(टुर्र)

लंबूटांग's picture
लंबूटांग in जे न देखे रवी...
1 Oct 2009 - 8:00 pm

(मला कवितेतले काहीही कळत नाही त्यामुळे मी कधीही काव्य विभागात फिरकत नाही. आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि आमचा कमी झोपेचा त्रास अजूनच वाढला. मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला. त्यांची पूल ही कविता पाहून एक विडंबन आमच्यातल्या सुप्त विडंबन्कारास स्फुरले. आम्हाला आमच्या आयुष्यातली पहिली कविता लिहीण्यास कच्चा माल दाखवल्याबद्दल टारोबा चे विशेष आभार ;) )

उतरत्या लिफ्ट्मधले निष्फळ उसासे
अन नाभीखाली डुचमळणारे खाद्य भरपूर
टुर्र टुर्र

इवल्याशा जागेतली अस्वस्थ तगमग
पण अत्तराच्या वरताण ठरलेले कालचे तंदूर
टुर्र टुर्र टुर्र

असतोच दडलेला काहींच्या पोटात
आतल्या आत ठुसठुसणारा उग्रगंधित धूर
टुर्र टुर्र टुर्र टुर्र

भयानकबिभत्सविडंबन

प्रतिक्रिया

चतुरंग's picture

1 Oct 2009 - 8:06 pm | चतुरंग

शरदिनींच्या कविता इतकी आदिम प्रेरणा घेऊन येतात की भलेभले विडंबनाच्या तोंडी दिले जातात! ;)
लंबूटांग तुझे ह्या प्रांतात स्वागत असो. आल्याआल्याच तू फटकेबाजीची चुणूक दाखवली आहेस! लगे रहो! :D

(विडंबनपंथानुगामी)चतुरंग

गणपा's picture

2 Oct 2009 - 3:08 pm | गणपा

आमचे मित्र ही आणि ही सम्राट टारोबा ढेकर यांनी आम्हाला शरदिनी यांच्या कवितांचा खजिना दाखवला आणि मागील २-३ रात्री जागून अथक परिश्रम करून आम्ही त्यांच्या कविता वाचल्या आणि अथक परिश्रम करून अर्थ समजण्याचा प्रयत्न केला.
आय्च्यान काल हेच करत होतो :)

प्राजु's picture

1 Oct 2009 - 9:45 pm | प्राजु

=)) =)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

1 Oct 2009 - 10:47 pm | टारझन

लंबुशेट,

हा प्रतिसाद खास तुझ्यासाठी !

हे "शरदिनी ताईंचे" च्या कविता कशाही असो किंवा नसो, त्याचे काही नाही.

मी आजवर मिसळपावावर, किंवा इतर कुठेही वाचलेलं, सर्वात हिणकस काव्य विडंबण आहे.

जियो लंबुशेट, जियो !!!!!

आजकाल हे विडंबकांचे लोण पसरले आहे (मुख्यतः आद्यगुरू चतुरंग रावांनी विडंबण देखिल आज पाप्युलर होऊ शकते, असे दाखवून दिल्यानंतर, अनेकांना आपण पद्य विडंबक आहोत, ह्याचा साक्षात्कार झाला आहे) त्यामुळे बाटली ला बाटली , बै ला बै जोडून पद्य विडंबणांचा घाणा सुरू केलाय बर्‍याच लोकांनी. कुणी केसुंची भाराखडी वाचून आणखीच राडा घातला आहे, विडंबणांचा

ह्या अशा वातावरणात, तुझं हे नितांत सुंदर विडंबण पोट साफ करते. "विडंबणच पाडायचं ना? हे घ्या !" असा अभिनिवेश नाही. हिण, हिणकस, मोजके आणि अचूक शब्द, उगाच अलंकार ठासून भरणे नाही, शब्दालंकार तर नाहीच, पण अर्थालंकारही नाहीत. साधं सोपं, मनाला भिडणारं विडंबण.

बस बॉस, आज दिल भर आया ! लंबुटांग माझा खूप जवळचा मित्र आहे, हे सांगायला मला नेहमीच अभिमान वाटलेला आहे. आज तो तुमने चार पकाव लोग के मुह पे ताला लगा दियेला है !

-- आंबेचोख्ता
(आमचेकडे आनंदावर विरजन घालून तयार दह्याचं लोणी टाळूवर लावून मिळेल, आजंच खपणार्‍यांना घसघशीत सुट )

मिसळभोक्ता's picture

1 Oct 2009 - 11:15 pm | मिसळभोक्ता

टार्‍या,

जरा बाहेर भेट.

लंबू,

विडंबन झकास.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज's picture

2 Oct 2009 - 8:06 am | सहज

लंबूटांग विडंबन व टार्‍या प्रतिसाद दोन्ही भारी!

Nile's picture

2 Oct 2009 - 11:21 pm | Nile

पुर्णतः सहमती!

अवलिया's picture

1 Oct 2009 - 11:06 pm | अवलिया

चालु द्या ! :)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विसोबा खेचर's picture

2 Oct 2009 - 12:33 pm | विसोबा खेचर

जहबहर्‍या....! :)