शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.

चिन्या१९८५'s picture
चिन्या१९८५ in जनातलं, मनातलं
3 Jun 2010 - 11:55 pm

शिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.

  • गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
  • शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
  • धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
  • अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार

छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महाराजांचा समावेश करावाच लागेल.अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते. हे राजे आपल्या आयुष्यातील शेवटची निर्णायक लढाई हरले तसेच त्यांचा त्याच पराजीत अवस्थेत अंत झाला त्याचबरोबर त्यांच्या मृत्युनंतर त्यांचे साम्राज्य लोप पावले. पण महाराजांनंतर त्यांचे साम्राज्य टिकले आणि वाढलेही.

शिवाजी महाराज युगपुरुष होते. त्यांनी अनेक नव्या गोष्टी सुरु केल्या . देशातलेपल्हीले 'खडे सैन्य' त्यांनी उभे केले. त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले. शिवरायांनी वतनदारी पध्दती बंद सैनिकांना,अधिकार्‍यांना पगार सुरु केले.शेतकर्‍यांच शोषण करणारी जमिनदारी पध्दत बंद करुन शेतकर्‍यांचा फायदा असणारी रयतवारी पध्दत आणली.

शिवाजी महाराज 'रयतेचा जाणता राजा' होते हे खरच.शिवराज्याभिषेकापुर्वी एक महीना आधी लिहिलेल्या एका पत्रातुन त्यांना रयतेची किती काळजी होती हे कळते. महाराज लिहितात,'कोण्ही कुणब्याचे येथील दाणे आणील्,कोण्ही भाकर्,कोण्ही गवत्,कोण्ही फाटे,कोण्ही भाजी,कोण्ही पाले.ऐसे करु लागलेत म्हणजे जे कुणबी घर धरुन जीवमात्र घेउन राहीले आहेत तेही जाउं लागतील.कितेक उपाशी मराया लागतील.म्हणजे ऐसे होईल की ,मोगल मुलकात आहे त्याहुन अधिक तळतळाट होईल.तेंव्हा रयतेची सारी बदनामी तुम्हावर येईल.हे तुम्ही बरे जाणोन बहुत यादी धरुन वर्तणुक करणे.कोण्ही....रयतेस काडीचा आजार द्यावयास गरज नाही.ज्याला जे पाहीजे,दाणा हो अगर गवत हो,अगर फाटे,भाजीपाले व वरकड विकाया येईल ते रास्त घ्यावे.बाजारात जावे रास विकत आणावे.कोण्हावरही जुलुम अगर कोण्हासी कलागती कराया गरज नाही...'यावरुनच शस्त्राच्या जोरावर सैन्य जनतेवर अत्याचार तर करणार नाही ना याची महाराजांना काळजी होती .वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक हार न चुकता घालतात !

एखाद्या भागातुन सैन्य जात असताना शेतापासुन दुरवरुन न्यावे कारण शेतांमधुन नेल्यास शेताची नासाडी होईल व तसे झाल्यास शेतकर्‍याने जगायचे कसे याचाही विचार महाराजांचा होता. राज्यौभारणीसाठी काय आवश्यक आहे याबाबत महाराजांचा खोलवर विचार होता.व्यापार राज्यासाठी खुप महत्वाचा आहे हे महाराज जाणुन होते.'साहुकार हे तो राज्याचे भुषण' असे महाराज म्हणत. आजच्या,२१व्या शतकाच्या जागतिकीकरणाच्या काळातही हे वाक्य फार महत्वाचे आहे.स्वातंत्र्योत्तर काळात जर आपल्या राज्यकर्त्यांना या वाक्याचा विसर पडला नसता तर आज कदाचित भारत हे विकसित राष्ट्र असते. आपल्या काळाच्या भरपुर पुढे पहाण्याची महाराजांची दुरदृष्टी हे महाराजांच्या यशाचे फार मोठे रहस्य आहे.महाराजांनी जलदुर्ग बांधले कारण व्यापाराच्या नावाखाली येणारे ब्रिटीश्,पौर्तुगिज्,फ्रेंच यांचा मुळ हेतु काय आहे हे महाराज जाणुन असावेत. आणि त्यांच्यावर जरब ठेवण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग उभारले ,नौदल उभे केले.

महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला.महाराजांनी त्यांना सढळ हस्ते मदत केली.महाराजांची तुळजाभवानीवरील निस्सिम भक्ती तर आपण जाणतोच.स्वराज्यनिर्मिती करण्याची शपथही महाराजांनी रायरेश्वराच्या साक्षीने घेतली. 'हे राज्य व्हावे ही तों श्रींचीच इच्छा आहे' असेही महाराज म्हणत.पण धार्मिक असुनही महाराज अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांनी सिंधुबंदीची प्रथा मोडुन काढली.ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.'

