सिगरेट सोडण्याचा सोपा मार्ग !

आंबोळी's picture
आंबोळी in जनातलं, मनातलं
14 May 2010 - 10:50 am

मित्रहो,

सिगरेट कशी सोडावी अश्या आशयाचा एक लेख मधे पहाण्यात आला होता. मी माझी सिगरेट ओढण्याची १४-१५ वर्ष जुनी सवय गेल्या जुलै महिन्यात सोडली. त्या आधी २ वर्षापूर्वी अ‍ॅलन कार नामक ग्रुहस्थाचे पुस्तक वाचून मी २ महिन्यांसाठी सिग्रेट सोडली होती. पण परत माज करून ओढायला सुरवात केली.
पण हे पुस्तक मला उपयोगी वाटले. आपल्यापैकी कुणाला सिग्रेट सोडायची असल्यास हे पुस्तक जरूर वाचून पहा. आणि फायदा झाल्यास नक्की कळवा

इथे पिडिएफ चढवायची सोय नाही त्यामुळे हे पिडिएफ स्वरूपातील पुस्तक मिमराठीवर चढवले आहे. तेथुन ते वाचता/तुमच्या कम्प्युटरवर उतरवून घेता येईल.
सिगरेट सोडण्याचा सोपा मार्ग !

(येवढा आमचा कंदील असताना फालतू सिगरेट पायी कुणाचा जीव गेलेला पहावत नाही हो)
आंबोळी

औषधोपचारअनुभव

प्रतिक्रिया

Pain's picture

14 May 2010 - 2:08 pm | Pain

बोटे फाकवा, सिगरेट सुटेल.

अरुण मनोहर's picture

14 May 2010 - 2:50 pm | अरुण मनोहर

एक संपल्या नंतर दुसरी पेटवे पर्यंत सुटलेलीच असते की. आणखी कितीदा सोडायची?

अनिल हटेला's picture

14 May 2010 - 8:07 pm | अनिल हटेला

हेच म्हणावंसं वाटतये....=))

असो..

सिगारेट अगर धम्रपान सोडा नावाचे धागे काढणार्‍यांचा णीशेध......
;)

फुकोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

शिल्पा ब's picture

14 May 2010 - 10:56 pm | शिल्पा ब

उगाचच कश्याला धरसोड करायची .....धरसोड वृत्ती चांगली नव्हे...चाललाय ते चालुद्या...फक्त आमच्यापासून लांब राहून फुंका...it won't matter...glob is already warmed up >:)

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/