक धन्यवाद.
3 Aug 2010 - 10:16 am | जाई अस्सल कोल्हापुरी
आता तवा गरम आहे तोपर्यंत आपापली पोळी भाजुन घ्या.ज्यांना कोणाचेही आभार मानायचे आहेत ते मानुन घ्या.
या धाग्याचे नाव मी खरं तर thanksgiving at Misalpav असे ठेवले असते तरी चालले असते.
मि.पा. करहो, हो जाओ शुरु..
आभारप्रदर्शनाचे व्यासपिठ खुले आहे.
आभार माना आभार
ऐका हो ऐका.मि.पा. राज्यातल्या सर्वांना कळविण्यात येत आहे की मि.पा.कराना ज्यांचे कोणाचे आभार मानायची असतील्,काहिही कारणांबद्दल तर या व्यासपिठावर येउन जाहीरपणे मानु शकता.
मान्यवरांसाठी हार्,पुष्पगुच्छ्,शाल आणि श्रीफळाची व्यवस्था आयोजकांतर्फे केली जाईल. ही संधी दवडू नका.
क्या पता कल हो ना हो..(हे जर्रा अति झालं ना!)
3 Aug 2010 - 10:32 am | शिल्पा ब
गंमत कसली त्यात...आम्ही आपले आभार मानून घेतले. तुमच्या भाषेत तव्यावर पोळी भाजून घेतली...
एक नम्र सूचना - इथुनपुढे मिपावर दवंडी पिटायची जबाबदारी घेऊन टाका.
3 Aug 2010 - 10:05 am | पाषाणभेद
मुख्य म्हणजे लिहीत रहा.
3 Aug 2010 - 1:24 pm | बिपिन कार्यकर्ते
तुमच्या 'टिंबां'वरून प्रेरणा घेऊन,
- .... .- -. -.- -.-- --- ..- .-.-.- .. .... --- .--. . -.-- --- ..- .-.. .. -.- . - .... .. ... ... .. - . .-.-.-
अर्थ इथे बघा.
3 Aug 2010 - 3:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
शी! काय घाण घाण लिहीतो हा! ;-)
3 Aug 2010 - 5:30 pm | ऋषिकेश
.-- .-. .. - .. -. --. .. -. --- - .... . .-. .-.. .- -. --. ..- .- --. . ... .. ... .--. .-. --- .... .. -... .. - . -.. --- -. - .... .. ... ... .. - . .-.-.- .... .- ...- .- - .- .-. .- ... .- .-.. .. .... .-
3 Aug 2010 - 5:36 pm | Nile
!!sepicer emos nrael dna og retteb ,owt uoY