बिलंदर - ४

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Apr 2010 - 3:36 pm

बिलंदर १

बिलंदर २

बिलंदर ३

इंटरव्ह्युनंतर शिर्‍या बाहेर पडला तो थेट समुद्रावर पोचला. डोक्यात विचारांचं थैमान माजलेलं.

सत्याचं नक्की काय झालं असेल? सत्या या क्षणी कुठे असेल? काय करत असेल? हजार प्रश्न..... हजार शंका.....

"पैसा कमाने आये हो दोस्त?"

कुठुनतरी प्रश्न आला आणि शिर्‍याने एकदम मान वळवून बघितले.

"कोण बे तू?"

"अरे दोस्त बोल रहा हुं तो दोस्त ही रहुंगा ना!"

"हे बघ राजा, आपण कुणाशीही अशी लगेच दोस्ती करत नाही. कोण आहेस आणि काम काय आहे ते बोल? मग ठरवेन दोस्त आहेस की......"

शिर्‍याच्या आवाजात खुन्नस होती.

"दोस्त... वहीसे हूं...जहा अभी तुम इंटरव्ह्यु देके आ रहे हो....! वैसे नाम इरफान है मेरा.........

आता मात्र शिर्‍या सावरून बसला.

"उस कंपनीसे क्या रिश्ता है तेरा?"

"दोस्त... वैसे तो कुछ भी नही, लेकीन बोले तो अपुन उनका छोटा मोटा सप्लायर कम केअर टेकर है! तु काम का बंदा लगा इस लिये तेरे को पिच्छा किया अपुन. बोले तो... वो कंपनीमें तो तेरा काम बननेवाला नै, तो अपनने सोचा क्युं ना अपने साथ जोड लु तेरे कु! क्या बोलता है.......! एक काम करते है... दारु पियेगा? हलक सुखा हो तो अपनेको कुछ नही सुझता है!"

संधी दार ठोठावत होती, ती सोडणार्‍यापैकी शिर्‍या नव्हता...

"पिलायेगा? आपल्याकडे काम नाय, काम नाय तर पैसा नाय? पैसा नाय तर जिंदगीत कायपण मजा नाय? तु दारु पिला. पण काम आपल्याला आपल्या लायकीचं वाटलं तरच करणार?"

"अरे चल यार, तु भी क्या याद करेगा , किस रईस से पाला पडा था? चल किसी वाईन शॉपसे पैले एक खंबा खरिदते है!"

"इसका मतलब हम किसी बार में नही बैठेंगे?" शिर्‍याने विचारले.

"बच्चा है रे तु, सच्ची बच्चा है.... तेरे को तराशना पडेंगा!ऐसी बाते बार में नही कही अकेलेमेंही की जाती है बच्चे"

एखाद्या लहान मुलाकडे बघुन हसावे तसा इरफान हसला. शिर्‍याने प्रचंड लाजल्यासारखा चेहरा केला. त्याचा या वेळचा अभिनय पाहून प्रत्यक्ष दिलीपकुमारही लाजला असता.

"सॉरी भाय, चुक झाली."

"चलता है, चलता है.... तेरको मालुम क्या? तेरेको पैली बार उदर देखा तब्बीच मै समझ गया, तु काम का बंदा है, नजर तय्यार हो गयेली है भाई अपनी. वो क्या बोलते है... चोर की गली चोरकोईच मालुम....."

मोठा जोक केल्यासारखा इरफान स्वतःशीच हसला. तसे शिर्‍यानेही त्याला साथ दिली. बाटली घेवून दोघे माहिमच्या किल्ल्यावर पोचले. तिथल्या मागच्या खडकात बसल्यावर इरफानने बाटली काढली. बरोबर एक बिस्लेरी आणि दाळ, कांदा, शेंगा असा चखणा होता. एकदा प्यायला सुरूवात झाली तसा शिर्‍या सावध झाला. त्याने आपला वेग कमी केला. आधीच बेसावध आणि दारुने अजुनच कामातुन गेलेला इरफान अजुनच बरळायला लागला.

"तुम ये काम कबसे कर रहे हो गुरू?" शिर्‍याने अदबीने विचारले तसा इरफानने विषय बदलला.

