तुम्हांला हे आठवतयं

chintamani1969's picture
chintamani1969 in जनातलं, मनातलं
13 May 2010 - 10:31 pm

आपल्याच जुन्या आठवणी आपल्याल्या आणि आपल्या मूडला फ्रेश करतात
आणि मग ...... आपल्या कामाला फ्रेश

तो दूरदर्शनचा गोल गोल फिरणारा लोगो

दूरदर्शनचाच तो पट्ट्या पट्ट्या चा स्क्रीन सेव्हर .... कार्यक्रमापेक्षा व्यत्ययाचीच पाटी अधिक

मालगुडी डेज ताना ना ताना ना ना ना

रामायण

देख भाई देख

मिले सूर मेरा तुम्हारा

टर्निग पॉईंट

भारत एक खोज

महाभारत

अलीफ लैला

व्योमकेश बक्शी

तहकीकात

ही म्यान

आणि ती सलमा सुलतान .........समाचार सांगणारी

विको तरमारिक नाही कॉस्म्यातिक ...

किंव्हा वॉशिंग पावडर निरमा ........दूध सी सफेदी निरामासे आयी रंगीन कपडेभी खिल खिल जाये ....

आय आम कॉम्प्लान बॉय आय आम ए कॉम्प्लान गर्ल
तो बॉय आता केवढा मोठा झाला आहे ... अहो तोच तो शाहीद कपूर आणि ती गर्ल
परवाच तीच म्हणे लग्न झालंय म्हणे ..... आयेशा टाकिया

आणि आपली रेणुका शहाणे आणि सिद्धार्थ काक ह्यांची सुरभी

रघुवीर यादवचा गोंधळ ..... मुंगेरीलाल के हसीन सपने ,
गाजर खाणारा करमचंद,विक्रम वेताळ.....
आणि बरेच काही ........

हा आपला साधारणपणे ८० ते ९० चा काळ.. नो सीटबेल्ट,नो ऐअर ब्याग्ज.....ट्रकच्या फाळक्यावर बसून प्रवास आणि तो सर्वांना आरामदायी वाटायचा .....लहान मुलांसाठी त्या रंगीबेरंगी बाबा गाड्या ..... सायकलच्या मागच्या चाकाला कार्डबोर्ड चा तुकडा लावून त्याचा येणारा फटर फटर .. अगदी फटफटीचा आवाज ..त्यामुळे
सायकलची तास न तास भटकंती.....त्या सायकलच्या शर्यती .... ट्रीप ... नो सेफ्टी हेल्मेट्स,नो नी प्याड, नो एल्बो प्याड .......तहान लागली की दिसेल त्या सार्वजनिक
नळाला तोंड लावून पाणी प्यायचे ......... नो बॉटल वाटर .........ती पोस्टाची तिकिटे ...... काडेपेट्याची कव्हर्स , आणि बरंच काही जमा करायचंय आणि जोपासायचा छंद
आणि सुट्टीच्या दिवशी दिवसभर उनाडक्या.....खेळ ....मात्र कुठल्याही परिस्थितीत अंधार व्हायच्या आत घरात आणि नंतर शुभं करोति .......................

मुक्तक

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

13 May 2010 - 10:43 pm | नितिन थत्ते

ह्म्म्म.

हे सगळं चालू होतं तेव्हा भाकरतुकडा कमवायच्या मागे असायचो.
:)

आमचा नॉस्टॅल्जिया म्हणजे गजरा आणि ज्ञानदीप. बाकी ज्ञानदीपचं समाजप्रबोधनाचं आणि त्या चळवळीला लोकांपर्यंत पोचवण्याचं यश अप्रतिम.
येथल्या अनेक लोकांना कल्पना नसेल पण आता होम मिनिस्टर हा कार्यक्रम जेवढा घराघरात पोचला आहे तितकाच ज्ञानदीप हा कार्यक्रम होता.
(त्याकाळी शनिवारी सायंकाळी मराठी चित्रपट दाखवत असत. ब्लॅक & व्हाईट. रंगीत टीव्ही आल्यावर काळे पांढरे सिनेमे दाखवायचेच नाहीत असा एक अलिखित नियमच झाला. :( )

नितिन थत्ते

टारझन's picture

14 May 2010 - 12:11 am | टारझन

१. होता ..... एक घर ... आस पास ...
२. मुलामुलांची ... फुला फुलांची ... बालचित्रवाणी .. आम्ही पाखरे आणंदाने .. आणंदाने गातो गंमत गाणी. .. बालचित्रवाणी ... बालचित्रवाणी
३. एक चिडिया ... अनेक चिडिया ...
४. ऑम्म............. णम: शिवाय .. आहाहाआआआआआ ....ओ..........म् नम: शिवाय !!

मस्त धागा आहे.

टारझन's picture

14 May 2010 - 1:59 am | टारझन

फार पुर्वी मला ही इमेल आली होती .. सगळा मॅटर सेम टू सेम तसाच दिसतोय !!
असो ! :)

भिडू's picture

14 May 2010 - 7:57 am | भिडू

+१

नितिन थत्ते's picture

14 May 2010 - 8:35 am | नितिन थत्ते

+२

पण त्यात वर मी लिहिलेले रेफरन्स नसल्याने तेवढे नॉस्टॅल्जिक झाले नव्हते.

नितिन थत्ते

जोश्या's picture

14 May 2010 - 11:26 am | जोश्या

JAAU DYA KAHI TARI CHANGALE

jaypal's picture

14 May 2010 - 10:30 am | jaypal

थत्ते साहेबांशी सहमत =D>
बाकी ज्ञानदीप वाचुन आकाशा येवढा आनंद झाला =))
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

चिरोटा's picture

14 May 2010 - 11:55 am | चिरोटा

आकाशानंद्.आणि कोणी तरी असायचे त्यांच्याबरोबर.
खानदान मालिका पण चांगली असायची.बुधवारी ९ वाजता.

