नववधु
हातात हिरव्या बांगड्यांचा
चुडा भरला होता
तोच हात मेन्दीने
तेव्हा रन्गला होता
नथनीचा तुझ्या त्यावेळी
डउलच न्यारा होता
गालावरिल लालीचा
रन्ग लाजरा होता
डोळ्यांमधे निरागसता
पराकोटीची जपलेली
गोश्ट होती माझ्या प्रेमाची
तव ओ लपलेली
वाळ्वंटातही को तरि
हिरवळ थोडी असावी
रखरखत्या या जीवनात माझ्या
सावली तुझि मिळावी
अनिरुद्ध
(read me at http://aniruddhashete.blogspot.com/)
प्रतिक्रिया
1 Apr 2010 - 9:56 am | अनिरुद्धशेटे
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
- कवी सुरेश भट
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
1 Apr 2010 - 10:08 am | अनिरुद्धशेटे
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
कवी सुरेश भट
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
1 Apr 2010 - 4:23 pm | वेताळ
परवा कोणत्यातरी धाग्यात मराठ्याना परराज्यात लुटारु समजण्यात येते असा उल्लेख आहे.त्या करिता आज लोकमत कोल्हापुर आवृत्तीत आलेल्या ह्या दोन ओळी लिहित आहे.
तलवार तर सगळ्यांच्या हातात होती.
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती.
पण हिंदवी स्वराज्य स्थापन्याची इच्छा,
फक्त मराठ्यांच्या रक्तात होती.
वेताळ