रावणाची सीता

डॉ.श्रीराम दिवटे's picture
डॉ.श्रीराम दिवटे in जनातलं, मनातलं
20 Jun 2010 - 1:40 pm

सीता जर रावणाला चाहू लागली अन् राम जर खलनायक ठरला तर रामायणाचे 'वामायन' होईल की नाही? अगदी तशीच स्थिती 'रावण' पाहिल्यानंतर (मायबाप दर्शकांची) होते.
तब्बल साठ कोटींची दौलत ओतून, तेलगू-तमिळऱ्हिंदी अशा तिन्ही भाषेतील एकूण २२०० रिळे मणिरत्नमने अक्षरशः कचऱ्‍याच्या डबड्यात घातली आहेत. रावण पिक्चर काढून त्याला 'रत्ने' तर नाहीच पुरेसे 'मनी' देखील मिळणार नाहीत हे उघड सत्य आहे. रावणाचे ऍडव्हान्स बुकिंग तर सोडाच फर्स्ट डे फर्स्ट शो सुद्धा कुठेही हाऊसफुल्ल चा बोर्ड मिरवू शकलेला नाही. एकंदर 'रावणा'च्या नशिबी घोर मृत्युदंड आला आहे.
रामायणातील आदर्शवत व्यक्तिरेखांना काळीमा फासून, प्रेमाचा 'भलताच' त्रिकोण दाखवून रावणवाल्यांनी प्रेक्षकांचा रोष ओढावून घेतला आहे. केवळ रेहमानचे संगीत, ऐश्वर्याची स्टंटबाजी, अन् टेक्निकल इफेक्टची भारंभार दृश्ये रावणाची बुडती नौका तारू शकणार नाहीत असे दिसते...
कथा फारशी वेगळी नाहिये. रावणासारखा वागणारा, भासणारा अभिषेक बहुतेक नक्षलवादी क्षेत्रात कार्यरत(?) असतो. तिथला प्रमुखही तोच असतो. स्थानिक लोकांविरुद्ध पोलिसांची चकमक उडते. त्यावेळी पोलिस अधिक्षक विक्रम (जो रामासारखा वागणारा) अभिषेक विरुद्ध दंड थोपटतो. त्याला शह देण्यासाठी अभिषेक त्याच्या सीतेला (पत्नीला) -ऐश्वर्याला- पळवून नेतो व आपल्या इलाख्यात आपल्याजवळ चौदा दिवस 'ठेवतो'. पूर्वी ऐश्वर्या त्याला रावण समजत असते. परंतु त्याच्या सहवासामध्ये तिला त्याच्यातला राम अनुभवास येतो. उलट पोलिसांमधीलच रावणवृत्ती तिला कळून चुकते. ऐश्वर्याच्या बहिणीवर (भर मांडवातून पळवून नेऊन) पोलिसांनीच अत्याचार केला असल्याचे सत्य तिला समजल्यावर विक्रम हा रावण वाटू लागतो व अभिषेक राम!
कशीबशी ती अभिषेकच्या तावडीतून सुटका करून विक्रमकडे पोचते. तेव्हा विक्रमला त्याचा चौदा दिवसांचा 'वनवास' आठवतो. म्हणून तो तिच्यावर संशय व्यक्त करून तिला जाब विचारतो. थोडक्यात अग्निपरीक्षा देण्यास प्रवृत्त करतो. त्यावर ती तडक अभिषेककडे जाऊन 'असं कसं काय झालं?' याचा जबाब दे म्हणते. तोपर्यंत विक्रम मोठ्या ताफ्यासह हजर राहून रावणाचे पात्र संपुष्टात आणतो. पुढे सीतेचे काय? काही कळत नाही. असो.
एवढा अगडबंब खर्च करून, इतकी मेहनत घेऊन मणीला कुठली रत्ने गवसली ते (आपल्याला) समजत नाही. त्याऐवजी मसालापट किंवा आधुनिक रामकथा बनविली असती तर गुंतवलेले भांडवल तरी वसूल झाले असते.
रामायणातील संदर्भांचा आधार घेऊन काय साधावयाचे आहे तेही उलगडत नाही. 'रावण'कारांनी सीतेचं अविश्वसनीय किंवा पचनी न पडणारं प्रेम'प्रकरण' दाखवून या चित्रपटाचं वाट्टोळं केलंय.
हा चित्रपट फार फार तर ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो. अभिनयाच्या बाबतीत अभि-ऐश पेक्षा विक्रमची बाजू उजवी ठरलीय. खासदार गोविंदा स्मॉल बट स्वीट भूमिकेत भाव खावून जातो. रेहमानचं 'ठेकेबाज' संगीत अन् स्टंटबाजी एवढ्याच काही जमेच्या बाजू. बाकी सगळा आनंदी आनंद आहे!

