क्लायन्ट शी बोलताना
चेहेर्यावरचे उसने हसू
सांडत जाते.
वीकएंडचे
प्लॅनिंग गंडत जाते
तेवढ्यात ती बातमी येते.
कोणी एक आपल्यातलाच
रोजच्या पहाण्यातला
एक मेल धाडतो
तुमचे सहकार्य मिळाले म्हणूनच मी इथवर पोहोचलो.
अन्यथा होतोच काय मी? एक नेतका भटका
तुमचे ऋण आहेत अपरापार.
सोडताना कंपनी दु:ख अपरंपार
रहा इथेच म्हंटले तर केला
प्रतीप्रश्न आला ठेवलय काय इथे?
आहेत ते म्हणतात बरे झाले सुटलास.
आम्हीही घेऊ कधीतरी मोकळा श्वास.
नववधु ला विचारतात तसे विचारती त्यास
कसे आहे रे तिकडचे पॅकेज खास
तोही म्हणे मिळेल थोडी मोठी पैशाची रास.
अन दईल तिकडे ही त्रास
असाच खडूस तो तिकडचा बॉस
फोन येई तेवढ्यात कोणा
हॅलो...या .या ..स्पीकिंग.
सिन्स लास्ट ५ ईअर्स.
येस लूकिंग फॉर चेंज
वदे तो हास्य वदनाने.
नव्या सोमवारी त्याचेही मेल ये तसेच.
शब्द तसेच हास्य तसेच
वागणेही त्याचे कॉपी पेष्टच
एक येतो एक जातो
मॅनेजर धपडतो
प्रॉजेक्ट प्लॅन कोलमडतो
क्लायंट बिचारा चरफडतो
प्रतिक्रिया
29 Oct 2009 - 3:02 pm | sneharani
छान....
मस्त... एकदम हापिसातलीच...!
29 Oct 2009 - 3:03 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
29 Oct 2009 - 3:09 pm | अवलिया
मागच्याच वर्षी बदलली ना कंपनी ? लगेच परत !
अभिनंदन ! !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Oct 2009 - 3:44 pm | विजुभाऊ
नाय हो नाना तसे काही नाही
मागच्या वर्षी मी बैल होतो. http://misalpav.com/node/2606
आता बैल + बैलांचा मास्तर आहे.
ती आणि ही सर्वस्वी वेगळी परिस्थिती आहे
आत्ता कंपनी बदलायचे विचार अजूनतरी आला नाहीय्ये
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
29 Oct 2009 - 3:13 pm | विनायक प्रभू
की काय?
29 Oct 2009 - 3:17 pm | लबाड लांडगा
हेच बोल्तो.
ल्.लां.
29 Oct 2009 - 3:41 pm | टारझन
झकास !! कवितेचा खरा अर्थ काय ते सांगा बुआ आता!!
पब्लिक उगा खोटे नाटे अर्थ काढण्यात दंग होईल नाही तर !
-- (विजुश्रीचा मित्र) टार्या
29 Oct 2009 - 3:54 pm | llपुण्याचे पेशवेll
वाह वाह छान.. उत्तम आत्मपरीक्षण. विजुभौ तुम्ही आता चिंतन शिबीरं पण घेऊ लागलात वाटतं. छान छान.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
29 Oct 2009 - 4:09 pm | धमाल मुलगा
=))
पुप्या गप रे! चिंतन शिबिरांचं नाव काढू नकोस. मला आज उपास करावा लागेल आणि आमच्या हापिसापाशी शेळीचं दुध मिळत नाही.
विजुभाऊ,
कविता जोरात आहे की. (देऊ का देऊ घोकंपट्टी केलेला शब्दबंबाळ प्रतिसाद? ;) )
29 Oct 2009 - 4:41 pm | llपुण्याचे पेशवेll
हे बघ धम्या, सगळ्यांनाच चिंतन शिबिरात जाण्याचं आणि काही उच्चभ्रु ठिकाणी राहण्याचं भाग्यं लाभत नसतं. असो. दुसरा कोणतरी चुकून का होईला चिंतन करतो आहे यात आनंद मान. झालंच तर शेळीच्या दुधाऐवजी चितळे दूध पिऊन चिंतन कर, कसे?
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
29 Oct 2009 - 4:46 pm | परिकथेतील राजकुमार
धम्या दुबईतल्या काकांकडून तुझे पिणे आजकाल अंमळ वाढले आहे असे कळाले. काळजी घे.
©º°¨¨°º© हमाल मुलगा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
29 Oct 2009 - 4:53 pm | आनंदयात्री
खरेच खरेच !!
तो अंमळ जास्त पियाला लागलाय याची कुणकुण लागली होतीच .. काल भेटला तेव्हा म्हणत होता .. ही आमची मार्लबोरो .. हिच्यावर आमचा भारी जिव !!
