धूसर झाल्या नभी तारका
आसमंती बेहोष हिवाळी,
मेहंदी रंगल्या सोनपाऊली
पहाट घेऊन येई दिवाळी..
मंद तेवते दीप अंगणी
जणू नक्षत्रे उतरून आली,
रंग माखूनी अंगावरती,
जमीन सारी भरून गेली..
मंद सुगंधी अभ्यंगातून,
धुंद काया होत सकाळी
चंदन गंधी मुग्ध न्हाऊनी
यौवनास या नवी झळाळी..
रूणझुण पैजण कर्णफ़ुले अन्
सुवर्णमाला गळा ल्यायली,
निळ्या जांभळ्या गर्भ रेशमी
वस्त्रांकित ही तनू बावरी..
बिंदी रेखूनी भाळावरती,
काजळरेखा नयनी आली
साज सोवळा लेऊन दर्पणी
लज्जित बाला रूप न्याहाळी..
क्षणैक नजरानजर होऊनी
शृंगाराची मिळे पावती,
लाजलाजली रूपगर्विता
दिपोत्सवाचे रंग हासती..
- प्राजु
प्रतिक्रिया
19 Oct 2009 - 9:12 am | अवलिया
मस्त :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
19 Oct 2009 - 9:15 am | shweta
यमक जुळले म्हणजे मस्त ?
20 Oct 2009 - 2:39 am | लवंगीमिरची
प्रयत्न चांगला आहे.. परंतु बरेच जागा " प्राची ला गच्ची " सारख्या वाटत आहेत.
"मंद तेवते दीप अंगणी" मधला दीप तो दीप असायला हवा .. किंवा अनेक वचनी
मंद तेवतात दीप अंगणी हे कसे वाटते..
20 Oct 2009 - 4:04 am | सुबक ठेंगणी
"मंद तेवते दीप अंगणी" मधलं तेवते हे "तेवत असलेले" याअर्थी वापरलेलं आहे. तेवती आणि तेवेते दोन्ही बरोबर आहेत असं वाटतं.
19 Oct 2009 - 10:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्षणैक नजरानजर होऊनी
शृंगाराची मिळे पावती,
लाजलाजली रूपगर्विता
दिपोत्सवाचे रंग हासती
या चार ओळी भारी आहेत.
-दिलीप बिरुटे
19 Oct 2009 - 7:30 pm | दशानन
असेच म्हणतो...
:)
छान आहे कविता...
* सकाळी प्रतिसाद दिला होता व अवांतर पण नव्हता कुठे गायब झाला :?
देवा.. काय चमत्कार आहे हा ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
19 Oct 2009 - 10:13 pm | उग्रसेन
कविता उमजत नाय पर
वरील वळी आवल्ड्या.
19 Oct 2009 - 11:06 am | सुबक ठेंगणी
एकदम सही जमली आहे कविता...एकदम घरी जाऊन पोचलं मन!
सुंदर...
19 Oct 2009 - 7:27 pm | प्राजु
धन्यवाद. सर्वांचे मनापासून आभार.
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
19 Oct 2009 - 8:04 pm | संदीप चित्रे
>> क्षणैक नजरानजर होऊनी
शृंगाराची मिळे पावती,
लाजलाजली रूपगर्विता
दिपोत्सवाचे रंग हासती..
क्या बात है प्राजु ! कविता आवडली !!
19 Oct 2009 - 9:53 pm | मदनबाण
क्षणैक नजरानजर होऊनी
शृंगाराची मिळे पावती,
लाजलाजली रूपगर्विता
दिपोत्सवाचे रंग हासती..
मस्तच... :)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
19 Oct 2009 - 10:03 pm | भास्कर केन्डे
प्राजू तै,
अजून एक लै भारी कवीता. दीवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
19 Oct 2009 - 11:41 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त !!!
कविता आवडलीच. सगळे दृश्य डोळ्यासमोर उभे राहिले.
बिपिन कार्यकर्ते
20 Oct 2009 - 2:25 am | कोल्हापुरी राजा
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !
20 Oct 2009 - 2:25 am | कोल्हापुरी राजा
फारच सुन्दर कविता आहे. मन अगदी भुतकालात गेले !