युध्दनिती,कुटनितीमध्ये तर महाराजांचा हात पकडण त्या काळात कुणालाही शक्य नव्हत.एक परदेशी इतिहासकार म्हणतो 'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.'आदिलशहाच्या तावडीतुन शहाजी राजांच्या सुटकेसाठी केलेले राजकारण्,जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकारण्,अफजलखानाला मैदानी प्रदेश सोडुन दुर्गम्,जंगली,पर्वती प्रदेशात आणन्यासाठी केलेली कुटनिती,आग्र्याहुन सुटका करवुन घेण्यासाठी आजारी पडण्याचे केलेले नाटक्,औरंगजेबाने जिझिया कर लागु केल्यावर 'तुमच्यावर इतके दारीद्र्य आले आहे का?' असे म्हणुन त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्र ही महाराजांच्या कुशल बुध्दिमत्तेची ओळख करुन देणारी काही उदाहरणे! महाराजांना स्वभाषेचा अभिमान होता.म्हणुन त्यांनी रघुनाथ पंडीतांकरवी 'राज्यव्यवहारकोषा'ची निर्मिती केली.अरबी,फारसी भाषेच्या गुलामगिरीतुन मराठी भाषेची सुटका करण्यासाठी महाराजांनी तसे केले.पण आजही इंग्रजी,हिंदी भाषेच्या आक्रमणातुन आपली भाषा वाचेल का नाही याची आपल्याला चिंता वाटते.

शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती.स्त्रीयांचा,परधर्माचा,परधर्मग्रंथाचा,परधर्मस्थळांचा आदर ही त्याचीच उदाहरणे. पण त्याचबरोबर स्वधर्म्,स्वजन्,स्वभाषा यांच्याबद्दल सार्थ अभिमानही त्यांना होता.आपल्या धर्माच्या लोकांचे ,आपल्या रयतेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी महाराजांनी केल्या.छत्रसालच्या राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली,त्याचबरोबर गोव्यामधे सक्तीने धर्मांतर करवणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकांनाही महाराजांनी खंबीरपणे रोखले.

आजही सुरक्षादलांनी महाराजांकडुन खुप काही शिकण्यासारखे आहे.महाराजांनी स्वतःची ताकद ओळखुन 'गनिमी काव्या'चा योग्य वापर करुन साम्राज्य उभारले.भावनेच्या भरात जाउन आमने-सामने युध्द न करता शत्रु बेसावध असताना त्याच्यावर छापा टाकुन शत्रूची दाणादाण उडवण्याचे तंत्र अवलंबले.महाराजांचे हेरखाते अतिशय सक्षम होते.आजच्या आपल्या देशात हेरखाते अस्तित्वात आहे का नाही असा प्रश्न कधीकधी उभा रहातो.आपन आपल्या शत्रुला बेसावध कधीच गाठु शकत नाही उलट शत्रुच आपल्याला बेसावध गाठुन वेचुन वेचुन मारतो हे दंतेवाडा,२६/११ वरुन दिसुन येते.शिवाजी महाराजांचे आपल्या शत्रुवर नेहमी लक्ष असायचे. गाफील रहाणे तिथे चालत नसे.म्हणुनच शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पौर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत.पण आजच्या परीस्थितीत भारत याबाबत कमालीचा गाफील दिसतो.आपला शत्रु चीन आपल्याला घेरण्यासाठी पुर्ण प्रयत्न करतो आहे.त्यांच्या राजधानीपासुन आपल्या सीमेपर्यंत लवकरात लवकर सैन्य घेउन येण्यासाठी महामार्ग बांधतो आहे.त्याचबरोबर आपल्या भागात घुसखोरी पण करतो आहे तरीही आपल्याकडे याबाबत फारच उदासीनता आहे. आपले सैन्य 'जो सर्वात उचापती करणारा शेजारी आहे(पाकीस्तान) त्याच्याविरुध्द जिंकण्याची आपली क्षमता असली पाहिजे' या थिअरीनुसार चालतो असे दिसुन येते.म्हणुनच चीनसारख्या देशाकडे दुर्लक्ष केले जाते. महाराज अशा विचारसरणिचे नव्हते असे वाटते.कारण तसे असते तर मुघल हे सर्वात महत्वाचे शत्रु होते आणि त्यांच्याकडे नौसेनाही नव्हती तरीही महाराजांनी नौसेना ,जलदुर्ग,उभारले.थोडक्यात म्हणजे आपले जे कोणी शत्रु विविध आघाड्यांवर आहेत त्यांच्याविरुध्द जिंकण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते ते करण्याची महाराजांची पध्दत होती.