P = NP

मराठे's picture

14 May 2010 - 9:24 pm | मराठे

आकाशानंदांचं नाव वाचून एक जुना जोक आठवला. कदाचीत माहित असेल... मला वाटतं ज्ञानदीपप्रमाणेच आणखी एक कार्यक्रम होता ज्यात प्रेक्षकांच्या पत्रांना आकाशानंद उत्तरं द्यायचे. त्यावेळी "गोट्या" नावाची लोकप्रिय मालिका चालू होती. परीक्षेच्यावेळी ती मालीका बंद असायची.. अशीच ती मालिका बंद असताना एका प्रेक्षकाचं पत्र आलं होतं.. त्यात प्रश्न होता.. "आजकाल तुम्ही गोट्या का दाखवत नाही" ? !! !

नितिन थत्ते's picture

15 May 2010 - 10:02 am | नितिन थत्ते

९०+ प्रतिसाद?

भारतीय भूतकाळात फार रमतात हेच खरे.

नितिन थत्ते

पक्या's picture

13 May 2010 - 10:41 pm | पक्या

सिध्दार्थ टाक नव्हे काक
आणि ये जो है जिंदगी, हम लोग , बुनियाद, रजनी राहिले की
जय महाराष्ट्र , जय मराठी !

शुचि's picture

13 May 2010 - 10:43 pm | शुचि

किलबिल -साप्तहिकी-गजरा-आमची माती अमची माणसं-ज्ञानदीप-स्टारट्रेक्-फायर्बॉ--डीडीज कॉमेडी शो

आमच्याकडे टीव्ही खूप खूप उशीरा आला. पण हे कार्यक्रम क्वचित शेजार्‍यांकडे पाहीले होते.
__________
आम्ही काड्यापेटीला दोरा लावून घरात फोन-फोन खेळत असू. सागरगोटे, बिट्ट्या, पत्ते, कॅरम हे देखील.

डबा ऐसपैस, जोडीसाखळी, कटींग द केक, वीषामृत, जमीन-पाणी, लंडन-लंडन, लिंगोरचा, आट्यापाट्या हे खेळ तर सर्रास आणि दररोज.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

पर्नल नेने मराठे's picture

14 May 2010 - 7:28 pm | पर्नल नेने मराठे

स्टारट्रेक् मधला लाम्ब्ड्या कानाचा कोण तो?

चुचु

jaypal's picture

14 May 2010 - 7:32 pm | jaypal

स्पॉक
sr
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पर्नल नेने मराठे's picture

15 May 2010 - 10:11 am | पर्नल नेने मराठे

होहो =)) बरोबर

चुचु

संदीप चित्रे's picture

13 May 2010 - 10:45 pm | संदीप चित्रे

येही देखेंगे 'हम लोग' म्हणणारा अशोककुमार, 'बुनियाद'चा हवेलीराम आणि 'मृगनयनी'ची पल्लवी जोशी, रविवार सकाळची 'कच्ची धूप' आणि बुधवार रात्रीची 'सुबह'... 'छायागीत', 'चित्रहार' सुरू झाले आणि अजूनही अभ्यास चालू असेल तर होणारी जीवाची उलाघाल ...
एक ना अनेक आठवणी... स्मरणरंजनाची सफर बेष्ट !

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

पांथस्थ's picture

13 May 2010 - 11:30 pm | पांथस्थ

'चित्रहार' सुरू झाले आणि अजूनही अभ्यास चालू असेल तर होणारी जीवाची उलाघाल ...

हे मात्र एकदम खरं!

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 10:48 pm | शिल्पा ब

देख भाई देख, गायब आया ,फटीचर, जायंट रोबोट, flash gorden , पोटली बाबा कि, गुणी राजू, जबाबदारी (हे शेवटचे दोन दुपारी १२-२ च्या दरम्यान लागायचे...शाळेतून आले कि टीव्ही..तेम्व्हापासुंची सवय आहे.. ;) )

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

चिरोटा's picture

13 May 2010 - 11:22 pm | चिरोटा

जायंट रोबोट

ह्याला तो दुसरा रोबोट घेवून जातो तेव्हा वर्गातले काही मुले-मुली रडले होते!!

तो बॉय आता केवढा मोठा झाला आहे ... अहो तोच तो शाहीद कपूर

अरेच्चा. कॉम्प्लान प्याय्ल्यावर त्याचा टी-शर्ट्/बनियन घट्ट व्हायचा ना!

ये जो है जिंदगी, हम लोग , बुनियाद, रजनी राहिले की

देखो मगर प्यार से ही पण एक मस्त सिरीयल होती.रविवारी दुपारी रजनीच्या नंतर्.पुलिस फाईल से ही एक करमचंद नंतर चालू झालेली पकाव सिरियल होती रात्री-१०:२०ला.बाकी श्वेतांबरा/बुनियाद/हमलोग ह्या मोठ्या लोकांच्या मालिका त्यावेळी डोक्यावरुन गेल्या होत्या.तमस मालिकेत कदाचित मारामारी बघायला मिळेल म्हणून ४/५ भाग पाहिले होते. पण ते ही नंतर बाउंसर!
शनिवार संध्याकाळ म्हणजे मराठी चित्रपट.रात्रीचे ८:३० झाले की "पुढील कार्यक्रम दिल्लीहून" नावाची ठरलेली पाटी.
टीव्ही म्हणजे- डायनोरा,ईसी,अप्ट्रॉन्,नेल्को.

P = NP

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 11:23 pm | शिल्पा ब

एक नूतनची मालिका होती...नाव आठवत नाही...हून हुना हून हुना असं काहीतरी गाणं असायचं
आणि giant रोबोट इंग्रजी होती ना? त्यात शहीद कपूर कुठून आला?

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

पांथस्थ's picture

13 May 2010 - 11:28 pm | पांथस्थ

हुन हुना रे हुन हुना....असे शीर्षक गीत आत्तापर्यंत (माझ्या माहितीप्रमाणे) फक्त एकाच मालिकेला होते..."कालीगंज की बहू"....

