मंडळी,
मला श्री सुरेश भट यांची 'लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी' ही अप्रतिम कविता पूर्ण व लिखित स्वरुपात हवी आहे. मला आवडलेल्या या कवितेच्या बर्याचशा ओळी मला माहित आहेत / पाठ आहेत पण तरीही पूर्ण कविता तिच्या मूळ स्वरुपात मला अद्याप तरी कोठेही मिळलेली नाही. तेव्हा या कवितेचे अचूक शब्द / ओळी कोणी देऊ शकेल काय किंवा निदान ही माहिती कोठे मिळेल हे सांगू शकेल काय ?
मिळणार्या माहितीसाठी आधीच धन्यवाद देतो.
- दिपोटी
प्रतिक्रिया
8 Mar 2010 - 6:39 pm | बिपिन कार्यकर्ते
सुधीर भट!!!! ???? सुरेश भट का? बाकी कवितेची अचूक प्रत माझ्याजवळ नाही.
बिपिन कार्यकर्ते
8 Mar 2010 - 6:44 pm | सागर
http://www.sureshbhat.in/
येथे भेट द्या ... अधिकृत प्रत मिळेन.
किंवा गूगल मधे 'लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी' असे मराठीतूनच शोधा, नक्की मिळेन
8 Mar 2010 - 6:48 pm | सागर
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
- कविवर्य सुरेश भट
8 Mar 2010 - 10:03 pm | प्रकाश घाटपांडे
हा पहा ठाण्यात झालेला अभिमान गीत सोहळा. संगीतकार कौशल इनामदार यांनी हे गीत सादर केले.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Mar 2010 - 11:39 pm | बिपिन कार्यकर्ते
हा घ्या मूळ दुवा...
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2010 - 6:11 am | दिपोटी
सागर, प्रकाश व बिपिन,
एवढ्या कमी वेळात माहिती मिळेल असे वाटले नव्हते. मिपाकी जय हो !
तुमच्या सहकार्याबद्दल भरपूर धन्यवाद !
- दिपोटी