तर अशा शिवरायांच्या महाराष्ट्रात आपण जन्मलो हे आपण आपले भाग्य मानले पाहीजे. पण एव्हढ्यावरच थांबुन उपयोग नाही.फक्त भावना,फक्त जयजयकार, फक्त मिरवणुका पुरेसे नाही. शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले गुण आपण आपल्यात अंगिकारण्याचा प्रयत्न केला पाहीजे. आपला समाज्,आपले राष्ट्र यांच्या भल्यासाठी आपण झटले पाहीजे. आपली शिवभक्ती फक्त भावना भडकवल्यावरच जागी होता कामा नये. शिवभक्ती आपल्या रक्ताचा भाग बनल्यावर भ्रष्टाचार्,नीतीमुल्यांचे हनन आपोआपच थांबेल. शिवरायांच्या ठायी असलेली चिकाटी जर आपण आपापल्या क्षेत्रात दाखवु शकलो तर सर्व क्षेत्रात आपला समाज पुढे जाईल.याबाबत समर्थांच्या काही ओळी लिहुन शेवट करतो.

  • शिवरायांस आठवावे | जिवित्व तृणवत मानावे |
  • इहलोकी परलोकी रहावे | किर्तीरुपे ||
  • शिवरायांचे कैसे चालणे | शिवरायांचे कैसे बोलणें |
  • शिवरायांचे सलगी देणें | कैसे असे||
  • शिवरायांचे आठवावे रुप | शिवरायांचा आठवावा प्रताप |
  • शिवरायांचा आठवावा साक्षेप | भुमंडळी ||

डॉ.चिन्मय कुलकर्णी.

इतिहासमत

प्रतिक्रिया

टारझन's picture

4 Jun 2010 - 12:05 am | टारझन

ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती

वाक्याचा पुर्वार्थ मोठा गमतीशिर ...
बाकी लेख निबंधाच्या अंगाने जातोय असे वाटले .. सगळंच माहिती असल्याने नविन काही मिळण्याबाबद निराषा झाली.
नेपोलियन्,ज्युलियस , अलेग्झांडर वगैरेंची राजांशी केलेली तुलणा, आणि नंतर पुन्हा खोडुन काढलेले मुद्दे म्हणजे , आम्ही म्याथ्स च्या पेपरात गणिताच्या स्टेप्स वाढवण्यासाठी त्याला एकदा दोन ने गुणायचो , आणि पुन्हा दोन ने भागायचो , त्या प्रमाणे वाटले.

अवांतर : काय चिण्या भौ.. लै दिवसांनी आलाय ? काय म्हणते रशिया ? :)

-नेपाळी बोनापार्ट

शानबा५१२'s picture

4 Jun 2010 - 12:09 am | शानबा५१२

जर शिवाजी महाराजांच महत्व लोकांना माहीती असत तर लोकांनी आज नको त्यांना डोक्यावर चढवुन ठेवल नसत...........आणि हे महाराष्ट्रात राहणारे उपरे व आपले महाराजांना खुशाल विसरले आहेत......
जयंत्या साज-या करत्यात भो**चे!!!!
अरे तो माणुस नसता तर 'पुर्ण सामान' पण नसत हातात राहील भ्**नु!!!

आपण फक्त मनोभावे त्यांना आठवुनच त्यांचे उपकार फेडु शकतो.......

आमच्या शिवाजी महराजांना माझा मानाचा(सर्वात वरचा बर का!) मुजरा!!!

शुचि's picture

4 Jun 2010 - 12:24 am | शुचि

भाषणात बर्‍याच मुद्द्यांचा सर्वांगसुंदर परामर्ष घेतला आहे. मला खूप आवडलं.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

प्रियाली's picture

4 Jun 2010 - 12:31 am | प्रियाली

भाषण नेमके कोणासमोर करायचे आहे? कटु शब्दांना क्षमा करा पण लहान मुलांसमोर भाषण करावे तसा सूर वाटतो आहे आणि काही अनावश्यक टाळ्याखाऊ वाक्ये बदलून योग्य वाक्यरचना करून भाषण करता येईल असे वाटते.

उदा.

त्यांनी देशातल पहील नौदल उभ केल,जलदुर्ग उभारले.