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2010 - 12:39 pm | कानडाऊ योगेशु

त्या मालिकेचे नाव "कालिगंज कि बहू" हे नसुन "मुजरिम हाजिर" हे होते.

मुलगा घर सोडुन गेल्यावर त्याच्या बाप सुनेच्या खोलीत रात्री येतो हा त्यातला एक सीन अजुनही आठवतोय.
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

चिरोटा's picture

13 May 2010 - 11:29 pm | चिरोटा

giant रोबोट इंग्रजी होती ना? त्यात शहीद कपूर कुठून आला?

कोण म्हणतय तस? शाहिद कपूर जहिरातीत कॉम्ल्पान पिणार. जायंट रोबोट मालिका.दुपारी लागायची.जपानी लोक असायचे त्यात बहुतेक.
P = NP

शिल्पा ब's picture

13 May 2010 - 11:32 pm | शिल्पा ब

इतक बारीक आठवत नाहि...तुम्ही म्हणता तस..ठीक आहे?
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

हवालदार's picture

14 May 2010 - 2:06 am | हवालदार

श्रीकान्त होती

चिरोटा's picture

13 May 2010 - 11:47 pm | चिरोटा

सिद्दार्थ बसुची Quiz Time ही मालिका.रविवारी रात्री ९ वाजता.आपल्या शाळेच्या बाहेर ईतरत्र भारतातही अनेक पटीने हुशार मुले आहेत ह्याची प्रथम जाणीव झाली!!.
एयर होस्टेस नावाची एक मालिका होती.आठवतेय का कुणाला?
आवडती सायकल एकच - मरुन रंगाची BSA SLR/Aristocrat
P = NP

संदीप चित्रे's picture

14 May 2010 - 1:41 am | संदीप चित्रे

माझीही अत्यंत आवडती मालिका होती.
>> आपल्या शाळेच्या बाहेर ईतरत्र भारतातही अनेक पटीने हुशार मुले आहेत ह्याची प्रथम जाणीव झाली
आणि आय.आय.टी.मधे शिकत असलेल्यांनाही कधी कधी लहान रामायण - महाभारतातल्या साध्या गोष्टी माहिती नसू शकतात हे ही समजायचं ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

इथे बघायला मिळतिल.

http://oldidiotbox.blogspot.com/

त्याचप्रमाणे 'राजश्री' इथे सुद्धा बर्‍याच गोष्टी आहेत बघायला. (पण आत्ता ती साईट उघडत नाहीये)

विकास's picture

14 May 2010 - 1:42 am | विकास

वर वाचक यांनी दिलेला धागा संग्राह्य आहे :-)

गजरा आणि ज्ञानदीप प्रमाणे आकाशानंद आणि विजया जोगळेकर धुमाळे यांचा "सप्रेम नमस्कार" हा कार्यक्रम पण लोकप्रिय होता.

गजर्‍याप्रमाणे, आवो मारे साथे ने गुजराथीची थोडी ओळख करून दिली. तसेच तबत्सुमचे फुल खिले है गुलशन गुलशन पण मस्त असायचे.

वर चित्रहार हा शब्द पाहीला पण त्याचे मूळ छायागीत विसरता येणार नाही. या आठवड्यात गुरवारी छायागीतात कोणती गाणी दाखवणार हे पहायला साप्ताहीकी पण नेमाने पहाणारी लोकं माहीत आहेत. (आणि त्यांची झलक दाखवायचे आणि हमखास ती गाणी नसायची :( )

कुलीच्या वेळेस झालेल्या अपघातातून उठताना बेडरेस्ट घेणारा अमिताभ म्हणे नेमाने "आमची माती आमची माणसे" बघायचा.

I am a complan boy मधे शहीद कपूर होता हे आत्ताच समजले. तशाच जाहीराती मधे अजून दोन टोकाच्या स्त्रीयांच्या जाहीराती म्हणजे सर्फच्या ललिताजी आणि लिरील!

तशी रेडीओ वरील एक मजेदार जाहीरात म्हणजे, "आई ग वैतागले मी या केसांना..." :-)

वास्तवीक पहायला तेंव्हा चॉइसेस कमी असायचे. क्लास असला, वीज गेली अथवा इतर कुठल्याही कारणाने एखादा एपिसोड चुकला तरी चालायचे जे असायचा त्यातच गोडी अपूर्णतेची असायची.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

भारद्वाज's picture

14 May 2010 - 12:26 pm | भारद्वाज

तशी रेडीओ वरील एक मजेदार जाहीरात म्हणजे, "आई ग वैतागले मी या केसांना..."

हो हो आठवतंय सगळं.
हे सुद्धा आठवतंय बघा: आमची शाळा दुपारची होती. ११.३० वाजता आम्ही जेवताना रेडिओवर कामगार सभा लागायची. त्यात Adroit Institute ची जाहिरात लागत असे.
"Adroit Institute फोन... पाच-सहा-सात-दोन-तीन-आठ-आठ" अशी तिची शेवटची ओळ होती. (अहो आश्चर्यम् !! इतक्या वर्षांनंतरसुद्धा फोन नं. एका झटक्यात आठवला)
शिवाय 'घराला आणि गोठ्याला कुठली पत्रे वापरावीत हेच कळत नाही...' हे सुद्धा असायचे.
-लहानपण देगा देवा

भडकमकर मास्तर's picture

14 May 2010 - 2:43 am | भडकमकर मास्तर

नववी दहावीत असताना घरी शुक्रवारी रात्री प्रौढांच्या फारीन फिल्म्स लागायच्या ... त्या पाहणे एक एक्सायटिं ग कर्यक्रम असत असे हे आठवते... नंतर अकरावीत हॉस्टेलला शुक्रवारी टीव्हीच्या खोलीत रात्री प्रचंड गर्दी होत असे ... मजेदार दिवसांच्या आठवणी...
_____________________________
श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

टारझन's picture

14 May 2010 - 9:54 am | टारझन

हाहाहा :) टिबी६ का ? =)) =))

(चोरुन टिबी६ चा लुत्फ घेता घेता एकदा पकडल्या गेलेला, त्यामुळे घरची केबल कट झालेला) आमबटकर मास्तर

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 3:12 am | शिल्पा ब

वागले कि दुनिया, आ बैल मुझे मार, जंगल बुक , गोट्या, पडघवली, स्वामी, निरमाची जाहिरात...
सुधीर काळेंची भिकाजीराव करोडपती, १०० (एक शून्य शून्य )

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

राधा१'s picture

14 May 2010 - 10:19 am | राधा१

सुधीर काळेंची भिकाजीराव करोडपती,

तुम्हाला सुधीर जोशी म्हणायच आहे का?
सुधीर काळे मि.पा. वरचे लेखक आहेत.
आणि भिकाजीराव करोडपती ही सुधीर जोशींची सिरीयल होती.