चित्रपटप्रतिक्रियासमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

वेताळ's picture

20 Jun 2010 - 1:44 pm | वेताळ

पैशे आणि वेळ वाचवल्या बद्दल धन्यवाद.
वेताळ

अमोल केळकर's picture

21 Jun 2010 - 3:04 pm | अमोल केळकर

असेच म्हणतो :)
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

घाशीराम कोतवाल १.२'s picture

21 Jun 2010 - 8:30 pm | घाशीराम कोतवाल १.२

@ डॉ दिवटे
खासदार गोविंदा स्मॉल बट स्वीट भूमिकेत भाव खावून जातो.
गोविंदा अजुन खासदार आहे कुठल्या मतदार संघाचा ? :? :O
तो नक्क्की हिरो आहे का खासदार ? :? :))
ह्यातुन आपल्याला नक्की काय सुचवायचे आहे? :D
अभी + ऐश = चित्रपट रद्दड हे ठरलेलेच आहे :)) :D
______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

टारझन's picture

20 Jun 2010 - 1:57 pm | टारझन

भिकारचोट अ‍ॅक्टर्स (अ‍ॅक्टर्स म्हणावं काय त्या दोघांना ? ) घेऊन पिक्चर बनवणार म्हंटल्यावर आपटावा , असं तर मनापासुनंच वाटत होतं =))
दलिंदर आहे तो अभिशेक बच्चन ... त्याचे पिक्चर्स थेटरात जाऊण बघायचे म्हणजे ... हॅहॅहॅ ...
तसा त्याच्या अफलातुन विनोदी ड्याण्स मुळे मनोरंजन होतं ही गोष्ट नाकारुन चालणार नाही ...
आणि ती मेणबती ऐश्वर्या ... शब्द खुंटले :)

छोटा डॉन's picture

20 Jun 2010 - 7:07 pm | छोटा डॉन

टार्‍याशी अगदी कट टु कट सहमत.
बाकी अजुन बोलण्यासारखे रहात नाही ...

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

हुप्प्या's picture

20 Jun 2010 - 7:47 pm | हुप्प्या

अभिषेकच्या आणि ऐश्वर्याच्या अभिनयाबद्दल अस्मादिकांसारखेच अनेकांचे मत असल्याचे बघून आनंद झाला.

अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता. आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे.

मृगनयनी's picture

21 Jun 2010 - 10:52 am | मृगनयनी

अभिषेक बच्चन हे पात्र जर बच्चन घराण्यात उत्पन्न झाले नसते तर त्याला कुणी कुत्राही विचारत नसता.

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))

"कुत्रा" का शब्द काळजाला भिडला! ;) =)) =)) =))

आजकाल भरपूर 'कुत्रे' फोकसमध्ये येत आहेत! त्यामुळे......डोळे..पाणा__........

असो.... =)) =))

अवांतर : भाद्रपद महिना सुरू झाला का? ;) ;) =)) =))
=))

आईबाप दोघेही उत्तम अभिनेते असूनही हे ध्यान असे कसे? अगदीच बावळट प्रकरण आहे.

नाही हं! :( अगदीच वाईट्ट नाहीये 'अभि'! `त्याचा भावरहित चेहरा नुसता पाहिला, तरी कित्ती बरं वाट्टं! ;) ;) ;)

यु मे से एनिथिन्ग!... बट "अभि" इस रिअली हॅन्डसम! :)

त्याचा भाग्यांक "५" आहे आणि ऐश'चा भाग्यांक "१" आहे.

"५"- 'बुध' हा नेहमीच "१"- 'रवि'च्या अमलाखाली येत असल्यामुळे "ऐश" प्रत्येक बाबतीत "अभि"ला डॉमिनेटिन्ग राहणार हे नक्की!
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

धमाल मुलगा's picture

21 Jun 2010 - 9:04 pm | धमाल मुलगा
बबलु's picture

20 Jun 2010 - 2:00 pm | बबलु

मस्त परिक्षण !
मुद्देसूद, रोखठोख.

....बबलु

प्रियाली's picture

20 Jun 2010 - 4:17 pm | प्रियाली

महाकाव्याची मोडतोड करून नवी साहित्यनिर्मिती करण्याबाबत चर्चा येथे झाली होतीच.

बाकी, ऐश्वर्या आणि अभिषेक यांना चित्रपटात एकत्र बघण्यापेक्षा इतर कामे करणे बरे असे माझे वैयक्तिक मत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jun 2010 - 4:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'रावण' चित्रपटावरील परीक्षणे आपल्या लेखाप्रमाणेच येत आहे. आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे.

