ब्रम्हदेशात गेल्या दोन दशकांपासून अहिंसेच्या मार्गानं चालू असलेल्या स्वातंत्र्यलढ्याचा तेजस्वी चेहरा. गेल्या वीस वर्षातला अधिकांश काळ तुरूंगात / नजरकैदेत काढूनही जनतेच्या मनातल त्यांच अढ्ळ स्थान. त्या नजरेनं पाहिल तर कधीच पराभूत झालेल ब्रह्मदेशच हुकूमशाही सरकार.
दुसरं महायुद्ध संपायच्या पार्श्वभूमीवर झालेला जन्म. वडिल एक उच्च सेनाधिकारी; आई ब्रम्हदेशाच्या परराष्ट्र मंत्रालयात नोकरी. २ वर्षाची असतानाच वडिलांची झालेली हत्त्या. नंतर आईची नेमणूक भारतात ब्रह्मदेशाची राजदूत म्हणून झाली म्हणून दिल्लीतलं वास्त्व्य, इथेच गांधीच्या विचारांचा पडलेला प्रभाव. नंतर लंडन मध्ये उर्वरित शिक्षण त्यानंतर संयुक्त राष्ट्र्संघात नोकरी; नवर्याबरोबर भूतान, भारत, इंग्लंड मध्ये वास्तव्य आणि उच्च शिक्षण असा मुख्यत्वेकरून एक मुलगी-पत्नी-आई असा जीवनप्रवास ( स्वातंत्रलढ्यात सक्रीय कार्य नव्हतं तोपर्यंत ).
१९८८ मध्यी आईच्या आजारपणांत भेट द्यायला रंगूनला गेल्या असताना हुकुमशहा 'ने विन' च्या राजीनाम्यानंतर ( कार्यकाल ६२-८८ ) लोकशाहीच्या मागणीसाठी प्रचंड आंदोलनं झाली , झालेला हा उठाव सरकार कडून हिंसात्मकरित्या दडपला गेला आणि याचवेळी ओंग सान सू ची यांनी राजकारणात सक्रीय सहभाग जाहीर केला. सरकारनं जमावबंदीचा आदेश लागू केला असूनही लाखोंच्या जागृतीच काम केलं, या बंदीच्या दुसर्याच दिवशी नॅशनल डेमोक्रॅटिक लिग ची स्थापना केली आणि चळ्वळीच नेतृत्व त्यांच्याकडे आलं.
असहकार आणी अहिंसा ह्या तत्वावर हा लढा चालू आहे...या सगळ्या दरम्यान त्यांच्या आईचं निधन झाल आणि त्यावेळीच त्यांनी जाहीर केलं की त्यांच्या आईवडिलांनी देशासाठी जस आयुष्य वेचल तसंच त्याही; वेळ्प्रसंगी प्राण देउनही देशसेवा करतील. देशाच्या चारीदिशांना फ़िरून जनमत तयार केल. पण १९८९ मध्ये झालेल्या निवडणूकांत भाग घेण्यासाठी सरकारकडून बंदी घातली गेली; त्यांना अटक झाली. ह्या बंदीनंतरही त्यांचा पक्ष ८२% जागा जिंकला पण हुकूमशाही सरकारन ही निवडणूक रद्दबादल ठरवली.
१९९५ मध्ये तब्बल ६ वर्षांनी नजरकैदेतून सुटका झाली; सुटकेच्या पहिल्या काही महिन्यात त्यांनी घेतलेल्या सभांना लाखोंच्या गर्दीन पुन्हा आपल केलं आणि चिडून परत सभाबंदी जाहीर झाली. त्यांचे अनेक सहकारी मारले गेले कित्येक आजही तुरूंगात खितपत आहेत.
त्यांनी ब्रह्मदेशाला भेट देउ नका आणि कोण्तीही आर्थिक गुंतवणूक लोकशाहीची स्थापन झाल्याशिवाय करू नका अशी विनंती आंतरराष्ट्रीय समुदायाला केली आहे, अमेरिकेनं आर्थिक निर्बंध घातलेत पण आशियाई देश मात्र हा अंतर्गत मामला आहे म्हणून गप्प आहेत...सार्क परिषद्सुद्धा मूग गिळून आहे.