"वो छोडो यार, तुम इतना बोलो... पैसा कमानेका है?"

"बिल्कुल भाई, त्यासाठीच तर आलोय."

"किस हद तक जा सकता है?" इर्फानचा थंड स्वरातला प्रश्न.

शिर्‍या सावध झाला. समोरचा माणुस नक्की सांगतो तोच आहे कि आणखी कोणी?

"देखो भाई, मेरा हद बतानेसे पहले मै तुम्हारे बारेमें जानना मंगताय. खात्री काय की तु सांगतोस ते खरेच आहे? तु पोलीसांचा माणुस नाहीस कशावरुन? मी काहीतरी बोललो आणि तुम्ही लोकांनी मलाच अडकवला तर काय? प्लीज गलत मत समझना......!"

तसा इरफान हसायला लागला.

"अपुन ... हौर पुलीसका आदमी? मेरे भाय वेस्टर्न लाईनके किसी भी पुलीस स्टेशनमें जाके देख. नोटीस बोर्डपें अपुनका फोटो मिलेगा तेरेको. फिरभी तेरेको खात्री दिलाने के लिये एक रिसेंट किस्सा बताताय तेरेको......! जो अब्बी तक पुलीसकोबी मालुम नै..."

शिर्‍या लक्ष देवून ऐकायला लागला.

अब्बी कुछ दिन पैले कंपनीने नया लॉट बाहर भेजा. साला तेरेको पैले ये बताना पडेंगा की लॉट क्या होता है! तो सुन... "

"भाई, एक बात बताओ लेकीन, हम लोग आज ही मिले है... तुम मेरेको जानता भी नही है... फिरभी इतना भरोसा? ये खतरनाक हो सकता है भाई!"

शिर्‍याने मध्येच चेतावणी दिली तसा इरफान हसायला लागला.

पिछले १० सालसे इस धंदे में हू बच्चे. आदमी पैचानना मेरेकु आता है! हौर अगर तू नाटक करेगा तो उसका बी इलाज है ना मेरे पास.....

"इरफानने डाव्या हाताने बाटली सरळ तोंडाला लावली आणि उजव्या हाताने कंबरेला मागच्या बाजुला पँटमध्ये खोचलेले पिस्तुल काढून शिर्‍याच्या समोर धरले."

तसा शिर्‍या दचकुन मागे सरला...

"डर मत बच्चे सिर्फ दिखा रहा हूं!"

इरफान खदाखदा हसला. पोटात गेलेली दारु असर दाखवायला लागली होती. शिर्‍या नुसतेच पीत असल्याचे नाटक करत अजुनही पहिलाच पेग घेवुन बसला होता. इरफानने पिस्तुल परत पाठीमागे पँटमध्ये खोचले. पण यावेळेस दारुच्या नशेत पिस्तुल नीट खोचली न जाता गळून मागे पडले. पण इरफानच्या ते लक्षातच आले नाही. तो गटागटा दारु पीतच होता.

"हा भाई तुम कुछ बोल रहे थे...

"मै कुछ बोल रहा था... क्या बोल रहा था? वो साली बिपाशा क्या नाचती है ना.... बिडी जलाईले....इरफान उठुन ठुमके मारायला लागला.

"च्यायला याला चढली बहुतेक! अरे भाई, आप वो लॉट के बारे में....

"हा हा.. लॉट माने चमडी ! चमडी जानताय ना तू.... औरत जात....! तो ये कंपनी टेलेंट शो की आडमें लडकीया सप्लाय करती है... गल्फ कंट्रीज हौर युरोपमें. इस बार कंपनीने एक नये बंदे को इस धंदेमें डाल दिया. बोले तो बंदा पैलेसेइच कंपनीमें था, लिकीन ये कामके बारेमें नै जानता था! अच्छा बंदा था बेचारा....

शिर्‍याने कान टवकारले. मस्तकाच्या शिरा तडातडा उडायला लागल्या. बहुतेक त्याच्या इथे येण्याचा उद्देष्य सफल होण्याच्या मार्गावर होता...

"सतीश नाम था उसका.......

शिर्‍याने महत्प्र्यासाने स्वतःला आवरले. पण त्याच क्षणी इरफानचे नशीब फिक्स झाले होते. इरफान आपल्याच तंद्रीत बोलत होता.

