(शेवट)

केशवसुमार's picture
केशवसुमार in जे न देखे रवी...
3 Dec 2009 - 11:43 am

आमची प्रेरणा बेसनलाडू यांची सुंदर गझल शेवट

भात मी असा हाती घ्यावा..खाता खाता
ओघळ अन तेव्हाच गळावा..खाता खाता

सोबत घेतो तूप वरण अन लिंबू मी ही
असा रोज सहभोज घडावा..खाता खाता

रोज असा हा पंगतीमध्ये बेत बनावा
बोटांवरती स्वाद उरावा..खाता खाता

एक घास ही पुढे मला खाता ना यावे
अग्रह हा इतका न करावा..खाता खाता

खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता

तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर
डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता

विडंबन

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

3 Dec 2009 - 1:29 pm | श्रावण मोडक

तुमचीच वाट पहात होतो. ढेकर दमदार आहे!

बेसनलाडू's picture

3 Dec 2009 - 1:46 pm | बेसनलाडू

(तृप्त)बेसनलाडू

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Dec 2009 - 2:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

व्वा! आता वामकुक्षीची गरज आहे!

अदिती

सहज's picture

3 Dec 2009 - 2:15 pm | सहज

मस्त एखादे पान (विडा) लावले तसे विडंबन

क्रान्ति's picture

3 Dec 2009 - 9:06 pm | क्रान्ति

अगदी तृप्त करणारं वाफाळलेल्या गरम गरम वरणभातासारखं विडंबन! एकदम झक्कास! :)

क्रान्ति
अग्निसखा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Dec 2009 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त अजून येऊ द्या...!

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

3 Dec 2009 - 10:28 pm | मदनबाण

मस्त...

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 11:29 pm | विसोबा खेचर

खूप वाढले अग्रह अन, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला विडा मिळावा..खाता खाता

तृप जेवला "केश्या" आता पडतो क्षणभर
डुलकीने या शेवट व्हावा..खाता खाता

ए केश्या सुंदर लिहिलं आहेस रे! :)

(विडाप्रेमी) तात्या.

ज्ञानेश...'s picture

4 Dec 2009 - 12:40 pm | ज्ञानेश...

हे 'खरं' विडंबन! =D>

कानडाऊ योगेशु's picture

4 Dec 2009 - 1:11 pm | कानडाऊ योगेशु

शेवट
प्रेषक बेसनलाडू ( गुरू, 12/03/2009 - 11:41) .

(शेवट)
प्रेषक केशवसुमार ( गुरू, 12/03/2009 - 11:43) .

मोजुन दोन मिनिटांत विडंबन....!!!! :O

---------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

गणपा's picture

4 Dec 2009 - 2:42 pm | गणपा

मंग गुर्जी हायत्याची पोचलेलं.
हा आवांतर प्रतिसाद तर न्हवे :?

याला म्हणतात विडंबन.
मस्तच.

-माझी खादाडी.

ऋषिकेश's picture

4 Dec 2009 - 1:42 pm | ऋषिकेश

हा हा!
मस्त रुचकर विडंबन :)

ऋषिकेश
------------------
मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

अमोल केळकर's picture

4 Dec 2009 - 1:47 pm | अमोल केळकर

मस्त ! मजा आली :)

अमोल

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

(भातचाप्या)चतुरंग

नाखु's picture

5 Dec 2009 - 9:16 am | नाखु

गुर्जींचे फार दिवस्सा नि दर्शन.....

निवांत डुलकी (नादावलेला खुळा)

टुकुल's picture

5 Dec 2009 - 10:24 am | टुकुल

मस्त लिव्हलेस "केश्या" आता गुंगतो क्षणभर
या प्रतिसादाने शेवट व्हावा.. जाता जाता.

आमचा उगाच प्रयत्न

--टुकुल

केशवसुमार's picture

6 Dec 2009 - 7:26 pm | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार