कवितेचा मार ! ! !

निरन्जन वहालेकर's picture
निरन्जन वहालेकर in जे न देखे रवी...
1 Apr 2010 - 10:25 am

कवितेचा मार ! ! !

जेष्ठ कवींचे संमेलन,
भरले श्रोत्यांनी प्रांगण.
कवींना चढे अगणित स्फुरण,
श्रोत्यांची स्थिती दारूण.

झडती कवितेच्या अगणित फैरी,
ए के – 47 च्या माऱ्या परी.
श्रोते जाहले सैरावैरा,
धडकी भरे त्यांच्या उरी.

आधीच समस्त श्रोते वेठीला,
त्यात एक कवी अवतरला.
छेडीला भीमपलास कवितेचा,
उतावीळ श्रोते भैरवीला.
.
जाहले तास दोन तास,
तरीही ना सरे त्याचा अट्टाहास.
वदे एक श्रोता शेजारी स्त्रीस
“ काही उपाय सुचवा हो “ !

वदली ती गौरांगना सत्वर,
“ तुम्हीच काही सुचवा गुरुवर,
सहते वीस वर्षे हा कवितेचा मार
उपाय परी ना गवसला आजवर. “

निरंजन वहालेकर

हास्यकविता

प्रतिक्रिया

शुचि's picture

2 Apr 2010 - 8:13 pm | शुचि

=)) झकास!!!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
हम नहीं वह जो करें ख़ून का दावा तुझपर
बल्कि पूछेगा ख़ुदा भी तो मुकर जायेंगे