"साले को भोत चरबी थी. बॉसने उसको अंदर लेके भोत बडा गलती किया. मालुम तेरेको... इस बंदेने तीन महिना गुपचुप तहकिकात करके सारी इन्फॉर्मेशन निकाल ली थी! कोई पुलीसवाला उसका साथ दे रैला था! लेकीन बॉसभी कच्ची गोलीया नै खेलेला है.. उसको पता चल गया तो उसने इस बंदे को फोरेन भेजने का प्लॅन बनाया! बंदा खुश्..बोले तो उसको इंटरनॅशनल लेवलका जानकारी निकालनेको मिलता ना! लेकीन बॉसने दिमाग चलाया.....

इस बंदेकी जगे दुसराच आदमी उसके नामपें बाहर चला गया! ये साला आठ दिन तक हमारे कब्जेमें था ! भोत टॉर्चर किया बॉसने उसको, अख्खी निकाला उसका, नाखुन उधेडा इतनाईच नै तो उसका पिसाब करनेका जगा भी जलाया! कैसा चिल्ला रहा था हXX! लेकीन जबानसे कुछ नै उगला. हमेरेको पक्का पता था की वो इन्फोर्मेशन अब्बी पुलीसके पास नै पोचा है... इसने कही तो छुपाके रख्खा है! लेकीन साला नै बोला..... हम लोग उसकी मेहबुबाको भी उठाके लाये....

"सतीशकी कोइ गर्लफ्रेंडभी थी !" शिर्‍याचा एकदम आश्चर्यचकीत स्वर...

नशीब इरफान दारुच्या नशेत होता म्हणून त्याच्या हे लक्षात आले नाही, नाहीतर लोचा झाला असता. तो तसाच टूनमध्ये बोलत होता.

"उसके सामने उसकी मेहबुबा को भी भोत तकलीफ दिया हम लोगो ने! सच बोलू तो तकलीप देनेका नाटक किया !" इरफान गालातल्या गालात हसायला लागला.

"नाटक?" शिर्‍याच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह....

"साला वो जिससे मोहोब्बत करता था, वो....... " इरफानने इकडे तिकडे पाहीलं... शिर्‍याला हळुच जवळ येण्याची खुण केली...शिर्‍या जवळ आला तसा इरफान जोरात ओरडला...."साली वो बॉस की सेक्रेटरी कम रख्खेल है... कामिनी ! बॉसनेच उसको इस बंदेके पिच्छू लगा के रखा था! इसका भांडाबी उसनेच फोडा था! लेकीन साला फिरभी नै बोला... बोलता था ये मेरे देशकी बहु-बेटीयोंका सवाल है..उसपें मेरा प्यार कुर्बान होता है तो हो जाये...! अपनका दिमाग घुमा हौ अपनने अपने हातसे उसके बदनमें चार गोली उतार दी!"

शिर्‍या नखशिखांत ताठरला. रक्ताचा तप्त प्रवाह मस्तकापासुन पायापर्यंत सळसळत गेला. शिर्‍याचा तापलेला चेहरा बघून इरफान दचकला...

"अरे यार तेरेको क्या हो गया! ठिक तो है ना तू...!"

"अं.. सॉरी भाई, वो खुनका सुना ना तो डर गया थोडा. " शिर्‍याने सावरून घेतले.

आता सत्या कुठल्या पोलीसांच्या संपर्कात होते ते ही शोधावे लागणार होते.

"भाई एक बात बताओ.. आप ये अपनी जान पें खेलके माल सप्लाय करतो हो! वो कहासे आता है...." शिर्‍याने दाणा टाकायला सुरूवात केली.

"बडे चालू हो दोस्त.. पैली मुलाकातमेंच मेरे पेट पें लात मारने की तय्यारी ! अरे ये बात अपनने अभी तक बॉस को नै बताया तेरे को बतायेगा क्या? पागल... बस इतना समझ ले इस धंदेमें हर बात के दल्ले होते है. उनके टचमें रैना पडताय! अपना भी एक नेटवर्क है! ये साले दल्ले अपनको लडकीया सप्लाय करते है! लेकीन ना उनको मालुम है ये माल किदरकु जाताय ना माल लेनेवालेकू मालूम ये माल किदरसे आताय! ये बात दोनोमेंसे किसी एक को भी मालुम हो गया तो समझ की इरफान खतम.. फिर अपनका जरुरत नै रहेगा इन लोगाको हौर ये लोग अपनको भी वो साले सतीशके पासमें पोचा देंगे! क्या समझा?"