असे वाटत नाही. महाराजांआधी शेकडो वर्षे सातवाहन, चोला आणि मौर्य राजे नौदले बाळगून होते परंतु राजांच्या आरमाराबद्दल तसेच वतनदारी प्रथेबद्दल आणि ती बंद करावीशी का वाटली यावर अधिक लिहिता येईल.

अलेक्सांडर्,नेपोलियन बोनापार्ट्,ज्युलियस सीझर वगैरे योद्ध्यांइतकेच महाराजांचे कर्तुत्व होते,नव्हे काही प्रमाणात यांच्यापेक्षा जास्तच महाराजांचे कर्तुत्व होते. कारण या राजांकडे तयार सैन्य,भुभाग होता.तर महाराजांना सर्व शुन्यातुन उभे करावयाचे होते.

नेपोलियन आणि सीझर हे जन्माने राजे किंवा सैन्य, भूभाग बाळगून नव्हते. त्यांची उद्दिष्टे वेगळी होती. अलेक्झांडरला स्वतःच्या भूभागाचा फारसा उपयोग नव्हता. तो वाचवण्याकरता त्याने लढाया केल्या नाहीत. किंबहुना, बर्‍याचशा लढाया परकीयांच्या भूभागावरच केल्या. कर्तृत्वाबरोबर त्यांच्या पराक्रमाविषयी बोलणे योग्य ठरेल. राजांनीही शून्यातून स्वराज्य उभे केले तरी तेही जहागिरदार होते तेव्हा तुलनेची गरज नाही.

वरील पत्राच्या उपदेशाच्या बरोबर विरुध्द वर्तन आजचे राजकारणी करतात. जनतेचा पैसा,साधनसामग्री आपलीच आहे या थाटात आजचे राजकारणी आहेत.इतकेच काय तर सामर्थ्याच्या बळावर मोक्याच्या ठीकाणी असलेल्या जमिनीही हे राजकारणी लोक बळकावतात. जनतेच्या भाजीच्या देठालाही हात लावु नका सांगणारे महाराज कुठे आणि जनतेच्या भाजीच्या देठाला सोडुन बाकी सर्वावर आपलाच हक्क आहे या थाटात वावरणारे आजचे नेते कुठे!पण आपल्या प्रत्येक सभेच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेला हे लोक हार न चुकता घालतात !

लेखाचा उद्देश शिवाजीराजांची माहिती करून देणे असल्यास वरील वाक्ये अवांतर आणि अनावश्यक आहेत पण टाळ्याखाऊ आहेत. :)

महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते ... ज्या काळात समुद्रात काही मिटर जाणही पाप होत त्या काळात महाराजांची जहाजं मस्कटपर्यंत जाउन पोहोचली होती.

मिटर वगैरे शब्द बदलता येतील. त्याचबरोबर, धर्मांतराचा किंवा बाटवलेल्या/ बाटलेल्या मुसलमानांना पुन्हा हिंदु करून घेण्याचा महत्त्वाचा मुद्दा आपण विसरलेले दिसता. त्यासाठी, महाराजांनी केलेले प्रयत्न विसरण्याजोगे नाहीत.

अजुन एक उदाहरण म्हणजे राजाराम हा महाराजांचा पुत्र पालथा जन्मला तेंव्हा महाराज म्हणाले होते 'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.'

हे श्रीमान योगीतील वाक्य आहे. याला ऐतिहासिक आधार आहे का? नसल्यास ते वगळले तरी चालेल.

शिवाजी महाराजांची रहाणी साधी होती पण विचारसरणी उच्च होती.

हे देखील टाळीखाऊ वाक्य. याची भाषणात गरज वाटत नाही त्यापेक्षा महाराजांच्या मावळ्यांशी असणार्‍या मैत्रीचे, सैन्यात बाई-बटकी बाळगू नये, मोहिमेवर असताना गावकर्‍यांना त्रास देऊ नये, त्यांच्यावर अन्न-शिधा देण्याची जबरदस्ती करू नये या धोरणाचे वर्णन करता येईल.

छत्रसालचा राजा नसावा. राजाचे नाव छत्रसाल असावे.
पुरंदरच्या तहात २३ किल्ले देण्याचे ठरले होते. २१ नाही.

(चू. भू. द्या. घ्या.)

बाकीचे आठवले आणि वेळ झाला की.

मी देखील आठवणींवरून लिहिले आहे तेव्हा प्रतिसादात चूक असल्यास दुरुस्त करावी.

योगी९००'s picture

4 Jun 2010 - 1:21 am | योगी९००

छत्रसालचा राजा नसावा. राजाचे नाव छत्रसाल असावे.

माझ्या माहितीप्रमाणे बुंदेलखंडाचा राजा छत्रसाल होता..तो पण थोरल्या बाजीरावाच्या काळात..