त्यांच्या पतीनं एकदाच शेवटच भेटू द्या म्हणून केलेली विनंतीही धुडकावून दिली गेली (त्यांच ९९ ला कॆन्सरन निधन झालय )हा सगळा व्यक्तिगत छळ, त्रास हा बर्माच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आवश्यक असा त्याग आहे अस त्या समजतात.
२००० साली परत अटक; २००२ ला सुटका; २००३ पासून परत नजर्कैदेत असं अट्क्-सुटका-परत अटक च्रक्र अव्याहत चालू आहे, लढा अजून सुरूच आहे.
नेल्सन मंडेलांनंतर 'स्वातंत्र्य लढा' या शब्दांना समानार्थी शब्द असं हे अद्वितीय व्यक्तिमत्व , आत्तापर्यंत नोबेलसहीत ६४ आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्या आलंकृत आहेत.अशा अत्यंत तेजस्वी, निडर ओंग सान सू ची यांचा आज ६५ वा वाढदिवस ( १९ जून ); त्यांना दीर्घायुष्य लाभो; आणि त्यांचे यापुढील वाढदिवस स्वतंत्र ब्रह्मदेशात साजरे करण्याच भाग्य त्यांना आणि आंम्हा सर्वांना लाभो हीच प्रार्थना!
* संदर्भ : पुस्तक 'फ्रिडम फ्रॉम फिअर' आणि आंतरजालावरून साभार
प्रतिक्रिया
20 Jun 2010 - 5:29 am | शिल्पा ब
अरे वा!!! खूपच तेजस्वी आहेत या बाई...वाढदिवसाच्या शुभेच्छा...आणि ओळख करून दिल्याबद्दल तुमचे आभार.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jun 2010 - 7:42 am | सहज
ब्रम्हदेशाच्या ह्या तेजस्वी रत्नाला प्रणाम!
20 Jun 2010 - 7:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>ब्रम्हदेशाच्या ह्या तेजस्वी रत्नाला प्रणाम!
20 Jun 2010 - 9:54 am | अप्पा जोगळेकर
या बाईवर एक सिनेमा पाहिला होता खूप वर्षांपूर्वी. दंडवत घालावा अशी व्यक्ती आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
20 Jun 2010 - 9:55 am | शिल्पा ब
सिनेमाचं नाव आठवलं तर सांगा म्हणजे आम्ही पण बघू...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
20 Jun 2010 - 10:21 am | अप्पा जोगळेकर
माफ करा. नाव आठवत नाहीये.
20 Jun 2010 - 10:01 pm | मस्त कलंदर
Silence and Fear: Aung san Suu Kyi
युट्यूबवर व्हिडिओजसुद्धा आहेत या चित्रपटाचे.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
20 Jun 2010 - 10:15 am | ऋषिकेश
ह्या ब्रह्मकन्येला सलाम!
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
20 Jun 2010 - 3:49 pm | मस्त कलंदर
माझा आळशीपणा नडला.. आजची स्त्री : या मालिकेत लिहिताना मला सुरूवातच मुळी आंग सान सू की यांपासून करायची होती..
शाळेत असतानाच कधीतरी मटाच्या 'धावत्या जगात' यांच्याबद्दल वाचले होते.. गेले कित्येक वर्षे त्या नजरकैदेत आहेत.. त्यांच्यावर मिडियाशी बोलण्याचीही बंदी आहे.. असं असूनही त्या अजूनही न थकता न कंटाळता लोकशाहीवादी सरकार आणण्यासाठी धडपडत आहेत..
