काल डिस्नेचा 'लायन किंग स्पेशल एडीशन' चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो.
लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता.
खरतर ह्या अॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस. २ ऑस्करवर ह्या चित्रपटाने ताबा मिळवला ह्यात नवल नाही.
अफ्रिकेतील जंगलावर राज्य करणारा 'लायन किंग' मुफासा. त्याच्याकडे नव्या युवराजाच्या रुपाने 'सिंबा' चा जन्म होतो. सिंबाच्या जन्मामुळे मुफासाच्या नंतर सिंहासनाचा वारस होउ शकणारा सिंबाचा काका स्कार हताश होउन जातो. सतत वेगवेगळे कट रचणे, मुफासाचे वाईट चिंतणे आणी सिंहासनाची स्वप्ने पाहणे हा स्कारचा दिवसभराचा उद्योग असतो.
आपल्या मुलाची जिवापाड काळजी घेणे, जंगलातल्या बर्या - वाईट सर्व गोष्टींची त्याला ओळख करुन देणे हे मुफासाचे रोजचे काम. सिंबा भविष्यातला राजा आहेस, ह्या दृष्टीने तो त्याला तयार करत असतो. एका दृष्यात सिंबाला जिवावरच्या संकटातुन सोडवुन आणत असताना तो काहिसा रागावुन सिंबाला चार गोष्टी सुनावत असतो, ह्या गोष्टी ऐकतानाच लहानग्या सिंबाचा पंजा वडीलांच्या उमटलेल्या मोठ्या पंजाच्या ठशावर पडतो. ह्या अप्रतीम दृष्यात सिंबाचा चेहरा आणी दिग्दर्शक खुप काही शिकवुन जातात.
तर इकडे दिवसभर समवयस्क मैत्रीण नाला बरोबर मनसोक्त हुंदडणे आणी झाझु ह्या वडीलांना नेमलेल्या पोपटाकडून जंगलाची माहिती मिळवत राहणे हे सिंबाचे छंद.
ह्या स्कारचा तरसांवर भारी जीव. त्यांच्या मदतीने सिंबा आणी मुफासा ह्यांचा काटा काढुन जंगलाचा राजा बनण्याचे त्याचे स्वप्न असते. लवकरच स्कारच्या सैतानी मेंदुत असा एक कट शिजलाही जातो. आपल्या क्रुर आणी काहिशा विकृत तर्स मित्रांच्या सह्हायाने स्कार त्या कटाची जोरदार अंमलबजावणी करतो.
स्कारच्या 'कृपेने' संकटात सापडलेल्या सिंबाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुफासाला आपला जीव गमवावा लागतो. लहानग्या सिंबावर जणु आकाशच कोसळते. धरणीवर कोसळलेल्या आपल्या वडीलांना सिंबाचे उठवण्याचे प्रयत्न डोळ्याच्या कडा ओल्या करुन जातात. त्याच वेळी तिथे हजर झालेला स्कार, सिंबाला त्याच्या वडीलांच्या आणी पर्यायाने जंगलाच्या राजाच्या मृत्युला तो कसा जबाबदार आहे हे सुनावतो. आपण आपल्या वडीलांच्या मृत्युला कारणीभुत झालोय हे ऐकुन कोवळ्या सिंबाच्या डोक्यावर जणु आकाशच कोसळते. गोंधळलेल्या आणी घाबरलेल्या सिंबाला स्कार जंगल सोडुन लांब पळुन जायचा सल्ला देतो.. दुर खुप दुर निघुन जा असे तो सिंबाला सुनावतो.
मानसीक धक्का बसलेला, बावरलेला सिंबा जंगलातुन पळ काढतो. बरेच अंतर काटल्यावर दमलेला छोटासा सिंबा टिमॉन आणी पुंबाच्या छत्रछायेखाली येतो, आणी मग सुरु होते सिंबाच्या एका वेगळ्याच आनंदी आयुष्याची सुरुवात. 'हाकुन मतात मीन्स नो वरीज' असे जीवनाचे तत्वज्ञान टिमॉन आणी पुंबा सिंबाला शिकवतात. आयुष्यात मागे काय घडले ते विसरायला लावुन त्याला नविन आयुष्य जगायला शिकवतात.
अशीच काही वर्षे उलटुन जातात आणी तरुण, रुबाबदार सिंबाची अचानक बालमैत्रीण नालाशी गाठ पडते. सिंबाला जिवंत पाहुन नाला आनंदाने बेभान होते. सिंबाच्या पलायनानंतर जंगलाय काय घडले हे ती सिंबाला सांगते. स्कार च्या राजा होण्याने त्याच्या तरस मित्रांची चंगळ आणी इतर प्राण्यांचे होत असलेले हाल, नाश पावत चाललेले जंगल, शिकारीची कमतरता आणी सिंबाच्या आईला आणी कळपातील इतर सदस्यांना शिकारीला पाठवुन स्वत: आरामत जगत असलेला स्कार हे सर्व वर्णन ती सिंबाला ऐकवते.
स्वत:ला अजुनही गुन्हेगार मानत असलेला सिंबा परत येण्यास तयार नसतो पण नालाचे प्रेमही त्याला सोडवत नसते. अशातच एक दिवशी काहीशा ठाम निश्चयाने सिंबा आपल्या मातृभुमीत पाय ठेवतो आणी आपल्या राज्यावर हक्क सांगतो. स्कारवर विजय मिळवुन तो पुन्हा राजा बनतो आणी जंगलात पुन्हा नंदनवनही फुलवतो.