शिवाजी महाराज एकाच वेळी विविध आघाड्यांवर लढत मुघल,आदिलशाही,ब्रिटीश्,पौर्तुगिज इत्यादींशी महाराज एकाच वेळी सामना करत.
मला माहित नव्हते की महाराजांनी ब्रिटीश आणि पौर्तुगिज यांच्या बरोबर सामना केला..माझ्या माहितीनुसार त्या काळात east India कंपनी ने आपला कारभार सुरु केला होता..पण महाराजांनी त्यांचा धुर्त कावा ओळखून त्यांना दुरच ठेवले होते..पण त्यांच्याबरोबर सामना/युद्ध वगैरे नव्हते झाले.

खादाडमाऊ

प्रियाली's picture

4 Jun 2010 - 1:24 am | प्रियाली

दीर्घायुषी असावा. महाराजांपासून थोरल्या बाजीरावांपर्यंत जिवंत होता. महाराज आणि बाजीराव त्यामानाने अल्पायुषीच. :(

शिवाजी, छत्रसाल आणि गुरु गोविंदसिंह या तिघांनी औरंगजेबाला टक्कर दिली होती.

चिन्या१९८५'s picture

4 Jun 2010 - 1:10 am | चिन्या१९८५

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद टारझन्,शानबा,शुचि,प्रियाली!!

बाकी लेख रटाळ झालेला दिसतोय.बहुतेक १ वर्षानंतर काहीतरी लिहितोय त्यामुळे असेल.बाकी काही आक्षेपार्ह नसेल तर मी परत संपादित करणार नाहिये.

टारझन्,रशियातला अभ्यास संपला.आता मेडिकल कोउन्सिल ऑफ इंडीयाची परीक्षाही पास झालोय.आता दिल्लीत इंटर्नशीप करणार आहे.

प्रियाली त्यांची नौदले परदेशी लोकांशी सामना करण्याइतकी सक्षम नसावीत.दुसरी गोष्ट म्हणजे जगातल्या महान राजांबद्दल बोलायला लागले तर तुलना ही होणारच.अलेक्सांडरकडे भुभाग्,सैन्य होते त्यामुळे त्याला इतरांशी लढण्याची तयारी करणे सोपे होते.शिवाय शिवरायांच्यासारखीच जशीच्या तशी परीस्थिती कुणाचीच नसणार.असो.तुलना करण्यास घाबरणे मला कळत नाही जेंव्हा आपले नाणे पक्के असताना.

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

Pain's picture

4 Jun 2010 - 10:09 am | Pain

छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो

अंगावर काटा उभा रहाणे हा वाक्प्रचार चान्गल्या लोकांपासून चांगल्या लोकांसाठी वापरत नाहीत. योग्य उदा. क्रुर दरोडेखोरांपासुन-->जनता किंवा किरण बेदींसारखा अधिकारी आणि गुंड

इतर अनेक चुका. बहुतेक प्रियाली यांनी दाखवल्याच आहेत्...उरलेल्या मी सांगतो.

jaypal's picture

4 Jun 2010 - 10:28 am | jaypal

अभ्यास पुर्ण भाषण पण...............सुरवातिचच दुसरं वाक्य
>>अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही."
खुप खटकल कारण मिपा वर अस वाक्य मी पहिल्यांदाच वाचत आहे.

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

ह्रुषिकेश's picture

4 Jun 2010 - 12:00 pm | ह्रुषिकेश

>>जयसिंघाशी झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देउन २१ ऐवजी प्रत्यक्षात १७च किल्ले देण्याचे राजकार>>..
या राजकारणाचा उल्लेख मी तरी पहिल्यान्दाच ऐकला. अर्थात माझा या विषयावर जास्त अभ्यास नाही. जाणकारानी यावर प्रकाश टाकावा..

चिन्या१९८५'s picture

4 Jun 2010 - 12:36 pm | चिन्या१९८५

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद पेन्,जयपाल्,हृषिकेश.

पेन्,अंगावर काटा वेगवेगळ्या कारणांनी उभा राहु शकतो. राष्ट्रगीत म्हणताना,मंदिरात गेल्यावरही आमच्या अंगावर काटा उभा रहातो.इथे हा वाक्प्रचार म्हणुन नाही तर वस्तुस्थिती म्हणुन लिहिला आहे.तसेच वाक्प्रचार म्हणुन जरी वापरला तरीही तुम्ही म्हणता तोच अर्थ होतो असे मला वाटत नाही.

जयपाल्,ते वाक्य मिपाकरांसाठी लिहिलेल नाही तर हे भाषण ज्या लोकांसमोर होणार होत त्यांच्याबाबत लिहिल होत.

हृषिकेष अस राजकारण नक्कीच झाल होत.तुम्ही तपासुन बघु शकता.

असो 'छत्रसालचा राजा वगैरे' टायपोबद्दलही चुका काढणे म्हणजे एकुनच शाळेतल्या शिक्षिका माझा पेपर तपासत आहेत अस मला वाटु लागलय.

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

कानडाऊ योगेशु's picture

4 Jun 2010 - 1:55 pm | कानडाऊ योगेशु

पेन्,अंगावर काटा वेगवेगळ्या कारणांनी उभा राहु शकतो. राष्ट्रगीत म्हणताना,मंदिरात गेल्यावरही आमच्या अंगावर काटा उभा रहातो.इथे हा वाक्प्रचार म्हणुन नाही तर वस्तुस्थिती म्हणुन लिहिला आहे.तसेच वाक्प्रचार म्हणुन जरी वापरला तरीही तुम्ही म्हणता तोच अर्थ होतो असे मला वाटत नाही.
अंगावर काटा उभे राहणे च्या ऐवजी रोमांच उभे राहतात असे म्हणणे जास्त योग्य वाटले असते.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

अवलिया's picture

4 Jun 2010 - 12:54 pm | अवलिया

चांगला लेख.

लेख लिहिण्याचा हेतु डोळ्यासमोर सतत राहु देणे, येवढे केले की अजुन असेच सुंदर लेख लिहिता येतील. :)

--अवलिया

जिप्सी's picture

4 Jun 2010 - 1:36 pm | जिप्सी

गेल्या २ वर्षात भारत इतिहास संशोधक मंडळात केलेल्या थोड्या फार अभ्यासानंतर मला काही गोष्टी सुचावाव्याश्या वाटतात. लेख उत्तम आहे पण बराच बाळबोध वाटतो.
'कुटनितीमध्ये महाराजांच्या करंगळीत जितक होतं तितक औरंगजेबाच्या पुर्ण शरीरात नव्हत.' :- हे वाक्य माझ्या वाचनात अजून तरी आलेलं नाही, परदेशी लेखकाचे नाव सांगितल्यास संदर्भ शोधता येईल.
'मुलगा पालथा जन्मला,बहुत उत्तम.आता तो दिल्ली पालथी घालेल.' या वाक्याला सुद्धा काहीहि एतिहसिक आधार नाही. मराठ्यांच्यात राजाच्या तोंडून निघालेला शब्द आणि शब्द लिहून ठेवायची पद्धत नव्हती. हि पद्धत मोगल दरबारात होती, त्याला अखबार असे म्हणत. हि गोष्ट कपोलकल्पित आहे. इतिहास लेखी पुरावा मागतो.
मराठी आरमार महाराजांनी उभे केले हा खरच एक एतिहसिक क्षण होता. मोगलांचे आरमार होते पण ते एवढे सामर्थ्यवान नव्हते महाराजांनी नवीन जहाजांचे प्रकार वापरत आणून युद्धसज्ज आरमार उभे केले. मराठी आरमार व्यापारासाठी मस्कत पर्यंत जात होती, म्हणजे महाराजांनी हिंदुस्थान आरमार नावाचे जे अंग विसरला होता त्याची जाणीव करून दिली. अनेक जलदुर्ग महाराजानी बांधून घेतले. एकट्या सिंधुदुर्गावर १ कोटी होन खर्च झालेल्याचा उल्लेख सापडतो १ होन = ३ १/२ ते ३ ३/४ रुपये. (त्यावेळचे !!!)
महाराज धार्मिक होते पण अंधश्रध्दाळु नव्हते.महाराजांचा तुकाराम महाराज्,समर्थ रामदास्,मौनी बाबा व इतर अनेक संतमहात्म्यांशी संबंध आला. ---- त्याकाळी हि जी काही संत मंडळी होती त्यासर्वाचे महाराजांशी सलगीचे संबध होते पण मी काही ठिकाणी महाराजांनी रामदास स्वामींच्या झोळीत राज्याची सनद टाकली होती, असे वाचले आहे याला कोणताही एतिहसिक पुरावा नाही. यात मी रामदासांची योग्यता कमी होती असे कोणत्याही प्रकारे सुचवत नाही. पण महाराज धर्म आणि सत्ता नेहमीच एकमेकापासून लांब ठेवत. महाराजांनी अनेक देवस्थानांना सनदा दिल्या म्हणजे त्या देवस्थानांना सरकारी जमिनी इनाम म्हणून दिल्या, पण जुन्या अनेक सनदा रद्द सुद्धा केल्या उदा. चिंचवडकर मोरया गोसावींना जनतेकडून धान्य गोळा करून घेण्याची सनद आदिलशहा कडून मिळाली होती पण महाराजांनी ती रद्द करून धान्य सरकारी अम्बारातून घ्यावे अशी तजवीज करून दिली.