त्यांच्या पतीला म्यानमारमध्ये येण्याची बंदी घातली गेली.. पण त्या हवेतर पतीला भेटायला जाऊ शकतात, असे सरकारचे धोरण होते.. पण जर एकदा का त्या देशाबाहेर पडल्या, तर सरकार त्यांना परत येऊ देणार नाही व त्यांचे कार्य अपूर्ण राहील म्हणून त्या पतीच्या शेवटच्या दिवसांतसुद्धा त्यांना भेटायला गेल्या नाहीत.. आजच्या घडीला आपल्या देशातले भ्रष्ट राजकारणी पाहिले की, त्यांच्यात याच्या एक सहस्त्रांशतरी व्यक्तिगत त्याग करण्याची इच्छा असेल असे वाटत नाही...
या प्रेरणादायी व्यक्तीमत्वाला शतशः वंदन आणि त्यांच्या कार्यास मनापासून शुभेच्छा!!!! वो होगी कामयाब एक दिन!!!!!!
अवांतरः अरे ऋ, त्या तुझ्या लाडक्या ब्लॉगावर वर्षाला एक पोस्ट येते.. जाहिरात करून काही फायदा नाही.
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
21 Jun 2010 - 6:15 pm | ऋषिकेश
हो ना! ते दु:ख आहेच .. डिस्क्लेमर टाकावा का?!!
आणि क्वालिटी बघ! रोज ब्लॉग अपडेटकरणार्या कित्येक ब्लॉग्जच्या तोंडात मारेल असा ब्लॉग आहे हा! :P
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन
22 Jun 2010 - 11:53 am | प्रदीप
स्यू ची हे त्यांचे नाव आहे-- मूळ लेखिकेने ते बरोबर लिहीले आहे.
मूळ लेख आवडला. स्यू चींच्या लढ्याचा त्यात चांगला परामर्श घेतला आहे.
म्हणजे त्या नक्की काय करीत आहेत? तर काही नाही, कारण काहीही करणे त्यांना अगदी अशक्यप्राय आहे, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात त्यांनी माफी मागून स्वतःची सुटका करून घेतलेली नाही, हे नजरेआड करून चालत नाही. ते आणि तितकेच काय ते त्यांचे गेल्या अनेक वर्षांचे योगदान.
मध्यंतरी -- सुमारे तीन्-चार वर्षांपूर्वी -- अचानक रंगून येथे भिक्षूंतर्फे आकस्मिक उठाव झाला होता, तो अर्थात तेथील सरकारने तात्काळ मोडून काढला.
मूळ लेखातील एक उल्लेख मात्र खटकला: "...त्या नजरेनं पाहिल तर कधीच पराभूत झालेल ब्रह्मदेशच हुकूमशाही सरकार." म्यानमारचे सध्याचे सरकार मॉरली वगैरे पराभूत असेल बापडे, (पण अगदी रोखठोक शब्दांत सांगायचे तर) त्यामुळे त्यांचे काय बिघडले आहे? सर्व प्रकारची आर्थिक गुंतवणूक म्यानमारमधे अजून केली जात आहे-- 'अमेरिकेने आर्थिक निर्बंध घातलेत' असा उल्लेख मूळ लेखात आहे, त्याविषयी नक्की ठाऊक नाही, पण तेल कंपन्या तिथे बर्यापैकी गुंतवणूका करीत आहेत. आणि मुख्य म्हणजे --आणि हे आपल्या, म्हणजे भारताच्या, संदर्भात अगदी महत्वाचे आहे-- चीन तिथे भरपूर मदत करीत आहे, गुंतवणूकी करीत आहे, त्यांचे इंफ्रास्ट्रक्चर तयार करीत आहे.
[अवांतर पण कदाचित नव्हेचः आफ्रिकेतील अनेक देशांतही चीन हेच करीत आहे. तेथील सरकारे ह्याविषयी आनंद व्यक्त करतात. 'पाश्चिमात्य सरकारे आम्हाला मदत करतांना, आम्ही काय करावे व काय करू नये वगैरे जे शहाणपण (patronisingly) शिकवतात, तसले चीन काहीही करीत नाही', असे ते म्हणतात].
