करालदाढा पुलकित पेढा
चतुरचर्हाटी चंचलमूढा
गोष्टगुर्जरी सुष्ट आर्जवी
सर्जनदर्जन भजनगुंजनी
का सृष्टीच्या भग्नमंथनी
तगमग लगबग मूढचिंतनी
तिरकस हलकट कृद्धधरित्री
गडणी सजणी गडणीसजणी
नयनवल्लरी सहजचिल्लरी
पुनःपुन्हा ती उडनतश्तरी
लखलख चकमक मंददर्शनी
कांता करी आकांत आननी
शरणमंजिरी विदुरप्रस्तरी
धृष्टद्युम्नी चरितविलासी
ललाटज्वलिता दारूणपलिता
शिशिरवंचना टाहो फुटता
पतीशिराला अंकी धारण
सती करी ती पतीपरायण
ध्वनि अग्नीचे आकांडतांडव
मानवरूपी नाचे दानव
परंपरेची मर्कटकरणी
टाहो कैसा बधीरकर्णी
कशाकशाची ऐसी शिकवण
कोण करि हे मनात चिंतन
प्रतिक्रिया
4 Oct 2009 - 3:00 pm | बिपिन कार्यकर्ते
शेवटचे कडवे कळले...
परंपरेची मर्कटकरणी
टाहो कैसा बधीरकर्णी
कशाकशाची ऐसी शिकवण
कोण करि हे मनात चिंतन
त्यामुळे बाकीच्या कवितेत त्याच रोखाने काही अर्थ आहे का हे बघतोय. बाकी तुम्हाला ऑनलाईन बघितले आणि आज येतेय बहुधा एक कविता असे वाटले होते. तसेच झाले.
बिपिन कार्यकर्ते
4 Oct 2009 - 5:13 pm | टारझन
कविता वाचायला आवडली :) तसे ही मला कोनत्याही कवितेचा अर्थ लागणे अंमळ अवघडंच जाते.
शरदिनी ताई.. लिहीत रहा :)
-(गद्य प्रेमी) टारोबा रैटर
4 Oct 2009 - 3:14 pm | JAGOMOHANPYARE
पेढा हा शब्ददेखील सोडला नाही !
सुंदर................... :)
4 Oct 2009 - 3:36 pm | वेताळ
ही कविता कोणाला तरी उद्देशुन लिहिली असावी अशी मनात शंका येते.
कोणी तरी ह्या कवितेचे मराठीत भाषांतर करावे ही विनंती.
वेताळ
4 Oct 2009 - 3:51 pm | दशानन
=))
=))
=))
सहमत, आहे कोणी आहे का.....माई का.... **** ;)
ते जरा शब्दकोष मराठीत आला आहे म्हणे त्यात काही संदर्भ सापडतात का पाहतो... थांबा आलोच.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
4 Oct 2009 - 3:40 pm | सूहास (not verified)
स्त्रीजन्माच्या भोगावर आणी अल्लडतेवर हि कविता आहे आणी हे जर खर नसेल तर मला मराठी येते का ?? आणी येत असेल तर का येते ??
सू हा स...
4 Oct 2009 - 3:41 pm | अमोल खरे
पहिले कडवे- पेढा आणि सर्जन.म्हणजे त्या सर्जन ने काहितरी यशस्वी शस्त्रक्रिया केली असणार आणि त्याबद्दल त्याला पेढा मिळाला असणार. ( मुलगा झाला असेल पेढा दिला म्हणजे.नाहितर बर्फी मिळाली असती. )
दुसरे कडवे-सॄष्टी-ग्लोबल वॉर्मिंग वर असणार नक्की........सोप्पे आहे.
तिसरे कडवे-चकमक व आकांत-एन्काऊंटर वर असणार-सोप्पे आहे.
चौथे कडवे-विलासी-शिशिर- मलातर एकदम विलासराव देशमुख व मनसेचे शिशिर शिंदे आठवले. पण तसे नसावे.
पाचवे कडवे-सतीप्रथेवर आहे. एवढे नक्कीच कळले.
सहावे कडवे-बिपिनदांनी अर्थ सांगितला त्यामुळे ते कडवे वाचायच्या भानगडीत पडलो नाही.
कविता खुप आवडली बरं.
30 Oct 2010 - 1:06 pm | चिगो
कविता आणि विशेष करुन तुमचे रसग्रहण खुप आवडले...
(अवांतर : "कविता समजली" असं सांगुन "विद्वान" व्हायला मिळतंय, तर कशाला सोडा ?)
4 Oct 2009 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कविता पुन्हा पुन्हा वाचतोय पण अर्थबोध होणे जरा अवघड आहे. कोणा जाणकाराच्या प्रतिसादातून अर्थ लागला तर मदत होईल असे वाटते.
भजनगुंजनी, मूढचिंतनी, कृद्धधरित्री, गडणीसजणी,नयनवल्लरी, सहजचिल्लरी
उडनतश्तरी,मंददर्शनी, आकांत आणनी, मर्कटकरणी, या शब्दांचे अर्थ नाय सांगता येणार पण या शब्दांचा नाद मला आवडला.
-दिलीप बिरुटे
4 Oct 2009 - 5:31 pm | विसोबा खेचर
मलाही!
(नादवेडा) तात्या.
4 Oct 2009 - 6:24 pm | चतुरंग
कविता पृथ्वीसंबंधी आणि एकूणच नियतीसंबंधी आहे.
मला किंचित लागलेला अर्थ असा -
नियतीच्या करालदाढा पुलकित अशा सजीवरुपी पेढ्याचा घास घ्यायला टपलेल्या असतात.