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 4:44 pm | शिल्पा ब

हो हो..जोशिच....चुकून काळे लिहिल...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

मिसळभोक्ता's picture

15 May 2010 - 4:51 am | मिसळभोक्ता

सुधीर काळेंची भिकाजीराव करोडपती

("स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" च्या चालीवर)
स्वामी जकार्ताचा तात्यामुळे भिकारी

बाकी चालू द्या.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

14 May 2010 - 3:42 am | विकास

राष्ट्रीय एकात्मतेवरून काही छान अ‍ॅनिमेशन्स होत्या. त्यातील एक, "एक अनेक" होती. तशी एक मजेदार होती ती "एकता का वृक्ष" त्यातला एक माणूस सॉलीड स्टाईलमधे ओरडतो आणि नंतर सगळे जबरा नाचतात. मात्र ह्याची चित्रफीत जालावर मिळाली नाही :(

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मदनबाण's picture

14 May 2010 - 6:52 pm | मदनबाण

एक माणूस सॉलीड स्टाईलमधे ओरडतो आणि नंतर सगळे जबरा नाचतात. मात्र ह्याची चित्रफीत जालावर मिळाली नाही
हो...मी सुद्धा खूप शोधला तो व्हिडीयो पण सापडला नाही कुठेच... :(
ओरडण्याची स्टाईल लाजवाबच आहे.

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

अरुंधती's picture

15 May 2010 - 6:17 am | अरुंधती

ही घ्या ''एक अनेक'' ची चित्रफीत : http://www.youtube.com/watch?v=VK_TnmNJqao

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मदनबाण's picture

14 May 2010 - 8:38 am | मदनबाण

कोणाला सिगमा नावाची मालिका लागायची ते आठवतय का ?

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 8:40 am | शिल्पा ब

स्पेस सिटि सिग्मा....आमची आवडती मालिका होति...त्यातला शक्ति फार आवडायचा ..तेव्हा...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

अनिल हटेला's picture

14 May 2010 - 4:58 pm | अनिल हटेला

स्पेस सीटी सीग्मा....
स्टोन बॉय अजुन एक आवडती मालीका...
स्वर्ड ऑफ टीपू सुल्तान.....
मेरी आवाज सुनो..
सुरभी......

आणी बर्‍याच आहेत....:)

देश की भावनाओ का दर्पन ,दूरदर्शन..... :))
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

jaypal's picture

14 May 2010 - 10:35 am | jaypal

श्रुंखला मैं शुक्रवारी रात्रीचे ए/१८ चित्रपट . @)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अमोल नागपूरकर's picture

14 May 2010 - 11:46 am | अमोल नागपूरकर

रविवारी सकाळी भक्ती बर्वे साप्ताहिकी सादर करायच्या. लोक तेही नेमाने बघायचे. शरदाचे चान्दणे हा साहित्यविषयक कार्यक्रम किवा शब्दान्च्या पलिकडले हा संगीताचा सुन्दर नजराणा होता. शान्त्ता शेळके आणि सरोजिनी बाबर ह्यान्नी सादर केलेला 'रानजाई' हा स्त्री लोकगीतान्वरील सर्वोत्तम कार्यक्रम तर कुणीच विसरू शकत नाही.

प्रमोद्_पुणे's picture

14 May 2010 - 11:51 am | प्रमोद्_पुणे

एक ओशीन नावाची मालिका असायची, (जपानी) भाषांतरीत, मस्त होती.. अजून काही आठवत आहेत त्या म्हणजे संस्कार (मोहन जोशी), हॅलो जिंदगी (शिर्षक गीताला जगजितसिंगचा आवाज होता), उडान, हम पंछी एक चाल के, स्टोन बौय, गजरा, आमची माती आमची माणसं (ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती..आमची माती आमची माणसं)..

दूरदरर्शन कधी मागे पडले की आपल्या आवडीनिवडी प्रगल्भ झाल्या??

sagarparadkar's picture

14 May 2010 - 4:35 pm | sagarparadkar

मला उडानचं शीर्शक गीत, जी निदा फाजली यांची एक गझल होती, फारच आवडत असे ...

मला आठवतायत ते शब्द थोडेसे असे :

रवां है कश्ती मगर हर तरफ अन्धेरा है
किसीका __ नही ये कुसूर मेरा है
बुझा है मेरेही हाथों चरागसा दिल का
कही सफर तो कही रास्ता है मन्झिल का

कोणाकडे हि गझल असल्यास येथे प्रदर्शित करावी ...

अनिल हटेला's picture

14 May 2010 - 5:00 pm | अनिल हटेला

आमची ही आवडती गझल होती ही...

कही सफर है ,कही रासता है मंजील का.
ये रात दीन की घुटन क्यु ........

असंच बरचसं काही......

(रेणुका शहाणे साठी फक्त सीरीयल बघणारा) ;)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

प्रमोद्_पुणे's picture

14 May 2010 - 12:32 pm | प्रमोद्_पुणे

दूरदरर्शन वर येणार्‍या जाहिराती पण मस्त असायच्या.. आठवणीतल्या काहि..