छत्रसाल राजाला त्यांनी त्याच हेतुने मदत केली :- पण याला प्रत्यक्ष कोणती मदत केली याचा उल्लेख सापडत नाही. वरच्या काही शंकाना उत्तर म्हणजे
छत्रसाल महाराजना भेटला त्यावेळी साधारणपणे १८ वर्षांचा होता. त्याचा जन्म १६४९चा आणि मृत्यू १७३१ चा. बाजीरावाचा मृत्यू १७४० चा म्हणजे हाच तो छत्रसाल .

थोडीशी अवांतर माहिती :- मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळेना वार्षिक ७००० होन पगार होता बाकीच्या ७ प्रधाना ना वार्षिक ५००० होन पगार होता.
आता वर दिलेल्या होनाच्या हिशोबाप्रमाणे त्यांच पॅकेज कितिच होत ? याचा हिशोब करता येईल.

अजूनही लिहिण्यासारखे बरेच आहे पण परत कधी तरी.

अमोल केळकर's picture

4 Jun 2010 - 4:08 pm | अमोल केळकर

लेख आवडला

अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

चिन्या१९८५'s picture

4 Jun 2010 - 8:17 pm | चिन्या१९८५

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अवलिया,जिप्सी आणि अमोल.

जिप्सी,तशा संदर्भाच वाक्य डगलसनी म्हटलय.
दुसर म्हणजे झोळित सनद टाकल्याचे शिवरायांचे एक पत्र दर्शवते.हे त्यांच्या १५सप्टेंबर १६७८ चे पत्र होते:
"श्री
श्रीसद्गुरुवर्य सकळतीर्थरुप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामीचे सेवेसी चरणरज शिवाजी राजे यांनी चरणावर मस्तक ठेवुन विज्ञापना जे (की) मजवर कृपा करुन सनाथ केले.आज्ञा केली की 'तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करुन धर्मस्थापना,देव्-ब्राह्मणाची सेवा,प्रजेची पिडा दुर करुन (तीचे) पाळण्,रक्षण करावे,हे व्रत संपादुन त्यात परमार्थ करावा.तुम्ही जे मनी धरीले ते श्री सिध्दीस पावील.' त्याजवरुन जो जो उद्योग केला व दुष्ट तुरुख (मुसलमान्)लिकांचा नाश करावा,विपुल द्रव्ये करुन राज्यपरंपरा अक्षय चालेल ऐसी स्थळे दुर्घट करावी ,ऐसे जे जे मनी धरीलें ते ते स्वामींनी आशिर्वादाप्रमाणे मनोरथ पुर्ण केले.याउपरी राज्य सर्व संपादिले.ते चरणी अर्पण करुन सर्व काळ सेवा करावी ऐसा विचार मनी आणिला.तेव्हा (रामदाससची) आज्ञा झाली की, 'तुम्हास पुर्वी धर्म सांगितले तेच करावे.तीच सेवा होय.' ऐसे आज्ञापिले.यावरुन निकट वास घडुन वारंवार दर्शन घडावे,श्रीची स्थापना कोठेतरी होउन सांप्रदाय शिष्यभक्ती विस्तीर्ण घडावी ऐसी (महाराजांनी) प्रार्थना केली....यास राज्य संपादिले त्यातील ग्रामभुमी कोठे काय नेमावी ते आज्ञा व्हावी.तेव्हा आज्ञा झाली की 'विषेश उपाधीचे कारण काय्?तथापि तुमच्या मनी श्रीची सेवा घडावी हा निश्चय जाहला.त्यास यथावकाशे जेथे जे नेमावेसे वाटेल ते नेमावे....'याप्रकारे आज्ञा जाहली..
.

छत्रसालला महाराजांकडुन प्रेरणा मिळाली स्वराज्यासाठी लढण्याची आणि त्याआधी तो महाराजांना भेटलाही होता.तो पुर्वी औरंगजेबाकडुन लढत असे.

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

आशिष सुर्वे's picture

4 Jun 2010 - 11:57 pm | आशिष सुर्वे

शिवाजी राजांबद्द्ल कितीही वेळा वाचले तरी 'रटाळ' वाटत नाही.. लिहीत रहा!
संभाजी राजांबद्दलही थोडे येऊदेत की!
======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

चिन्या१९८५'s picture

5 Jun 2010 - 12:30 am | चिन्या१९८५

धन्यवाद आशीष.
संभाजी महाराजांबद्दल पण लिहु कधीतरी.

