माहित नाही

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in जे न देखे रवी...
29 Sep 2009 - 9:31 am

(प्रेरणा: समझनेवाले, समझ गये है, ना समझे वो अनाडी है)

माहीती नाही,
कोण ते लोक, ज्यांच्या
प्रेमाला प्रेम मिळाले....

आम्ही तर फक्त,
कळ्या मागितल्या,
पण मिळाले, काट्यांचेच हार

निघून गेला....
निघून गेला.....

निघून गेला, प्रत्येक मित्र
देऊन, दोन क्षणांची साथ
वेळ कुणाला, इथे जो देतो,
वेड्यांचीही साथ

मला तर माझी छायाही
नेहमीच मिळाली बेजार

आम्ही तर फक्त,
कळ्या मागितल्या,
पण मिळाले, काट्यांचेच हार

ह्यालाच जीवन म्हणतात तर
असेच जगुन घेऊ
तक्रार नाही करणार
ओठ शिवून घेणार
अश्रू पिऊन घेऊ

दु:खाला नाही घाबरणार
कारण शंभरदा ते मिळणार

आम्ही तर फक्त,
कळ्या मागितल्या,
पण मिळाले, काट्यांचेच हार

हाय काय अन नाय काय.....

(आदरणीय गोळे काका, आणि आदरणीय सामंतकाका, आपल्या आवडत्या हिंदी/उर्दू रचना कृपया आम्हास कळवाव्यात, आम्ही त्या सर्व रचनांचीशुद्ध मराठीत मोडतोड, उर्फ भाषांतर, करून देऊ. आणि सर्व भाषांतरे, उर्फ मोडतोड मूळ चालीत म्हणता येईल, ह्याची ग्यारंटी इथे मिळेल. ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय. धन्यवाद.)

बिभत्सकविता

प्रतिक्रिया

लवंगी's picture

29 Sep 2009 - 9:43 am | लवंगी

:|

टारझन's picture

29 Sep 2009 - 9:49 am | टारझन

काल जोरदार शस्त्रपुजा झालेली दिसतेय .. आणि धार वगैरे सुद्धा लावलीय वाट्टं
कालपासून एकदम कल्ला !!

-(मिभोश्रीचा मित्र) टार्‍या

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 9:50 am | मिसळभोक्ता

अशा आकसपूर्ण प्रतिसादांना आम्ही उपप्रतिसाद देत नसतो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

टारझन's picture

29 Sep 2009 - 1:09 pm | टारझन

हॅहॅहॅ .. .हे म्हणजे त्या बिपासा बासू च्या "राज" पिक्चरमधल्या "यहां पे सब शांती शांती है " गाण्यासारखं झालं ..

-टारझन
(आमच्याकडे आनंदावर विरजन घातलेल्यामुळे तयार दह्याचं घुसळून लोणी करून टाळू वर लावून मिळेल , आजच खपणार्‍यांसाठी/ निवर्तणार्‍यांसाठी घसघशीत सुट )

विसोबा खेचर's picture

29 Sep 2009 - 9:59 am | विसोबा खेचर

जबरा..!

आवडले. =D>
वेताळ

अवलिया's picture

29 Sep 2009 - 10:03 am | अवलिया

हॅ हॅ हॅ
मस्त!

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

घाटावरचे भट's picture

29 Sep 2009 - 10:16 am | घाटावरचे भट

असेच म्हणतो...

असं संपूर्ण वाक्य शीर्षकात न टाकल्याबद्दल मिभोकाकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

आपल्यासारख्या जाणत्यांकडून सुचवणी आली ह्यातच माझ्या लेखनाचे पनीर झाले.

(चीज ला शुद्ध मराठीत पनीर म्हणतात ना? चुकून पणीर लिहिनार होतो, पण ते बाळबोध ठरले असते. आनि त्यामुळे उपहासात्मक. अगा बाबो !!)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

मिसळभोक्ता's picture

29 Sep 2009 - 2:30 pm | मिसळभोक्ता

(आणि आमच्या आजोबा-सभासदाकडून एक स्ट्र्याटेजी सर्वांना समर्पण.. आपला धागा खाली जात असल्यास हे आजोबा लोक आभार मानून आपला धागा वरच्यावर वर आणतात..) धन्यवाद.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पाषाणभेद's picture

29 Sep 2009 - 2:40 pm | पाषाणभेद

लय भारी रे मिभो भाऊ. लई दिसापासून हासलो नव्हतो. माझे तोंड जागेवरच आहे याची प्रचितीदिल्याबद्दल ढन्यवाद.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

चतुरंग's picture

29 Sep 2009 - 4:15 pm | चतुरंग

म्हटल्यावर म्हणालो कोणाला खपवलाय बघूयात! येऊन बघतो तो प्यासा झालेल्या मिभोंनी चक्क साहिरच्याच शेरवानीला हात घातलेला! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, एकदा का मिभो विरजण लावत सुटले ना की काही खरं बघ! कुणीतरी त्यांच्या हातून ते दह्याचं पातेलं काढून घ्या रे! :T )

(तुपकट)चतुरंग

विनायक प्रभू's picture

29 Sep 2009 - 5:20 pm | विनायक प्रभू

असेच गाणे मी मराठीतुन मी म्हणतो.
पण का च्या अयवजी वेगळे अक्षर