(१) येह ढेर से कपडे मैं कैसे धोउं, अछा साबुन मैं कोनसा लाउं;

(२) निरमा निरमा वौशिंग पाउडर निरमा..इसके झाग ने जादू कर दिया.. (ह्यातला 'झाग' वर गायिका अशी काही तान घ्यायची);

(३)पेहला प्यार लाए जीवन में बहार (जय साबण);

(४)हरवला राया माझा मेडिमिक्स साबणाच्या फेसात (मेडिमिक्स );

(५) झुळझुळ पाणि आणल कोणि ......सांगतो राणी, फिनोलेक्सने आणले पाणि, शेतं पिकली सोन्यावाणी.. (फिनोलेक्स);

(६) ओहो दिपिकाजि आइये आइये, ये लिजिए आपका सब सामान्..अम्म्..ये नहि वो..मगर आप तो वो हमेशा मेहंगा वाला साबून..लेती थी, मगर वहि झाग वही सफेदि अगर कम दामों में मिले तो कोइ ये क्यु ले, वो न ले?? मान गये. किसे ? आपकी पारखी नजर और निरमा सुपर दोनों को..निरमा सुपर ..सफेदि का सुपर दम दाम फिर भी कम..

(७) जबमे छोटा बच्चा था..खूब शरारत करता था, मेरि चोरी पकडी जाती (product आठवत नाही);

(८) पोरी ए पोरी पावनं आलं बग..तशी तर माज्या घरची लक्ष्मी वायची लय मोट्या मोट्या घरच्या पोरिंची इचा व्हती पन म्या हिला पसंद केलि कारन ही नुसति लक्ष्मी न्हाय तर वनलक्ष्मी हाय् वनलक्ष्मी..

"गुरांना चारा ....गाटीला पैका घरच्या घरी सामाजिक वनीकरन येता दारी." (कुणितरी पूर्ण करा रे हे स्लोगन)

कोणाला अजून आठवत आहेत का?

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2010 - 1:10 pm | कानडाऊ योगेशु

जबमे छोटा बच्चा था..खूब शरारत करता था, मेरि चोरी पकडी जाती

रोशनी देता बजाज..अब मै बिलकुल बुढा हू.गोली खाकर सोता हि...रोशनी देता बजाज..

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

jaypal's picture

14 May 2010 - 1:12 pm | jaypal

जबमे छोटा बच्चा था ... बडी शरात करता था
जब रंगीन जवानी थी ... ईक राजा और ईक रानी थी
अब मैं बिलकुल बुढा हुं.... गोली खाकर जिता हुं

लेकीन आज भी घर के अंदर रौशन होता बजाज.

*पत्नी से करे जो प्यार प्रेस्टीज से कैसे करे इन्कार
* कॅडबरीज च्या सगळ्या अ‍ॅडस त्यातल्यात्यात स्टेडीयम वर येउन मस्त नाचणारी मुलगी.

*************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

प्रमोद्_पुणे's picture

14 May 2010 - 2:38 pm | प्रमोद्_पुणे

जयपाल, योगेश. "पत्नी से करे जो प्यार प्रेस्टीज से कैसे करे इन्कार".. १ नंबर विसरलोच होतो. अजून काही आठवल्या..

(१) कालनिर्णय द्या ना कालनिर्णय घ्या ना..भिंतीवरी कालनिर्णय असावे (रेणुका शहाणे);

(२) ये बेचारा काम के बोज का मारा इसे चाहिए हमदर्द का टौनिक सिंकारा (काच फोडून बाहेर येणारा जावेद जाफरी);

(३) विको टर्मरिक नही cosmetic, विको टर्मरिक आयुर्वेदीक क्रीम;

(४) भूल ना जाना ECE Bulb लाना;

(५) राजू तुम्हारे दात तो मोतियों जैसे चमक रहे हें (डाबर लाल दंतमंजन);

(६) ढूंढ्ते रह जाओगे (आसावरी जोशी);

अजून एक दिलिप ताहिल ची होती त्याने शबनम बॅग अडकवलेली असते. आठवत नाहीए कोणती होती ते..

प्रमोद्_पुणे's picture

14 May 2010 - 2:42 pm | प्रमोद्_पुणे

आई शिकाना अ आ ई छोटी ताई शाळेत जाई म्हणेन शिकीन मी अ आ ई.. मग का उत्तर काही राही आई शिकाना अ आ ई..

अनिल हटेला's picture

14 May 2010 - 5:03 pm | अनिल हटेला

अजुन एक असरानी आणी विजु खोटेची..

भइ राम लक्ष्मण बल्ब देना..
ऐसा कोइ बल्ब नही आता...

...
....

लेकीन एक नही छ ! पूरे घर के बदल डालूंगा..:d.

दुसरी एक..
पहला प्यार लाये जीवन मे बहार.... ;)

बैलोबा (जय)नीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

भारद्वाज's picture

14 May 2010 - 2:26 pm | भारद्वाज

कानाने बहिरा....मुका परि नाssही
जय महाराष्ट्र

प्रमोद्_पुणे's picture

14 May 2010 - 2:39 pm | प्रमोद्_पुणे

कानाने बहिरा....मुका परि नाssही, शिकवता त्याला बोले कैसा पाही..

sagarparadkar's picture

14 May 2010 - 4:40 pm | sagarparadkar

"जळणाला लाकूड, गुरांना चारा ....
गाठीला पैका घरच्या घरी ....
सामाजिक वनीकरण येता दारी."

sagarparadkar's picture

14 May 2010 - 4:46 pm | sagarparadkar

अरे कोणाला सिन्टेक्स टाकिची जाहीरात आठवते का ...

त्यात सविता प्रभुणे आणि शिवाजी साटम होते ...

सविताजी कारच्या बाहेरुन डोकावून : "भुलियेगा नही ..."
शिवाजी साटम ड्रायव्हर सीटवरूनः "हां सिन्टेक्स तो आज लगवाना हि है ..." :)

प्रमोद्_पुणे's picture

14 May 2010 - 6:23 pm | प्रमोद्_पुणे

धन्यवाद्..मला जाम आठवत नव्हते.

