ऐका .....बिडी.

मीनल's picture
मीनल in जनातलं, मनातलं
1 Nov 2009 - 9:02 pm

मिसळपावचे एक सदस्य विमुक्त यांची अशीच एक गोष्ट माझ्या वाचनात आली.
यात साउंड मिक्सिंगसाठी खूप स्कोप वाटला. म्हणून ही कथा निवडली आणि माझ्या आवाजात ध्वनिमुद्रित केली .
मी वापरलेले रेकॉर्डींगचे साधन उत्तम नाही. शिवाय मी या क्षेत्रातली तरबेज किंवा अनुभवी नाही.
तरीही इथे टाकायचे धाडस करते आहे.
ऐका .....बिडी.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

कथा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

1 Nov 2009 - 9:19 pm | प्रमोद देव

पार्श्वसंगीतामुळे झालेली वातावरण निर्मिती आणि वाचन....सगळंच जबरदस्त!

कुणी निंदा,कुणी वंदा!
आम्ही जोपासतो
चाली लावण्याच्या छंदा!!

बाकरवडी's picture

1 Nov 2009 - 9:39 pm | बाकरवडी

छान !!
आकाशवाणीवरचे अभिवाचन ऐकतोय असे वाटले.
उत्तम !!

अजून चांगल्या कथेची ध्वनीमुद्रीका ऐकायला आवडेल.

:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी

बहुगुणी's picture

1 Nov 2009 - 10:31 pm | बहुगुणी

साउंड मिक्सिंगची प्रक्रिया, विशेषतः चपलांची 'करकर', छानच जमली आहे. पहिला प्रयत्न नक्कीच वाटत नाही, कथाकथन आवडलं.

मदनबाण's picture

1 Nov 2009 - 10:31 pm | मदनबाण

कथा आणि कथावाचन दोन्हीही सुंदरच... :)
आवाजात केलेला बदल तर एकदम भारी !!!
आपल्याला तर झपाझप चालणार्‍या पावलाचा आवाज लयं आवडला...

(कानसेन)
मदनबाण.....

अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

प्राजु's picture

2 Nov 2009 - 5:15 am | प्राजु

मस्त!! वातावरण निर्मिती मस्त जमली आहे.
- प्राजक्ता
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

2 Nov 2009 - 6:53 am | सहज

उत्तम अभिवाचन.

अजुन येउ दे!!

मीनल's picture

2 Nov 2009 - 8:41 am | मीनल

धन्यवाद.
मला अजून आभार मानायचे आहेत ते ...
१] प्राजू -साधारण एक वर्षापूर्वी तिनेच मला उतेजन दिले व मला अजूनही रेकॉर्डिंगसाठी मदत करत आहे.
२] विमुक्त- यांनी मला त्यांची गोष्ट रेकॉर्ड करायला परावानगी दिली.
३] देव काका-यांच्या मदती मुळेच ही गोष्ट मिपावर टाकता आली आणि तुम्हाला ऐकता आली.
पून्हा एकदा आभार.

मीनल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Nov 2009 - 9:07 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच! कथा आधी वाचली नव्हती, तुमच्यामुळे वाचली गेली.

मीनलताई, एक सूचना: काही वाक्य प्लेन टोनमधे वाचली तर जास्त चांगली वाटेल.

अदिती

जे.पी.मॉर्गन's picture

2 Nov 2009 - 11:22 am | जे.पी.मॉर्गन

एक नंबर प्रयत्न...... अजून काही जणं असाच आणि वेगळा प्रयत्न करतील ही अपेक्षा !

विमुक्त's picture

2 Nov 2009 - 7:03 pm | विमुक्त

झकास... background score आणि कथाकथन सहीच...

भडकमकर मास्तर's picture

3 Nov 2009 - 9:26 am | भडकमकर मास्तर

मजा आली..
चांगला प्रयत्न...
कोणते सॉफ्त्वेअर वापरले , त्याची तांत्रिक माहिती लिहिली तरी चालेल
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Nov 2009 - 9:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बॅकग्राऊंड वगैरे कशी अ‍ॅड करायची माहिती नाही. पण मास्तर ऑडेसिटी नावाचे सॉफ्टवेअर मी वापरलं आहे, पॉडकास्ट बनवण्यासाठी. विण्डोज, लिनक्स दोन्हीवर चालतं. वापरायलाही सोपं आहे. त्यात दोन वेगवेगळे ट्रॅक्स एकत्र करून पाहिलेले नाहीत.
आकाशवाणीवालेही तेच सॉफ्टवेअर वापरतात, असं गेल्याच आठवड्यात पाहिलं.

अदिती
स्वतःच्या मुलाखतीची जाहिरात.

मीनल's picture

3 Nov 2009 - 5:47 pm | मीनल

हो.
मी पण ऑडेसिटी वापरले. माईक उत्तम असेल तर रेकॉर्डिंग ही चांगल होत.
रेकॉर्डिंग झाल्यावरही त्यात अनेक बदल करता येतात.
मला ही बरेच टेकेनिक जमत नाही.शिकायचे आहेत.

मीनल.

स्वाती२'s picture

3 Nov 2009 - 6:01 pm | स्वाती२

मस्त!

मेघवेडा's picture

21 Dec 2010 - 8:42 pm | मेघवेडा

लै लै भारी हो मीनलतै. बॅकग्राऊंड स्कोअर, त्यामुळे झालेली वातावरण निर्मिती आणि कथाकथन सारं सारं अप्रतिम! फारच छान!

कथा आधी वाचलेली होती. रेफरन्स लागत होता पण नीट आठवत नव्हती, त्यामुळे अजून मजा आली! अजून येऊ द्या!

अवांतर :नानाचा 'बिडी' हा धागा वाचून बिड्यांबर काही माहिती मिळते का हे पाहण्यासाठी गूगलल्यावर हे मिळालं. !!!

मीनल's picture

22 Dec 2010 - 5:57 am | मीनल

अरे!!
आज एक वर्षानंतर धागा वर आला.
अवलियांच्या नविन धाग्यामुळे आज आठवण झाली की काय मेघवेडा यांना???

थोडी घाईघाईत वाचली गेली आहे असे वाटते..

कथाकथनात आपण नेहमी जशा गप्पा मारतो, तसा एक प्रकारच्या निवांतपणे वाचन होते आणि उत्कंठावर्धक कथा असली की वाचकांची/ श्रोत्यांची उत्सुकता ताणली जाते.

अप्पा जोगळेकर's picture

22 Dec 2010 - 8:29 am | अप्पा जोगळेकर

च्या मारी. हा पश्या असल्या कथा कवाधरनं लिहायला लागला. त्याचे लवली फोटू आणि डोंगरयात्रांची वर्णनं वाचायची सवय होती. लई भारी. कथा ऐकण्यापेक्षा वाचताना जास्त छान वाटली.