हो. करंज्या, बेसनलाडू, चकली, मोदक हे मी आणि लेकीनं मिळून केले. आदल्या नैवेद्याची अंबाडीची भाजी-भाकरी, मटकीची उसळ हेही मीच केलेलं. फक्त दुसर्या नैवेद्यातली पुरणपोळी, १६ भाज्यांची मिश्र भाजी, आंबील, मसालेभात, पालकाची दाळभाजी, रवा-बेसन लाडू, चिंचेची चटणी, वडा हे आचार्यानं बनवलं.
सजावट लेकींची. मी गौरींना साड्या नेसवून मुखवटे बसवून देते, दागिने घालणं आणि छोट्या बाळांना तयार करणं हे काम लेकींचं. साड्यांची निवडही त्यांचीच.
खरंच गं...खूप सुंदर सजल्या आहेत गौ-या. तुझ्या लेकींना सांग सुंदर झालिये सजावट.
मला देवांच्यात पण नातेसंबंध जपले जातात ही गोष्टच खूप आवडते. सोन्यामोत्याने नटलेली माहेरवाशीण, तिच्या स्वागतासाठी केलेलं तिच्या आवडीचं जेवण अशा नातं जपणा-या गोष्टी किती आनंद देतात नाही!
जवळजवळ एका वर्षाने बाप्पा आणि गौरी भेटल्यावर त्यांच्या किती गप्पा होत असतील असं मला नेहमी वाटतं.
हे सगळं मी हे फोटो बघून imagine केलं आणि खूप सही वाटलं.
तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि दाळं घालून केलेली सुकी चटणी आहे. आणि करंजी पण आहे. गौरी मांडल्यावरचा नैवेद्य अंबाडीची भाजी, भाकरी, चटणी, उसळ आणि करंजी असा असतो. गणपतीला बेसनलाडू आणि मोदक.
सोलापूरी माझ्या घरीसुद्धा (आई-आण्णांकडे) गणपती आणि लक्ष्मी असतात. काही फोटो..
बाप्पांसाठी यावेळी आण्णांनी घरीच पालखी तयार केली होती.
गणपतीबाप्पाच्या दोघी बहिणी यावेळी बाप्पांना भेटायला येतात अशी समजुत आहे. आमच्याकडे त्यांना लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे संबोधले जाते. अलक्ष्मी म्हणजे अवदसा, यावेळी वर्षातुन एकदाच तिचीही पुजा केली जाते जेणे करुन वर्षभर तिची खप्पामर्जी न होवो.
सस्नेह
विशाल
*************************************************************
प्रतिक्रिया
29 Aug 2009 - 6:00 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मिरजेच्या आमच्या घरची गणपतीची मुर्तीही अशीच असायची.
(१ला फोटो).मला परत लहानपणीच्या काळात गेल्यासारखे वाटले.
महालक्ष्मींचे दागिने,सजावट, खुपच सुरेख....
29 Aug 2009 - 6:08 pm | माधुरी दिक्षित
फारच सुरेख आहेत गौरी आणि गणपती, एकदम प्रसन्न वाटल !!
29 Aug 2009 - 6:13 pm | दशानन
एकदम प्रसन्न वाटलं !!!!!
*
मोदक.................. मोदक... मोदक... :(
29 Aug 2009 - 6:45 pm | मीनल
खरोखरच छान सजावटआहे.
प्रसन्न वाटल मूर्ती पाहून.
बाप्पा तर मस्तच आहेत .
खाऊ????????? काय बोलाव? फक्त खायला सुरवात करावी.
मीनल.
29 Aug 2009 - 6:54 pm | परिकथेतील राजकुमार
शॉल्लीड ग क्रांती तै !!
त्या मिठाया वगैरे घरी केल्या का तु ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
29 Aug 2009 - 7:32 pm | क्रान्ति
हो. करंज्या, बेसनलाडू, चकली, मोदक हे मी आणि लेकीनं मिळून केले. आदल्या नैवेद्याची अंबाडीची भाजी-भाकरी, मटकीची उसळ हेही मीच केलेलं. फक्त दुसर्या नैवेद्यातली पुरणपोळी, १६ भाज्यांची मिश्र भाजी, आंबील, मसालेभात, पालकाची दाळभाजी, रवा-बेसन लाडू, चिंचेची चटणी, वडा हे आचार्यानं बनवलं.
