||इंजिनिअरिंगचे श्लोक||
मना बारावीचं तुला टेन्शन भारी
रात्र रात्र जागून अभ्यास करी।
HSC नंतर CET एक्झाम
तरी बाळगी जवळी तू झंडुबाम॥1॥
करायाची तुजला असे रे डॉक्टरी
मार्कस् कुठे रे परी मार्कशीटवरी।
आता स्वप्ने पाहाणे सोडुनि द्यावे
आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावे॥2॥
मना देऊनि तें कॉलेजला डोनेशन
मिळेल रे तुला येथे ऍडमिशन।
लावूनि अथवा मोठा वशिला
स्वतःचा प्रवेश नक्की करावा॥3॥
इथे येऊन अभ्यास सोडूनि द्यावा
आणि टाईमपासही भावें करावा।
लेक्चरला बसणेही सोडूनि द्यावे
प्रँक्टीकल मात्र कधी न चुकवावे॥4॥
कधी लायब्ररीत जाशी पुस्तक आणाया
तरी येणा-या पोरींवर ठेव डोळा।
सदा मोबाईल आपला चालू असावा
हळूच आणि पट्कन फोटो काढावा॥5॥
सदा लँब असिस्टंटला वशिला लावावा
'प्रँक्टीकलचा' प्रयोग आधी पहावा।
'ओरल'ला मात्र चिडीचूप बसावे
मना श्रेष्ठ धारिष्ट्य जींवी धरावे॥6॥
मना सज्जना पंखे चालू ठेवावे
बाथरूमचे बल्बही आपले म्हणावे।
हॉस्टेलात तू जोरदार बाँब लावावे
आणि मध्यरात्री सर्वांना जागवावे॥7॥
सदा लेक्चर बुडवूनि बाहेर फिरावे
आणि कँटीनमध्ये 'वडापाव' खावे।
अभ्यासापासून दूरचि रहावे
दर शुक्रवारी सिनेमाला जावे॥8॥
मना मास्तरांचे कधी न ऐकावे
सांगतील त्याच्या नेमके उलटे करावे।
वेळेत कधी ना सबमिशन करावे
Term-work चे मार्कस् मात्र भांडूनि घ्यावे॥9॥
मना मानसी दुःख आणू नको रे
तुला एटीकेटीची चिंता नको रे।
जगी सर्व सुखी असा कोण आहे
'डिसेंबर'नंतर 'मे'देखील आहे॥10॥
सदा सर्वदा योग पार्ट्यांचा घडावा
विनाकारणी पैसा खर्ची पडावा।
'पी.एल्.' मध्ये पुस्तक उघडूनि पहावे
Syllabus Book देखील विकत आणावे॥11॥
मना सज्जना दोन लाखांत फक्त
तुला व्हावयाचे असे साधुसंत।
उद्योग सारे बाकीचे सोडूनि द्यावे
आणि इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यावे॥12॥
प्रतिक्रिया
3 Mar 2010 - 9:46 am | टारझन
वा चिर्कुट वा !! कवितेची पाककृती काय झक्कास जमलीये :)
जियो !!
- टारेश बाराकडवी
3 Mar 2010 - 10:06 am | विजुभाऊ
टारेश बाराकडवी
ठ्यॉ ठ्यॉ ठ्यॉ...=)) टार्या........ साल्ला आजच्या दिवसाची सुरुवात झाली
3 Mar 2010 - 6:17 pm | चिर्कुट
>>टारेश बाराकडवी
हे कळायला अंमळ वेळ लागला राव... ~X(
--मंदबुद्गी चिर्कुट