"भोत रिक्स का काम है बॉस? तुमे तो बडे खतरनाक आदमी निकले."

इरफान खाली बघून पीत होता, त्यामुळे शिर्‍या फिरत फिरत त्याच्या पाठीमागे जावून आला हे त्याला कळालेच नाही.

"भाई, एक बात बोलो, इत्ते सारे दलालोंके नाम, पते सब याद कैसे रखते हो. तुम तो काँपुटरके माफिक दिमाग रखते हो यार !" शिर्‍याने पुढचे जाळे टाकले आणि मासळी अलगद अडकली.

"नै रे... इतना सब थोडेही याद रख्खेगा ! वो सब एक डायरीमें लिखके रख्खेला है, डायरी अपने एक खास आदमी कें पास रैता है बोले तो एकदम सेफ!"

"और वो आदमी कौन है, किधर रहता है!" शिर्‍याचा स्वर बदलला होता.

"येडा समझा है के मेरेको...जो बात बॉसको नै बतायी वो तेरको बताउंगा? तु मेरे साथ मिल जा, कुछ काम करके दिखा फिर धीरे धीरे सब पता चल जायेगा पने आप. क्या बोलता है?"

"तुने बॉसको नही बताया, लेकीन बॉसने कभी ऐसे नही पुछा होगा, जरा सर उठाकर देख मेरी तरफ...!" शिर्‍याचा आवाज बर्फासारखा थंड होता.

इरफाननें चमकून वर बघीतले... शिर्‍या समोर त्याचेच पिस्तूल घेवुन उभा होता.

"चल बोल....!"

"देख भाई मजाक नही.... वो कट्टा है, गलतीसें घोडा दब गया तो अपन टपक जायेगा. हौ वैसेभी डायरी जिसके पास है वो पक्का शैतान है.. अपनके बगैर डायरी किसीको नै देगा!" पिस्तूल बघितल्यावर इरफानची नशा फुर्र्कन उडून गेली होती, तो चांगलाच टरकला होता.

"वो मै देख लुंगा उसको कैसा हँडल करना है.....लेकीन इस वक्त तुने ना भी बताया तो भी वो मै पता कर ही लुंगा एक दो दिनमें. लेकीन फिर मेरको ये घोडा दबाना पडेंगा. तू चाहता कें मैं ये घोडा ना दबावू तो बकना चालू कर!"

शिर्‍याने पिस्तुलचे लॉक उघडले आणि पिस्तूल इरफानवर ताणले...

तसा इरफान बोलक्या पोपटासारखा बोलायला लागला. सगळी माहिती त्याच्या तोंडातून बाहेर पडली आणि शिर्‍याने पिस्तूल त्याच्या हातात परत दिलं. इरफान क्षणभर चमकला आणि लगेच त्याने ते पिस्तूल शिर्‍यावर रोखलं...

"खट खट..... नुसताच आवाज्...इरफानने चमकुन पिस्तुलाकडे बघितलं...

"अबे येड्या, त्यातल्या गोळ्या काढून टाकल्यात मी. तुला संपवायला मला माझे दोन हात पुरेसे आहेत साल्या."

तसा इरफान अजीजीच्या मुडमधे आला.

"देख भाई, तेरको जो इनफोर्मेशन चैये था, अपनने दे दिया, हां..?..दिया ना? अब अपनको जाने दे ना...! अपन किसको नै बोलेगा तेरे बारे में...!"

"आता मला येडा समजतो का? तु इथुन सुटला की आधी तुझ्या त्या मोमीनभाईला फोन करणार्, मणाजे मी तिथे डायरी घ्यायला पोचायच्या आधी तो माझ्या स्वागताला तय्यार असणार. हल बे... आणि असंही तुझं मरण मघाशीच निश्चित झालय जेव्हा तु मला सांगितलस की सत्याला तू स्वतःच्या हाताने मारलंस!" शिर्‍याचे डोळे अंगार ओकत होते. आवाज थरथरायला लागला होता......