तर मुद्दा हा, की नेहमीप्रमाणे भारताने म्यानमारातील हुंता-सरकारशी संधान बांधण्याचा मौका सोडला आहे. मॉरल्स/ एथिक्स वगैरे रिकाम्या पोटी बोलायच्या गोष्टी नव्हेत. आणी भरल्या पोटी असणारे देश ह्या सर्व धाब्यावर बसवतात. लिबियाशी यू. के.; फ्रान्स व अर्थात यू. एस. ए. ह्यांचे संबंध सुधारत आहेत, पाकिस्तान तर त्या एका बलाढ्ढ्य.... वगैरे देशाचा 'दहशतवादाच्या लढ्या'त पार्टनर आहे!! म्यानमारमधे आपली पत असली पाहिजे होती, ती सध्यातरी नाही, ह्यापुढे ती मिळण्याचे लक्षण दिसत नाही.
22 Jun 2010 - 12:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रदीप यांचा माहितीपूर्ण प्रतिसाद आवडला.
अदिती
22 Jun 2010 - 12:52 pm | पुष्करिणी
धन्यवाद प्रदीप.
जवळ्जवळ २० वर्षात मेजरेबल सक्सेस असा म्ह्टला तर काहीच नाही ( जनजागृती सोडली तर, मला न्यानमारच्या लढ्याची माहिती फक्त त्यांच्यामुळेच आहे ), तुमच म्हणणं त्या दृष्टीनं बरोबर आहे.
रिकाम्या पोटी मॉरल्स ची किंमत शून्य ह्या मताशीही मी १००% सहमत आहे.
मी हा लेख एका व्यक्तीचा सिस्टीम विरोधातला लढा, कदाचित फार फरक पडणार नाही याची काही अंशी जाणिव असतानाही, त्यासाठी लागणारा पेशन्स, त्याग इ. या हेतूनं लिहिला आहे.
* अमेरिकेचे आणि युरोपियन युनियन चे आर्थिक निर्बंध आहेत.
पुष्करिणी
22 Jun 2010 - 6:18 pm | प्रदीप
.
मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे लेख उत्कृष्ट आहे, मला आवडला, कारण अत्यंत संयतपणे तुम्ही ऑंग सोंग स्यू चींच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्यांना हवे असते तर केव्हाच त्या हुंताशी समझोता करून कुठेतरी परदेशात राहू शकल्या असत्या (आठवा: बेनझीर भुत्तो). तसे त्यांनी अगदी निग्रहाने केलेले नाही, हे उल्लेखनीय व आदरणीय आहे.
मला फक्त अगदी वास्तवाच्या पातळीवरून त्यांच्या लढ्याचे ,म्यानमारचे व आपल्या त्यांच्या संबंधांचे इवॅल्यूएशन करायचे होते. आपला हा लेख त्याचे निमीत्त झाले खरे म्हणजे, आणि त्याअर्थाने हे सगळे बरेच अवांतर म्हणता येईल. हुंता इतका पाशवी आहे की त्याच्यापुढे स्यू चींच्या चळवळीचे काहीही चालू शकत नाही. त्या नजर कैदेत व बाहेर सगळे 'शांत' अशी परिस्थिती आहे. चार पाच वर्षांपूर्वी तेथे जोरदार चक्री वादळ झाले, अनेकांचे प्राण गेले, अनेक बेघर झाले. तेव्हाही हुंता सरकारने चीन व मला वाटते भारत सोडून इतर कुणालाही देशात येऊन मदत देण्यास नकार दिला. 'आता तेथीला जनतेचे काय होणार' वगैरे अनेक प्रश्न पाश्चिमात्य देशांनी व मीडियाने उपस्थित केले खरे, पण तसे काही फार बरेवाईट झाल्याचे ऐकिवात आलेले नाही. गेल्या वर्षी एका चक्रम अमेरिकनने स्यू ची असलेल्या प्रासादात, जवळच्या तलावातून पोहून जाण्याचा प्रयत्न केला. हा त्याने स्वतःहून केला, पण त्याची परिणिती हुंताने स्यू चींवर खटला चालवून त्यांची नजरकैद अजून १८ महिने वाढवण्यात झाली!!