साधी सोपी आणी सुंदर कहाणी. पण छोट्या छोट्या प्रसंगातुनही खुप काही शिकवुन जाणारी. प्राण्यांच्या भावविश्वाचा आणी आपल्या मनाचा ठाव घेणारी.
ह्या राजाला आणी त्याच्या मनमोहक राज्याला आवर्जुन भेट द्याच.
प्रतिक्रिया
9 Nov 2009 - 2:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
:-)
10 Nov 2009 - 10:39 am | टारझन
जबरा रे पर्या लेका !! लॉयनकिंग्वा चा आपण लै मोठा फॅन !! तसेच सिंबाश्रीचा मित्र !!
हकुना मटाटा तर लैच्च भारी !!
- (प्युंबा) टारझन
9 Nov 2009 - 2:18 pm | नंदन
शिंव्हाची गोष्ट मस्तच. डिस्नेचं याच गोष्टीवरचं म्युझिकलसुद्धा छान आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
9 Nov 2009 - 2:18 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
9 Nov 2009 - 2:18 pm | बिपिन कार्यकर्ते
परा!!! लेका काय सुंदर रे... हा चित्रपट बघायचा राहूनच गेलाय. आता बघेनच... लेकराबाळासोबत. चित्रंही काय मस्त आहेत. वा!!! मजा आली. सगळ्यात जास्त आवडलेले चित्र म्हणजे लायन किंग आणि त्याचा छावा कड्याच्या टोकावर पाठमोरे बसलेले आहेत आणि सुर्योदय होत आहे... क्लास!!!
बिपिन कार्यकर्ते
9 Nov 2009 - 2:19 pm | अवलिया
हॅ हॅ हॅ
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
9 Nov 2009 - 2:24 pm | Nile
आता पर्यंत हिंडुन आलेल्या जंगलांपैकी हे सर्वात बेस्ट!
-राजहंस. ;)
9 Nov 2009 - 3:01 pm | निखिल देशपांडे
परा बघावच लागणार बे हे जंगल....
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
9 Nov 2009 - 3:30 pm | मस्त कलंदर
खरंच बघावंसं वाटतंय हे जंगल!!!!
बाकी.. बिकांनी उल्लेखलेला तो फोटोही मस्तच!!!!!
(अजूनही टॉम अँड जेरी बघताना कुणाच्याही हाकेला ओ न देणारी)
मस्त कलंदर.. :D
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Nov 2009 - 3:11 pm | हर्षद आनंदी
मी पण बघणार.. लहान होऊन बघणार.
भारी मज्जा टुक टुक टुक टुक
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
9 Nov 2009 - 3:34 pm | ज्ञानेश...
अप्रतिम आहे लायन किंग.
याची कथा थोडीशी 'मादागास्कर पार्ट २' शी मिळतीजुळती आहे. तोपण एक धमाल चित्रपट होता.
"Great Power Comes With Great Responsibilities"
9 Nov 2009 - 3:43 pm | भडकमकर मास्तर
:)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
9 Nov 2009 - 3:45 pm | भडकमकर मास्तर
:)
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
9 Nov 2009 - 4:21 pm | गणपा
हे अॅनिमेशन चित्रपट, यावर आमचा भारी जीव.
एका हुन एक सरस अॅनिमेशन २D आणि ३D गेल्या १-२ दशकात आले.
एकही सोडला नाही.
मग तो अगदी लायन किंग (भाग १ -भाग २ आणि भाग १ १/२) पासुन ते परवा पर्यंतच्या Cloudy with a Chance of Meatballs.
टॉय स्टोरी १-२-३, मॉन्स्टर्स इंक., निमो,हॉर्टन हिअर्स हु, रॅट्यॅटुई, आईस एज १-२-३, बोल्ट,मीट द रॉबिनसन्स , ओव्हर द एज, मादागास्कर १ -२, द इक्रेडीबल्स, वॉली, ओपन सिझन १-२ न संपणारी यादी आहे आवडलेल्या अॅनिमेशनपटांची....
9 Nov 2009 - 4:35 pm | विंजिनेर
नितांत सुंदर, अॅस्कर विजेते, सर्वात जास्त हिट अशी अनेक बिरूदे मिरवणारं अॅनिमेशन. एल्टन जॉनची सगळीच गाणी मस्त. डिस्नेच्या 'रेनेसांस कालखंडातील' एक अवस्मरणीय अॅनिमेशन (ब्युटी अँड द बीस्ट, बाम्बी, आणि शेवटी मुलान).
लायन किंगच्या 'प्रेरणे'बद्दल खूप गदारोळ झाला होता. कायदेशीर मुस्कटदाबी केल्याचे आरोपसुद्धा झाले होते. अधिक माहिती विकीवर मिळेल
10 Nov 2009 - 6:55 am | प्रभो
परा मस्त आहे रे पिक्चर...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
10 Nov 2009 - 8:00 am | लवंगी
खूप आवडता चित्रपट.. अजुनही मध्येच २-३ महिन्यातून एखाद्या शनीवारी मी आणी माझा सिंबा आवडीने हा चित्रपट पहात बसतो.. हकूना मटाटा लागल की अगदि गळा फाडून दोघे गाणं म्हणतो..
:)
10 Nov 2009 - 9:06 am | सहज
परा (असेही) परिक्षण करतो तर!
;-)
10 Nov 2009 - 10:19 am | मदनबाण
राजकुमारा मस्त लिहले आहेस आणि फोटोचा वापर तर सुंदरच... :)
मदनबाण.....
आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.