राजा's picture

14 May 2010 - 12:54 pm | राजा

रविवार मुकबधिरा साठि असलेल्या बातम्या आणि प्रादेशिक भाषेतिल चित्रपट

Dhananjay Borgaonkar's picture

14 May 2010 - 12:54 pm | Dhananjay Borgaonkar

स्वाभिमान..माझी आवडती सिरीयल..१० वी मधे होतो तेव्हा.

ब्योमकेश बक्शी सुद्धा फार भारी मालिका होती.
एक से बढ्कर एक - कार्तिका राणेची पहिली सिरीयल.

द ग्रेट मराठा, टिपु सुल्तान, असे पाहुणे येती, सर्कस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, सुरभि.

भारद्वाज's picture

14 May 2010 - 2:59 pm | भारद्वाज

स्वाभिमान चं टायटल साँग पण मस्त होतं.
एक पल....है जिंदगी....एक पल...कुछ भी नही...काहे का गम...कैसी खुशी....घडी रुकेना....पुढचं सांगा यार कोणीतरी (लिंक वगैरे)
ब्योमकेश बक्शी --------एक नंबर भावा
एक से बढ्कर एक ------यात नवखा शंकर महादेवनसुद्धा आला होता.

अजून एकः जुनून सिरीयल पण मस्त होती (नाना नगरकर, केशव कल्सी इ.)
लहानपण देगा देवा

Dipa Patil's picture

14 May 2010 - 1:01 pm | Dipa Patil

जबमे छोटा बच्चा था..खूब शरारत करता था, मेरि चोरी पकडी जाती (product आठवत नाही); बजाज बल्ब

फास्टर फेणे
दादा दादी कि कहानीया
निशिगन्धा वाडच - आव्हान

प्रमोद्_पुणे's picture

14 May 2010 - 1:10 pm | प्रमोद्_पुणे

दिपा धन्यवाद..

पक्या's picture

14 May 2010 - 1:05 pm | पक्या

कच्ची धूप इथे पहाता येईल
http://www.youtube.com/watch?v=V9rB2dT-62o&feature=related किंवा येथे पण आहे.
http://www.rajshri.com/Video/Kachchi-Dhoop-Ep-1

जय महाराष्ट्र , जय मराठी !

कानडाऊ योगेशु's picture

14 May 2010 - 1:17 pm | कानडाऊ योगेशु

किले का रहस्य..
मंगळवारी रात्री ११.०० वाजता असायची.
हट्टाने जागुन पाहायचो.
एक शून्य शून्य..(ह्या मालिकेचे शीर्षक संगीत मस्त होते..ट्यावण्याव..ट्यावण्याव..ट्यावण्याव...इ.)
परमवीर..(परमवीर..परमवीर...जो करि जीवाची होळी..छातीवर झेलुनि गोळी..जो देशद्रोह ?? जाळी..तो परमवीर्..तो परमवीर.)

लक्ष्मीकांत बेर्डे,निळु फुले ची "होळी रे होळी". बहुदा शनिवारी असायची.
सतीश पुळेकर,रिमा लागुची "लाईफ मेंबर" ही मालिका.

---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

गणपा's picture

14 May 2010 - 1:47 pm | गणपा

लैच उशीरा धागा उघडला.. बरेच आवडते कार्यक्रम आणि जाहिराती वर येउन गेल्यात म्हणुन परत नमुद नाही करत.
एक पपेट शो होता फार जुना ब्लॅक अँड व्हाईट फायर बॉल. SLV 5 हे अंतराळ यान असत त्यात. अंतराळवीरांवर होती ती मालीका त्यात एक पाळलेल माकड असत. रविवारी सकाळी लागायची.

त्याकाळी कार्टुन्स जास्त नसायच्या पण ज्या फिल्म्स डिव्हीजन्सच्या असायच्या त्या सगळ्याच मजेशिर आसायच्या. त्यातुन एक मेसेज दिला जायचा.
त्यातलीच एक आवडणारी कार्टुन म्हणजे एक माणुस रस्त्यावर बसलेला आसायचा आणि घरा घरातुन कचारा रस्त्यावर फेकला जायचा. शेवटी त्याच चालण मुश्किल होत आणि तो वैतागुन लाथा मारुन परत सगळा कचरा लोकांच्या घरात टाकतो.

अजुन एक अलिकडच्या काळातला पपेट शो म्हणजे 'पोटली बाबा की'. टायटल साँगच इतक मस्त होत त्याच.

मालिकंमध्ये नुक्कड हि आवडती होती. ती संपली तेव्हा वाईट वाटल होत. परत 'नया नुक्कड' या नावाने चालु झाली. पण पहिल्या इतकी मजा नाही आली.
रविवारची स्टारट्रेक ही तेव्हा इंरजीतला अ का ठो कळत नसताना ही आवडिने न चुकता पाहायचो.

खर आहे.
"द ल्युसि शो" , "लारेल हार्डी" , " चार्ली चॅप्लीन" आणि फार पुर्वीचे " द गुडीज" (३ जण एकाच सायकलवरचे आठवतात का?
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

गणपा's picture

14 May 2010 - 2:08 pm | गणपा

हाव ना रे जयप्या एक र्‍ह्यालच बग तो 'डीडीज् कॉमेडी शो' म्हणुन काय बेणं व्हत त्ये. आयला त्या मि. बीन च्या वर्ताण.
त्याच त्वांडच एवड गोजिरवान हुत की हासवुन हासवुन मारायच.

