नमस्कार मंडळी.
मागच्या वर्षी जानेवारीमधे दिवे आगर ला जाण्याचा अचानक बेत ठरला आणी आम्ही तीन मित्र निघालो. "अरे अचानक कुठे जाताय? रहायला जागा मिळणार नाही, सगळीकडे बुकींग फुल असतं" असं म्हणुन २-३ जणांनी टांग दिली तरी आम्ही तीन जण निघालोच.
जातानाच निसर्गाची सुंदरता जाणवायला लागली होती.
हॉटेल्स आणी लॉज फुल असणार माहित होत. आता रहाण्याची व्यवस्था फक्त एकाच ठिकाणी होणार म्हणुन गाडी सरळ माणगाव ला घेतली आणी तिथे आरामशीर रुम्स मिळाल्या. रुम बुक केल्या, बॅग ठेवल्या आणी दिवे आगर ला आलो. पुन्हा पुन्हा जाण्याची इच्छा होईल असं ठिकाण. हिरवाईने नटलेलं, निसर्गाचं वरदान लाभलेल एक छोटसं गाव. मोठा, स्वच्छ समुद्र किनारा लाभल्यानं पर्यटक येतात आणी तिथल्या लोकांना त्यामुळं थोडा पैसा कमवायचा लाभ मिळतो.
स्वर्ण्-गणपतीचा आशिर्वाद घेतला आणी समुद्र किनार्यावर गेलो.
बीच बराच मोठा आहे. व्हॉलीबॉल, क्रिकेट, फुटबॉल खेळायला चांगला वाव आहे. काही कॉलेजातले मुलं होते त्यांच्या बरोब आम्ही क्रिकेट आणी फुटबॉल खेळलो सुद्धा.
तास अन् तास बसुन रहाता येईल असा समुद्रकिनारा आणी सुर्यास्त. डोळ्यांच पारण फिटतं निसर्गाची कला पाहुन. :)
आपला,
मराठमोळा
प्रतिक्रिया
19 Jul 2010 - 2:47 pm | मराठमोळा
फोटो दिसत का नाहीयेत? पिकासावर चढवलेत. कृपया कुणी संपादक लक्ष घालु शकतील काय?
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 Jul 2010 - 3:22 pm | यशोधरा
हेच लिहायला आले होते ममो.
दिसले आता फोटो. समुद्रकिनार्याचे लाजवाब!
यशो
संवाद आणि छायाप्रकाश.
19 Jul 2010 - 7:50 pm | तिमा
हेच म्हणतो. फोटो अप्रतिम!!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
19 Jul 2010 - 3:16 pm | भिडू
| मागच्या वर्षी जानेवारीमधे दिवे आगर ला जाण्याचा अचानक बेत ठरला आणी आम्ही तीन मित्र निघालो.
फोटो मधे तारखा डिसेंबर महिन्याच्या दिसत आहेत. :)
19 Jul 2010 - 3:23 pm | मराठमोळा
>>फोटो मधे तारखा डिसेंबर महिन्याच्या दिसत आहेत
तुमच निरिक्षण चांगलं आहे, पण कॅमेरा मधे तारीख आणी वेळ सेट केलेली नव्हती. शेवट्चे तीन फोटो पहा, त्यात संध्याकाळ आहे, पण वेळ दुपारची १ ते १:३० दरम्यान दिसतेय.
:) जानेवारीतच गेलो होतो.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
19 Jul 2010 - 8:04 pm | jaypal
सुर्यास्ताचे फोटो विशेष आवडले.
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
19 Jul 2010 - 8:38 pm | प्रभो
मस्त रे...
19 Jul 2010 - 8:59 pm | ब्रिटिश
भारी फोटू दादुस
दर्या बगतला क जीव खालीवर होतो र
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