भारताने नेहमीप्रमाणे म्यानमारच्या बाबतीत धरसोड पॉलिसी ठेवली आहे (ह्यात नवीन ते काय?) म्यानमारचे भौगोलिक महत्व आपण -म्हणजे दिल्लीतील सरकारी नोकर आणि राजकारणी- ओळ्खू शकले नाहीत, किंवा अगदी मुद्दाम चुकिची भूमिका घेत राहिले (ह्यातही नवीन ते काय?) असे वाचनात आले होते की जॉर्ज संरक्षणमंत्री असतांना म्यानमाराच्या स्यू चींच्या लढ्यातील काही परागंदा झालेल्या कार्यकर्त्यांना त्यांच्या घरात आश्रय दिला गेला होता! चीनने अगदी सुरूवातीपासून तेथील हुंता सरकारशी जुळते घेतले. आता जो 'स्ट्रिंग ऑफ पर्ल' समजला जातो, त्यातील एक पर्ल बर्मा येथे आहे (इतर पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका येथे आहेत).
आपण लेखात सार्कचा उल्लेख केला आहे. वास्तविक सार्कला विचारतो कोण? सार्कचे सोडा, पण एसियन ह्या आ. आशियाच्या देशांच्या संघटनेनेही म्यानमारविषयी अगदी गुळमुळीत धोरण राखले आहे. शेवटी आपले स्वतःचे हितसंबंध महत्वाचे. आणि कुठल्याही स्थानातील लढे हे त्या त्या जनतेने स्वत:हूनच चालवायचे असतात, बाहेरून केलेली मदत एकार्थी मलमपट्तीसारखी ठरते (ह्याची गेल्या ५० वर्षांतील दोन उत्कृष्ट उदाहरणे म्हणजे बांग्लादेश व पूर्व तिमोर). असो. हे अति अवांतर झाले आहे. एका अत्यंत तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या परिचयाच्या लेखात हे सर्व उगाच मधे आणल्याबद्दल क्षमा असावी. राहवले नाही.
22 Jun 2010 - 6:37 pm | सहज
हे अवांतर खरच खूप छान!
अवांतराबद्दल अपराधी वाटत असल्यास प्रदीप यांनी महीन्याला किमान एक अशी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा वेध घेणारी एक लेखमाला लिहावी असा आग्रह करतो.
होउन जाउ दे +१
22 Jun 2010 - 6:48 pm | बिपिन कार्यकर्ते
अशी लेखमाला लिहायचा प्रस्ताव प्रदीपदांनी खूप आधीच माझ्यापुढे मांडला होता. त्यात माझी काही मदत अपेक्षित होती. पण मला नियमितपणे तसे जमेल का? अशी शंका होतीच शिवाय व्यस्त असल्याने पाहिजे तसा प्रतिसाद देता नाही आला. त्यामुळे ही योजना बारगळली. क्षमस्व.
पण एकट्यावर अवलंबून न राहता, जर प्रदीपदा परत तयार असतील, तर काही लोकांनी मिळून असे लिहायला हरकत नाही.
बिपिन कार्यकर्ते
22 Jun 2010 - 9:29 pm | मस्त कलंदर
बिकांचे सहमतीच आहे असे समजून माझे +२!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
22 Jun 2010 - 11:06 pm | नंदन
सहमत आहे. लेख आणि त्यावरची चर्चा दोन्ही उत्तम.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Jun 2010 - 8:12 pm | पुष्करिणी
प्रदीपदा, तुमचे सर्व मुद्दे अतिशय तर्कसंगत आहेत आणि मला ते पटले.
मला म्यानमारच्या राजकीय परिस्थितीबद्दल आणि एकंदरीत तेथिल घडामोडींबद्द्ल फारच थोडी माहिती आहे , आणि जी काही आहे ती ओंग सान सू ची यांच्या संदर्भातच आहे.