मदनबाण's picture

14 May 2010 - 6:55 pm | मदनबाण

हो... एव्हढी धडपड करुन सुद्धा याला लागत कसं नाही याच मला नेहमी आश्चर्य वाटायच... :)
यूट्यूबवर डीडीज आहे. :)

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

इरसाल's picture

14 May 2010 - 2:56 pm | इरसाल

कसला विचार करतोस रामैय्या.
घराला आणि गोठ्याला कोणते पत्रे वापरावे हेच काळात नाही बघ.
अरे अस्बेस्तोस सिमेंट चे पत्रे वापरून बघ.माझ्या आजोबांनी बसविलेले पत्रे अजूनही शाबूत आहेत.
अरे खरच कि मी pan अस्बेस्तोस सिमेंटचे पत्रे आणतो.

भारद्वाज's picture

14 May 2010 - 3:20 pm | भारद्वाज

कसला विचार करतोस रामण्णा.
घराला आणि गोठ्याला कुठली पत्रे वापरावे हेच काळात नाही बघ.
अरे चारमिनारचे अस्बेस्टॉस-सिमेंट चे पत्रे विकत घे. माझ्या आजोबांनी घराला बसवलेले सिमेंटचे पत्रे ...अजूनही शाबूत हायेत.
अरे खरंच की. मी ही चारमिनारचे पत्रे घेउन येतो.
चारमिनार...भारतातील सर्वाधिक विक्री असलेलं अस्बेस्टॉस सिमेंट उत्पादन
-
लहानपण देगा देवा

राघव's picture

14 May 2010 - 3:06 pm | राघव

खरंच उशीर झाला धागा बघायला.
जवळजवळ सगळे वर सांगीतलेले आहेच सगळ्यांनी!
पूर्वीचं रंगोली कोण कसं विसरलं बुवा! रवीवारी सकाळी ७ वाजता उठणं जीवावर यायचं पण रंगोलीसाठी म्हणून खास उठायचो! :)

राघव

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2010 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त स्मरणरंजन.... माझ्यावेळच्या कार्यक्रमांच्या आठवणी ताज्या झाल्या.

बिपिन कार्यकर्ते

स्वाती२'s picture

14 May 2010 - 4:08 pm | स्वाती२

काय छान आठवणींना उजाळा मिळाला.

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 5:07 pm | शिल्पा ब

कितीकाळ तर lifebouy दुसरा साबण कोणी वापरू शकतं यावर विश्वासच नव्हता....lifebouy अंघोळीला आणि कपडे धुवायला washing powder निरमा....
झी हॉरर शो राहिलाच...आणि lifebouy है जहां तंदुरुस्ती है वहा...

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

jaypal's picture

14 May 2010 - 4:52 pm | jaypal

कि खोज देखिल खुप आवडीने बघत असे :-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

पांथस्थ's picture

15 May 2010 - 1:11 am | पांथस्थ

मला नुकताच पुण्यात "भारत एक खोज" चा डि.व्ही.डि. सेट मिळाला.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

नम्रता राणे's picture

14 May 2010 - 5:09 pm | नम्रता राणे

छान चर्चा!!!!!!!!

ते दिवस पुन्हा भर्रकन डोळ्यापुढे आले.

त्यावेळी सुध्द्दा आवो मारी साथी, संताकुक्डी, अशा इतर भाषीक कार्यक्रमांचा जास्त भरणा पाहून मराठी भाषेवर अन्याय होत असल्याबद्दल दुरर्दशनचा राग यायचा... . साप्ताहीकी सुध्दा प्रथम हिन्दीत सादर व्हायची.. असो.

तात्या अभ्यंकरांचा याच धर्तीवरचा एक लेख यापुर्वी वाचल्याचे आठवतेय.

काहीही असो..चिमणरावांचे ... माफ करा.. चिंतामणीरावांचे या लेखाबद्दल धन्यावाद.

पूरबसे सूर्य उगा फैला उजियारा
जागी हर दिशा दिशा
जागा जग सारा
पूरबसे सूर्य उगा....

पेंटिंग करणारा मुलगा अणि फिरायला निघालेले आजोबा यांची!!

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

मस्तानी's picture

14 May 2010 - 6:16 pm | मस्तानी

तबस्सुम चा "फुल खिले है गुलशन गुलशन" ... रविवार सकाळी ७ वाजता येणारी "रंगोली" ...
एक इंग्रजी मालिका होती ... पण अभिनेते / अभिनेत्री हिंदी ... A ...full of Sky ... असं काहीसं नाव होत ... मिलिंद सोमण, राहुल बोस होते ते नक्की आठवतंय ... कुणाला आठवतंय का त्या बद्दल ?

तिमा's picture

14 May 2010 - 6:56 pm | तिमा

लई पावरबाज मेम्री हाय लोकानची ! मजा आली वाचताना. त्याही पूर्वीच्या काळात म्हणजे रेडिओच्या जाहिराती आठवल्या.
एक कुटुंबनियोजनाविषयी जाहिरात होती.
'आशीर्वाद देई बाळा सौख्यवंत हो तू, औक्षवंत हो तू |
हॅ, हॅ, हॅ, हॅ
काय रे दादा, नंदू आता तीन वर्षाचा झाला ना ?
अगं हो, आज तर त्याचा तिसरा वाढदिवस!
मग नंदूला आता बहिण नको का ?
ते तुझ्या वहिनीलाच विचार की!
सगळे जण कोरसमधे:
इश्यं ! दुसरं मूल आत्ता नाही तीन नंतर कधीच नाही.
तळटीपः आमच्या वर्गातली पोरे याची नक्कल करताना वहिनीच्या जागी मोलकरणीलाच विचार की असे म्हणत!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

मीली's picture

14 May 2010 - 8:50 pm | मीली

जुन्या सिरिअल्स चे फोटो सापडले होते पण काहीतरी एरर येते आहे....फोटो दिसत नाहीत...
वेळ मिळाला कि परत प्रयत्न करते.