"हXXXX ! सत्या माझा दोस्त होता, जिवलग दोस्त ! माझा बाप, माझी आई एवढंच काय स्वतःपेक्षाही जास्त जीव लावला होता त्याने मला. तुम्ही माझा दोस्त मारलात. आज या समुद्रासमोर या उफाळलेल्या लाटांना साक्ष ठेवून शपथ घेतो एकेकाला हाल हाल करून मारीन, सोडणार नाही. तुमची सगळी सिंडिकेट उध्वस्त करून टाकेन."

रागाच्या भरात शिर्‍या पुढे सरकला. आपला बलदंड हात त्याने भेदरलेल्या इरफानच्या गळ्यात टाकला.....

दुसर्‍याच क्षणी इरफानची मान अर्धवट लटकायला लागली. पण अजुन तो जिवंत होता. त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण तोंडातून शब्दच फुटेना.

"अहं इतक्या लवकर मरणार नाहीस तू.. अजुन दोन तीन तास तरी असाच तडफडत राहशील. त्या हिशोबानेच तुझी मान मोडलीये मी. माझ्या भावाला जसा मारलात ना हाल हाल करून, तुम्हा प्रत्येकाला तसाच हाल हाल करुन मारणार आहे मी."

शिर्‍याने त्याला खांद्यावर उचलुन घेतलं आणि एका मोठ्या खडकाच्या आड ठेवून दिलं. सकाळ होइपर्यंत तिथं कोणी फिरकणार नव्हतं. तोपर्यंत इर्फान तडफडत तडफडत मृत्यूची मागणी करणार होता.

शिर्‍याने एकदा त्याच्याकडे तुच्छतेने पाहीलं आणि त्याच्या अंगावर पचकन थुंकून तो मोमीनभाईला शोधायला निघाला !

********************************************************************************************

ट्रिंग ट्रिंग्.....ट्रिंग ट्रिंग्.....ट्रिंग ट्रिंग...

रिंग वाजतच राहीली तसे रोहीत भारद्वाजने वैतागून फोन उचलला.

"हॅलो रोहीत हिअर!"

"नमस्कार इन्स्पेक्टर सतीश रावराणे बोलतोय."

"बोलीये सर... किससे बात करनी है आपको?"

"रोहीत भारद्वाज तुम्हीच का?"

"बोल रहा हू... क्या चाहीये?"

"तुम...?"

"मतलब...?" रोहीत चमकलाच..

"मतलब आम्हाला माहिमच्या किल्ल्यामागच्या खडकात एक प्रेत सापडलय. त्याच्या खिशात रोहीत भारद्वाजचं कार्ड सापडलं म्हणुन फोन केलाय मी. तुम्हाला इथे चौकीवर यावे लागेल."

"अरे साब, यहा कितनेही लोग रोज नोकरी मांगने आते है..., और हजारो लोग खुदकुशीभी करते है! कहीसें मिला होगा उसको मेरा कार्ड.... इसमें मेरा क्या वास्ता.....? आप जानते है आप किससे बात कर रहे है? मेरा वक्त बहुत किमती है !"

रोहीतचा आवाज चढला होता.

"ए भडव्या, तू देव जरी असलास ना, तरी सुद्धा जिथे न्यायाचा प्रश्न आहे तिथे मी देवाला सुद्धा बोलवीन चौकीत. इन्स्पे. सतीश रावराणे म्हणतात मला. मी जर तुझ्या ऑफीसमध्ये आलो तर चार चौघात तुझ्या स्टाफसमोर तुझी बेअब्रू होइल म्हणुन इथे बोलवतोय. साडेअकराच्या आत मला इथे पाहीजेस तू. समजला? आणि हो ही केस आत्महत्येची नाही, कुणीतरी एका बेवड्याला भरपूर पाजून एखाद्या प्रोफेशनलप्रमाणे त्याची मान मोडली आहे. आणि ज्याची मान मोडलीय त्याचं नाव इरफान आहे...तोच बदनाम हिस्ट्री शीटर. मला वाटतं आता तुला प्रसंगाची गंभीरता कळली असेल!"