>>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो

सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ?

-दिलीप बिरुटे

छोटा डॉन's picture

20 Jun 2010 - 7:06 pm | छोटा डॉन

>>>ऐश्वर्याच्या दाद देण्याजोग्या साहसी दृश्यांसाठीच पहावा लागतो
सर्वच चित्रपट समीक्षक असे म्हणत आहेत. काय आहे हो ही साहसी दृष्य ?

हम्म्,
बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे.
आजपर्यंत कधी त्याची गरज पडली नाही, नुसत्या दिसण्यातच तिची भुमिका संपुन जायची.
सबब, ऐश्वर्याचा जो काही असेल तो अभिनय हेच समिक्षकांच्या लेखी "साहस"
असावे असे वाटते.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मस्त कलंदर's picture

20 Jun 2010 - 9:51 pm | मस्त कलंदर

बहुदा ऐश्वर्याने ह्या ठिकाणी अभिनय करणयचे 'साहस' केले असावे.

हो ना. तिचा सगळा वेळ ती कशी छान छान दिसते हेच दाखवण्यात जातो.. मला ती नेहमीच कचकड्याची बाहुली वाटते

@ डॉ. वेळ आणि पैसे तसेही घालवणार नव्हतेच.. पण तरीही चुकून विचारही मनात येणार नाही. वेळेतच लेख टाकल्याबद्दल धन्यवाद!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

संकेत's picture

22 Jun 2010 - 3:40 am | संकेत

काय आहे हो ही साहसी दृष्य ?

केशवसुमार's picture

20 Jun 2010 - 4:43 pm | केशवसुमार

जालावर फुकट असून सुद्धा मी ८ मिनिटाच्या वर बघू शकलो नाही.. ह्याच मणिरत्न्म ने रोजा चित्रपट केला होता ह्या वर विश्वास बसत नाही..
(८ मिनिटे वाया गेल्याने चिडलेला) केशवसुमार

टारझन's picture

21 Jun 2010 - 9:19 am | टारझन

काय राव केसु शेट .... आठ मिनीटं अशी वाया घालवली ? =)) त्यापेक्षा ,
ती आठ मिनीटं कशी सत्कारणी लावता येतील ते केवळ तुमच्याच हातात होतं , म्हणुन केसु तुम्हारा चुक्याच !

-(८ मिनीटं प्रेमी) केशरकुमार

मीनल's picture

20 Jun 2010 - 6:46 pm | मीनल

खरे आहे. रामायणाचा संदर्भ घेऊन गोष्ट बदललेली आहे.
उगाचच आरडा ओरडी- ( सेन्स लेस). स्टंट शो बाजी, नको इतका पाऊस( पाउण सिनेमात जोरदार पाऊस आहे)... याचे एकत्र मिश्रण.
ऐश्वर्या अजिबात सुंदर दिसत नाही. डोळे सतत रक्ताळलेले आहेत.
गृहिणी म्हणून दाखवलेले डान्स टिचर ही तितकीशी सुंदर नाही.
एकूण काय? पैसे वसूलच नाही होत. ना दृष्टी सुख/ ना कर्ण माधुर्य /ना कथानक.
अजिबात जाऊ नका `रावण` पहायला.
Absolute बेकार सिनेमा !

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

सोम्यागोम्या's picture

21 Jun 2010 - 4:31 am | सोम्यागोम्या

करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं ! जवळपास प्रत्येक दृष्यात पाऊस. चित्रपटातल्या विवाहातील चालिरिती राजस्थानी, डोंगर द-या केरळातल्या व पाऊस चेरापुंजीचा वाटत होता.
अभिषेक "चिकचिकचिका" करतो तो अभिनय अतिषय रद्दड होता. गोविंदाला कशाला घेतले काही प्रयोजन नाही. त्याला हनुमानासारख्या उड्या मारयला लावून काय साधले?

बाकी चित्रिकरणाच्या जागा, कॅमेरा हे आवडले.

आशिष सुर्वे's picture

20 Jun 2010 - 10:00 pm | आशिष सुर्वे

आपण जर थेट्रात जाऊन हा चित्रपट पाहिला असेल, तर्र आपल्या साहसाला मी दाद देतो..

ह्याबाबतीत मी भाग्यवान ठरलो.. आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. ;)

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

शिल्पा ब's picture

20 Jun 2010 - 10:02 pm | शिल्पा ब

<<<<आणि काल 'सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) पाहून आलो.. Wink

येउ द्या त्याचेहि परीक्शण..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

?????