अरुंधती's picture

14 May 2010 - 7:54 pm | अरुंधती

कोणाला अमृतमंथन मालिका आठवत नाहीए का? वसुंधरा पेंडसे नाईक असायच्या त्यात.... चर्चा चालायची संस्कृत साहित्यावर, मला तेव्हा त्यातले जाम काही कळायचे नाही. पण तिचा आवाज, वाणी, स्पष्टोच्चार, हसणे व लांबसडक केस फार आवडायचे!!! 8>

त्यानंतर मोहन गोखलेंची श्वेतांबरा व मिस्टर योगी मालिका, ओम पुरी दीपा मेहता ची
तमस, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, तृष्णा - संगीता बिजलानी होती त्यात, तितलियां नावाची एक सह्ही सीरियल लागायची. किट्टू गिडवानीचीही एक सुंदर सिरियल लागायची.... नाव आठवत नाहीए.... तिचीच व रोहित रॉय ची अजून एक सीरियल होती.... ती त्याची सावत्र आई असते....
रविवारी विक्रम वेताळ, दादा दादी की कहांनियां - अशोक कुमार, दादीमां के नुस्खे मध्ये दीना पाठक घरगुती औषधी उपाय सांगायची. महाभारत, रामायण....

हमलोग, बुनियाद, पल्लवी जोशीची एक सिरियल लागायची - त्यात ती गर्भार असते आणि तिची स्मृती गेलेली असते......नाव काय बरे?
किलबिल, संताकुकडी, आमची माती आमची माणसं, कामगारविश्व हे देखील भक्तीने बघायचो :)
बातम्या देताना अनंत भावे, प्रदीप भिडे, आकाशानंद, चारुशीला साबळे, भक्ती बर्वे वगैरे. इंग्रजीतून मीनू.
सुरभि, क्विझ टाईम, रविवार दुपारचे प्रादेशिक चित्रपट, शनिवार सायंकाळचे मराठी चित्रपट......... ये जो है जिंदगी तर खल्लासच! स्वरूप संपत च्या अजून अशाच एक-दोन सीरियल्स नंतर येऊन गेल्या.
होळीच्या वेळी भरणारे हास्यकवी संमेलन....
गजरा..... रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या....
व्यत्ययच्या पाट्या....
आपण यांना पाहिलंत का?..... त्या कुटुंबनियोजन, एकी हेच बळ इ. इ. संदेश देणार्‍या कार्टून फिल्म्स.... लई मजा!!! :-) :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विकास's picture

14 May 2010 - 9:00 pm | विकास

कोणाला अमृतमंथन मालिका आठवत नाहीए का? वसुंधरा पेंडसे नाईक असायच्या त्यात...

अर्थातच आठवते. तसेच शास्त्रीय संगितावरून कुठलातरी एक मराठीत कार्यक्रम असायचा. डॉ. मोहन रानडे मला वाटते त्याचे सुत्रसंचलन करायचे.

किलबिल, संताकुकडी, आमची माती आमची माणसं, कामगारविश्व हे देखील भक्तीने बघायचो

खरे आहे! यावरून रविवारची, "प्रतिभा आणि प्रतिमा" ही मालीका पण आठवली. अशाच दिवाळीच्या शनिवार-रविवारी पुल, श्रीकांत मोघे आदी दिग्गजांचे वार्‍यावरची वरात आणि एका रविवारची कहाणी बघितल्याचे आठवले.

बातम्या देताना अनंत भावे, प्रदीप भिडे, आकाशानंद, चारुशीला साबळे, भक्ती बर्वे वगैरे. इंग्रजीतून मीनू.

तसेच हिंदीतील हरीश भिमाणी, सरीता सेठी, इंग्रजीतील लोकू संन्याल, मराठीतील चारूशिला पटवर्धन, ज्योत्स्ना किरपेकर आणि अवघ्या महाराष्ट्राला चटका लावून गेलेली नंतरची विख्यात अभिनेत्री स्मीता पाटील यांनी दिलेल्या बातम्या पण आठवल्या...

बाकी या वृत्तनिवेदक-निवेदिकांच्या बाबतीत, चांगली पर्सनॅलीटी, स्टाईल वगैरे असूनही, "नाकावरून माशी हलत नाही" हा वाक्प्रयोग अक्षरशः खरा ठरायचा ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

मी ऋचा's picture

15 May 2010 - 11:54 am | मी ऋचा

आणि बातम्यांच्या आधी सुविचारांच्या पाट्या!!

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

Dhananjay Borgaonkar's picture

14 May 2010 - 8:02 pm | Dhananjay Borgaonkar

किट्टू गिडवानीचीही एक सुंदर सिरियल लागायची.... नाव आठवत नाहीए.... तिचीच व रोहित रॉय ची अजून एक सीरियल होती.... ती त्याची सावत्र आई असते....

स्वाभिमान. रोहित रॉयची सावत्र आई म्हणजे अंजु महेंद्रु.
आशुतोष राणा च त्यागी कॅरेक्टर लैच भारी होत त्यात.

भारद्वाज's picture

14 May 2010 - 11:06 pm | भारद्वाज

स्वाभिमानचं टायटल साँग द्या की रे कोणीतरी.....

-शान मुहाब्बत...नफरत प्यार...दौलत शोहरत..भागम भाग...

बेसनलाडू's picture

15 May 2010 - 5:56 am | बेसनलाडू

आणि त्यातच मनोज बाजपाईसुद्धा होता. वकिलाच्या भूमिकेत.
(स्मरणशील)बेसनलाडू

मी ऋचा's picture

15 May 2010 - 12:05 pm | मी ऋचा

नाही नाही, अन्जु महेंद्रु त्याची सख्खी आई असते (रंजना देवी) आणि किटु गिडवानी
सावत्र आई असते (स्वेतलाना नाव असतं तिचं).

मी ॠचा

र॑गुनी र॑गात सार्‍या र॑ग माझा वेगळा !!

jaypal's picture

14 May 2010 - 9:37 pm | jaypal

त्या सत्यजित रें च्या भयकथा आठवताहेत का कुणाला?
.
त्या कथा बघीतल्यावर चाळीतील कॉमन टोयलेट मधे जाताना चळाचळा कापत असे (भरीस भर म्हणुन बहुतेक वेळा गेलेला बल्ब कुणी लावायचा या वादात अंधारच असायचा)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/