29 Oct 2009 - 4:54 pm | धमाल मुलगा
वाक्य चुकतंय का रे?
"आमचा धम्या आजकाल फार पियाला लागलाय असं दुबईचे काका म्हणत होते" असं हवंय का ते? :?
29 Oct 2009 - 4:57 pm | प्रभो
तुला समजलं ना बे...खल्लास.....आजून एक मारायची..... :)
29 Oct 2009 - 5:01 pm | परिकथेतील राजकुमार
अगदी योग्य बोललास, पण मागाहुन कोणाचे प्रताधिकार मान्य करुन त्यास श्रेय देत बसावे लागु नये म्हणुन थोडा बदल केला आहे.
©º°¨¨°º© परालिया ©º°¨¨°º©
आमचे राज्य
29 Oct 2009 - 5:09 pm | llपुण्याचे पेशवेll
+१. आणि हवे तर चिंतन करण्यासाठी तुमच्या दुबैच्या काकाना शिवाजच्या बाटलीतून उंटिणीचे दूध पाठवायला सांग.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
29 Oct 2009 - 5:10 pm | अवलिया
एक सूचना -
हे संकेतस्थळ पूर्णत: एक खाजगी मालमत्ता असून येथे मिपारत्न दुबैचे काकांविषयी एकही गैरशब्द/विरोधी सूर/काही निंदा-नालस्ती विषयक कोणतेही लेखन सहन केले जाणार नाही! त्यांच्या सामाजिक/वैयक्तिक आयुष्याविषयी कुणाची काही विरोधी मते असतीलही आणि त्या मतांचा आदरही आहे. परंतु त्या व्यक्त करण्यास मिसळपाव ह्या व्यासपिठावर पूर्णत: बंदी आहे हे सर्व सभासदांनी कृपया लक्षात घ्यावे ही विनंती!
नाना भयंकर,
सदस्य, मिसळपाव डॉट कॉम.
29 Oct 2009 - 6:40 pm | धमाल मुलगा
एक्स्ट्रिमली सॉरी नाना ... मिसळपाव हे "माझं" आहे असं समजुन वावरत होतो :) शिवाय आपणही म्हणायचात "मिसळपाव आपलं आहे .." ह्यापुढे लक्षात ठेऊ !!
:) :) :) नक्कीच ह्याचे पालन करू .... पण जेंव्हा एखादा थोर संपादक आपला मित्र होतो तेंव्हा त्याच्या मैत्रीला वंदून त्याचे मित्र लिहीतात तेंव्हा तिथे जर कोणी त्याचा त्याचं कार्य सोडून वैयक्तिक (मी केला नाही, पण त्यापेक्षा कैक पटीनं अधीक) अवमान केला तर ते आम्हाला सहन करण्यापलिकडे काहीही करता येत नाही हो !!
मतांचा आदर केल्याबद्दल आभार नाना !! आपल्याविषयीचा आदर दुणावला !!
अवांतरः पळा आता .. नाय तं येतायत सगळेच बांबू घेऊन !!
--धमालन
साधासुधा गरीबबिच्चारा सदस्य, मौजे मिसळपाव.कॉम
29 Oct 2009 - 7:11 pm | दशानन
=))
=))
=))
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
29 Oct 2009 - 7:12 pm | llपुण्याचे पेशवेll
हाहाहा.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
29 Oct 2009 - 7:32 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
अक्षरशः खपलोय ... आज मी कृतकृत्य झालो ...
=)) =)) =)) आज डोळ्यातनं पचापच पिचकार्या उडाल्यात आनंदाश्रूंच्या (कृपया डोळे हे दोन भुवयांमधले .. आणि लांब नाकाच्या आजुबाजूचेच गृहित धरलेत)
-- जमाल मुंगळा
30 Oct 2009 - 9:51 am | विजुभाऊ
प्र का टा आ
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
30 Oct 2009 - 10:00 am | llपुण्याचे पेशवेll
कृपया सर्व सदस्यांनी अवांतर चर्चांसाठी खरडवही, व्यनि या पैसे खर्च करून निर्माण केलेल्या सुविधांचा वापर करावा. संपादक या अवांतर चर्चेकडे लक्ष देतील काय?
-खात्या
29 Oct 2009 - 3:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हळव्या ऐटीतल्या लोकांच्या कविता आम्ही वाचत नाही.
अदिती
30 Oct 2009 - 10:20 am | आशिष सुर्वे
विजुभाऊ, झकास कविता.. हापिसातली आजची बोहनी (सकाळ) तुमच्यामुळे छानच झाली!
असेच लिहीत रहा!!
-
कोकणी फणस