मन्या हा साधासरळ गृहस्थ व निर्व्यसनी म्हणून सर्वांना परीचित वयाच्या एकविसाव्या वर्षीच वडिलांनी त्याचे लग्न लावून दिले.कामाला जाणे तिथून घरी येणे हे त्याचे नित्याचेच. पण या मन्याला घरच्यांना न सांगता अचानक सच का सामना मध्ये जायची दुर्बुध्दी होते आणि टिवी वर त्याचे दृश्य झळकू लागतात १) डान्स बार मे जाते थे क्या ? २) आपने कभी वेश्या के साथ शारीरीक संबंध बनाये है क्या? घरच्यांना टिव्ही वर मन्याला पाहून धक्का बसतो सतत मन्याचे दृश्य टिवी वर दिसत असल्याने आणि नको त्या प्रश्नाला मन्या सामोरा गेल्याने मन्याची बदनामी तर होतेच मन्याचा बाप मन्याला बदड बदड बदडतो बायकोही नाही नाही ते बोलते मन्याला वाटते झक मारली नि तिथे गेलो. चाळीमध्ये,नाक्यानाक्यावर , ऑफीसमध्ये मन्याला तोंड दाखविणे मुश्कील होते. अखेरीस टिवीवर सच का सामना हा शो सुरू होतो आणि मन्या निवेदका समोरील सीट वर बसतो आणि सुरू होते मन्यावर प्रश्नांची सरबत्ती प्रश्न पहीला - मन्याजी आपकी हिंदी और इंग्लिश भाषा बहुत ही खराब है ? मन्या म्हणतो “हा ” निवेदक विचारतो क्यो ? मन्या खरखर सांगतो लहानपणापासून मराठी माध्यमात शिकल्याने व पुढे फक्त मराठी मराठी केल्याने इतर भाषेत मागे पडलो प्रश्न दुसरा - क्या आप कभी सिगारेट और दारू पीते है ? मन्या म्हणतो जी “ हा ” , निवेदक विचारतो लेकीन आपने ये बात अपने घरवालोसे क्यो छुपाई यावर मन्या म्हणतो लहानपणासूनच माझ्यावर घरच्यांचा प्रचंड विश्वास ते सर्वांना सांगत की आमचा मन्या खुप सभ्य ,देवमाणुसच हो त्यामुळे माझी तशी प्रतिमा बनत गेली आणि मी माझी व्यसने लपुनछ्पुन करू लागलो सिगारेट पिउन झाल्यावर तिचा वास न येण्यासाठी मी मिंटच्या गोळ्या खाऊ लागलो दारूची तलफ भागविण्यासाठी पिकनिकच्या नावाने बाहेर जाऊ लागलो निवेदक त्याला थांबवतो अब तिसरा प्रश्न आपने अभी पिकनिक के बारे मे कहा उसीसे जुडा हुआ एक प्रश्न क्या आप पिकनिक के नाम पर डान्स बार मे जाते थे क्या ? मन्या चे उत्तर “हो ” निवेदक विचारतो क्यो मन्या म्हणतो मला कॉलेजमध्ये मुलींशी बोलायला मैत्री करायला खुप वाटायचे पण हिंम्मत तर व्हायचीच नाही शिवाय मामाच्या मुलीशीच लग्न करायचे यामुळे घरच्यांची माझ्यावर करडीनजर पुढे मी मित्रांकडून डान्सबारबाबत ऐकले तिथे गेलो या मुली पटकन कोणाशीही मैत्री करतात हातात पैसे असले की बस झाले नाही तर कॉलेजात एखादा मुलीपुढे मैत्रीचा हात पुढे करून बोलायचे कसे या कल्पनेनेच मला दरदरून घाम फुटायचा. निवेदक मन्याला चौथा प्रश्न विचारतो क्या आप ने कभी वेश्या के साथ शारीरीक संबंध बनाये है क्या? मन्या म्हणतो नही निवेदक म्हणतो क्यो ? मन्या भडकतो म्हणतो तुझ्या तर तुला अजुन दुसरे प्रश्न विचारेवेसे वाटत नाही काय साला मगासपासून हेच प्रश्न. निवेदक म्हणतो मन्याजी तुम्हाला कळणार नाही माणुस जे धंदे आपल्या घरच्यांना न सांगता चोरून करतो तेच प्रश्न आम्ही विचारतो शेवटी सत्याला सामोरे जाणे कठीणच असतो पाहा तेवढ्यात मन्याला स्वतःच्या बापाची,बायकोची,चाळीतील आपल्या प्रतिमेची आठवण येऊ लागते त्याला दरदरून घाम फुटू लागतो पाहतो तर………. मन्याची बायको त्याला झोपेतून उठवत असते आणि मन्या उठतो मनातल्या मनात बोलतो काय नको तो सच का सामना आपला झुठ का सामनाच बरा.