सजावट लेकींची. मी गौरींना साड्या नेसवून मुखवटे बसवून देते, दागिने घालणं आणि छोट्या बाळांना तयार करणं हे काम लेकींचं. साड्यांची निवडही त्यांचीच.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
29 Aug 2009 - 6:57 pm | अवलिया
सुरेख !
अतिशय प्रसन्न वाटलं... ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
29 Aug 2009 - 7:37 pm | बिपिन कार्यकर्ते
खरंच छान!!! प्रसन्न वाटलं.
बिपिन कार्यकर्ते
29 Aug 2009 - 9:19 pm | मदनबाण
सुरेख... :)
मदनबाण.....
Stride 2009 :---
http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
29 Aug 2009 - 9:30 pm | अनामिक
सुंदर फोटू क्रान्ति तै...
-अनामिक
29 Aug 2009 - 11:59 pm | शुभान्गी
आज सातासमुद्राच्या पलिकडे गौराईचे दर्शन झाले.......खूप आभारी आहे.......खूप प्रसन्न वाट्ले............
30 Aug 2009 - 9:34 am | विंजिनेर
मस्त सजल्या आहेत गौरीबाय ...
30 Aug 2009 - 10:45 am | स्वाती दिनेश
प्रसन्न वाटलं गौरी गणपती पाहून..
स्वाती
30 Aug 2009 - 12:23 pm | पाषाणभेद
छान लेख व फोटो आहेत.
मला आपण लेख कवीता आहे की काय असे वाटले. :-)
आपला देव्हारा पुर्व - पश्चिम आहे ना? हो ना? मी बरोबर ओळखतो.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
30 Aug 2009 - 12:40 pm | मराठमोळा
वा!!! खुप सुंदर फोटो आहेत.
प्रसाद तेवढा पाठवुन द्या पाहु लवकर.. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
31 Aug 2009 - 9:05 am | विसोबा खेचर
जय हो! :)
31 Aug 2009 - 9:14 am | प्राजु
केवळ सुरेख!!!
धन्यवाद क्रांती. खूप छान वाटलं फोटो पाहून.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
31 Aug 2009 - 12:23 pm | सुबक ठेंगणी
खरंच गं...खूप सुंदर सजल्या आहेत गौ-या. तुझ्या लेकींना सांग सुंदर झालिये सजावट.
मला देवांच्यात पण नातेसंबंध जपले जातात ही गोष्टच खूप आवडते. सोन्यामोत्याने नटलेली माहेरवाशीण, तिच्या स्वागतासाठी केलेलं तिच्या आवडीचं जेवण अशा नातं जपणा-या गोष्टी किती आनंद देतात नाही!
जवळजवळ एका वर्षाने बाप्पा आणि गौरी भेटल्यावर त्यांच्या किती गप्पा होत असतील असं मला नेहमी वाटतं.
हे सगळं मी हे फोटो बघून imagine केलं आणि खूप सही वाटलं.
1 Sep 2009 - 7:06 pm | क्रान्ति
धन्यवाद मंडळी. जालाच्या आणि मराठी संकेतस्थळांच्या सौजन्याने यंदा प्रथमच घरचे देव आणि गौरी-गणेश शब्दशः विश्वरूप झाले! :)
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
1 Sep 2009 - 8:04 pm | सूहास (not verified)
त्या ताटात ज्वारीच्या भाकरी बरोबर , मटकी व भाजीखेरीज दोन आयटम कसले आहे..एक तर चटनी वाटते...
सू हा स...
1 Sep 2009 - 9:25 pm | क्रान्ति
तीळ, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि दाळं घालून केलेली सुकी चटणी आहे. आणि करंजी पण आहे. गौरी मांडल्यावरचा नैवेद्य अंबाडीची भाजी, भाकरी, चटणी, उसळ आणि करंजी असा असतो. गणपतीला बेसनलाडू आणि मोदक.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
2 Sep 2009 - 5:52 pm | विशाल कुलकर्णी
सोलापूरी माझ्या घरीसुद्धा (आई-आण्णांकडे) गणपती आणि लक्ष्मी असतात. काही फोटो..
बाप्पांसाठी यावेळी आण्णांनी घरीच पालखी तयार केली होती.
गणपतीबाप्पाच्या दोघी बहिणी यावेळी बाप्पांना भेटायला येतात अशी समजुत आहे. आमच्याकडे त्यांना लक्ष्मी आणि अलक्ष्मी असे संबोधले जाते. अलक्ष्मी म्हणजे अवदसा, यावेळी वर्षातुन एकदाच तिचीही पुजा केली जाते जेणे करुन वर्षभर तिची खप्पामर्जी न होवो.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"