विनोदी लेखन – ५.
स्मित रेषा
चेहऱ्यावरील काही स्नायूंच्या ताणांची परिणिती म्हणजे भाव दर्शन. ओठांची चंद्रकोर स्मितरेषा तर ओठांचा चंबू चुंबनाचा! कपाळाला आठ्या म्हणजे त्रासिकपणा तर उंचावलेल्या भुवया ताणले्ल्या अपेक्षा!
हसऱ्या चेहऱ्र्याचे नेहमीच स्वागत होते. खेटर खाल्लेला चेहरा कोणाला आवडणार? कदाचित पडेल चेहऱ्याच्या रडेल प्राण्याला!
स्मितरेषा म्हणजे मोफतका माल. चेहऱ्याची किंमत मात्र वाढवतो. स्मित नकली व असली प्रकारात मिळते. तोंड देखले स्मित पाठ वळताच मावळते. मोहक स्मित आठवणीत राहते.
स्मितकारी ओठांना ध्वनी मिळाला की हास्य बनते. तोच अधोभागातून आला तर हास्यास्पद ठरतो. हास्याची लागवण आनंदीपणाला निमंत्रण असते. घरात आनंदाचे चांदणे फुलवते. तर नोकरी धंद्यात सलोखा घडवते. मैत्रीवर आपलेपणाचा शिक्कामोर्तब करते.
हास्याला विनोदाचे वाहन मिळाले की अनेकांच्या स्मितरेषा फुलतात. पु. ल., दामुअण्णा मालवणकर, जॉनी लीव्हर, सुनील पाल, राजू श्रीवास्तव यांच्या नुसत्या दर्शनाने पोट गदगदायला लागते. पोटाला व्यायाम मिळतो. भल्यामोठ्या तोंदाच्या लोकांना जग हसते. त्यांना जगाकडे बघून हसायला व्यायामप्रेमी हास्यक्लबचे सदस्य बनावे लागते.
काही जबड्याचे विश्वदर्शन करत हसतात तर काहींना विचित्र दंतपंगतींमुळे तोंडासमोर हात धरावा लागतो. काहींना चुटकुले, जोक सांगताना स्वतः हसायचे नसते याचा विसर पडतो. काहींना माहिती असलेला विनोद असेल तर आधीच हसायला येते. तर काहींची टयुब पेटायला उशीर लागतो. तोवर ते बळेबळे हसून वेळ साजरी करतात.
सरदारजी लोकांना नेहमी सावध राहावे लागते. कोण केंव्हा त्यांच्यावर जोक रचेल नेम नसतो. पंजाबात एका रेल्वेस्टेशनवर पटरीवर अनेक सरदारजी गाडीखाली चेंगरून मेले. एक सरदार मात्र वाचला. लोकांनी त्याला विचारले, “हे कसे काय झाले? तो म्हणाला, “सगळी चूक त्या अनौन्सरची होती. त्याने अनाउंन्स केले की की आज गाडी ४ नंबर प्लॅट फॉर्मवर येत आहे”. ते एकून सर्व सरदार पटपट पटरीवर कुदले. तेवढ्यात गाडी त्यांच्या वरून गेली. ते मेले. मी जीव द्यायला पटरीवर पडलो होतो. मला फलाटावर छलांग मारावी लागली. पण गाडी पटरीवर आली अन् मी फुकट वाचलो.
एकदा सर्व सरदारजींनी ठरवले का आपली फार चेष्टा होते. यावर उपाय करण्यासाठी त्यांनी एक अधिवेशन भरवले. कुठल्याही तऱ्हेची चूक राहू न देता, चोख अधिवेशन पार पडले. लोक परतीसाठी स्टेशनवर जमा झाले. तेवढ्यात एक सरदार घाईघाईने प्रत्येकाला पुड्या वाटत सुटला व म्हणत होता, “जेवणात थोडे नमक कमी होते ते वाटतोय. उगाच तेवढ्याने कोणी खोट काढायला नको”!
प्रतिक्रिया
17 Sep 2009 - 7:15 pm | सखाराम_गटणे™
मला वाटते सरदारजीवर विनोद करणे बंद करायला हवे.
हा कायद्याने गुन्हा आहे.
17 Sep 2009 - 7:18 pm | दशानन
>>हा कायद्याने गुन्हा आहे.
काही तरीच ... ठोकायचं म्हणून लिहला काय :?
**
बाकी ओक साहेब बदल सुखद !
छान वाटलं... जरा मोठे लेख लिहा ना.. वाचायला पण आनंद होईल.
17 Sep 2009 - 7:27 pm | सुबक ठेंगणी
बाकी ओक साहेब बदल सुखद !
छान वाटलं... जरा मोठे लेख लिहा ना.. वाचायला पण आनंद होईल.
अवांतरः हे वाचून अंमळ गाजलेल्या "गाय" ह्या निबंधाची आठवण झाली;)
17 Sep 2009 - 7:38 pm | क्रान्ति
स्मितरेषा म्हणजे मोफतका माल. चेहऱ्याची किंमत मात्र वाढवतो.
वा! सही! :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
17 Sep 2009 - 8:43 pm | योगी९००
चेहऱ्यावरील काही स्नायूंच्या ताणांची परिणिती म्हणजे भाव दर्शन. ओठांची चंद्रकोर स्मितरेषा तर ओठांचा चंबू चुंबनाचा! कपाळाला आठ्या म्हणजे त्रासिकपणा तर उंचावलेल्या भुवया ताणले्ल्या अपेक्षा!
सही!!!!!!!
एका ट्रक चालकाला (सरदार नव्हे) अपघातामूळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. पोलिस प्रश्न विचारताना त्याला विचारतात, "काय रे एवढे मोठे झाड तुला दिसले नाही..? कसा काय धडकलास त्या झाडावर..? काय झोपला होतास काय..?"
चालक : "नाही साहेब !! मी एका रस्त्यावर लिहीलेला मोठ्या बोर्डवरचा सुरक्षा संदेश वाचत होतो."
पोलिस : "एवढे काय महत्वाचे लिहीले होते त्या बोर्डावर..?"
चालक : "नजर हटी दुर्घटना घटी"
खादाडमाऊ
17 Sep 2009 - 9:15 pm | प्राजु
सरदारजीचा जोक आवडला.
बदल खरंच सुखावह आहे. सुठें म्हणते तसं लेखातील वाक्य रचना वाचून "गाय" निबंध आठवला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Sep 2009 - 1:26 am | mahalkshmi
लेख छान आहे. 'विनोद ' यावरच जास्त लिहिले असते,तर आणखी मजा आली असती.सरदारजीचे विनोद आता खरच बन्द करायला हवेत.चि.वी.जोशी,पु.ल.देशपान्डे किन्वा मन्गला गोड्बोले यान्च्या सारख्यानचे लेख वाचताना नकळतच हसु येते.चेहरा आनन्दी होतो.
18 Sep 2009 - 7:56 am | सहज
धन्यवाद ओकसाहेब आमची नाडी ओळखुन लेखन केल्याबद्दल :-)