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

जिप्सी's picture

6 Jun 2010 - 5:31 pm | जिप्सी

चिन्या १९८७ आपण उल्लेखलेले पत्र माझ्या वाचनात आलेले आहे. पण मी म्हणत होतो तो प्रसंग थोडक्यात असा कि, समर्थ रायगडावर भिक्षा मागण्यासाठी गेले असताना महाराजांनी त्यांच्या झोळीत राज्याच्या सनदा टाकल्या ,हा प्रसंग बर्याच गोष्टीच्या पुस्तकात दाखवलेला आहे. छत्रसाल बद्दल तर मी आपले म्हणणे आधीच मान्य केले आहे. निकोलसचा जरा संधर्भ दिलात तर आजच त्याला शोधता येईल. हा माणूस प्रत्यक्षात महाराजांना भेटलेला होता काय? मनुची (माझ्या माहिती प्रमाणे ) महाराजांना राजकारानेतर प्रसंगात भेटलेला १मेव परदेशी होता.

चिन्या१९८५'s picture

6 Jun 2010 - 8:39 pm | चिन्या१९८५

निकोलस नाही मी डगलस म्हटल.तो महाराजांना भेटला नव्हता कारण तो बराच नंतर भारतात आला होता.मनुची बरोबरच Thevenot पण महाराजांना भेटला होता.त्यानी महाराजांचे दिसणे वगैरे गोष्टी लिहुन ठेवलेल्या आहेत. अजुनही काही जण त्यांना भेटले होते शिवराज्याभिषेकाच्या वेळी.

वरील पत्रामधे उल्लेख आहे की महाराजांनी सर्व राज्य अर्पण करण्याची इच्छा दाखवली होती तो प्रसंग आधी कधीतरी झाला असणार.पण तुम्ही म्हणता तो प्रसंग माझ्या वाचनात आल्याचे आठवत नाही(वाचलेही असेल बहुतेक)
मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985

जिप्सी's picture

7 Jun 2010 - 6:06 pm | जिप्सी

बर बर तुम्ही म्हणताय तो जेम्स डग्लस तर ! "बुक ऑफ बॉम्बे"वाला. चिनूभाऊ तुम्ही हे फार गंभीरपणे घेऊ नका,पण हा सदगृहस्थ फारसा अभ्यासू आणि विद्वान म्हणून गणला जात नव्हता. आणि त्यान "बुक ऑफ बॉम्बे" लिहील १८८० नंतर कधीतरी आणि त्यात सुद्धा त्याचा महाराजांबद्दल आणि मराठ्यांच्याबद्दल भरपूर गोंधळ उडालेला आहे हे जाणवत. त्यान महाराजांची समाधी राजगडावर आहे असे लिहिले आहे,म्हणजे काय ते ओळखा ! असो तुमच्यामुळ माझा बराच अभ्यास झाला.
पुन्हा येउद्या एखादा झकास लेख. पुण्यात असाल तर लेखासाठी भरपूर कच्चा माल पुरवण्याची सोय करता येईल.
तुम्हाला पुढच्या लेखासाठी शुभेच्छा !

अवांतर :- ग्रांट डफच History of Mahrattas नक्की वाचा. जदुनाथ सरकारांच शिवाजी आणि औरंगझेब यांच्याबद्दलच लेखनही वाचा. आणि गाईड वाचायचं असेल तर शेजवलकर आणि पगडी झिंदाबाद.

चिन्या१९८५'s picture

8 Jun 2010 - 12:42 am | चिन्या१९८५

डगलसच खर पुस्तक मी वाचलेल नाहीये आणि तो विद्वान नसेलही.पण मला त्याने दिलेली उपमा आवडली,त्याने अजुनही काही उपमा चपखल दिलेल्या आहेत.

हिस्टरी ऑफ मराठाज इंटरनेटवर उपलब्ध आहे.संथगतीने माझे त्याचे वाचनही सुरु आहे.३ भाग आहेत ना त्याचे?जदुनाथ सरकारांच महाराजांवरच पुस्तक वाचल आहे.बाकी पुढचा लेख महाराजांवरच असेल अस वाटत नाही.महाराजांच्या युध्दनीतीवर एखाद पुस्तक आहे का??म्हणजे फक्त युध्दांबाबतच??

मला ट्विटरवर फॉलो करु शकता- http://twitter.com/chinya1985