तिकडून फोन आदळला गेला.

रोहीतने लगेच दुसरा नंबर फिरवला...

"सुदेश, इरफान के साथ जहा जहा हमारे ताल्लुकात साबीत हो सकते है, वो सारे सबूत मिटा दो. इरफान मर चुका है! शायद कोइ हमारा दुश्मन पैदा हो चुका है! मै माहीम पोलीस चौकी जा रहा हू!"

**********************************************************************************************

"गावडे, हा इरफान ...! जर मी चुकत नसेन तर त्या सतीश देशमुखने वर्णन केलेला इरफान हाच असावा. खरेतर माझ्याकडे कसलाच पुरावा नाहीये. अगदी त्या रोहीतला सांगितल्याप्रमाणे त्याचे कार्ड वगैरे काही इरफानजवळ मिळालेले नाहीये. मागे सतीशने हे कार्ड मला दिले होते, त्यानंतर सतीश लंडनला गेला आणि मग त्याच्याशी असलेला संपर्कच तुटला.....

सद्ध्यातरी मी हवेतच तीर मारलाय. बघूया काही हातात येते का ते?

सतीशचं काय झालं असावं? तो लंडनमध्येच आहे की.....? तो जिवंत असेल ना...?

इन्स्पे. रावराण्यांच्या डोक्यात शेकडो प्रश्न भिरभिरायला लागले होते.

"परमेश्वरा त्या सतीशला जप रे. चांगला पोरगा आहे तो. त्याला जर काही झालं तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल, कायदा कंबरेला बांधून एकेकाला जित्ता जाळीन भर बाजारात.....!"

क्रमशः

विशाल कुलकर्णी

कथा

प्रतिक्रिया

गणपा's picture

9 Apr 2010 - 5:03 pm | गणपा

विंटरेस्टींग...
वाचतोय विशाल भौ..

हर्षद आनंदी's picture

9 Apr 2010 - 5:38 pm | हर्षद आनंदी

एक एक पदर उलगडत चालले आहेत तशी.. मजा येतेय

पण खुप्प वाट बघायला लागत आहे, त्यामुळे नाखुष :( :( :(

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

अनिल हटेला's picture

9 Apr 2010 - 6:04 pm | अनिल हटेला

नेहेमीप्रमाणे वेगवान कथानक...
पूभाप्र....

:)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D

प्रभो's picture

9 Apr 2010 - 6:30 pm | प्रभो

विशल्या, ह्यालापण क्रमशः..???

लवकर टाक रे पुढचा भाग....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

चेतन's picture

9 Apr 2010 - 7:02 pm | चेतन

हा भाग ठीक झालाय. मागच्या भागात अंदाज आल्याने एव्हढा ईंटरेस्टींग नाही वाटला

जरा लवकर पुढचा भाग टाका ना राव लय वेळ लावताय...

विंजिनेर's picture

9 Apr 2010 - 7:13 pm | विंजिनेर

मस्त रे भावड्या... मोठे भाग टाकतो आहेस म्हणून थोडा वेळ लागला तरी चालेल. तुझ्या वेगाने लिही.

तिमा's picture

9 Apr 2010 - 7:21 pm | तिमा

विशालभाऊ,
तुम्ही उत्तम कथालेखक आहात. एकदा वाचायला घेतल्यावर मधे सोडता येत नाही . तुमचा कथासंग्रह वगैरे प्रसिध्द झालाय का ? असल्यास कळवा.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

वाचक's picture

9 Apr 2010 - 8:19 pm | वाचक

आता ही सूडकथा वाटतेय, 'बिलंदर' नावाचा अणि शिर्‍याच्या करुन दिलेल्या ओळखीचा धागा आता संबंधित राहीलेला दिसत नाहीये. की कहानीमे ट्विस्ट ? :)

विशाल कुलकर्णी's picture

11 Apr 2010 - 11:19 am | विशाल कुलकर्णी

की कहानीमे ट्विस्ट ? >>>>

समदंच आता सांगुन कसं चालेल देवा.... ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आवशीचो घोव्'s picture

11 Apr 2010 - 1:58 pm | आवशीचो घोव्

पुढचा भाग येउद्या लवकरात लवकर... उत्सुकता वाढत चालली आहे