तिरपी आणि सातत्याने फिरणारी पृथ्वी ही सततच्या उत्पत्ति, स्थिती, लयाचे कारण ठरते.
पोटातल्या सततच्या लावारस मंथनातून ज्वालामुखीचे उद्रेक होतात आणि भूकंपाने प्रस्तर दुभंगून जातात.
मानवाच्या मर्कटलीलांना निसर्गाने दिलेले हे उत्तर आहे. पण एवढा विचार कोण करणार.
(अनेक नादमय शब्दांच्या तुकड्यातुकड्यात कळले आहे असे वाटत असतानाच सटकणारा गुळगुळीत अर्थ भरलेली नादखुळी कविता! :()
(नादावलेला)चतुरंग
4 Oct 2009 - 6:27 pm | चन्द्रशेखर गोखले
अर्थ हाताला लागत नाही , परंतू वाचल्याशिवाय रहावत नाही, हे शरदिनींच्या कवितेचे वैशिष्ट्य असते.
5 Oct 2009 - 6:11 pm | अनिल हटेला
हीच गत आम्हा पामरांची झालीये...
असो ....
येउ द्यात अशा आगळ्या कविता....
(शरदीनी ताईंच्या कवितेचा पंखा ( उलटा लटकलेला))
बैलोबा चायनीजकर !!!
I drink only days ,which starts from 'T'...
Tuesday
Thursday
Today ;-)
4 Oct 2009 - 7:02 pm | सखाराम_गटणे™
तुमच्या कवीता चांगल्या असतात. पण सम्जत नाहीत. पण नादमाधुरयामुळे, आम्हाला 'आ आंटे; सार्ख्या तामिळ गाण्यासारखा आस्वाद घेतो.
4 Oct 2009 - 9:08 pm | मीनल
तुमच्या प्रत्येक कविता अर्थ शोधायला भाग पाडतात.
शब्दांचे नाविन्य हे त्याचे कारण असू शकेल.
पण केवळ तेच एक कारण नाही हे निश्चित.
दुसरं काय असू शकेल? :?
कदाचित नदमयता,लेखन प्रकार, आपली कवयित्री म्हणून असलेली इमेज की अजून काही?
मीनल.
4 Oct 2009 - 9:15 pm | श्रावण मोडक
वाचली. नादमाधुर्याचा लाभ घेतला. अर्थ लावण्याचा निरर्थक प्रयत्न करत बसलो नाही.
5 Oct 2009 - 11:58 am | सुबक ठेंगणी
मी पण अगदी असंच केलं...
5 Oct 2009 - 12:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या शब्दरचना (न समजताच) आवडल्या.
हे कडवं का कोण जाणे ओळखीचं वाटलं.
करालदाढा हा तुमचा शब्द पुन्हा एकदा वाचला. तुम्हाला विशेषत्वाने आवडतो का हा शब्द?
अदिती
(सभासद, wpta क्लब)
6 Oct 2009 - 7:25 pm | धनंजय
कडवी वाचली, पण अर्थ लावून घेतला नाही.
5 Oct 2009 - 11:26 am | दिपाली पाटिल
>>करालदाढा पुलकित पेढा
म्हणजे पुलकीत झालेला पेढा दाढेखाली कराकरा खाल्ला असं आहे की अजुन काही अर्थ आहे?
>>तिरकस हलकट कृद्धधरित्री
बापरे @)
दिपाली :)
5 Oct 2009 - 3:57 pm | विसोबा खेचर
वा शरदिनी!
सुंदर नादमयी कविता. एक वेगळीच कविता वाचल्याचा आनंद झाला! जियो....!
तात्या.
9 Oct 2009 - 2:18 pm | शरदिनी
धन्यवाद तात्या
5 Oct 2009 - 4:52 pm | गोगट्यांचा समीर
कवितेतली पहिली पाच कडवी ही एक एक घटना सांगणा-या आहेत असं वाटलं...आणि शेवटचं कडवं हे गोषवारा वाटत आहे..
अवांतर :
धृष्टद्युम्नी म्हणजे द्रौपदी का ??
5 Oct 2009 - 10:33 pm | प्राजु
शब्दरचना छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
6 Oct 2009 - 1:40 pm | वाहीदा
पतीशिराला अंकी धारण
सती करी ती पतीपरायण
ध्वनि अग्नीचे आकांडतांडव
मानवरूपी नाचे दानव
परंपरेची मर्कटकरणी
टाहो कैसा बधीरकर्णी
कशाकशाची ऐसी शिकवण
कोण करि हे मनात चिंतन
सुंदर काव्यरचना !! शेवटचे दोन कडवे आवड्ले , आपल्या परीने त्याचा अर्थ लावला पण तुमच्या कवितेचा मतितार्थ तुम्ही आम्हास सोप्या पध्दतीने समजवून सांगावा हि विनंती.
तुमच्या काव्यरचना नेहमीच विचार करण्यास भाग पाडतात. :-) नेहमीच्या रटाळ शब्दांच्या बरेच पलीकडचे ... म्हणूनच तुमच्या कविता न चुकता मी वाचते जरूर :-)
~ वाहीदा
तुम्हारी नज्म ऐसी की हर लब्ज पे दम निकले,
बहुत निकले नज्म के मतलब ... लेकिन फिर भी सही न निकले :-)
29 Apr 2010 - 10:55 pm | डावखुरा
रचना छानच...
बाळ सिताराम मर्धेकरान्च्या कवितेची चाप दिसुन येते....
{न्हालेल्या जणु....}
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
31 Oct 2010 - 8:47 pm | स्वानंद मारुलकर
ही कविता पंच-कन्यकांवर आहे काय?