तेंव्हा आपला प्रतिसाद अवांतर/ अतिअवांतर मुळीच नाही ( क्षमस्व वगैरे म्हणून लाजवू नका प्लीज :) ), इंफॅक्ट तुम्ही सविस्तर लिहा यावर.
पुष्करिणी
22 Jun 2010 - 11:05 pm | चतुरंग
प्रदीप यांनी ह्या संदर्भात आणखीन लिहावे अशी त्यांना आग्रहाची विनंती.
सत्याग्रही लढे, शांतिपूर्ण मार्गाने प्रश्नांची सोडवणूक वगैरे गोष्टी ह्या चक्क सायडींगला टाकून, वेळकाढू धोरणे अवलंबून प्रबळ आणि धटिंगण राष्ट्रे आपला कार्यभाग साधून घेतच जातात आणि भारतासारखे 'शांतिदूत' चुळबुळत, चरफडत एकीकडे कोपर्यात बसून राहतात हे अजिबात चांगले वाटत नाही.
रिकाम्या पोटी जसा लढा उपयोगाचा नाही तसाच बलहीन लोकांचा शांतिसंदेशही फारसा उपयोगाचा नाही असा काही संदेश ह्यातून आपल्याला मिळावा का?
चतुरंग
22 Jun 2010 - 1:00 pm | यशोधरा
प्रदीप, तुमचा प्रतिसाद आवडला.
22 Jun 2010 - 11:11 pm | मिसळभोक्ता
अर्थात त्यांनी माफी मागून स्वतःची सुटका करून घेतलेली नाही, हे नजरेआड करून चालत नाही. ते आणि तितकेच काय ते त्यांचे गेल्या अनेक वर्षांचे योगदान.
ह्या इतक्या सुंदर लेखात, सावरकरांशी अशी तुलना करून लेख हायजॅक करण्याबद्दल निषेध !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
22 Jun 2010 - 11:20 pm | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंगा, आता काटछाटीला सुरुवात करावी लागणार रे बहुदा, चल सरसावून बैस बघू!) :W
चतुरंग
23 Jun 2010 - 10:11 am | नितिन थत्ते
>>काटछाटीला सुरुवात करावी लागणार रे
सहमत. आणि "भारतासारखे 'शांतिदूत' चुळबुळत, चरफडत...." वगैरे आलेच आहे त्यामुळे कात्री घ्यावीच लागणार.
नितिन थत्ते
23 Jun 2010 - 7:19 am | प्रदीप
!!
23 Jun 2010 - 11:22 am | II विकास II
आम्हाला हेही संदर्भ आठवुन गेले.
Vajpayee and the Quit India movement
http://www.hinduonnet.com/fline/fl1503/15031150.htm
माफी मागणे, पळुन येणे, शिताफीने निसटुन येणे नेहमीच चुकीचे नसते, असो.
21 Jun 2010 - 9:57 am | नितिन थत्ते
सलाम.
नितिन थत्ते
21 Jun 2010 - 10:13 am | अरुंधती
उत्तम परिचय! त्यांच्याबद्दल वर्तमानपत्रांतून बरेच काही वाचले होते. पण मराठीतून अशी समग्र ओळख एकाच लेखात आटोपशीरपणे करुन दिल्याबद्दल आभार! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
21 Jun 2010 - 6:09 pm | बिपिन कार्यकर्ते
सलाम!!!!!!
बिपिन कार्यकर्ते
21 Jun 2010 - 7:24 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सलाम! ओंग सान सू ची यांना वाढदिवसाच्या (थोड्या उशीरा) आणि कार्यासाठीही शुभेच्छा!
21 Jun 2010 - 8:04 pm | चित्रा
असेच म्हणते.
धन्यवाद, पुष्करिणी.
22 Jun 2010 - 11:07 pm | चतुरंग
पण मराठीतून घेतलेला समग्र आढावा आवडला.
अतिशय उत्तम लेखन.
चतुरंग
23 Jun 2010 - 6:02 am | मदनबाण
लेख आवडला...
मदनबाण.....
"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson