बर्याच दिवसानी इकडे चक्कर मारु मारु म्हणत रहातच होत.
एका रविवारी जमवलच आणि निघालो.
घरुन उरकुन जायल १० वाजुन गेले होतेच. उन्हाचा तडाखा भारीच जाणवत होता.
निगडीतुन हे ठिकाण एकदम जवळ आहे. देहुरोड क्रॉस केला की सोमाटणे फाट्याच्या अलिकडेच घोराडेश्वराचा डोंगर आहे. पावसाळ्यात मस्त हिरवेगार डोंगर बघुन मजा वाटत असते पण आता ओकेबोके डोंगर.
तिकडे गेलो. दुचाकी सावली बघुन लावली. (हो नायतर नंतर पोळुन कोण घेणार?? ;) )
पायर्या बसवल्या आहेत आता. पण दुतर्फा झाडी नाहिये. मग काय उन्हाचा तडाखा सहन करत , कॅमेरा सरसावत निघालो. सोबत बायको आणि पोरगं होतच.
जाताजाताच एक कडड्ड्डक्क्क पाटी पाहिली. :)
काहि पायर्या चढुन झाल्या तो वरच चिरंजीवाने बाबा मला वर उचलुन घे चा घोषा लावला.
अरे अजुन थोडं अजुन थोडं अस बोल्लो पण नाही, तो हटुनच बसला होता. मग काय घेतल त्याला कडेवर आणि निघालो. अशावेळी तो बायकोकडे जात नाही. त्याला बाबाच पाहिजेच असतोच...
हे त्याला बायकोने शिकवुन ठेवल असेल काय?? :D
चांगलीच दमछाक झाली वर जाइपर्यंत.
पण वर गेल्यावर मस्त हवा होती. शिवाय शिवलिंग असलेल्या गुहेत मस्त थंडगार वातावरण असतं.
एक साधक तिथे एकाग्र चित्ताने जप करत होता आणि आमच पिल्लु तिथे (कितीही शांत केल तरी ) उड्या मारत दंगा करत होत.
काहि वेळाने तो साधक त्याचा जप पुर्ण झाल्याने तिथुन निघुन गेला.
मग आम्ही जरा निवांतपणे दर्शन घेतल. मुलाला देवबाप्पा नीट दाखवला.
तिथे बसुन ओमकाराचा जप केला आणी बाहेर आलो.
बाहरेच्या पारावार बसुन दमलेली (????) बायको आणि पोरग पाणी आणि कोल्ड्रिन्क पित बसले तोवर मी जरा फोटु काढण्याचा चान्स मारला.
हे बघा पत्थर के फुल :D
बाहेरुन गुहा अशी दिसते
थोडा वेळ थांबुन परत निघालो.
उतरताना मात्र पोराने त्रास न देता माकडउड्या मारत उतरण्याचा आनंद घेतला.
उतरताना निम्म अंतर उतरल्यावर एक दोन फटु काढले आणि घरचा रस्ता धरला.
इन्द्रायणी नदी
अलिकडेच ही गणेशमुर्ती बनवली आहे.
कडाक्याच्या उन्हात फार दुर न जाता , घरच्यानाही कुठेतरी फिरायच समाधान शिवाय फाफलत पायर्या चढल्याने होणारा व्यायाम असा दुहेरी फायदा करुन देणारी ही छोटीशी सहल.
प्रतिक्रिया
16 Apr 2010 - 11:27 pm | अश्विनीका
सुंदर परिसर दिसतोय. नागाची आणि गणपतीची भव्य मूर्ती आवडली. फोटो ही छान आले आहेत.
- अश्विनी
16 Apr 2010 - 11:48 pm | डावखुरा
गाभार्यातील पिंडीचे आणि शेवटचे दोन फोटो विशेष आवडले..."राजे!"
16 Apr 2010 - 11:55 pm | स्वप्नयोगी
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
17 Apr 2010 - 8:18 am | ज्ञानेश...
तो वेगळा, हा वेगळा.
एकंदर मस्त फोटू आणि लेख.
---------------------
17 Apr 2010 - 12:01 am | प्रियाली
भटक भुके हा शब्द फारच आवडला. एखाद्या सार्वजनिक क्षेत्रावर अशी पाटी कोणी लावू शकते याची अंमळ गंमतही वाटली.
फोटो छान आहेत.
17 Apr 2010 - 12:14 am | अनिल हटेला
गाभार्याचे आणी गणेशाचे फोटो खास आवडले.....
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D
17 Apr 2010 - 12:28 am | प्रभो
मस्त रे..
17 Apr 2010 - 2:47 am | गणपा
वा झकासराव एका चांगल्या ठिकाणाची ओळख करुन दिलित..
विहिंप-बजरंग दलाचा बोर्ड पण आवडला. :)
17 Apr 2010 - 5:34 am | शुचि
छान वर्णन आणि फोटो :) धन्यवाद.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला
काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
17 Apr 2010 - 7:57 am | मदनबाण
नावा प्रमाणेच वर्णन आणि फोटु झकास्स्स्स्स आहेत. :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
17 Apr 2010 - 9:03 am | प्रचेतस
झकासराव, झकास वर्णन.
घोराडेश्वर हे अगदी जवळचे सुंदर ठिकाण आहे. तो आहे १०/१२ बौद्ध लेण्यांचा समुदाय. बोर घाटावरून(२००० वर्षांपूर्वी पायी) येणार्यांचे विश्रांतीस्थळ. इथे फारसे कोरीव काम आढळत नाही. बहुधा निधीचा अभाव. शिवलिंग असणारी लेणीत पुर्वी स्तूप होता. त्याचे अवशेष अजूनही त्या गुहेत आढळतात. कालांतराने तिथे स्तूप जाउन शिवलिंगाची स्थापना झालेली असावी.
पाण्याची कोरीव टाकी पण आहेत. पण पिण्यायोग्य नाहीत.
-------------
(तिथे अनेक वेळा जाउन आलेला) वल्ली
19 Apr 2010 - 2:46 pm | धमाल मुलगा
धन्यवाद वल्ली,
ही माहिती अजिबात नव्हती. आम्ही आपले समजायचो की घोराडेश्वराला शिवरात्रीला तुफान गर्दी असते म्हणजे मावळातल्याच कोणीतरी शिवकालात वगैरे बांधलेलं मंदीर असेल.
पुन्हा एकदा धन्यवाद ह्या माहितीकरता.
17 Apr 2010 - 9:33 am | प्रकाश घाटपांडे
झकासराव चे वर्णन व वल्लीची माहिती आवडली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
17 Apr 2010 - 10:14 am | ओंकार देशमुख
छान माहिती दिलिये...फोटो पण छान आहेत..
त्या गणपतीच्या मुर्तीचे अजून डीटेल्स आहेत का?
ओंकार देशमुख
http://pune-marathi-blog.blogspot.com/
17 Apr 2010 - 10:17 am | योगेश२४
सगळे फोटो अफलातुन!!!
नविन जागेची माहिती (निदान मलातरी :)) मिळाली.
17 Apr 2010 - 3:41 pm | खादाड
माहिती आणि फोटो दोनिहि छान :)
19 Apr 2010 - 2:24 pm | झकासराव
धन्यवाद मित्रहो.
वल्ली छान माहिती दिलीत. :)
स्वप्नयोगी भंडारा डोंगर हा तळेगाव-चाकण रस्त्यालगत आहे. देहुगावातुन देखील जाता येइल भंडारा डोंगरावर.
पण घोराडेश्वर हा डोंगर मुंबई पुणे रस्त्यालगत सोमाटणे फाट्याच्या अलिकडे आहे.
ओमकार ती मुर्ती हल्लीच पुर्ण झाली आहे. बिर्ला ट्रस्टने ह्याच काम केल आहे अस ऐकीवात आहे.
मला ह्या मुर्तीपेक्षाही कोल्हापुरला जाताना कोल्हापुरच्या अलिकडे ८-१० किमीवर असलेली वडगाव फाट्याच्या जवळची गणपतीची मुर्ती जास्त आवडली आहे.
प्रियाली तिथे आधी बरेच जोडपी जात असत. मग चतुशृंगी मंदीराच्या मागच्या टेकडीवर जे प्रकार चालत तेच हळूहळु इकडेही होत आहेत हे लक्षात आल्यावरच ती पाटी लावली आहे.
अशा कडक पाट्यांची अनेक ठिकाणी खरतर गरज आहे.
19 Apr 2010 - 2:32 pm | मेघवेडा
मस्तच! बोर्ड लई भारी!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
19 Apr 2010 - 2:42 pm | बिपिन कार्यकर्ते
छानच झाली की सफर!!!
बिपिन कार्यकर्ते
19 Apr 2010 - 3:01 pm | धमाल मुलगा
झक्या, लेक्या लै भारी!
ह्या घोराडेश्वराच्या टेकडीशी आमच्या लै आठवणी बांधलेल्या हैत रे!
कंटाळा आला की गाडीला किक मारुन सगळे दोस्त घोराडेश्वरापाशी जायचो.
घोराडेश्वराच्या कमानीपासुन डावीकडे दिसणार्या टेकडीवर उभ्या कातळातुन कमीत कमी वेळात कोण चढतो ह्याची दर वेळी शर्यत. :)
मंदीराच्या गाभार्यात गेल्यावर तर काय ग्गारेगार वाटतं भाऊ....त्यात एखादा गोसावी आत बसुन 'ॐ नमः शिवाय' चा जप करत बसला असला तर एकदम भारुनच जायला होतं. :)
मस्त फोटो. बजरंगदलाची पाटी तर लय भारी!!! हेच गरजेचं आहे.
अवांतरः घोराडेश्वराहुन येता येता कधी अय्यप्पा मंदीरात जाऊन पहा रे! एकदम खल्लास वाटतं. अय्यप्पाच्या गाभार्यात दिवा नाही बल्ब नाही...पण दोन्ही बाजुच्या समयांनी उजळलेली काळोखातली मुर्ती पाहायला काय भारी वाटतं.
20 Apr 2010 - 12:06 pm | झकासराव
अय्यपा मंदिरात आधे एकदा जाउन आलोय.
आता पावसाळ्या जायच आहे तिकडे. :)
19 Apr 2010 - 8:14 pm | स्वाती२
छान फोटो आणि माहिती.
20 Apr 2010 - 12:27 pm | दिपक
छान फोटो आणि माहिती. अजुन येवुदेरे..
20 Apr 2010 - 12:24 pm | विशाल कुलकर्णी
मस्त रे झक्या !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
20 Apr 2010 - 12:39 pm | श्रीराजे
भाऊ......
फोटो एकदम झकास आले आहेत...!