प्रतिक्रिया
18 Aug 2009 - 1:13 pm | मिसळभोक्ता
विरामचिन्हांचा उपयोग भावला.
-- मिसळभोक्ता
18 Aug 2009 - 1:18 pm | अवलिया
मन्याच्या जागी विकी टाकुन पाहीला. लेख आवडला.
परिच्छेद न पाडता सर्व वाक्ये समान स्तरावर आणण्याचा वैचारिक विचार स्तुत्य !
पु ले शु !!
--अवलिया
18 Aug 2009 - 1:20 pm | टारझन
मिसळभोक्तानं माझी प्रतिक्रिया चोरली आहे ! विरामचिन्हांचा अत्तिशय योग्य वापर केल्याने लेख हृदयाला भिडण्यात यशस्वि झाला आहे ! लेखकाचं अभिणंदण !
बाकी विकी-पिडिया ची आठवण झाली !
-(पिडीत) टारझन
18 Aug 2009 - 2:00 pm | विकि
मिसळाभोक्ता,अवलिया आणी खास करून टारझन रावांना खुप खुप धन्यवाद.मिसळ भोक्ता व अवलिया म्हणतील आम्हीही अतिशय छान प्रतिक्रिया दिली पण खास करून टारझनरावांनाच का ? तुम्हाला माहीत असेलच की फार पुर्वी मिपावर असलेला टारझनराव आणि आमच्यातील वैचारीक संघर्षाचा जुना इतिहास सर्वांनाच ज्ञात आहे . टारझनरावांनी लेखाला प्रतिक्रिया दिली बरे वाटले शेवटी सच का सामना आम्हीही स्विकारला आहेच की.
सध्या खुप खुप सुधारलेला
विकि
18 Aug 2009 - 2:18 pm | अवलिया
सध्या खुप खुप सुधारलेला
स्वघोषित प्रमाणपत्र चालत नाही भाउ ;)
--अवलिया
18 Aug 2009 - 8:05 pm | चतुरंग
टार्या, ह्याला घेरे एकदा बोळे क्लबात! ;)
(जॅनिटर)चतुरंग
18 Aug 2009 - 9:04 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
बापरे... एवढा जड शब्द .... रेड्यामुखी वेद म्हणवलेल्याची दंतकथा नसावी ;)
बाकी प्रथमंच जातपात सोडून लिहील्याबद्दल लेखकाचं अभिणंदण ! :)
@ चतुरंग ... बोळाक्लब मधे टाकू शकतो , बोळेक्लब .. उम्म्मह्म्म्म !!!
- (नाकाचा बोळा तुंबल्यास लावायचा) विक्स वेपोरब
18 Aug 2009 - 8:24 pm | प्रकाश घाटपांडे
झुट या सच हा सामना प्रवृत्तींमधला आहे . एकाच व्यक्तीत तो असु शकतो. या सामन्याचा निकाल मात्र आपली सदसदविवेकबुद्धीच देउ शकते
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
18 Aug 2009 - 8:30 pm | विकास
खरं म्हणजे, विकीसाहेबांचा लेख म्हणल्यावर आधी मी विकी"पिडीत" होणार आणि मग मी विकीला पिडीत करणार असे वाटले ;) पण छ्या! एकदम भ्रमनिरास झाला! म्हणूनच हा लेख एकदम आवडला :-).
तो सच का सामना हा कार्यक्रम एकदाच बघावा लागला. सवंग कार्यक्रम आहे असे वाटले. :-(
18 Aug 2009 - 11:12 pm | विकि
घाटपांडे साहेब आणि विकास राव यांचे आभार.
18 Aug 2009 - 11:24 pm | योगी९००
लेख आवडला ..
(त्या म्हातार्याचा सच का सामना बघितला का? आम्हाला बघताना लाज वाटली.)
खादाडमाऊ