आणि आपल्या साहसाला काय म्हणावं ;)

खरं म्हणजे "काय? झोप-बिप छान लागली ना? एसी चालु होता ना? " असं विचारणार होतो...

हुप्प्या's picture

21 Jun 2010 - 8:44 am | हुप्प्या

कितीतरी हिंदी सिनेमे येतात आणि मला पत्ताच लागत नाही. कुणी चांगली साईट सुचवाल का जिथे नव्या सिनेमांचे परीक्षण आणि बॉक्स आफिसवर नवा सिनेमा कितपत चालला आहे ते कळू शकेल? पूर्वी रिडिफवर बघायचो पण आता ती साईट विशेष आवडत नाही.
टीपः
रावणाच्या बाबतीत मिसळपावने मदत केली पण आणखी कुठल्या त्राटिका, शूर्पणखा आणि कुंभकर्ण येतच राहतील. तर त्यांच्या माहितीकरता साईट सुचवाल तर आपला आजन्म ऋणी राहीन.

नि३'s picture

21 Jun 2010 - 8:51 am | नि३

१> http://www.naachgaana.com/
२> http://wogma.com/

ह्या दोन्ही बेस्ट साईट आहे.

---नि३.

ऋषिकेश's picture

21 Jun 2010 - 9:36 am | ऋषिकेश

काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!! :(

अप्रतिम क्यामेरा, काहि स्टंटस, लोकेशन्स आणि बरं संगीत सोडल्यास चित्रपट रद्दड आहे हे खरेच..

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

धमाल मुलगा's picture

21 Jun 2010 - 8:58 pm | धमाल मुलगा

>>काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!!
=)) =)) =)) वेलकम टू क्लब! ;)

धमाल मुलगा's picture

21 Jun 2010 - 9:02 pm | धमाल मुलगा

अहो, काय हे डॉक्टरसाहेब...
का म्हणुन हो तुम्हाला असलं काहीतरी पहायची अवदसा आठवली?
आयला, त्या 'रावण'चे प्रोमोज पाहुनच डोक्याची मंडई..नाय नाय..मार्केटयार्ड झालं होतं! शॉल्लेट डेअरिंग आहे राव तुमचं. आख्खा सिनेमा पाहिलात? _/\_

>>करेक्ट ! एवढा पाऊस पाहून मलाच सर्दी होते का असं वाटायला लागलं होतं !
सोम्यागोम्या... =)) =)) खल्लास!

>>आता तो पाहू नये असे म्हटल्याने तो पाहावाच असे वाटायला लागले आहे.
बिरुटेसाहेब... ऑल द बेश्ट! देव तुमचं भलं करो!! आकाशातला बाप तुम्हाला पुरेशी सहनशक्ती प्रदान करो!!! =))

चतुरंग's picture

21 Jun 2010 - 9:11 pm | चतुरंग

वीकांतालाच मिळाला आहे बघायला पण अजून बघितला नाहीये आणि हे वरचं सगळं वाचून :( आता बघेन असं वाटत नाहीये!

(जांबुवंत)चतुरंग

आशिष सुर्वे's picture

21 Jun 2010 - 11:11 pm | आशिष सुर्वे

आम्ही सुद्धा..
>>काहि अपरिहार्य (!!) कारणाने चित्रपट थेटरात बघितला!!!!>>
फरक फक्त चित्रपटाचा होता.. ('सेक्स अ‍ॅन्ड द सिटी (भाग २) )

आता ते 'अपरिहार्य' कारण बाजूलाच बसले असल्याने चित्रपटाकडे विशेष लक्ष नव्हतेच.. म्हणून 'शिल्पा ब' तैंच्या विनंतीला मान देऊन परिक्षण लिहिणे शक्य नाही.. ;)

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

Manoj Katwe's picture

22 Jun 2010 - 6:18 am | Manoj Katwe

मला सुद्धा आयुष्यातली बरीच कामे हि ह्या असल्या अपरिहार्य कारणामुळेच करावी लागतात.
रोज रोज कामावर सुद्धा मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे येत असतो.
मी तर काय सांगू , एकशे एक फालतू सिनेमे बघितले असतील, ते ह्याच अपरिहार्य कारणामुळे.
(सर्व हिंदी सिनेमे मी ह्याच अपरिहार्य कारणामुळे बघतो, नाहीतर मी बरा आणि आपले इंग्लिश सिनेमे बरे.
ternimator , transformer, resident evil, underworld, prince of persia, shrek हे माझे आवडते सिनेमे, आणि हीच माझी catagory .
(कोनतरी समदुक्खी पाहून थोडासा आनंद झालेला. )